Jan 26, 2022
नारीवादी

घेतला आहे मी नवरा विकत

Read Later
घेतला आहे मी नवरा विकत
घेतला आहे मी नवरा विकत 


आज सारिका च्या घरी जोरजोरात भांडण चालू होत.. नेहमी असायचं पण आज सारिका चा ही आवाज होता त्यात... म्हूणन शेजारी कान देऊन ऐकत होते.. एवढी शांत.. समजदार.. मनमिळाऊ सारिका का बर भांडत असेल... असा प्रश्न सगळ्या शेजार्यांना पडला होता.. मी ही त्यातली एक... 

सारिका माझी खूप जवळची मैत्रीण झाली होती या सोसायटी मध्ये.... 
सारिका शिक्षिका होती.. जॉब करायची.. आणि घर ही सांभाळायची.. 

सारिका देशपांडे... देशपांडे ची एकुलती एक लेक... लाडाने वाढवलेली..सारिका एक उच्शिक्षित मुलगी... स्वतंत्र स्वभावाची.. स्वछंदी मुलगी.. तसेच मनमिळावू.. संस्कारी.. दिसायला अतिशय सुंदर... शिक्षण पूर्ण झालं... तिने MA B.ed केलेलं.. आणि सातारा ला जॉब करत होती... 

घरच्यांनी उपवर शोधायला चालू केल... भरपूर स्थळ येऊ लागले पण सारिका ला ते हुंडा खूप मागू लागले.. सारिका हुंडा च्या खिलाफ होती पण घरी तीच कोणी ऐकत नव्हतं.. आणि राज पाटील च स्थळ आलं.. मुलगा इंजिनीरिंग होऊन जॉब करत होता.. सातारा च स्वतः च घर होत.. तिची जॉब ही तिथे च आहे म्हूणन आई बाबा नी त्याला पसंत केल.. आणि 8 लाख 12 तोळे सोन देऊन.. थाटामाटात सारिका च लग्न झालं.. सारिका सासरी आली.. 

राज स्वभाव ने शांत.. कमी बोलायचं.. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम.. पण घरात त्याच काहीच चालत नसे... तो सारिका ला रूम मध्ये प्रॉमिस करायचा मी हे करेल.. ते करेल तुझ्यासाठी पण रूम बाहेर आलास तो तिला जास्त बोलायचं ही नाही.. सारिका ला त्याच हे घाबरून वागण आवडत नसे..
घरातील वातावरण ही खूप congested.. narrow minded मानसीवृत्ती पाहून तिला राग येऊ लागला.. 

सगळं तिनेच करायचा असा अट्टाहास असे सासूबाई चा... तू सून आहेस... तुलाच करयचा आहे.. बगता बगता 1 वर्ष झाला पण परिस्थिती काहीच बदलेली नाही... तेच रोजच रडगाणं.. तू हेच का केलास.. कोणाला विचारून केलास.. तुझ्या आईबाबा ने हेच शिकवलं का??  etc etc.. सारिका शांत राहून ऐकून घेत.. 
बाहेर फिरायला जायचं नाही... हॉटेल्स च खायचं नाही.. नवीन कपडे घायचे नाही... बर्थडे एनिवर्सरी सेलेब्रेशन करयचा नाही.. प्रेत्येक गोष्टी वर बंदी... 

सारिका ची सहनशक्ती संपत आली होती.. आणि आज तिच्या सहनशक्ती चा पार कडेलोट झाला... 

सारिकाला आज बर नव्हतं... ताप आलेला डोकं दुखत होत.. तिने जॉब वरून सुट्टी घेतली आराम करायला आणि सासूबाई नी जुने कपडे काढले धुवायला.. सारिका ला सांगतलं धुणासाठी... तिने काहीच ans दिले नाही.. 
11 वाजले तरी घरात कोणी चहा देखील केल नव्हतं.. सासू ची बडबड चालू झाल... सारिका ला तापी मुळे weakness आला होता.. राज ही आज घरीच होता.. तिने राज ला बोलवलं आणि लहसून सोलून दयाल सांगतलं... 
सासूबाई ने हे ऐकलं आणि ओरडत च तिच्या अंगावर गेल्या 

मेहंदी लावलीस का हाताला??  सासू 
का काय झालं... सारिका 
माझ्या पोराला काम सांगतेस का??  सासू 
तुमच्या मुलगा माझा ही नवरा आहे आई.. मला त्रास होतोय मी मदद नको मागू.. सारिका.. 
नाही मागायची.. सासू 
का पण.. सारिका 
कारण तू घरातील काम करायला आणलेली कामवाली आहेस... सासू 
सारिकाला हे ऐकून शॉक च बसला.. राज शांत ऐकत होता.. काहीच react करत नव्हता.. ते पाहून तिला खूप राग आला.. 
आणि सारिका बोलायला चालू झाली.. 
काय म्हण्टलंत.. मी कामवाली?? नाही बल्की तुमच्या मुलगा माझा नौकर नक्की आहे कारण 8 लाख 12 तोळे देऊन विकत घेतला आहे मी त्याला.. 
हे ऐकून सासू सासरे आणि नवरा तिच्याकडे बघू लागले... 
सासूने नवरा ला उकसवला बघ बघ कशी बोलते तुझी बायको तुला नौकर म्हणते आणि त्याच्यातला पुरुषी अहंकार जागी झाला आणि त्यांनी सारिका वर हात उचला आणि तिला घरा बाहेर काडून दिल... तिच्या तोंडावर दार लावून दिल.. 

मी तिला माझ्या घरी घेऊन गेले.. पाणी दिले.. तेव्हा थोडा वेळ शांत बसली आणि बोलू लागली.. काय चुकलं माझं सांग.. एवढे पैसे देऊन लग्न करयचा.. यांचं घर साम्भाळायचं.. नौकरी करून ही पैसे यांना दयचे.. आणि वरतून काय म्हणतात कामवाली आहे त्यांच्या घरची.. 
अरे हुंडा म्हूणन जे पैसे घेतले कश्याला.. मला पोषायला.. त्याची गरज नाही कारण मी कमावते.. मी स्वतःला पोषु शकते.. housewife असते तरी घरात ला काम करून ही मी स्वतः पोषु शकलेच असते.. ती थोडा वेळ थांबून तिचा आईबाबा कडे निघून गेली.. 

खरं बोलत होती ती.. हुंडा देतोय म्हणजे नवरा विकतच तर घेतोय आपण.. 
आमची नवीन मैत्री झालास जेव्हा तिच्या हुंडा च कळलं होत मला तेव्हा मी बोलली अरे बापरे एवढा हुंडा... तू तर चक्क नवरा विकत घेतलास की आणि खूप हसलो होतो.. तो मजाक आज तिची वस्तूस्तिथी बनला होता.. तिच्या अस्तित्वाच सत्य बनला होता.. 
खरंच बोली होती ती एवढा हुंडा देऊन लग्न करून आलास नवरा वर एवढा हक्क असू नये की त्याला काम सांगावे.. 

माझे विचार आवडले नसतील तर माफ करावे 

✍️dr  रेड्डी 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Usha Reddy

Doctor

जे अनुभव आले आहेत तेच माझ्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न..