थोरली आई आहे तुझी भाग 14 Repost

..


भाग 14 थोरली आई आहे तुझी


एकीकडे मनात खूप काहूर दाटून आले होते... त्यात बाहेर ही छान प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते... बाबांचे ते गुलाबाचे रोपटे ही छान हलत डुलत होते... ह्या थंड वाऱ्यात तर ते अजून प्रसन्न करत होते..खिडक्यांचे पडदे त्यावर ही फुलांचे सुंदर design होते...


आता आरती आली होती म्हणून जो पसारा आभाने विचार मग्न असतांना करून ठेवला होता तो ही जिथल्या तिथे अगदी व्यवस्थित लावून ठेवला होता... फुलदणीत फुलेच सजली होती.. भाज्या फळे फ्रीज मध्येच गेली होती... जिथे बेडशीट हवे तिथेच लावले गेले होते... घरात रूमफ्रेशनर मारले होते..


एका कोपऱ्यात नेहमीप्रमाणे दोन मोगऱ्याचे गजरे लावले होते... सगळे घर अगदी आरश्या सारखे चकचकीत केले होते... घरात हवा खेळती रहावी म्हणून जरा खिडक्या उघडया केल्या होत्या.. मंद थंड कुंद हवा आता घरात शिरकाव करू लागली होती...

आता ह्या सुंदर सजलेल्या वातावरणात प्रसन्नता दिसत होती..
इकडे मात्र निर्मळ मनाचा,प्रसन्न वाटणारा आभाचा चेहरा अगदी उरलेला वाटत होता... मग काय होणार जेव्हा मनातील युध्द आणि बाहेरील युद्ध हे आपल्या कुवती बाहेर जात असतील आणि मनाची कोंडी होत असेल...भावनांचा उद्वेग होत असेल..

.त्या कल्लोळ झालेल्या मनाला आपल्याच माणसाचं हात नसेल आणि ह्या सगळ्यात आपल्या माणसाचा हातभार असेल तर मनमोकळे व्हायचे कसे आणि कुठे... म्हणतात बाबा मुलीचा मित्र असतो...तो तिच्या मनातील भाव समजून घेऊ शकतो...काय चूक काय बरोबर हे सांगण्याचा त्याचा हक्कच आहे... पण हे माहीत आहे आणि मान्य ही केले आहे की हे स्थळ अगदी योग्य आहे मग ऐन वेळी ते नको आपण हे पाहू म्हणण्यात काय अर्थ आहे..


बाबा मी आता ती लहान आभा नाही जी तुमच्या सोबत जत्रेत याची तेव्हा तुम्ही जी भाऊली मागाल ती तुम्ही मला द्याचे... आणि कधी कधी तुमच्या बजेट मध्ये नसेल तेव्हा हातात घेतलेली,तिच्याशी मग माझी त्याच क्षणी बट्टी जमलेली भाऊली ही पैस्या अभावी मागे ठेऊन देत आणि मला म्हणत बेटा ही नको आता आपण ही बघू...

कधी तर तुम्ही असे ही कितीदा केले होते की मी स्वस्तातली भाऊली नको आपण महाग वाली घेऊ म्हणून जिच्यात माझा जीव रमला ती परत करायला लावून महागातली घेतली होती...पण बाबा त्या भाऊल्या होत्या...


मन सांगत होते की बाबा हा भाऊला नाही ना.. गुंतलेले मन मी काढून असेच परत कोणत्याही माणसाशी जुळवू शकत नाही ना.. मन हे जणू काचे सारखे नाजूक असते ...एका ठिकाणी रमले ,रुजले,रोवले की ते तिथून परत इतर ठिकाणी काढताना त्याच्या ठिकऱ्या होणारच ना..

आभा खूपच गुंतली होती विचारात..मनात कितीदा बाबांना समजावून सांगत होती..एक एक उदाहरण देत होती पण प्रत्यक्षात मात्र बाबांशी बोलायची हिम्मत मात्र नव्हती... ती जे रणजित काही दिवसांपासून बोलत होती ते घरात माहीत नव्हते... ते समजत होते की तो जेव्हा घरी येईल तेव्हा जे काही नात्यात पक्के होईल त्या नंतर आभा स्वतःहूनच त्यांच्याशी बोलेल...मग कसलीच आड काठी नसणार... ना आमची ना आईसाहेबांची... मग दोघे हवे तर कुठे निवांत भेटले तरी हरकत नाही... त्यानंतर साखरपुडा..होईल मग अजून जवळीक वाढेल हे गृहीत धरले होते... पण आभा इतक्या जवळ जाईल न बघता हे त्यांना माहीत नव्हते. .

ए आभा ऐकना आता थोडी दमले आहे मी चल तुझ्या हातची मस्त कॉफी होऊन जाऊदे..आरती असे म्हणतात आभा आतून हालली आणि भानावर आली....आणि बघते तर काय घर एकदम चकचकती केले होते.. तिने यासाठी आरतीचे मिठी मारून आणि आपले विचार बाजूला ठेवून लगेच coffee करायला तिला आत घेऊन गेली होती... आरती ओट्यावर उडी मारून बसली होती पाय हालवत...थोडी डार्क कर coffee...साखर कमी टाक....हो थोडी इलायची टाक.... दुःख पिशवीतले घे...असे मुद्दाम सल्ले देते होती.... बाजूला ड्राय fruits पडलेले होते ते एक एक करत तोंडात टाकत होती.....

मस्त असत ना ह्या पाहुण्यांचे, किती ते लाड,किती त्यांची उठा ठेव...त्यांच्यासाठी फळ,मेवा,जेवण,मिठाई...म्हणजे बघ ना,ठरले तरी फायद्यात नाही ठरले तरी फायद्या ...खाऊन पिऊन मग म्हणायचे मी कळतो....आणि गेले की गायब...मग परत तेव्हा येतात जेव्हा आपण इकडे कोणाला तरी आपले मन देऊन बसतो...मी असते तर सरळ त्या मुलालाच सांगितले असते...माझे affair आहे... तू ही बघ जमतंय का...एक घाव आणि दोन तुकडे.... असे म्हणत तिने बसल्या बसल्या बाजूला ठेवलेल्या सफरचंदाचे दोन तुकडे केले होते...

इकडे आभा तिच्या बोलण्याची गम्मत बघत होती आता आरतीच्या ह्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर हसू आले होते... थोडे टेन्शन ही कमी झाले होते.. आता बाहेरचे ढगाळलेल्या वातावरणातून तिला सोनेरी किरण दिसत होते.. आरती म्हणते ते ही अगदी खोटे नाही...आता मलाच काही तरी करावे लागणार आहे... कॉफी घेत दोघी आता हॉल मध्ये आल्या होत्या,मस्त सोफ्या वर पाय वरती दुमडून आरतीच्या केलेल्या joke वर टाळ्या देत होत्या...

आभा तू अशीच हसत रहा,कारण जे नशिबात लिहिले आहे ते कोणी बदलू शकत नाही... तुला आपली स्वाती माहीतच आहे ना, तिने कॉलेज मध्ये असताना प्रियांश सोबत किती serious affair केले होते... चांगले 10 वर्ष होते ते सोबत.. किती आना भाका घेतल्या होत्या सोबत राहू,सोबत मरू... आणि काय काय..आणि आपल्याला ही वाटायचे ना की ते दोघे आता लग्न करणारच.... आणि त्यांनी तर घरच्यांना ही सांगितले होतेच....मग त्यांनी ही हो म्हणून मान्य केले होते... मग परत काय झाले माहीत नाही पण तिने भलत्याच कोणाशी तरी आणि त्याने भलतीच कोणाशी तरी लग्न केले होते... खुश दिसत होते तरी.. असेच काही आपल्या बाबती ही घडू शकते....तू स्वप्न बघितले ते आत्ता आत्ता ,मग इतकी कशी gurantee देतेस तू की रणजीतच माझे भविष्य आहे ह्याची...अग काही दिवसाची ओळख..अजून भेट नाही... मान्य आहे की तू आता ह्या पाहुणे ह्या प्रकाराला कंटाळली आहेस... आणि बेस्ट म्हणजे सगळ्या आलेल्या स्थळांपैकी रणजित सगळ्यात उत्तम असा मुलगा आहे... आणि तू त्याला जाणून घेऊनच पुढे पाऊल टाकले आहेस... पण एकदा हा बघ आणि विषय तूच संपवून टाक..

आभा म्हणाली, खरंय ग डोकं सतत ते विचार करून करून ताळ्यावर नव्हते ,मन लागत नव्हते.. ह्याच ज्या गोष्टी आहेत ना पाहुणे येणे..येऊन बघून ,खाऊन जाने ह्याला आता मन मानत नाही... त्यात रणजित मनाला भावाला.. आज हे बोलणे होऊ देते आणि लगेच रणजित सोबत मी बोलते... त्यालाच मी आता पुढाकार घ्यायला लावणार. ...आता त्यानेच प्रत्यक्ष येऊन बोलणी करावी हे म्हणते...

क्रमशः.....