डॉमिनाटिंग नेचर एक विकृती

..

डॉमिनाटिंग नेचर म्हणजे काय??

मी पणा,मी म्हणेल ती पूर्व दिशा,

मी उठ म्हंटल की उठायचं,मी बस म्हंटल की बसायचं.


समाजात वावरत असताना असे महाभाग बघायला भेटतात मग ती स्त्री असू शकते किंवा पुरुष ही.


सरिताच्या नवऱ्याचा लग्नानंतर चा फर्स्ट बर्थडे. सरिता ने ठरवलं की आपण छान सेलेब्रेशन करूया. सगळ्यात आधी सासूबाईंशी बोलून घेऊया,


"आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत."


हा, बोल ग, काय म्हणतेस?


"आई, यांचा बर्थडे आहे परवा, तर मी विचार करत होते, आपण केक आणून छान सेलेब्रेशन करूया. नाही म्हणजे तुमची परमिशन असेल तर." गोड हसत आणि थोडं घाबरत सरिताने सासूबाईना विचारलं.


"ठीक आहे करूया."सासूबाई ने हसून तिला उत्तर दिले.


सरिता ने छान डेकोरेशन केले, छान केक आणला, केक कटिंग च्या वेळेस तिने सगळ्यांना हॉल मध्ये बोलवले पण सासरे आलेच नाहीत.


"आई, \"पपा नाही आले.थांबा मी परत बोलावून आणते. "आणि सरिता सासऱ्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेली.


"पपा, चला केक कट करूया. "तिने हसत सासऱ्यांना आवाज दिला.


"कोणाला सांगुन तु सेलेब्रेशन चा निर्णय घेतलास?"


"पपा, आईंना विचारून सगळी तयारी केली आहे मी. हवं तर आईंना विचारा." आता सरिता पुरती घाबरली होती.


"माझं घर आहे हे, मला विचारल्याशिवाय इथे काहीही करायचं नाही. हे तुझ्या बापाचं घर नाही, वाटेल तस वागायला. इथून पुढे मला विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही. जा आता मला नाही यायचं."


सरिता ने काय विचार केला होता आणि काय झाले होते.


तिने रडतच स्वतःची रूम गाठली. नवरा ही तिच्या पाठोपाठ रूम मध्ये आला.

सरिता ला त्यांनी जवळ घेतले, "सरू रडू नको ग प्लीज. एक वेळेस सेलेब्रेशन नाही झाले तरी चालेल, केक कट नाही झाला तरी चालेल पण माझ्या बर्थडे दिवशी तुझं रडणं नाही सहन होणार ग मला. प्लीज सरू माझ्यासाठी शांत हो."


तिने कसबसे स्वतःचे रडणे थांबवले. "सॉरी,माझ्यामुळे झाले हे सगळे. मला पपांना विचारायला हवं होत. ऍक्च्युली, आमच्या घरात बाबा अश्या गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही करत. सो, मला वाटले इथे ही." तिने मुसमूसत त्याला तिची बाजू सांगितली.


"सरू, तुला आणखी इथले लोक, त्यांचं वागणं, बोलणं माहिती नाहीये राणी, म्हणुन तुला बोललो होतो नको करू सेलेब्रेशन वगैरे ."


"चल रडणं थांबव. मी आलोच."तिचे डोळे पुसून तो रूम बाहेर निघून गेला.


सरिता आता थोडी शांत झाली होती.


राजेश हातात केक घेऊन रूम मध्ये आला." हैप्पी बर्थडे टु मी "म्हणतच केक तिच्यासमोर ठेवला.


दोघांनी मिळून राजेश बर्थडे सेलेब्रेट केला.


प्रसंग 2


रविवार असल्यामुळे राजेश ने सरूला आपण बाहेर फिरायला जाऊ असं सांगतलं.

सरू ही खुप खुश झाली. बाहेर फिरता येणार आणि थोडा कॅलिटी टाइम स्पेंड करता येईल.


" आई मी यांच्यासोबत बाहेर फिरायला जात आहे, जाऊ ना. "


" हो जा. "सासूबाई बोल्या


इकडे सासरे रागाने लाल झाले. मला न विचारता बाहेर गेलेच कसे.

त्यादिवशी ते न जेवता झोपले.

खुप वेळा मनवल्यानंतर,खुप सॉरी बोलल्यानंतर मग जेवण करायला तयार झाले.


त्यांच्या हा माझे ते खरं बोलण्याच्या सवयीमुळे सरिता कोमेजून जाऊ लागली. सुन सासऱ्याच्या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ लागली.

सासरे रोज सरूच्या चुका शोधू लागले. कधी ती चुक करते आणि कधी आपण तिला बोल लावू.

रोज रोज तेच तेच बोलणं, तेच टोमणे, तोच अहंकारी दरारा सरिताला सगळं असह्य होऊ लागलं होतं.


तिने त्यांचा वागण्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तिला डबल त्रास झाला.


सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून सरिताने राजेश सोबत घर सोडले.


हे लोक वाटच पाहत असतात की समोरचा व्यक्ती आपल्या त्रासावर कधी रिऍक्ट करेल. आपली रिऍकशन त्यांना आसुरी आनंद देऊन जाते.

इतकावर नाही थांबत हे लोक .ते लोक स्वतः तर पेसेंन्सलेस असतात पण वारंवार समोरच्याचा पेशंन्स चेक करत असतात.


असे बरेच लोक आपल्या आजूबाजूला आपल्या कामाच्या ठिकाणी,आपल्या घरात असतात असा लोकांशी डील कस करायच कळत नाही.


माझा सिम्पल फंडा..ओम दुर्लक्षाय नमः ...

किती ही बडबड केली तरी, किती ही काही ही केल तरी, इग्नोर करायच.


डॉमिनेशन हा एक आजारच आहे कारण दुसऱ्याच्या त्रासात स्वतःला ख़ुशी मिळवणं म्हणजे एक प्रकारची विकृतीच .


तुमच्या कडे काही सल्ले असतील असा लोकांशी  डील कसं करायचं प्लीज सांगाल?

आजही समाजात असे लोक आहेत. असे लोक फक्त 70/80/90मध्ये होते असं बिलकुल नाहीये.

आजच्या काळात असे लोक बाहेर मोठं मोठ्या बढाया मारतात आणि घरात आल्यास घरातल्या लोकांवर अत्याचार करतात.