गृहीत धरतात की आपण गृहीत धरू देतो?

...

गृहीत धरतात की गृहीत धरू देता?


"ऐका ना, मला बोलायचं आहे तुमच्याशी " ती.

"पाच मिनिट थांब, इतकं झालं की लगेच बोलतो " तो.

पाच मिनिटानंतर -

"बोल, काय झालं?" तो

"सगळे मला गृहीत धरतात. तुम्ही देखील. मला इतकं बोलायचं म्हणून तुमच्याकडे आले तर, तुम्हाला तुमचं कामं इम्पॉर्टन्ट होतं. मलाच पाच मिनिट थांबवलं तुम्ही " मुसमूसत बोलत होती ती

"ओ, सॉरी. मेल करायचा होता म्हणून थांब बोललो "तो 

"बस इथे आणि बोल " तो

"मी घरीच असते पण मलाही कामं असतात. घरचं सगळं मीच पाहते तरीही सगळे असे वागतात माझ्या सोबत जशी काय मी रिकामीच आहे" ती

"सगळे म्हणजे मी ही आलो का त्यात " तो

"हो, कुठली गोष्ट वेळेवर नाही भेटली की किती आदळाआपट करता तुम्ही, कधी चुकून राहील पाणी बॉटल भरून ठेवायची तर चक्क बॉटल फेकून देता " ती

"हम्म. सॉरी " तो

"लगेच सॉरी नका म्हणू. आणखीन भरपूर वेळा सॉरी म्हणायला लागेल, सो एकदाच सॉरी बोला. आधी ऐकून घ्या " ती.

"आय नो. मी आता आपल्या बाळामुळे घरी असते पण याचा अर्थ असा नाही होतं ना की मी 24/7 तुम्हां सगळ्यांच्या सेवेत हजर असावं. तुम्ही म्हणाल ते करावं.

परवा आईने चक्क चार किलो लाल मिर्च घरी मिक्सरवर वाटून घेतली माझ्याकडून. का तर, घरीच असतेस आणि अर्धा तासात होऊन जातं वाटून" ती

"जरा कामं आवरलं म्हणून बसले की, लगेच काहीतरी फालतू कामं सांगतात. आणि मला नाही म्हणता येत नाही. कधी हिंमत करून काही बोललं की आईंना राग येतो " ती

तो आता फक्त ऐकून घेत होता.

"एवढं करूनही बाबा म्हणतात, करते काय ती?चार भांडी घासते आणि दोन चपात्या करते, नंतर तर दिवसभर रिकामीच असते". ती

"मला माझ्यासाठी वेळ हवा आहे. मला आराम करता येत नाही. मला स्वतःला वेळ द्याचा आहे " ती.

"बरं. मी एक विचारू का? तुझं रुटीन काय आहे?" तो.

"रोजचंच. म्हणजे सकाळी सहाला उठल्यास स्वतःच आवरते. मग किचन, भांडी, झाडू, नास्ता बनवते.

अंघोळ, देवपूजा मग नास्ता करते. त्यानंतर बाळाचं आवरून त्याला खाऊ घालते.

त्यानंतर स्वयंपाक दुपारचा, जेवणं मग बाळासोबत थोडं खेळणं, त्याला नवीन काही शिकवण. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. सगळं आवरून दहा वाजता जेवणं करते आणि त्यानंतर मोबाईल पाहत  झोपते"ती

"एक मिनिट चल माझ्यासोबत." तो

"कुठे?" ती

"चल ना, मग कळेल " तो

त्यांनी तिला आरश्यासमोर थांबवलं आणि म्हणाला, "पहा "

"काय पाहवू?" ती

"स्वतःला पहा "तो

"तिने स्वतःला पाहिलं, केसांची वेणी नव्हती घातली कालपासून त्यामुळे केसांची हालत खूप खराब दिसत होती, वजन वाढलं होतं विशेष म्हणजे पोट वाढतच होतं. चेहऱ्यावर ग्लो नव्हता. डोळ्याखाली डार्क सर्कल वाढली होती.

"कशी हालत झाली माझी. कामात स्वतःकडे पाहायला वेळच भेटत नाही. पोट पण वाढतच आहे. डार्क सर्कल पण किती वाढलेत. तिसच्या वयात एकदम काकूबाई दिसतंय मी " स्वतःवरच नाराज होतं म्हणाली.

"तुला नाही वाटत या आरश्यामधल्या मुलींसाठी काही करावं. काही बदल करणं मस्ट आहे मग घरात काम कितीही असो "तो.

"हा. वजन कमी करायला व्यायाम आणि वॉक करावा लागेल पण तितका वेळ भेटतंच नाही " ती

"चुक. तू तो वेळ काढत नाहीस. तू तुझं डेली रुटीन फिक्स केलंस आणि त्यावर फर्म राहून कामं केलस की समोरच्यालाही वाटेलच की हिच्या वेळा फिक्स आहेत आणि ही रिकामी नसते सतत बीजी असते तर तुला कोणी गृहीत धरून कामाचं बर्डन देणार नाही" तो तिला समजावत होता.

"वजन यार कसं कमी करायचं रोज शिल्लक काहीतरी राहतं आणि ते मलाच खावं लागतं कारण कोणीच दुसरं खात नाही. आईंना मूळव्याध आहे त्यांना जमत नाही आणि तुम्ही आणि बाबा शक्यच नाही. शीळ खाण्याने पण वजन वाढतं त्यातला त्यात माझं रोज ओव्हर इटिंग होतं. थोडीच भाजी राहिली खाऊन टाकते उगी उद्या मलाच खावी लागेल म्हणून " ती.

"हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत तू कोणाला हक्क देत नाहीस की, तुला गृहीत धरा तोपर्यंत कोणीच तुला गृहीत धरणार नाही. बऱ्याच वेळा मी पाहतो की, आईने तुला आवाज दिला की तो पळतच त्यांच्याकडे जाते. जाऊ नको असं नाही म्हणत पण असं जाण्याने त्याना सवय लागते की आपण आवाज दिला की ही पळतच येते.कधी कधी स्वतःची किंमत वाढवण्यासाठी समोरच्याला नाही म्हणायला हवं. पण समोरच्याच कामं किती महत्वाच आहे की नाही हे पाहूनच सगळं ठरवायचं. समजलं का काय म्हणतोय " तो

"हम्म. समजलं " ती.

"काय समजलं? समरी प्लीज "तो

"हेच की, गृहीत धरलं म्हणून रडत न बसता, स्वतःच असं फिक्स वेळापत्रक बनवायचं. स्वतःकडे लक्ष द्याचं जेणेकरून समोरचा अपल्याला रिकामं टेकड्या न समजून त्याच्या कामं करून घेईल. आणि कधी कधी कामं आणि वेळ बघून नाही म्हणायचं जेणेकरून आपली किंमत वाढते आणि समोरच्या व्यक्तीच्या अपॆक्षाची लिस्ट थोडी कमी होईल. सो आता मला जिथे गरज आहे तिथे नाही म्हणायचं आहे, माझं कामं आधी करूनच मगच दुसऱ्यांच्या कामाकडे लक्ष द्याचं आहे" ती.

"गुड गर्ल. लवकर सगळं समजलं. सो स्वतःवर फोकस केलास की कोण काय करत आहे याकडे लक्ष थोडं कमी जाईल आणि स्वतःकडे जास्त. स्वतःला असं ट्रान्सफॉर्म केल्यास तुलाही पॉसिटीव्ह फील होईल.तू स्वतःला, स्वतःच्या कामांना आधी इम्पॉर्टन्स दे मग बघ तुला वाटणारच नाही कोणी गृहीत धरतंय. कालपासून केस कॉम्ब केले नाहीत, इतका वेळही नाही भेटला का तुला तुझ्यासाठी कालपासून? आपलं बाळ तीन वर्षाचं झालं आहे. तरीही तुला वजन कमी करण्यासाठी वेळ भेटला नाही?" तो

"खरंच सांग,आपल्याला खरंच गृहीत धरतात की आपण गृहीत धरू देतो?.सो थिंक ओव्हर इट आणि मला नंतर येऊन सांग. कामं आहेत खूप मला, जातो मी " तो निघून गेला.तिच्यामधल्या तिला जाग करून.

खरंच बोलत होता तो, बऱ्याच घरात आपण ऐकतो, आमच्या घरात मला सगळे गृहीत धरतात. ती करेल, तो करेल, त्याला जमेल, तिला आवडेल वैगरे वैगरे..

जर आपल्या मनाला वाटलं की हे मला जमत नाही किंवा पटत नाही तर स्पष्ट बोला आणि बाजूला व्हा.

हे हे मला पटलं नाही. किंवा हे हे मला जमणार नाही. नेक्स्ट टाईम तो व्यक्ती तुम्हाला ते कामं सांगणारच नाही.

मैत्रिणींनो, मला बाई आमच्यात सगळे गृहीत धरतात ही गोष्ट अटलेस्ट तुम्ही तरी गृहीत धरू नकात.

स्वतःच असं एक विश्व निर्माण करा ज्यात व्यायाम असेल, मेडिटेशन असेल, हेअल्दी डायट असेल,बऱ्याच तुमच्या आवडीच्या गोष्टी असतील.तुम्हाला कामं सांगण्याआधी आणि गृहीत धरण्या आधी सगळ्यांना वाटलं पाहिजे, नाही यार तिचं सगळं फिक्स असतं. तिला विचारून घेऊया एकदा.