Jan 26, 2022
नारीवादी

बबड्या (पुरुष प्रधान घर )

Read Later
बबड्या (पुरुष प्रधान घर )
मैत्रिणी चा कॉल आला.. मयुरी चा.. 
बोलत बोलत रडू लागली..
मी विचारलं काय ग काय झालंतर
बोली आजकाल माझं आणि नवराच पटत नाहीये ग..

आई झाले.. 6महिन्या नंतर सासरी आले... बाळ लहान असल्यामुळे जॉब सोडून दिला... आता 2 वर्ष तरी काही करायच नाही असं ठरवलं...

घरी असल्यामुळे.. स्वपाक.. भांडी.. फरशी.. कपडे सगळे स्वतः करायचे... हे करून बाळाचे कपडे.. त्याच खान पिन.. सु शी.. रडणं हसणं खेळण सगळं मलाच बघावं लागायचं..

नवरा ची काही मदत होत नाही... उलट त्याच जेवण... त्याच कपडे.. त्याच सामान सगळं व्यवस्थित बघायच... 

मग त्याला बाथरूम ची चपल ओली जमत नाही.. जमेल तस कोरडी ठेवायची... त्याला गरम जेवायला लागत तर तो आल्यास गरम बनवून देणे... त्याला धूळ जमत नाही म्हूणन सतत क्लीन करत राहणे... त्याच्या सतत पुढे मागे करात राहणे...

एवढं सगळं करत असताना त्याच्याकडून अपेक्षा काहीच ठेवायच्या नाहीत...

तबियत थोडी खराब होती म्हूणन गरम गरम जेवण बनवता नाही आलं... घाई गडबडीत चपल ओली. राहिली.. . कोरडी करता नाही आली.. त्याच नास्ता जेवण थोडं late बनवून झालं..

आज त्याला msg केला कामाच्या ठिकाणी ते ही ऑनलाईन दिसला तो म्हूणन अरे थोडं सामान लागणार आहे घेऊन येतो का???

त्याचे 10 तरी msg आले... 

मी एक एक करून लक्ष देऊन वाचत होते..

तूझ्या सोयीने मला जमणार नाही.. माझ्या परीने मी आणेल...

तुला जसं तुझ्या सोयीने जेवण आणि बाकी गोष्टी माझ्यासाठी करता येतात.. अगदी तसंच मला ही येते..

मला कळलं नाही असा का msg केला यांनी...

मी विचारलं काय झालं..

तर बोला हे बघ.. मला गरम च जेवण हवा... बाथरुम ची चपल कोरडी हवी.. माझं सगळं मला वेळेत हवं.. late जमणार नाही.. मग कारण काहीही असो.. ओके...

मी बाहेरून पैसे कमवून आणतो... मला घरच आणि बाहेरच जमणार नाही... तू आता घरी असतेस तू कर सगळं घरच... तुला जमत नसेल तर सांग मला मी mess लावतो 2 time ची... atlest 40 रूप मध्ये मला गरम आणि चविस्ट जेवायला भेटेल...

त्याचा शेवटचा msg बघून शॉक झाले मी...

ती बोलू लागली सांग मी काय करू 

मी तिला एवढंच बोलें.. स्वतःवर प्रेम कर... स्वतःवर लक्ष दे... स्वतःची रिस्पेक्ट कर.. जो पर्यंत तू स्वतःची value समजून घेणार नाहीस तो पर्यंत तुला असा त्रास होणारच...

त्याच्या मागे मागे केल्यामुळे तो डोकावर बसला आहे...

तू स्वतःकडे लक्ष दे.. तो नक्की तुझ्याकडे लक्ष देईल..

मला वाईट वाटलं तीच आणि कीव आली तिच्या नवऱ्याच्या विचाराची... जो बायको च्या प्रेमाला mess शी तुलना करतोय... असा पुरुषांनी लग्न न करता... 2 टाइम्स ची mess आणि एक कामवाली ठेवली तरी त्यांचं भागून जात..

मला विचार पडला कि पुरुष बाहेरून 4 पैसे कमवून आणतात म्हणजे झाली का त्यांची जबाबदारी... सगळे सुख पैसा ने विकत घेता येतात का..??

बायको आजरी असल्यास तरी तिला समजून घेतलं तर कुठं बिघडलं.. ती थोडंच तुम्हाला तुमच्या हाताचं चहा करून मागतेय... फक्त जे रोज होत त्याला थोडा उशीर होईल...

बायको जॉब सोडून घरी आहे कारण ती तुमच्या बाळाचं संगोपन करायला ती थांबलेली असते... ती घरी राहते म्हणजे ती काहीच करत नाही असं होत नाही..

तुम्ही तुमच्या इच्छा बोलून दाखवल्या... 

कधी तिला ही वाटत असेल ना... नवरा ने तिला जवळ बसवून विचारावं कि सांग तुला काय वाटत... तुला काही हवं आहे.. etc etc..

खूप सध्या सरळ अपेक्षा असतात बायको च्या.. प्रेमाचे 2 शब्द...
नास्ता केलास का??  करून घे...
जेवण केलास का..??  चाल जेवू..
थकलीस का खूप... पिलू ने त्रास दिला का फार.. जा थोडं पड मी घेतो बाळाला...
हे घे 1000 रुपये राहूदे तुझ्याकडे..
दुखतंय का... उठू नकोस मी बघतो सगळं तू आराम कर..

एवढंसं शब्द पण जड जातात  पुरुष मंडळींना...

कुठे कुठे आज च्या युगात पण पुरुष प्रधान समाज आहे.. आजही बबड्या आहेत भरपूर घरात..

असं काही घडल्यास ती स्त्री neutral होत.. ती दगड बनते.. नातं तर निभावते फक्त जबाबदारी म्हूणन.. प्रेम आटून जात...

ती तुमच्यासोबत असते खरी पण तुम्ही तिला केव्हाच गमावलेले असत...
माझे विचार आवडले नसतील किंवा माझा उपाय आवडला नसेल  तर माफ करा..

✍️ dr. Reddy


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..