जाणीव आईकडून अहो आईकडे आल्याची

..

आई आणि अहो आई.... 




1)वेळ 8:30am-

"अग बाळा,एवढया लवकर का उठलीस? पिल्लू झोपलं आहे तोपर्यंत झोपायचं ना.सासरी नाही भेटत हम्म असं झोपायला. "आई 


"काहीही काय आई, मी नाही ऐकणार कोणाचं, मी पिल्लू सोबत झोपणार आणि तिच्यासोबतच उठणार. "स्वाती 


वेळ 7am-

"अग स्वाती, बाळ झोपला आहे तोपर्यंत काम आवरून घ्यायचं गं लवकर उठून. कितीही वेळ नाही झोपायचं, काय बाई आजकालच्या पोरी,सासूबाई च सकाळी 7 वाजता बडबड चालू होती."


त्या वेळेला आईकडून आपण  अहो आईकडे आलो आहोत जाणवलं.


2)"आई,जाम अंग दुखतंय बघ,ताप पण आला आहे.बसं ना माझ्याजवळ, तू जवळ नसली की चिडचिड होते.प्लीज बस ना माझ्याजवळ" स्वाती.


आईने स्वातीच डोकं मांडीवर घेतलं आणि बोलली "हो बाळा आहे मी तुझ्याजवळ. "


"अरे स्वाती,भांडी नाही घासली अजून,8 वाजलेत.सासूबाई रूममध्ये येऊन ओरडल्या."

"अहो आई डोकं दुखतंय आणि ताप पण आला आहे, म्हूणन झोपले. "स्वाती 

"बर एक काम कर,भांडी घासून दे सद्यापूर्ती. थोडा  आराम करून बाकी काम आवर."

दुखत असल्यास आईला जवळून हलू न देणारी ती. आज दुखत असून पण घरातील सगळी काम ती करत होती.

तेव्हा जाणवलं ,आपण आईकडून अहो आईकडे आलो आहोत.


3)"आज पिल्लू बाबाकडे होती आणि त्यांच्या कडे रडू लागली.आईने पिल्लूला बाबाकडून  आणून मला दिली आणि बोली अहो बाळ रडत असल्यास,त्याचा आईकडे द्यावे,लगेच शांत होत बाळ "आई.


"आज पिल्लू परत मला बघुन रडत होत. मी चपाती बनवत होते. त्याच रडणं पाहून,मी स्वतः त्याचाकडे गेले."


सासूबाई ओरडल्या," मी घेतलंय त्याला,काम आवर तुझं. रडू दे थोडा वेळ त्याला काही होत नाही थोडं रडल्यास "


तेव्हा परत जाणवलं आपण आईकडून अहो आईकडे आलो आहोत.



आई जवळ असल्यास आपण तिला खूप रागे भरतो.दूर गेल्यास तिची आठवणं येते आणि तिची किमत ही कळते.