अपेक्षाचं ओझं

...




अपेक्षा... Expectation... खूप मोठे शब्द आहेत... शब्दासोबत अर्थ ही खूप मोठा आहे...
म्हणतात ना...
अपेक्षेच ओझं बाजूला ठेवलं की समाधानाचे आयुष्य जगता येत....

अंजली सध्या घरीच असते म्हूणन घरातील सगळे काम ती स्वतःच करायची...2 वर्ष चा मुलगा विराट.. सासू सासरे.. नवरा असं तीच कुटुंब....
बाळ लहान असल्यामुळे ती जॉब करत नव्हती .. उच्चशिक्षित अंजु घरातील केर कचऱ्या पासून भांडी धुनी सगळं स्वतः करायची...
कामवाली लावावी असं सतत तिला वाटे पण घरातील लोकांची मेन्टॅलिटी पाहून ती गप्प राहिली... कारण तू आहेस ना घरी मग कशाला बाई आणि उगाच खर्च करायचा...
सगळ्यांचा तालावर दिवसभर नाचवे लागे तिला... बाळाचं खाणे पिणे शु शी... त्याची खेळणी.. त्याचा केलेला पसारा.. आवरता आवरता थकून जाई ती...
तरीही सासू सासऱ्यांना वाटे करते काय ही, घरीच तर असते.. तिला वाईट वाटे... पण दुर्लक्ष करत असे..

नवऱ्याला ही सगळे जागेवर आणि वेळेवर लागायचं... बाथरुम मध्ये वस्तू जागेवर.. कपडे जागेवर.. नास्ता चहा वेळेवर... हद्द अशी की त्याचा वेळेवर हिनेच त्याला उठवावे लागे... अहो उठा 6-7-8 वाजले... नाही उठवले की साधी एवढी गोस्ट पण जमत नाही चा पाढा चालू होत असे...

या सगळ्यात तिने स्वतःकडे लक्ष देण च बंद केल होत... तिला वेळच भेटत नसे....

एक दिवस अपेक्षेच ओझं इतकं वाढलं की तिचे मन खूप दुखवलं गेलं...
पिरियड्स आल्यामुळे तिला त्रास होत होता.. पायात क्रॅम्पस येत होते.. ब्लीडींग मुळे weakness जाणवत होता तरीही ती उठून सगळं वेळेवर करणाचा प्रयत्न करत होती.. पण सगळ्या गोष्टीना late झाला...
नवऱ्याचे कपडे त्याचा जागेवर ठेवायला उशीर झाला.. नास्ता ला उशीर झाला... नवरा काहीच बोला नाही.. तिला वाटलं चला दुखतं आहे म्हूणन समजून तरी घेतलं म्हूणन थोडं समाधान वाटत होत तिला..
स्वपाक ला late झाला.. रोज 1 वाजता होणारा स्वापक आज 1:30 झाले...आणि सासऱ्यांनी तमाशा चालू केला... आता काय आम्ही यांचा वेळेनुसार जेवायचं का..?? सगळे मनाने चालू आहे...  करते काय  एवढं जे उशीर झाला etc etc खूप बोले सासरे.. नवरा ही चुपचाप ऐकत होता...
तिने आशेने त्याच्याकडे पाहिलं,तो बोलेल काहीतरी पण त्यांनी ही तिलाच ऐकवलं...

खूप रडली... कोणी नव्हतं तीच इथे ज्याचा मिठीत रडून मन हलक कराव असं... स्वतःच आरश्यासमोर थांबून स्वतःच स्वतःच डोळे पुसून.. स्वतःला पाहिलं तिने...
2 दिवसात तिने स्वतःला नीट पाहिलं नव्हतं आरश्यात...

मग मनाने प्रश्न केला... कोणासाठी केलंस हे सगळं, या लोकांसाठी ज्यांना तुझं दुखणं ही दिसत नाही... त्यांचं अपेक्षाच ओझं एवढं जास्त आहे की, तू त्या खाली दबून गेलीस... तिने मनाशी ठरवलं आणि तडक हॉल मध्ये आली आणि सगळ्यांना बोली मला बोलायचं आहे...

हात जोडून सासू सासऱ्यांना बोली माफ करा आईबाबा काही चुकीचं बोले तर पण मला आता सहन होत नाहीये म्हूणन बोलाव लागतंय .
तुम्हा सगळ्यांना वाटत मी काय करते.. घरातच असते.. घरातील काम किती असतात, आई तुम्हला माहिती आणि दिसत ही तुम्हाला.. प्रेत्येक अपेक्षा माझ्याकडून का??
माझं आज दुखत आहे मला ही वाटू शकत ना की तू आज आराम कर आम्ही करतो सगळं... असं म्हणावं कोणीतरी.

तुमच्या प्रेत्येक वेळाला मी धावून यायचं, माझी वेळ आल्यास तुझं ते कर्तव्य आहे म्हूणन तुम्ही उडवा उडवी करायची... का??

नवऱ्याला बोली.. सगळ्या गोष्टी वेळेवर लागतात.. सगळं मीच कराव अशी अपेक्षा... कधी तुम्ही विचारलं मला तू जेवली का..? तू नास्ता केलास का...? काम राहूदे आराम कर.. स्वतःकडे लक्ष दे... बोला ना काय झालं..?
जर दुखत असेल तर देखील जो मला नजरंदाज  करतोय तो मला आयुष्य भर सांभाळू शकेल का??

मला माफ करा तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही.. मी केल्या ही असत्या जर तुम्ही मला थोडं समजून घेणाचा प्रयत्न केला असता तर....

तिने बॅग भरली आणि मुला सोबत माहेरी निघाली... जाता जाता एवढंच बोली... अपेक्षेच ओझं कमी वाटल्यास येईन परत....
तिच्या नवऱ्याला त्याची चूक कळाली... त्यांनी तिला 8 दिवस माहेरी राहू दिली..8 दिवसानंतर घेऊन आला..
आता तो तिला प्रेत्येक कामात जमेल तस मदत करत होता.. मुलाला सांभाळत होता.. स्वतःचे काम स्वतः करत होता...

प्रेत्येक वेळाला आपण असा विचार करतो की जाऊदे कश्याला बोलून दाखवायचं उगी आपल्या बोलण्यामुळे घरातील वातावरण बिघडेल.. पण सखींनो.. सतत चांगुलपणा दाखवल्यास .. तो चांगुलपणा अंगलोट पण येऊ शकतो... लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात..
ज्या गोष्टीमुळे आणि ज्या व्यक्ती मुळे आपल मानसिक संतुलन बिघडत असेल तर नक्कीच बोला किंवा त्यापासून 4 हात लांब राहा...
मी बोले तर वाईट समजतील असं विचार काढून टाका कारण लोकांनी देवाला सोडल नाही आपण तर मानवजात आहोत...
स्पष्ट आणि फर्म राहा..
समोरच्याच तेवढ्यच अपेक्षा पूर्ण करा जेवढ्या तुम्हला जमतात...
ज्या अपेक्षा ठेवायच्या असतील स्वतःकडून ठेवा...

आणि हो व्यायाम.. मेडिटेशन walk या गोष्टी अन्न वस्त्र निवारा इतक्याच महत्वाचे आहेत...

सखींनो... सकाळी 6 वाजता  उठत असाल तर 5 ला उठा स्वतःसाठी
15-20 मिन टेरेस वर walk करून या..5 मिन डोळे बंद करून मेडिटेशन करा...

दिवस फ्रेश जाईल... मन दिवसभर फ्रेश राहील आणि हेअल्थ एकच नंबर राहील आणि इम्पॉर्टन्ट म्हणजे नेगेटिव्हिटी पासून आपण स्वतः 4 हात लांब राहूत...

काही चुकलं तर माफ करा...
यात नवरा बदला आहे...
पण प्रेत्येक जागी बदलतोच असं नाही होत.. अश्या वेळी मनातील मलभ बोलून दाखवणं ही गरजच असते... मग त्यावर कस रिऍक्ट करायच हे त्यांचा प्रश्न आहे...
नवरा बदलला नसला तर स्वतःला बदला... स्वतः साठी स्वतः स्टॅन्ड घ्या... इमोशनल डिपेंडेन्सी खूप घातक असते... सो इतकंच सांगेल जेवढं झेपत तेवढंच करा... आणि स्वतःवर भरभरून प्रेम करा...