Jan 26, 2022
नारीवादी

हक्काचं घर

Read Later
हक्काचं घर

हक्काचं घरनीता  अगदी लहानपणापासून आजीचं  बोलणे ऐकायची की," तू तर काय परक्याचे धन आहेस.चार दिवस राहणार आणि सासरी जाणार. तिला हे समजतच नाही की, ज्या घरात आपण जन्माला आलो ते घर आपलं का नाही,आपण परक्याचं धन का? "

हळूहळू ती मोठी होऊ लागली आणि तिला तिच्या आजीचे म्हणण्याचा अर्थ कळू लागला.

सगळ्या मुलींसारखं तिच्यासाठी ही उपवर मुलगा पाहून तिचे लग्न करण्यात आले.


उदय  चांगला मुलगा होता. शिकलेला होता. चांगला नोकरी वरती होता.घरचे चांगले होते.

नीता चे लग्न तिच्या वडिलांनी खूप थाटामाटात करून दिले.भरपूर सारा हुंडा, भरपूर सारी भांडी कोंडी,चमचा पासून ते मोठ्या डब्यापर्यंत सगळं दिल तिला. एक नवीन संसारासाठी जे जे लागत ते सगळं तिच्या वडिलांनी तिच्यासाठी भेट म्हणुन घेतली होती.

नवीन संसार चालू होतो आणि सगळ्यांच्या संसारासारखं

नव्याचे नऊ दिवस संपतात आणि खरा संसार तिला कळायला लागतो.

बाकी सगळ्यांसारखं तिच्या घरात ही कुरबुर होत असायची.

म्हणतात ना सगळ्यांच्या घरी मातीच्या चुली.

एकदा स्वपाक घरामधली जुनी भरणी काही कामाची नव्हती आणि उगाच जागा व्यापून बसली आहे म्हणून तिने ती उचलून दुसरीकडे ठेवली.


भरणी ची जागा बदलली गेल्यामुळे सासूबाई ना खूपच राग येतो.

इतके वर्ष त्या किचन ची राणी त्या होत्या आणि अचानक काल आलेली मुलगी त्यांची जागा घेऊ पाहतेय.त्यांच्या वस्तू न विचारता उचलून दुसरीकडे ठेवते, हे काही त्यांना पटलं नाही.

त्यांनी लागलीच तिला आवज दिला,

"नीता, ये नीता जरा इकडे ये??"

काय झालं आई, काही हवंय का??

नीता तू ही भरणी का उचलली इथून??

आई तिचा उपयोग आपण करत नाहीत आणि उगाच तेवढी जागा व्यापून जाते. त्या जागी दुसरं काही ठेवता येईल म्हणुन काढली.


मला विचारायचं ना नीता??

सॉरी आई, मला वाटलं उपयोग नाहीये तर ठेवून द्यावी.

त्या दोघींचा आवाज ऐकून सासरेबुवा तिथं आले, काय झालं नीता? काय कालवा कालव करत आहात दोघी??


अहो, बघा बरं नीता ने मला न विचारता माझी भरणी कुठे तरी उचलून ठेवली. वरतून मलाच म्हणते उपयोगाची नव्हती म्हणुन ठेवून दिली.

तस नाही बाबा, आक्च्युली मी ते.....

ती काही बोलण्या अगोदरच सासरे तिच्यावर ओरडले, हे बघ नीता हे घर आमचं आहे इथे आम्ही म्हणेल तसंच राहायचं.

इथून पुढे किचन मधील कुठलीच वस्तू तुझ्या सासूला विचारल्याशिवाय उचलायची नाही. अगदी चमचा ही.

तीच किचन आहे हे.

नीता ने गुपचूप खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं. डोळ्यातील अश्रू ना कसबसं डोळ्यात च रोकलं.

तिला खूप दुःख झालं पण ते न दाखवता ती प्रेत्येक गोष्ट सासूबाईंना विचारून करू लागली. विषय वाढू नये म्हणून ती सासू ला विचारून सकाळच्या चहा पासून ते रात्री च्या जेवण पर्यंत त्यांना च विचारायची.

ती हे करत असताना पण तिला सतत भीती असायची चुकून कुठली वस्तू ची जागा बदलेली तर सासू बोलेल.


ही सततची भीती, हे दडपण तिला आता नको वाटत होते. तिने या विषयावर नवरा शी बोलायचं ठरवलं. ती या घरची सून होती,हे घर तीच ही होते.

रात्री उदय  घरी आला. त्याला जेवण दिले. त्याचा मूड पहिला, चांगला वाटला तिला. त्याच

सगळा आवरून झालास, ती उदय ला बोली,

मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्यांनी मोबाईल मध्ये बघतच बोल म्हंटल.

तिने झालेला प्रकार उदय  ला सांगितला आणि त्यावर त्याच जे उत्तर आलं त्यांनी तिला भोवळ यायचं बाकी होत.


तो तिला बोला, ठीक आहे ना, ऐक ना आईबाबा च.

तसें ही लग्न करून तू या घरात आलीस सो अड्जस्ट तुलाच करावे लागेल, कारण हे तुझं घर नाहीये.

तुम्हा मुलींचं पण ना लग्न झालं नाही की आपसूक सगळे हक्क तुम्हाला तुमच्या हातात हवे असे अट्टहास असतात, असे म्हणून तो झोपी जातो आणि तिला ही झोपायला सांगतो.


ती झोपते पण तीच विचारचक्र चालू होत.

ती विचार करते किती इझिली तो बोला तू आलीस इथे. तुला अड्जस्ट करावे लागेल.

अरे लग्न झालापासून अड्जस्टच तर करतेय.

सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हा लोकांसाठीच तर करतेय सगळे. माझा विचार ही नाही केला मी आणि तुम्ही लोक म्हणत आहात माझं हे घर नाही.लग्नाच्या 2 वर्ष्यानंतर ही या लोकांनी मला आपलंस मानलं नाही.

तिला दुःख होत होत  की, तो तिला समजू शकला नाही. तिला सगळे स्वतःचा हातात नव्हतं पाहिजे फक्त स्वतःचा मनाने करण्याचा हक्क हवा होता. तिला फक्त ते घर तीचच  आहे.न भिता तुला वाटत तस कर असं नवरा कडून ऐकायचं होत. तिचा डोळयातून अश्रू वाहत असतात.रडत रडत तिला कधीतरी उशिरा झोप लागते.दुसरा दिवशी सकाळी ती लवकर उठते.मनाशी ठरवते आता हक्काचं घर घेतल्याशिवाय थांबायचं नाही.सगळं आवरून झाल्यास उदय  आणि घरच्याना सांगते, मला जॉब करायचा आहे.

घरचे तयार होत नाहीत पण उदय  त्यांना तयार करतो.

4 पैसे घरात येतील म्हणून पण सासूबाईंची अट असते की घरचे सगळे कामे तिनेच केले पाहिजे कारण सून आहेस तू या घरची आणि हे घर आता तुझंच आहे . ती मनात हसते आणि मनातच म्हणते काम पडल्यास घर माझे आणि हक्क दाखवायचा झाल्यास तुझ घर नाहीये हे.

तीच m com झालेलं होते त्या बेसिस वर तिला बँकेत नौकरी भेटते. नौकरी करत करत घर सांभाळत असते. काही वर्ष्यात 2 गोंडस बाळ ही तिच्या आयुष्यात येतात.

बाळंनंतर मात्र तिची तारेवरची कसरत सुरु होते.


फक्त नौकरी वरती  तिची स्वप्न  पूर्ण होणार नसतात.

ती अकाउंट च्या मुलांचं क्लाससेस घायला चालू करते. सुरुवातीला बोटावर मोजण्याईतकीच  मुलं असतात. नीता अकाउंट्स मध्ये खूप हुशार असते आणि हळूहळू मुलांची संख्या वाढत जाते आणि पैसेही चांगले जमू लागतात.

क्लास, मुलं, त्यांचं स्कूल, जॉब या सगळ्यामध्ये  घरातील काम  करण्यासाठी तिच्यात स्टयमिना राहत नव्हता.

घरात घर कामासाठी बायका लावते.या 10 वर्षात घरचे ही तिची मेहनत बघून बदलेले नसतात पण तिचा बाळांना छान सांभाळत असतात. तिला जास्त काही नको होत घरच्यांकडून, तिचा पिलाना सांभाळतात हेच खूप होते.


हे सगळं करत असताना ती मागच्या 10 वर्ष्यापासून 365 डे सेविंग च्यालेंज स्वतःला देत होती.

1 जानेवारी पासून सुरुवात करत असायची.

(1 jan 1 दिवस =1 रुपये,2 जानेवारी 2 दिवस = 2 रुपये,31 जानेवारी = 31 रुपये,1 फेब्रुवारी 32 दिवस =32 रुपये )

महिने न बघता 365 दिवस मोजत ती दिवसाप्रमाणे एक डबा मध्ये पैसे जमा करायची आणि 31 डिसेंबर ला ते पैसे काउन्ट करून बँकेत जमा करायची.

365 दिवसाचे जवळपास 66 हजार एवढी सेविंग ती करायची.


या 10 वर्ष्यामध्ये तिला हवी तेवढी रक्कम जमा नव्हती झाली. तीच स्वप्न तीच हक्काच्या घरासाठी तिला आणखी पैसे लागणार होते त्यासाठी तिने

क्लाससेस नंतर  ऑनलाईन शॉपिंग बिझनेस स्टार्ट केला आणि त्यातून तिला कल्याणी ताई ?चा सपोर्ट भेटतो.. कल्याणी ताई या ऑनलाईन बिजनेस च्या  बॉस होत्या आणि त्या बिजनेस मध्ये तिला खूप प्रॉफिट भेटते.

15 वर्ष लगातार मेहनत केल्यानंतर जे काही पैसे जमा झाले होते त्यानंतर तिला तीच स्वप्न खूप जवळ आल्यासारखे वाटू लागले.

हे करता करता ती खूप काही शिकत होती . खूप पॉसिटीव्हली तिने सासर च्या लोकांना आणि नवऱ्याला ऍक्सेप्ट केले होते .

आज तिच्या मेहनती फळ तिला भेटलं होता तिने स्वतःचा हक्काचा स्वतःचा फ्लॅट विकत घेतला होता.

स्वतः चा मेहनती ने तिने 1RK चा फ्लॅट घेतला होता.

आज तिने तिच्या हक्काच्या घरात पहिला मोकळा स्वास घेतला आणि आज खऱ्या अर्थाने तीच स्वप्न पूर्ण झाले होते.

असं बिलकुल नव्हते की नवऱ्याचं घर आता 15 वर्ष्यानंतर तीच नव्हतं. नक्कीच 15 वर्ष्यानंतर तिचंच होत पण ज्या जखमा तिच्या मनावर लहानपणी पासून झाल्या होत्या त्यावर या घराने मलम लावायचं काम केल होते.

माहेरी लग्न नंतर परक्याचं धन म्हूणन ते घर आपला नाही.

सासरी परक्याचं लेकरू म्हूणन सासरी पण आपला हक्क नाही.

ही गोष्ट लक्षात ठेवून तिने तीच ध्येय आज पूर्ण केले होते आणि आज त्याच घरात बसून तिला ते मानसिक समाधान भेटला होत जे ती मागचे 15 वर्ष झाले शोधत होती.त्या घरात ती तिला हवं तस बदल करू शकत होती.तिला कोणी टोकाणारे  नव्हतं इथे.इथे ती मोकळा स्वास काय असतो, ते अनुभवत होती.

असं भरपूर वेळा फील करून दिलं जाते की हे घर तुमचं नाही... वारंवार फील करून दिल्यामुळे,फील होत की आपला घर नेमका कुठलं???

असा वेळेला नीता सारखं सुखाचं 4 क्षण जगण्यासाठी हक्काचं आपल काहीतर हवंच.नाही का??

एक स्त्री जिद्दीला पेटल्यास काहीही करू शकते, हे या नायिकेने दाखवून दिले.

काही लोक कितीही पुढारलेल्या विचारांचे असले तरी घरातील सुनेला असं फील करून देतात की ती या घरची नाही.

त्यांचे आधुनिक विचार हे फक्त विचार बनून च राहतात.. कृतीत कधीच उतरत नाहीत.365 days सेविंग चॅलेंज नक्की करून पाहा. 

usha reddy

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..