Jan 26, 2022
नारीवादी

सासूबाईंच्या अतिचांगुलपणाचे फायदे आणि तोटे

Read Later
सासूबाईंच्या अतिचांगुलपणाचे फायदे आणि तोटे

मिता सुंदर,सुशील,शिक्षित मुलगी .मिडल क्लास फॅमिली मध्ये वाढलेली .

आई हाउसवाइफ आणि बाबा टीचर आणि एक मोठा भाऊ आणि त्याची बायको अशी तिची गोड फॅमिली .

मिळून मिसळून आनंदाने राहणारे कुटुंब .


वहिनी ही तिची वहिनी नसून मोठ्या बहिणी सारखी होती.तिच्यात आणि वहिनी मध्ये घरात कधीच फरक केला जात नव्हता.


मितासाठी अमित च स्थळ आले .अमित स्वतः चांगल्या पोस्ट वर होता .घरातील आर्थिक स्थिती खूप चांगली होती .माणसे पण छान होती. मिता आणि अमित च लग्न झाले .


मिता ने जे माहेरी पाहिलं प्रेम, आपुलकी,जिव्हाळा सगळ्यात इम्पॉर्टन्ट म्हणजे स्त्रीचा सन्मान ,त्याच सगळ्या गोष्टीची अपेक्षा घेऊन ती सासरी आली.


नवीन नवीन दिवस खूप छान गेले कारण सासूबाई खूपच गरीब मनमिळावू समजून घेणाऱ्या होत्या,पण त्यांच्याशी बोलते वेळेस तिला असं भासायचे की या कुठल्या तरी दडपणा खाली बोलत आहेत .


दिवस जात होते आणि हळूहळू घरातले लोक तिला उमजू लागले .


घरात फक्त सासऱ्यांचा दरारा चालायचा .त्यांनी म्हंटल तेच घरात होत असे .


सासरे बाहेरून आले किंवा त्यांची गाडीच्या आवाजाने सासूबाई ची धडपड चालू होत असे .त्यांच्यासाठी पाणीचा ग्लास भरून ठेवणं,त्यांचा टॉवेल जागेवर ठेवण,चहा साठी पाणी उकळायला ठेवण.


सासऱ्यांच्या जेवणाची वेळ चुकली की ते सासूबाई ना धारेवर धरायचे .त्यांना नको नको ते बोलायचे .सगळं ऐकून घेऊन चूक नसताना त्या सॉरी बोलायच्या.


त्याचा सतत होणारा अपमान तिला सहन होत नव्हता आणि तिला कळून चुकलं होत की या घरात पुरुष जे बोलेल तेच काळ्या दगडावरची रेघ असं मानलं जात.


अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण पुरुष मंडळींवर अवलंबून असायच्या जसे,


आजचा किस्सा... मिताने सासूबाईना विचारलं,

आई भाजी काय करू?

 सासूबाई बोल्या,मेथी कर पपांना आणि अमित ला आवडते.


आई पण मेथी कमी आहे आपल्याला पुरणार नाही,मिता बोली.

अग मिता त्या दोघाना पुरली तरी बस.बायका आपण वरण सोबत खाऊ या.


प्रेत्येक गोष्टी मध्ये पुरुष पुढे, कंटाळली होती ती अश्या दुय्यम वागणुकीला .


तिने विरोध करायचा प्रयत्न केला.

तिची चूक नसली तरी सासूबाई तिला रडून पडून,तिला सॉरी म्हण म्हणून मागे लागायच्या आणि त्यांच्यासाठी तिला माघार घ्यावी लागायची .


तिला पुरुषी अहंकारला शांत राहून, सहन करून आणखी बळ नको द्याला एवढंच वाटायचं.


तिने या विषयी अमित शी बोली "अरे अमित आईंची चूक नसताना 'पपा फार बोलतात त्यांना.त्या गुपचूप ऐकून घेतात .तू काही बोल ना."

मिता ते तसेच आहेत त्यांना सवय आहे असं वागायची आणि आईला त्यांचा या स्वभावाची सवय झाली आता.

अरे, सवय आहे म्हणजे काय,त्यांच्या अश्या बॅकबोन नसलेल्या वागण्यामुळे मला त्रास होत आहे.


सासूबाई नी स्वतःची कधी किंमत करून घेतलं नाही कारण त्या शिकलेल्या नव्हत्या.त्यांच्या मुलांचं शिक्षण सासऱ्यांनी करून दिल.घरात काही कमी पडू दिल नाही म्हूणन त्या त्याचं काहीही ऐकून घ्यायच्या असं सासूबाई च मत होत,जर सासरेबुवा ने मुलाचं शिक्षण,घरात पैसा दिला तर ते त्यांचं कर्तव्य होत,त्यात त्यांचे उपकार मान्यासारखं काय होत .


सासूबाई च्या अश्या वागण्यामुळे  घरात तिला ही स्त्री म्हूणन किंमत नव्हती.


अमित ला कधी काही साधं काम जरी सांगतलं की, सासूबाई बोलायच्या अग मिता त्याला कशाला सांगतेस थकून येतो तो बाहेरून.आपल बायकांचं काम आहे ते आपण करायच .थांब मी करते त्याला नको सांगू .


तिला भयंकर राग यायचा.साधी साधी काम केल तर कुठे बिघडलं आणि बाहेरून काम फक्त तोच करतो का, मी ही करतेच ना, इनफॅक्ट मी तर घरच आणि बाहेरच दोन्ही करते.


सासूबाई खूप काळजी घ्यायच्या तिची पण त्यांचा सगळं स्वतः सहन करणं आणि पुरुषी अहंकार सतत जपत राहणं हा स्वभाव मिताच्या चिडचिड च कारण बनत चाल होत.


कारण कधी अमित ला काही बोल की,तो ही बोलायचा मिता इतके वर्ष आई करतेच ना,बायकांचे काम आहेत ते.


सासूबाई नी कधीच स्वतःच्या इच्छेचा,आवडीचा,राहणीमान कशाचा विचारच नाही केला. त्यांच्यासाठी नवरा म्हणेल ती पूर्व दिशा अश्या त्या जगत होत्या.


तिने एकदा हेअरकट केला कारण ऑफिस,घर त्यामुळे केसांची काळजी घेणं तिला होत नव्हते.


हेअरकट करून ती घरी आली.

काही वेळात सासऱ्यांनी तिला बोलावलं

"सुनबाई कोणाला विचारून केस भादरून आलात?"


कोणाला नाही विचारलं बाबा.. आणि तसेही 

केस कट करण्यासाठी कोणाची परमिशन ची काय गरज आहे बाबा?


काय बोलात माझ्या घरात असे छोटे छोटे केस चालणार नाहीत... सासरे तिच्यावर ओरडू लागले...

सासूला ही खूप बोले.

तुझा कंट्रोल नाही कोणावर, सासू आहेस तू,सासूसारखी वाग etc etc


मिताला खूप राग आला. इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतका तमाशा. रागात ती रूम मध्ये निघून गेली.


काही वेळानंतर सासूबाई रूम मध्ये आल्या "मिता असं डोक्यात राग घालून घेऊ नये. शब्दाने शब्द वाढतो बाळा, बाबांना सॉरी बोल माझ्यासाठी कर त्यांच्या मनासारखं.
मिता त्यांना बोली,"आई त्यांची चुक असून पण त्यांचा मनासारखं वागलं ना आई त्यांना सवय लागते.प्लीज आई मी नाही बोलणार सॉरी.

घरातील वातावरण पुढच्या 2 दिवसात खूप अशांत झालं, सगळयांना याचा त्रास होऊ लागला आणि घरातील शांततेसाठी तिने त्यांना सॉरी बोली.


अश्या कितीतरी गोष्टी होत्या ज्या हळूहळू मिताला त्रास करू लागल्या.सासरे मुद्दामहुन त्रास देऊ लागले .पाहुणेमध्ये सून किती वाईट सांगू लागले.

ती इतक्या डिप्रेशन मध्ये गेली की तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. ज्या वातावरणचा तिला ठावठिकाणा नव्हता,असा ठिकाणी ती रोज कुढत,तीळ तीळ मरत जगत होती.

 छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी स्त्रीची झेरो किंमत असणाऱ्या घरात तिला राहायचं नव्हतं.

अमित जो काही वागायचा तो ही वडिलाच्या दबावाखाली .शेवटी तिने ठरवलं आणि


तिने काही दिवसांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

ती आणि अमित आता दुसरीकडे राहतात .

सासूबाईंना सोडून जाण्यासाठी तीच मन तयार नव्हते आणि स्वतः सासूबाई पण तयार नव्हत्या.


मिता सासूबाई कडून खूप काही शिकली. त्यांची सहनशक्ती,त्यांची सकारात्मक वागणूक, प्रेत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन.

नात्यामध्ये एक रागीट असेल तर दुसऱ्यांनी शांत राहायचं .

नातं टिकून राहण्यासाठी कधी कधी कमी पणा घेतला तर कुठे बिघडलं.

नवऱ्याशी एकरूप एकनिष्ठ राहायचं.

अश्या अनेक छान छान गोष्टी ती सासूबाई मुळे शिकली.


आजही तिला त्यांना तिथे सोडून येणाची गोष्ट त्रास देते.


पण आजही तिला सासूबाई च सगळं सहन करून जगणं ही गोष्ट चूक की बरोबर कळाली नाही.

त्यांचा नेहमी सासऱ्यांनाचा इगो सॅटिसफाय करून देणे चूक की बरोबर


त्यांचं नेहमी तिला झुकून राहा दबून राहा.पुरुष महत्वाचे म्हणणे  चूक की बरोबर कळलंच नाही कधी.


घरात सासू खंबीर असेल तर आपला सून म्हूणन,स्त्री म्हूणन मान सगळे करतात पण सासूबाई अश्या असतील तर त्याचा त्रास आपल्याला नक्की होतो .

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..