अबोल नवऱ्याशी बोलक नातं

..

रात्र भर बाळामुळे आणि पोटात दुखत असल्यामुळे पहाटे पहाटे झोप लागली.


सकाळचे 8 वाजले तरी ही आज ही उठली नाही म्हूणन हॉल मध्ये महाभारत चालू होते आणि तिच्यावर पुष्प सुमने उधळली जात होती.


बाहेरच्या मोठमोठ्या आवाजामुळे,तिला जाग आली आणि तिने पिल्लो खाली ठेवलेला मोबाईल बघितला,तर 8?वाजले होते.


मनात धडकी च भरली तिच्या.अरे बापरे, काय बोलतील बाहेर. आपण एवढ्या उशिरा उठलो,खूप बोलतील. कस जाऊ बाहेर. हातपाय थरथरत होते तिचे.

किती अपराधी पणाची भावना तिच्या मनात आली, जणू काय तिने पाप च केल होते.


ती काही क्षण तिथेच दाराजवळ थाबली, कारण बाहेर सासऱ्यांच्या आवाजासोबत तिला आज चक्क नवऱ्याचा आवाज ऐकू आला.

पाहिलं तर तिला विश्वास च बसला नाही तिला . तिने लक्ष देऊन ऐकलं आणि खरंच तो नवऱ्याचा आवाज होता.


रोज रात्री ती देवाला प्रार्थना करायची,देवा ही रात्र संपूच नये कारण तिच्या आयुष्यात सकाळ ही नेगेटिव्हिटी ने भरलेली असायची. ती रात्रीचे ते 5-7 तास आपल्या चिमुकलीला पोटाशी धरून सुखानी काढायची.रोज तिला रूम च्या बाहेर जायच्या नावाने नको नको वाटायचं.

आज त्याचा आवाज ऐकून पोटात गोळा येऊ लागला आणि भीती वजा उत्सुकता असे मिश्र भाव तिच्या मनात निर्माण झाले.


भीती यासाठी,कारण तिचा नवरा अतिशय अबोल,मोजकंच बोलणारा, कोणाला त्रास न देणारा.

आज वडिलांशी काय बोलत असेल.. भांडत तर नसेल?की आणखी काय? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येऊ लागले.


अस बिलकुल नव्हतं,की तिचा तिच्या नवऱ्यावर विश्वास नव्हता पण काही महिन्यापूर्वी ती त्याला समजू शकत नव्हती...

(कोरोना मुळे आणि घरातील सतत असणाऱ्या नेगेटिव्ह वातावरण मुळे त्यांच्यात खूप अंतर निर्माण झालं होते. त्यात त्याचा अबोल स्वभाव... त्यामुळे गैरसमज वाढत होते... तुम्ही बोलत नाही.. तुमचं माझ्याकडे लक्ष नाही अश्या तक्रारी मुळे तो आणखीन शांत झाला... आणि तिची चिडचिड वाढू लागली...


दिवसभर ती सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी झटत होती पण तिच्यासाठी 2 शब्द प्रेमाचे कोणाच्या ही मुखातून निघत नव्हते.

तिची अपेक्षा बाकी स्त्रीयासारखी होती... नवराने प्रेमाने विचारपूस करावी पण तिची निराशा होत असे...


ती सतत त्याच्या आजूबाजूला घुटमळू लागली त्याचा ही काही उपयोग झाला नाही... मैत्रिणी अश्या वेळी भरपूर सल्ले देतात,तिने ते ही करून पाहिलं... इग्नोर करून... No effect at all...


आता काय करायचा, Fb प्रतिलिपी.. इरा सगळीकडे search चालू झाला... अबोल नवऱ्याला कस बोलके करायच ... किंवा त्याचाशी कस वागायचं... नाना प्रकार केले तिने काहीच नाही झालं...


एवढं सगळं करण्यात ती ही विसरून गेली की,तो कसा आहे तसाच त्याला accept करू नाही शकली. शेवटी एक दिवस u tube वर मोटिवेशनल स्पीच ऐकत असताना तिला एक विडिओ दिसला....


What is love...??


Love is less about romance.... More about Respect

Love is less about my rights.... More about responsibilities for ur welfare...

Love is less about knowing the person... More about caring the person....


आणि तिला तिच्या प्रश्न चे ans भेटले.

आजपर्यंत ती फक्त स्वतःचा विचार करायची कधी त्याचा विचार, त्याला ती कशी हवी हा विचारच नव्हता केला.तिने त्याला तो आहे तसा accept च नव्हतं केल .


त्या दिवसा पासून तिने ते सगळं केल जे एका पार्टनर ने करायला हवं.....तिच्यासाठी सगळं अवघड होत कारण अपेक्षा चे ओझं तिने सगळ्यात आधी तिच्या डोक्यावरून काढून टाकलं.... तिने त्याचा अबोलपणा स्वीकारला... त्याला complain करण बंद केल... खूप patience ठेवले... खूप कठीण गेलं सगळं पण तिने केल.

रोज मेडिटेशन करून मनाची ताकत वाढवली...


हळूहळू त्याचे अबोल भाव ती ओळखू लागली होती... जेवण छान झालं आहे असं कॉम्प्लिमेंट तो द्याचा नाही पण पूर्ण ताट चाटून पुसून खायचा याचा अर्थ त्याला जेवण आवडलं.

अश्या बऱ्याच गोष्टी ती समजू लागली. )


तिच्या विचाराच्या तंद्री तुन ती बाहेर आली ते बाहेरच्या आवाजामुळे...


सासरे... ही काय पद्धत झाली उठायची... कधी ही उठायचं.. काही ही करायच... ही काय धर्मशाळा आहे का? माझं घर आहे etc etc... नेहमीचंच बोलत होते


नवरा.... अरे पण रोज लवकर उठणारी ती आज का उठली नाही जाणून घेतलं का तुम्ही... काही त्रास होत असेल तिला... लेकरांनी झोपू दिल नसेल...


प्रेत्येक वेळाला तिला दोषी ठरवून मोकळ होतो आपण सगळे .


उठल्यापासून ती आपल्यासाठी च सगळं करते पण तक्रार कधीच नाही... तिची माझ्याकडे फक्त एकच तक्रार असते वेळ देत नाही... बाकी ती कधी कामात मदत मागते.. ना सोन नणं मागते...

लेकरू आजारी असलं तरी रात्रभर एकटं जागून काढते पण कोणाला उठवत नाही... प्रेत्येक गोष्ट मन लावून अतिशय dedication ने करते...

तुम्ही नेहमी तिला विचारता ना काय केलंस तू या घरासाठी... जे आपण केल नाही ते तिने केलंय... समर्पण... आत्मसमर्पण... स्वतःचा विचार न करता तिने सगळ्यांसाठी सगळं केल....


मी नवरा म्हूणन तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही पण यापुढे विनाकारण तिला बोलेल ही खपवून घेणार नाही....


आज तिला त्याला शांतपणे समजून घेऊन साथ देणाची किंमत कळाली होती...


सतत त्याच्यावर चिडणं त्याला काहिबाई बोलण या मुळे तो दुरावात होता... पण जेव्हा चिडचिड कमी करून तक्रार न करता तिने त्याची साथ दिली,याची त्याला जाणीव आहे ही गोष्ट तिच्यासाठी खूप इम्पॉर्टन्ट होती.....


त्याचे शब्द निघत होते आणि त्याच्या शब्दसोबत तिचे आनंद अश्रू...


तिला सतत वाटायचं त्याच लक्ष च नसतं.. त्याच प्रेम च नाही.. तो समजून घेत नाही पण,आज त्यांनी तिच्या सगळ्या प्रश्न चे उत्तर दिली...


अश्रू पुसून ती बाहेर आली.अतिशय आनंदाने तिने पटपट kitchen आवरलं आणि सगळ्यांच्या आवडीचा नास्ता बनवला आणि नवऱ्याला द्याला गेली... आणि त्याला hug करून... Thanku बोली....


त्यांनी ही तिला मिठीत धरून इतकंच बोला... दिसत ही आणि कळत ही मला... फक्त शांत साथ दे... मी सगळं ठीक करेन...


त्याच्यावर ती एवढंच बोली... तुम्ही सोबत असल्यास मला कसलंच आणि कुठलंच दुःख होऊच शकत नाही....


त्या दिवसानंतर घरात जे काही नेगेटिव्हिटी होती तिने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

कधी कधी आपण बायका आपल्या हक्क... आपला वेळ.. आपल फालणं आपल बिस्थान करत नवऱ्याला खूप काही बोलून जातो... त्यातला त्यात शांत अबोल नवरा असेल तर अवघडच होत... पण शांत नवऱ्यांना बायका पण शांतच आवडतात.... शांत साथ देणाऱ्या...

खूप अवघड असत आपली चिडचिड होत असून आपण शांतपणे समोरच्याला समजून घेणं....

खूप अवघड जात स्वतःचा स्वभाव बदलून समोरच्या व्यक्ती सारखं स्वतःला थोडं बनवणं...


आयुष्यात काही phase येतात जेव्हा एकमेकांना समजून घेणं गरजच असत... त्या phase मध्ये साथ दिली की आयुष्यभर ते नातं घट्ट बनून राहत..