तिला काय कळत ( Postpartum Depression )

..


सुजाता ला emergency मध्ये हॉस्पिटल ला ऍडमिट करण्यात आले.

अचानक चक्कर येऊन पडली.डॉक्टर ने चेकअप केले आणि तिला अंडर ऑबसेर्व्हशन  सेमी icu ला ठेवण्यात आले.

तिचा BP फार वाढला होता...

icu मध्ये शिफ्ट केल्यानंतर डॉ ने तिच्या फॅमिली ला भेटण्यासाठी बोलवले.


तिच्यासोबत तिचा नवरा विपीन आला होता... अचानक सगळं घडल्या मुळे विपीन घाबरला होता...


डॉ काय झालं आहे सुजाता ला... ठीक तर आहे ना ती.. त्यांनी घाबरत विचारले...


तुम्ही कोण त्यांचे... डॉ 


मी तिचा नवरा विपीन काळे...


बरं mr. काळे त्यांना काही स्ट्रेस आहे किंवा कुठली गोळी चालू आहे का??


नाही डॉ कुठली गोळी चालू नाहीये तिला...


actually, mr. काळे त्यांचा BP फार वाढला आहे... फक्त 29 इयर च्या आहेत त्या आणि एवढा  Bp ......not good for her health...


काही फॅमिली issue आहेत का.?. किंवा आणखी काही प्राब्लम??


प्रेग्नन्सी मध्ये तिचा bp वाढला होता...बाकी तर सगळं ओके आहे...विपीन ने डॉक्टरांना माहिती दिली.


काही वेळानंतर सुजाता ला शुद्ध आली आणि dr ने तिला चेक केलं... Bp कमी करायच्या मेडिसिन मुळे bp कमी आला होता..


तिच्याशी थोडं बोल्यानंतर dr ना समजलं stress induced hypertension आहे... स्ट्रेस मुळे bp वाढला आहे.


29 वर्ष ची सुजाता 2वर्ष च्या गोंडस मुलीची आई होती... किती खुश होती ती, खुशी तिच्या लाईफ मध्ये आली म्हणून.


मानसरोग dr ला बोलावण्यात आले...

तेव्हा सगळ्यांना समजलं की कशी ती डिप्रेशन मध्ये धजली जातेय...

तिला रात्र रात्र झोप लागत नाही,तिची चिडचिड वाढली आहे, सतत विचार करत राहते, तिला काही करावेसे नाही वाटत,हल्ली मुलीसोबत ही वेळ घालवायला नको वाटत.


तिचे सगळी लक्षण पाहता डॉक्टर नी तिला PPD ( POSTPARTUM depression ) झाला आहे अशा निष्कर्ष काढला.


प्रेत्येक घरात असते तसेच काही तिच्याही घरातही सासू सासरे टोमणे आणि पुरुष प्रधान घर... बबड्या ही होता तिच्या घरात...


आज नाहीतर उद्या सगळं ठीक होईल या आशेवर जगणारी ती. बाळाची चाहूल लागली आणि ती सुखावली.

बाळाची चाहुली नंतर होईल सगळं ठीक अशी ती मनाची रोज समजूत घालत असे आणि खुशी तिच्या आयुष्यात आली...


खुशी च्या येणाने सासू सासरे नवरा खूप खुश होते... तिचे खूप लाड करायचे...

पण,

हिच्याशी मात्र खूप तुटुक वागायचे. वाटेल तसें बोलायचं.


ही सतत कामात... वेळेत काम झाली पाहिजे... तरीही ती लेकराकडे बघून निमूटपणे सगळं सहन करत होती...


खुशी आता 1 वर्ष ची झाल्यामुळे... सॉलिड खात होती.. म्हूणन ती रोज तिच्या साठी सूप.. होम made cerelac... नाचणी.. दालखीचडी... गुटी असे करायची... पण त्यात ही घरचे तिच्यावर अविश्वास दाखवू लागले...


तिने जे बनवलं ते खुशी ला खाऊ घालू देत नव्हते... उलट तिला काय कळत... तिला काय अक्कल आहे... असं म्हणून हिणवू लागले...


तिला प्रश्न पडला,मी आई आहे तिची.. मला तिच्या विषयी जास्त माहित असणार की त्यांना... मान्य आहे त्यांना अनुभव आहे पण मी ही आई आहे तिची...


रोज असेच घडत होते ... काहीही कारणावरून तिला घालून पाडून बोल जायचं...


बघता बघता ख़ुशी 18 मंथ ची झाली आणि तिने एका दिवशी खुशी साठी आलू पराठा बनवला.. त्यावर तिला किती ऐकवलं त्यांनी... कोणाला विचारून बनवलास?... का बनवलास?.. तुला काय कळत बाळंचं... त्यांना काय खाऊ घालायचं असत नसत...18 month च्या खुशी ला पराठा देण चुकीचं नव्हतं च...


या सगळ्या प्रकारे ने तिच्या मधली नवीन आई घुसमटू लागली... तिळ तिळ तुटू लागली... तिला तिच्या बाळासाठी काही मनासारखं करता येत नव्हते.

नवऱ्याला काही सांगायचं प्रयत्न केला त्यावर त्याच एकच ans की मोठी अनुभवी लोक आहेत त्यांचं थोडं ऐकलंस तर कुठे बिघडलं..

नंतर तर नवरा ऐकून घेऊन एवढंच सांगायचा इग्नोर कर...


सासू सासरे खूप लाड करायचे ख़ुशी चा,पण तिला चॉकलेट देऊन... मोबाईल ची तर सवय लावली होती...

मोबाईल पाहत तिला त्यांच्या जवळ चा झोपवायचे ...

तिला दूध पाजण्यासाठी बोलवलं तरी सासूबाई बोलायच्या काय आहे ग तुझ्या दुधात.. बंद कर पाजयचं.


आज तर हद्द च झाली... तिला खाऊ घालत असताना खुशी इकडे तिकडे पळत पळत थोडी पडली... तिला लागलं नाही आणि रडली ही नाही... तरीही सासरे तिला बोलें बाळ सांभाळता येत नाही तर कशाला ग संभाळते....

नुसतं जन्म दिला म्हणजे सगळं आलं असं नसतं... तुला येत नाही ना सांभाळता जा निघून आमच्या घरातून आम्ही सांभाळू आमच्या लेकराला...


तिला काही बोलूच दिल नाही आणि तिला घरा बाहेर जायला फोर्स करू लागले... खुशी ला तिच्याकडे देत नव्हते....

सासूबाई नी ख़ुशी ला तिच्याकडून हिसकावून घेऊन बाहेर निघून गेल्या आणि 

तिला भीती वाटली खरंच खुशी आपल्या पासून दुरावेल का आणि ति चक्कर येऊन पडली...


कुठल्याही आईला तू चांगली आई नाहीस हे सांगणाचा हक्क कोणाला च नाही..

समाजात आजही असे लोक आहेत ते नवीन आईला सपोर्ट न करता तिला डिप्रेस करतात आणि मग नवीन माता postpartum depression च्या शिकार होतात...


Postpartum depression हे एक मानसिक आजार आहे जो डिलिव्हरी नंतर भरपूर आई मध्ये पाहायला भेटतो.



सगळ्यांना वाचकांना एवढीच विनंती तिला तीच आईपण तिच्या पद्धतीने अनुभूवा द्या...???

तिला मदत करता येत नसेल तर तिचा त्रास तर वाढवू नकात...

आईने बाळाला जन्म दिला म्हणजे त्याच सगळं तिनेच करायच सु शी.. खाण पिण...आणि त्याला काही कमी जास्त झालं की ऐकावं ही आईला च लागत सांभाळता येत नाही तिला..

किती असे पुरुष आहेत जे बोलतात... रात्री बाळ बारबार उठत असेल तर,तू झोप मी घेतो.. तू थकली असशील दिवसभर काम करून... खूप कमी लोक असतात असे किंवा नसतील ही...


फक्त तू थकली असशील आराम कर.. तू जेवण कर मी घेतो बाळाला एवढं जरी कोणी बोले तरी 4 घास जास्त खाते ती...


तिला त्रास होत असेल तर घरातील सासूबाई बोलतात.. आमच्या वेळेस आम्ही शेताला जायचो वेगरा वेगरा... सगळे स्त्रिया वेगळ्या असतात. तो जमणा वेगळा होता...


डिलिव्हरी नंतर चे डिप्रेशन ची संख्या खूप वाढत आहे... काळजी घ्या आपल्या घरातील नवीन माताची...??


नवीन मातांना विनंती आहे... स्वतःच्या आईपाणावर विश्वास ठेवा. तुमच्या पेक्षा जास्त काळजी त्या बाळाची कोणीच घेऊ शकत नाही.

रोज थोडं walk करा

रोज 15-20 मिनिट ध्यान मेडिटेशन करा

Healthy खा

भरपूर पाणी प्या..

आपल्या पार्टनर शी बोलत रहा... मला यांनी असंच बोलें त्यांनी तसेच बोलें म्हूणन कुढत बसू नका.

कुछ तो लोग केहगे, लोगो का काम हैं केहना.. सो new moms 10 लोक 10 सल्ले देतात... तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा... स्वतःवर प्रेम करा...

देवानी आपल्यावर एक नवीन आयुष्य घडवण्याचं मोठं कार्य सोपवलं आहे तर त्यासाठी स्ट्रॉंग अँड healthy रहा...

जास्त त्रास असल्यास तुमच्या dr चा सल्ला नक्की घ्या.

सुजाता ला वेळीच dr च्या सल्ला भेटला... तिने त्याप्रमाणे रोज मेडिटेशन योगा करून स्वतःच्या मनाला स्थिर केल... स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात केली...

या वेळेस विपीन ने तिची साथ दिली... Dr च्या काउंसेल्लिंग चा उपयोग विपीन ला जास्त झाला...

त्याला त्याची चूक समजून आली आणि त्यांनी सुजाता ला पूर्ण सपोर्ट केला...

आज सुजाता डिप्रेशन मधून बाहेर पडली आहे... आपल्या ख़ुशी सोबत खुश आहे...

आजही तिला स्पष्ट बोलता येत नाही पण चुकीच्या गोष्टीना इग्नोर करायला नक्कीच शिकली आहे....

काही चुकलं असेल तर माफ करा