आमच्या घरात मनमोकळे वातावरण.. खरंच??

..





सुलभाबाई आज हळदी कुंकू वाला आल्याल्या बायकांना हसत हसत सांगत होत्या... आमच्या घरात वातावरण खूप मनमोकळं आहे... ज्याला जे करायच आहे ते त्यांनी कराव.... प्रेत्येकाची मर्जी जपली जाते आमच्या घरात....


बायका पण हसून हसून त्यांना प्रतिसाद देत होत्या...

खरंच किती समजूतदार आहात तुम्ही मुलगा सून समान मानता...

सुने ला जॉब करू देता.. तुम्ही घरच सगळं बघता... आदर्श ठेवला आहे तुम्ही समाजासमोर.... खरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे सुलभाताई...


अहो त्यात काय... मी काही मोठं करत नाही... माझी सून सून नाही मुलगीच आहे... आमच्या अमु आणि समु मध्ये मी कधीच फरक नाही केला...


आता हेच बघा ना हळदी कुंकू आहे म्हूणन बाहेरून मागवलं सगळं... समु म्हणत होती आई घरी बनवू पण मीच म्हंटल नको ग समु थकून जाशील...


हे सगळ्या गोष्टी समु म्हणजे समीक्षा किचन मधून ऐकत होती...

तिच्या चेहऱ्यावर राग.. चीड आणि मजबुरी असे मिश्र भाव होते....


ती नास्ता च्या प्लेट भरत भरत विचार करू लागली....

खरंच.... या घरात मनमोकळ वातावरण आहे????


समीक्षा इंजिनीयर होती... सागर च स्थळ आलं... मुलगा ही इंजिनीयर होता....

मुलापेक्षा घरचे खूप आवडले समीक्षा ला... त्यांचं मनमोकळ बोलण त्यांचा स्वभाव आणि विचार ही....


सुनेकडून काहीच अपेक्षा नव्हत्या... तिने जॉब केलेला चालत होता... घरातील खेळूमेळी च्या वातावरण मध्ये अड्जस्ट होणारी सून हवी होती त्यांना....


तिचे छंद तिच्या आवडीनिवडी सगळ्या काही पहिल्या भेटीमध्ये च सासुसासरे नी जाणून घेतलं.... आणि बाकी मुलीसारखी तिला ही खूप आनंद झाला कि घरचे इतके छान आहेत तर होकार द्यावा आणि लग्न झालं...


लग्नाचे सगळे विधी.. देवदर्शन आणि हनिमून उरकलं...


समीक्षा ने ठरवलं एक 2 मंथ घरी राहून सगळं समजून घ्यावं आणि मग जॉब करावा पण सासूबाई च्या आग्रह खातीर तिने लगेच जॉब सुरु केला...


सकाळचं सगळं सासूबाई करायच्या... समु रात्री चे सगळं आवरत असायची...

1 मंथ झाला.. पाहिला पगार... लग्नानंतरचा... समु ने सासू सासऱ्याच्या हातात दिला... त्यांनी ही आनंदाने ठेवून घेतला...


हळू हळू सासूबाई सकाळच्या कामातून काढता पाय घेऊ लागल्या... समु बाळा तबियत बरी वाटत नाही आज तू घेशील आवरून... तिने ही काळजी पोटी सकाळचा नास्ता पाणी... स्वपाक.. देवपूजा आवरून मग ऑफिस ला जाऊ लागली...


आता सासूबाई मॉर्निंग walk ला जायच्या बहाणे देऊ लागल्या आणि सकाळचं सगळं झाड लोट.... स्वापक पाणी करून समु थकून जात होती तरीही सगळं करून जात होती...


कामावरून आल्यास थोडा आराम करून परत रात्री च जेवण बनवणे... पण आता आल्यास आराम पण करणं बंद झालं कारण आता सासूबाई नी नास्ता पासून जेवणापर्यंत ची भांडी सिंक मध्ये तसेच ठेवू लागल्या...


तिला हळूहळू अंदाज येऊ लागला कि या मुदाम करत आहेत... काही बोलाव तर घरातील वातावरण खराब होईल म्हूणन शांत होती...


जरा सकाळी उठायला उशीर झाला की सासूबाई अबोला धरायच्या...

मैत्रिणी सोबत कुठे थोडं बाहेर गेली की हजार वेळा कॉल करायच्या कधी येत आहेस... स्वापक करायचा आहे... त्याचं असं वागणं बघून तिने बाहेर जाण बंद केल...


जरा कुठे कुठल्या भांड्याला साबण राहिली की बेडरूम मध्ये तिच्या नवऱ्यासमोर दाखवणार बघ समु आजही साबण राहिली... त्यावर नवरा लगेच बोलायचा अग नीट करत जा ना...


तिच्या मनासारखं काही जेवण बनवलं की लगेच टोमणे मारणे आणि म्हणार असं वेगवेगळे खाऊ वाटत म्हूणनच तर गॅस संपतो...


समु कंटाळून गेली होती... कामाला बाई लावली की तिला 2 दिवसात सासूबाई हाकलून देत असत का तर नीट काम करत नाही... चोरी करते... घाण च काम ग तीच असे कारण देऊन...


त्यांचा हा त्रास कोणाला सांगत येत नव्हता आणि दाखवता ही येत नव्हता...


मुलाच्या समोर सगळं मीच करते असं दाखवायच्या...

तो यायच्या वेळेत काम करत बसत होत्या... मुलाला वाटायचं माझी आई किती मदत करते बायकोला .


पगार झाला की लगेच पगार झाला का ग... दिला नाहीस...


मागच्या महिन्यात समु ने पयमेन्ट दिल नाही... त्यावर घरात खूप गोंधळ झाला...

तिने मनाशी ठरवलंच होत आता काहीही झालं तरी स्वतःसाठी स्टॅन्ड घ्यायचाच...


तिने स्पष्ट सांगतलं... आई बाबा.. सकाळचं आवरून नास्ता जेवण भांडी सगळं करून ऑफिस ला जायला उशीर होतोय... pmt भेटत नाही मला... म्हूणन मी गाडी घेणार आहे त्यामुळे या पुढे माझा पगार मी त्या गाडीच्या हफ्त्या साठी देणार आहे...


त्यावर खूप बोलें सगळे पण समु ने जे ठरवलं ते केलंच....थोडे दिवस बोलें सगळे पण नंतर शांत झाले सगळे...


समु नास्ताचे घेऊन ये या सासूबाईच्या हाके मुळे तिची विचाराची तंद्री तुटली आणि ती नास्ता देऊ लागली..


काकू... समु कुठून आणलास ग सामोसा...


अहो काकू समु च्या kitchen मधून म्हणजे मी बनवले... कसे झाले आहेत ??


काकू... अग पण तुझी सासू तर बोली... सासूबाई तोंडावर पडल्या...?


समु एकटीने कशाला केलंस सगळं... काकू बोल्या...


काय करू काकू आमच्याकडे बाईच टिकत नाही... काम छान करत नाहीत किंवा चोरी वेगरा करतात... हो ना आई...

सासू त्यावर काहीच बोल्या नाहीत....


अग आमची कामवाली सुनीता खूप प्रामाणिक आणि स्वच्छ काम करते... तीला पाठवते...


ओके काकू थँक्यू...


दुसऱ्या दिवशी पासून समु ने स्वतः मध्ये बदल केले...


आपण प्रामाणिक आणी सीन्सरेली सगळं करत आहोत तर घाबरयच कशाला... आणि

बाई लावली... स्वतः साठी वेळ काढू लागली... मैत्रिणी सोबत वेळ घालवू लागली..


नवराला स्पष्ट सांगतलं की तुमच्या घरातले वातावरण मनमोकळ नसेल पण मी मनमोकळ्या विचारयची आहे....


मी कुठल्याही गोष्टी चा अतिरेक करत नाही.मी माझ्या आवडीनिवडी लिमिट मध्ये च करते .. यापुढे जास्त काही सहन ही करणार नाही...


नवऱ्याला दाखवून दिल की काय चुकत आहे...पण शेवटी तो नवराच.. mummas boy ??


जेव्हा हिने स्वतःसाठी वेळ काढून स्वतःवर प्रेम करू लागली... स्वतःमध्ये busy राहू लागली तेव्हा त्याला जाणवू लागलं की समु कुठे तरी hurt झाली...


त्यांनी तिची माफी मागीतली आणि तिने ही त्याला माफ केल...


सागर तुमच्या घरातले माहिती नाही रे पण मला मनमोकळ जगायचं आणि मी ते जगणारच... माझा हक्क आहे तो... त्यावर त्यांनी ही हसून तिला हो असे उत्तर दिले...


आपण समाजात पाहतो... आमचं फ्री आहे हम्म वातावरण घरच म्हणणारे लोक अतिशय congested mind चे असतात....

सो आपण ठरवायचं आपल मन मोकळ सोडायचं की बंदिस्त ठेवायचं...


मनमोकळ वातावरण च्या नावाखाली लोक समोरच्याच मानसिक खचिकरण करतात अश्या लोकांना जर उत्तर द्याचं असेल तर शांत राहून त्यांच्याकडे इग्नोर करायचा... त्याच्या कुठल्याच गोष्टीवर रिऍक्ट नाही करायच....


आपली रिऍकशन म्हणजे त्याची action flim बनते.... सो अश्या लोंकाना बडबड करू दयाची... मोठेपणा मिरवू द्याचा आपण मात्र शांत राहून आपल्यला जे करायच ते करायच...

इति शी तो लाईफ है...??उसमे भी इतना स्ट्रेस... ना बाबा ना...


है तुझे भी इज्जजात करले तू भी खुद से मोहब्बत... याद रखना दोस्तो... खुद का खयाल खुद रखोगे तो खुद का साथ जिंदगी भर पाओगे...



frnds....

हसत राहा आणि छान छान वाचत राहा.