Jan 26, 2022
नारीवादी

स्त्री आणि तडजोड

Read Later
स्त्री आणि तडजोड


लहानपणापासून आपण सगळ्यांनी आपल्या आईकडून आजीकडून ऐकलं आहेच....

बाई ग तडजोड ही बाई च्या पाचवी ला पुंजली...

स्त्री ला जन्मला पासून च तडजोडीचे धडे दिले जातात...


शाळेत टाकायच असेल तर मुलीला मराठी मेडीयम आणि मुलाला इंग्लिश मेडीयम...(मिडल क्लास गावाकडच्या फॅमिली )

पोरी शिकून काय करणार आहेत... करू दे तडजोड... सध्या ही परिस्थिती आणखीन ही गावामध्ये आहे...


तुला तुझा आवडता कोर्स करता येणार नाही कारण भैया च्या कोर्स ला पैसे दयाचे आहेत... तू दुसरा कुठला तरी कोर्स कर... मुलगी आहेस कर ना तेवढी तडजोड...


अश्या बऱ्याच तडजोडी वर नाव स्त्री च कोरून ठेवलं आहे..???


स्मिता ने संक्रात साठी पुरणाचा घाट घातला... तिला पुरणपोळी आवडत नव्हती आणि पचत ही नव्हती... पण घरच्यांसाठी तिने पुरणपोळ्या बनवल्या...

पुरणपोळी खाल्या मुळे तिला संध्याकाळी loose motion झाले..

कसबस उठून रात्री साठी स्वापक बनवू लागली. सकाळच्या 2-3  पुरणपोळी शिल्लक होत्या...

सासूबाईण्या तिने विचारलं,आई 3 पोळ्या आहेत तर थोडा भात बनवते आणि 2 चपाती...

सासूबाई बोल्या,अग 2 नको 4 पोळ्या बनव... मी.. तुझे सासरे आणि सागर साठी...

पुरणपोळी एक मी खाते एक तू खा...आणि मिनू एक खाईल..

मिनू स्मिता ची 15 वर्ष्याची मुलगी... मिनू ही खाईल.

हे ऐकून स्मिता ला राग ही आला आणि वाईट ही वाटलं... रोज मी राहिलेले शील्लक अन्न तर खाते ,पण आज सकाळीच पुरणपोळी सहन नाही झाली ,आता परत खायचं म्हंटल्यास आणखीन त्रास...

तिने हिम्मत करून सासूबाईंना बोली, आई पुरणपोळी तर सगळ्यांना आवडते तर ते खातील... मला त्रास होतोय मला जमणार नाही ओ खायला...

सासूबाई नी रागाने तिच्यावर कटाक्ष टाकला आणि बोल्या..

स्मिता बायका आहोत आपण त्रास होत असेल म्हूणन स्वतः गरम आणि पुरुषाला सकाळचं जेवण द्याचं का?? ते काही नाही पुरणपोळी आपण खायची आणि त्यांना गरम चपाती बनव..

तिला सासूबाई च्या राग खूप आला पण तडजोड करावीच लागेल म्हूणन शांत राहिली...


मिनू पाहत होती लहानपणी पासून,आईला किती अड्जस्ट कराव लागत पण आईसाठी कोणी अड्जस्ट करत नाही.. दिवसभर भिंगरी सारखे फिरते ती सगळ्यांनाच्या मागे.. तिला मात्र कोणीच विचारत नाही की, ती थकली का?? उलट तिलाच रोज बोल लावतात..

मिनू मोठी झाली होती तिला आता आईच दुःख समजत होत...


मिनू च्या स्कूल मध्ये function होत ती आई च्या मागे लागली होती... ड्रेस घाल म्हूणन... पण आजी बोली आमच्या घरात बायका साडीच घालतात...

तिने बाबांना विनवण्या केल्या, तो ही बोला,मिनू तिला सवय नाही ड्रेस ची असुदे ग... बिचारी मिनू शांत राहिली...


मिनू आज छान वन पीस घालून तयार झाली फ्रण्ड च्या बर्थडे साठी. ती निघत असताना आजीने तिला थांबवलं आणि बोली असे कपडे वापरायचे नाहीत मिनू..

त्यावर ती बोलण्या आधी सागर बोला,आई मिनू ला जे घालायचं ते घालू दे,तिला उगी असे बंधन घालू नको... जग कुठे चाललं आहे, तू कुठला विचार करत आहेस.

मिनू ला आनंद झाला बाबा आपल्यासाठी विचार करतो मग, आईसाठी का गप्प राहतो...


तिने आईला एकदिवस विचारलच,का तू स्वतःसाठी स्टॅन्ड घेत नाहीस... तू जॉब सोडून घरी राहिलीस माझ्यासाठी... तूच का अड्जस्ट केलेस.. बाबांनी का नाही केल असं... आता मी मोठी झाली,तू जॉब चा का विचार नाही करत...


आई तुझ्या आवडी निवडी तू नाही जपलीस तर कोण जपणार...

मिनू ने तिला खूप समजावलं आणि स्मिता ला आज अचानक आपल्या अंगात 10 लोकांचं बळ आल्यासारखं भासू लागलं आणि मुलीचं कौतुक वाटू लागलं की,किती मोठी झाली माझी मिनू... माझ्यासाठी किती विचार करते. आनंदाने डोळे भरून आले...


मिनू ने तिचे डोळे पुसले आणि बोली आता रडायचं नाही आई. आता हसायचं फक्त हसायचं.. आणि दोघी एकमेकींना कडकडून मिठी मारत नवीन स्वप्न रंगवू लागल्या...


रात्री जेवणाच्या वेळी मिनू ने सगळ्यांना बोलायचं ठरवलं...

बाबा अरे नवीन क्लास सुरु करायचा विचार करतेय...

बर.. कर फीस किती आहे...

बाबा मी नाही रे,आई क्लास सुरु करायचं म्हणतेय..

आई.. आजी लगेच बोली... आता या वयात तुझी आई क्लास ला जाणार...?? कशाला हवयं असलं काही... आणि "काय ग स्मिता नुसते उद्योग कोण शिकवतो ग तुला.."??


आजी आईला क्लास ला जायची गरज नाही.. Maths मध्ये मास्टर्स केल तिने.. ती स्वतः क्लास चालू करून मुलांना शिकवणार...??


काय ??बाबा आजी एकदम ओरडले..


हो बाबा...


अग पण का?? काय कमी आहे तिला.. बाबा बोला


सगळं आहे तिच्याकडे फक्त स्वतःच स्वातंत्र्य नाही.. स्वतःचा आत्मविश्वास नाही.. स्वतःच desicion घ्यायचा हक्क नाही...

लग्न झाल्यापासून तुमच्या तालावर नाचतेय ती... कधी तिला विचारलं दमली असशील आराम कर.. बर हे जाऊदे..


आजी मला सांग आईची आवडती भाजी कुठली... आजी तिचा कडे अशी पाहू लागली की तिला माहित च नाही..

बाबा तू सांग.. त्याला ही माहित नव्हतं..

मिनू ने सगळ्यांना सांगतलं ते कसं चुकत आहेत... As usual सगळ्यांना पटलं पण आजी ला नाही ??


मिनू मुळे स्मिता ने maths ट्युशन चालू केल... आणि आज तिची 200 मुलांची batch आहे... स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकली ती तिच्या मुली मुळे...


आज तिने मिनू ला घट्ट मिठी मारली आणि बोली thanku ग सखी तुझ्यामुळे मी स्वतःला भेटले..

तेव्हा मिनू ने हसून उत्तर दिल.. नाही तडजोड लिमिट मध्ये करून स्वतःचा विचार केलास म्हूणन तू स्वतःला भेटलीस...


आज स्मिता चा सत्कार होता.. त्या सिटी मधलं टॉप क्लास मध्ये एक हिचा क्लास होता... तेव्हा ती मिनू विषयी भरभरून बोलत होती आणि सगळ्यांना भरभरून सांगत होती तडजोड करा पण सहन होईल आणि पचेल इतकीच..??


दुसरे आपल्यला तडजोड कर बोलें तरी,आपण ठरवायचं कुठे तडजोड करायची आणि कुठे नाही...

अडजस्टमेन्ट प्रेत्येकाला करावीच लागते पण त्या अडजस्टमेन्ट मुळे आपले मानसिक आणि शारीरिक हाल नको व्हायला...


Usha ??ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..