फसवा एक मोह भाग 2 Repost

..


त्याने आता ठरवले इथून पुढे अशी मुलगी शोधायची जी जास्त आगाऊ तर नसेलच पण तिला सहानुभूतीची गरज असेल...आणि तशी मुलगी म्हणजे सुरभीच होती सध्या त्याच्या नजरेत... आता रेवा दूर गेली होती...मग तीने झालेला प्रकार जरी सुरभीला सांगितला तरी मी मात्र सुरभीला रेवाच कशी वाया गेलेली मुलगी आहे हे सांगेन..

सुरभी पुरती त्याच्या जाळ्यात अडकली होती..तीला पूर्ण अडके पर्यंत त्याने काहीच सांगितले नाही... असे की तिला लग्नाशिवाय काही पर्याय रहाणार नाही..

त्याने तिला नेमके लग्नाच्या आधीच सांगितले की त्याचे आधीच लग्न झाले होते.. पण त्याने लपून ठेवले यातुन त्याच्या इराद्यावरच शंका निर्माण झाल्यावर तिने, विचार करायला वेळ मागितला आणि ऐनवेळी लग्न पुढे ढकलावे ...मला सगळे पटले असे वाटेने तेव्हा लग्न करू...तोपर्यंत आपण पुढे पाऊल नको टाकायला... ती त्याची आता चौकशी करू लागली होती... हे त्याला आवडले नाही तेव्हा त्याला वाटले ह्या ही गरीब गायीला रेवासारखे शिंग फुटता कामा नये... नाहीतर ही पण हातची जाईल आणि पैसे ही...

त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली..आणि त्यांचे दोघांचे video सगळ्या कॉलेज भर करेन असे सांगून तिला कात्रीत पकडू लागला...college teacher and students
च्या siteवर पोस्ट टाकेन आणि तुला एका रात्रीत बदनाम करेन असे बोलू लागला.... तिला आता एका दिवसाची मुदत दिली होती...नाही जमल्यास तो हा video viral करेन....

ती साधी सरळ होती,तिला आता बदनामीची भीती वाटत होती,घरी बाबाला माहीत झाले तर मी त्यांना तोंड दाखवू शकणार नाही,इकडे पोलीसा मध्ये तक्रार करू शकत नाही... कॉलेज ही सोडता येणार नाही..आता काय एकच उपाय असावा का...ह्या अश्या माणसासोबत लग्न करावे का...पण केले नाही तरी मरण...केले तरी मरण अशी गत झाली होती...

तिने त्याला सकाळीच फोन करून कळवले होते हो मी ,मी तयार आहे लग्नाला तुझ्यासोबत.... ती

ये बात,आता कशी तयार केली मी तुला लग्नाला,आता तू नटून ये मग आपण देवा पंडितांच्या साक्षीने लग्न लावू.....ये ग बाई माझे..

इकडे त्याने तिला शहरातील हद्दीच्या बाहेर एका मंदिरात बोलावले... एक वकील बोलवला इकडे फेरे घेतले आणि तिकडे खोट्या सह्या करायला लावल्या पण पुरावा म्हणून एक ही फोटो नाही की त्याच्या कडून तिच्या कडून कोणी नातेवाईक नाही... झाले लग्न गेला घेऊन घरी..

इकडे दोन दिवस झाले त्याने तिला घरी नेऊन..पण घरी ही कोण कशी कोणाची काहीच सांगितले नाही...तिला हॉल मध्ये बसून ठेवले.. इकडे तिने बाबाला फोन करून सांगितले की मी कॉलेजच्या कामा निमित्ताने मैत्रिणीच्या घरी आहे...लवकर येईल....पण दोनच चार,आणि चाराचे आठ दिवस झाले पण तिला त्याने तिच्या घरी ही जाऊ दिले नाही...ना घरात कोणती एक जागा दिली.... मग कोणी तरी कोंडी फोडली..विचारल्यावर सांगितले....मला हिच्या अडचणीमुळे हिला घरात आणावे लागले......तिचा नवरा ऐन वेळी पळून गेला हिला टाकून मग ही कुठे जाणार इतक्या रात्री म्हणून तिला आपल्या घरी आणले ,तीला दुसरा सहारा, घर मिळेपर्यंत ती इथे राहीन ,तिला खोली बिली काही नसली तर ती हॉल मध्ये राहीन..घरच्यांना आता त्याच्या ह्या बाहेरख्याली वागण्याचा त्रास होत होता,आणि वाटत होते की ह्या पोरी चांगल्या घरच्या असून ही कश्या ह्याच्या नादी लागतात...

ह्याला पण कळत नाही कोणाला घरात आणावे ते... इथे आपल्यालाच जागा कमी पडते त्यात ही बया येऊन बसली...तो लाख म्हणेन तिला घर मिळेपर्यंत राहीन पण हिला कळायला नको..हा लग्न झालेला बाबा आहे.. आणि आपण कसे ह्याच्या घरात पडून रहायच...कोणी बोलत नाही म्हंटले तर आपण होऊन निघाली असती कोणी... मान ना पान बसली येऊन...

आता महिना होऊन गेला होता,मग एक दिवस सगळेच तिच्यावर धावून गेले,म्हणाले त्याला कळत नाही पण तुला कळले पाहिजे लोकांच्या घरी कसे राहायला पाहिजे ते, चल निघ इथून..आताच्या आता घर सोड.... त्याच्या आईने तर हात उचलला,बायकोने तर तिचे समानच फेकले...तिला काही वाही बोलण्याचा तडाखा सुरू केला...

आता सुरभीला सत्य सांगण्याची ही चांगली संधी होती,तिने आता ठरवलेच की सांगायचे..