डिवोर्स मनाचा मनाशी

...





समिधा लग्न करून सासरी आली.. प्रेत्येक मुलीप्रमाणे खूप सारे स्वप्न आणि खूप प्रेम मनात घेऊन.नवीन आयुष्याची तयारी करायला सज्ज होती समिधा.

समिधा मनमिळावू, दिसायला सुंदर, उच्चशिक्षित होती.
माहेरी लाडाकोढ्यात वाढलेली.

लग्नाचं वय झालं आणि समीर च स्थळ आलं. समीर तिला पाहता क्षणी आवडला नाही.
समीर दिसायला सावळा.. समोर थोडं टक्कल पडलेले..समीर च्या घरच्यांचा आग्रह खातीर ती समीर ला भेटली आणि त्याचे विचार त्याचा स्वभाव तिला आवडला आणि तिने लगेच होकार दिला...

घरच्यांना ही समीर दिसायला आवडला नव्हता पण समिधा ची इच्छा समजुन लग्नाला सगळे तयार झाले..
लग्न झालं. नव्याचे नऊ दिवस संपले.. घरात सासू सासरे दीर आणि नणंद एवढा परिवार... कमवणारे  फक्त नवरा.

लग्नाला 1 महिना ही झाला नव्हता कि एके दिवशी जेवत असताना सासरे  बोलें, समिधा तुला सून म्हूणन आणले आहे कारण तू समीर ला fincial सपोर्ट करावा म्हूणन पण तु तर जॉब च नावच काढत नाहीस, म्हूणन म्हंटल आपण च सांगावं आता जॉब कर.

त्यांच्या बोलण्यावर तिने समीर कडे पहिले या आशेने कि तो काही बोलेल पण नाही, नाही बोला काही तो.
तिला खूप वाईट वाटलं पण स्वतःला सावरत की कधी तरी जॉब करायचा होता ना, मग आता का नको. जॉब करू लागली.

सगळी payment सासरे घेऊ लागले.तिला त्या गोष्टीच काही वाटलं नाही पण तिचा येणाजाण्याचा खर्च, तिचा व्यक्तीतिक खर्च याचा ही हिशोब सासरे तिला मागू लागले.. तिला हे पटलं नाही.
तिने समीर ला या विषयी विचारलं तर, तो बोला ठीक आहे ना.. तिला त्याच वागण खटकलं पण ती शांत राहिली.

सासूबाई सासऱ्यांनी तकदा लावला जॉब करत आहेस म्हूणन माज करू नको, घरातले सगळं काम करून, स्वपाक बनवून जॉब ला जात जा. जॉब करतेस म्हणजे आमच्यावर उपकार करत नाहीस.
तिने समीर ला सांगतलं की अरे मला नाही जमणार.. माझी खूप दमछाक होते रे,तर तो तिच्यावरच ओरडला काय ग कटकट करतेस,4 माणसाच्या स्वपाक साठी आणि हे काय चालवलं अरे तुरे... अहो जाओ बोलायचं मला ओके...
तिच्या डोळ्यातून अश्रू ची धारा थांबत नव्हत्या.. तिला खूप वाईट वाटलं कि आपण याच्यावर एवढा विश्वास ठेवून लग्न केल आणि हा वेगळाच वागतोय.
याच्या आग्रहामुळे आपण याला अरे तुरे बोलत होतो आणि हा आता असा का बोलतोय.
मी तुझ्या डोळ्यातून एक थेंब ही येऊ देणार नाही म्हणणारा आता रोज रडवतोय.
खचली होती ती मानसिक रित्या... हरली होती ती प्रेमामध्ये. ज्या व्यक्ती वर जीवापाड विश्वास ठेवला तो व्यक्ती च बदलला होता.

बघता बघता 2 वर्ष झाली आणि त्यांना आता बाळ झालं.. बाळाच्या संगोपन साठी समिधा घरी असायची..

ती माहेरहून ठरवून आली होती मनात काहीच वाईट ठेवायचं नाही सगळं विसरून नवी सुरुवात करायची.. 

घरातलं सगळं करायच.. भांडी.. फरशी.. कपडे.. स्वपाक.. सगळं करायची... कोणाला नाव ठेवायला जागा नव्हती ठेवली तिने..

घरी बसते म्हूणन सासू सासरे ची कुरकुर.. तिला वाटेल तस बोलण.. कॉन्टीनुए टोमणे... तिला आता कंटाळा आला होता..

तिने समीर शी  या विषयी चर्चा केली तर तो तिच्यावर च भडकला.. उलट तिलाच बोला खूप.

एकेदिवशी हद पार झाली.. समीरला घरी येतेवेळेस दूध घेऊन ये असा msg करून ही, तो  दूध  आणयच विसरला.. तिने त्याला विचारला की अहो सतत दूध विसरता तुम्ही ..तर  सासरे तिच्यावर ओरडले.. तो काय तुझा नौकर आहे का.?. तुझ्या बापाचा नौकर आहे का..??  तू घरात बसून फक्त खातेस तू जाऊन आण्याचा ना दूध.. खूप बोलें तिने फक्त ऐकून घेतलं आणि रूम मध्ये येऊन बसली..

समीर तिच्या पाठोपाठ आला आणि तिला बोला शांत राहा.. रिऍक्ट करू नको.. तू कशाला बोली तस etc etc..

तिला वाईट वाटत खूप की नवरा बायको म्हूणन हक्काने त्याला बोलू शकत नाही मी या घरात.

सतत च्या मानसिक खाचिकारण मुळे ती आतून तुटत होती.
तिच्या आणि समीर च्या नात्यात खूप मोठी दरी निर्माण झाली होती... कधी कशी तिला समजलंच नाही.
तिला आता सगळंच हरल्या  सारखं वाटू लागलं...मित्र मैत्रिणी नी डिवोर्स चा सल्ला दिला  . ..त्यावर तिने हसून एवढंच बोली डिवोर्स तर केव्हाच झालाय आमचा मनाचा मनाशी.. फक्त कागदावर रजिस्टर नाही झाला...

खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या मनावर खूप मोठे मोठे घाव करतात..असे किती तरी नातं आहेत समाजात ज्यांचं असा डिवोर्स झाला आहे.. फक्त मुलांसाठी.. आई वडिलाच्या इज्जत साठी नातं टिकवून आहेत...

अश्या नात्यात घुसमट होते ...नातं तोडणं हा उपाय सगळ्या स्त्रिया ना जमत नाही ...मग त्या असा डिवोर्स करून आयुष्य भर नातं निभावतात पण फक्त जबाबदारी म्हूणन ...

अश्या कितीतरी स्त्रियां आजही आहेत ज्या उच्चशिक्षित आहेत पण तरीही अश्याप्रकारच नात्याचं ओझं ओढत आहेत.
आजच्या स्त्रियां खूप पुढे गेल्या आहेत पण तरीही आणखीन बऱ्याच स्त्रीया अश्या परिस्थिती मधून जात आहेत, त्यांना एवढंच सांगावं वाटत.. जिथे आहात जश्या आहात स्वतःसोबत जगायला शिका.. स्वतःवर प्रेम करा...
नवरा नवऱ्याचं प्रेम फक्त लग्नाच्या 2-4 वर्ष छान असत आणि वाटत... बाकी नंतर तर व्यवहार सुरु होतो... Give nd take चा...
जे काही करायच ते आधी स्वतःसाठी करा.. स्वतःला खुश ठेवण्यासाठी दुसऱ्याची गरज का??
स्वतः खुश राहिलात तर आपोआप बाकीचे खुश होतात...