दुसऱ्यांना खुश ठेवायला जाऊ नका...

...










स्त्री ला देवाने बनवलंच असं आहे की... तिच्यात सगळे रूप पाहायला भेटतात...

स्त्री स्वतः पेक्षा दुसऱ्यांसाठी जास्त जगते...सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्यात busy असते....
दुसऱ्यांना खुश ठेवताना स्वतः स्वतःला दुःखी करून घेते आणि स्वतःला हरवून बसते....

आजची कथा ही आपल्या पैकी बऱ्याच स्त्रीयानाची आहे...

मीरा कर्तव्यदक्ष सून बायको आणि आई होती...

सकाळी उठल्यापासून ती घरातल्या प्रेत्येकासाठी झटयाची... मुलांचे डबे... नवरा चा डबा... सासू सासर्यांचा नास्ता चहा... औषधं पाणी... मुलांचे स्कूल त्यांचा होम वर्क... सगळं काही मीरा करायची....

कधीच तक्रार नव्हती तिची..... कारण ती सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्यात busy असायची...

रोज नवीन नवीन receipe बनवायची.... मुलांना आणि नवऱ्याला खुश करण्यासाठी...पण त्यांना काही नवलं वाटतं नव्हते... उलट ते तिला गृहीत धरायचे... ही काय घरीच असते...

नवऱ्याचं सगळ्यां वस्तू जागच्या जागी ठेवायची....
त्याला जसं आवडत तसं सगळं घर आवरून ती त्याची वाट पाहायची... तो आल्यास त्याला घरात छान वाटावं सगळं... तो खुश फील करावा आणि त्याला पॉसिटीव्ह वाटावं घरात....

छोट्यातली छोटी गोष्टी ची काळजी ती घ्याची त्याच्या पण तो कधीच खुश नव्हता झाला तिच्या कामावर.... तिचे इफेर्ट्स तिचे कष्ट कोणीच पाहत नसत....

सासू सासर्यांचा सगळं तीच करायची तरी देखील त्यांना तिच्याबाबतीत काहीच वाटत नव्हते... उलट ते म्हणायचे... काम करून आमच्यावर उपकार नाही करत ती.... या घरची सून आहे ती... तिला हे करावेच लागेल...

इतकी वर्ष झाली पण ती जे करते ते फक्त घरच्या लोकांसाठी त्यांच्या आनंदासाठी करत होती.... पण त्यातून तिला निराशा च भेटायची...

आज त्याच्या ऑफिस ची पार्टी होती... ती छान तयार होऊन हॉल मध्ये आली आणि खूप आशेने तिने नवऱ्याकडे पाहिलं तर त्याच तर लक्षच नव्हतं,यांच्या आवडीचा कलर घातला तरीही त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही...तिला वाटत खूप त्यांनी तारीफ करावीशी पण atlest छान दिसत आहेस एवढं तरी.....

पार्टी मध्ये चुकून हिच्याकडून एका ladies च्या साडी वर पाणी सांडलं जात आणि खूप issue होतो...
मीरा चा नवरा सगळ्यांसमोर तिला खूप बोलतो आणि ती खूप रडते खूप आक्रोश करून घेते आणि

त्या इंसिडेन्ट नंतर तिला कळू लागलं की किती चुकीचं वागत होतो आपण... आपण अश्या लोकामासाठी मर मर करतोय ज्याला आपली value नाही... जे लोक सतत तिचा अपमान करतात...

नुकताच चालू असलेल्या दसरा च काम आठवलं तिला....
घरात इतकी माणसं असून ही हिने एकटीने सगळे भांडी कपाट बेड स्वतः उचलून स्वच्छ केले.... एकटीने अगदी मनाने सगळं केल... का नाही करणार तीच हक्काचं घर होत....

एवढं करून ही सासूबाई बोल्या... सगळं उलट काम करतेस बाई.... अगदी एक झालं की एक व्यवस्थित कामे करावे पण तुला ना ते जमतच नाही....खूप वाईट वाटलं.... इतकं सगळं एकटीने करून ही सासूबाई अश्या बोल्या....

बेडरूम पण नेटनेटकी करून काही changes केले तिने त्यावर नवरा ही बोला की कुणी सांगतलं ग स्वतःची अक्कल वापरायला....
ती बोली तुम्हाला आवडेल म्हूणन केल....
त्यावर तो बोला... मला आवडेल असं आतापर्यंत काही केलंस का तू.... जे आता करशील... सतत स्वतःच्या मनाचं करतेस....

तितक्यात सासूबाई पण आल्या आणि तिच्यावर ओरडू लागल्या... मालकीण समजते स्वतःला घराची... बघ ना दसऱ्याचा काम काढतांना विचारलं देखील नाही... काय बदल करतेय ते ही सांगत नाही ही....

ती सुन्न झाली होती... त्या दोघचं बोलण तिच्या कानपर्यंत पोहचत नव्हतं... ती शॉक लागल्यासारखं झाली होती... ज्या लोकांना खुश करण्यासाठी ती सगळं करत होती... त्यांच्या मनात तिच्याविषयी असं काही असेल कधी विचारच नव्हता केला.....

खूप रडली बाथरूम मध्ये जाऊन... रडून रडून तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि स्वतःला आरश्यात पाहिलं... कशी होतीस तू आणि कशी झालीस तू अशी हाल स्वतःचे तिने करून घेतले होते...

तिने तिथेच बसून सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा तिला समजलं आजपर्यंत तिने दुसऱयांना खुश ठेवण्यासाठी सगळं केल.. तिने स्वतःचा कधीच विचार केला नाही... स्वतःची आवड पण विसरली होती ती....
दुसर्यांसाठी जगून काय भेटलं... काहीच नाही कारण तू स्वतःसाठी काहीच केल नाहीस... तू स्वतःला कधीच value दिली नाहीस म्हूणन घरात कोणीच तुला value देत नाही... तुला सतत गृहीत धरलं जात कारण तू धरू देतेस....

तू जेवण करताना ही तुला सासूबाई 10 काम सांगतात आणि तू उठून निमूट पणे करतेस... तेच जर तू बोली असतीस... जेवण करत आहे जेवल्यास करते तर त्यांना ही कळलं असत तुझं जेवण ही इम्पॉर्टन्ट आहे....

तीच अंतर्मन तिला समजावत होत आणि तिला तिच्याच चुकांची जाणीव करून देत होत....
आज दुःख झालं तुला कारण तू त्यांच्याकडून अपेक्षा केलीस की तुझी तारीफ करतील पण ते लोक तारीफ करण्यासारखे नाहीच आहेत हे जर लवकर aacept केलेस तर सगळं सुरुळीत होईल....

सो डोळे पूस आणि स्वतःच आधी time table बनव.... स्वतःच्या आवडी निवडी लिहून काढ पेपर वर... आणि या पुढे तुला खुश करण्यासाठी जग...
घर स्वच्छ करायला तुला आवडत खुशाल कर... पण माझ्या या करण्यामुळे घरचे खुश होतील no way... ते कधीच होत नाही...
तू कितीही चांगल काम केल तरी त्यात त्रुटी तर काढणारच...

सो दुसर्याना खुश करण बंद करा...
कारण लोक आपली 1 वाईट गोष्ट लक्षात ठेवतात 9 चांगल्या गोष्टी विसरून जातात...

आयुष्य खूप कमी आहे जितके आहे तितकं स्वतःसाठी जगा... हो स्वतःसाठी जगा...कारण तुम्ही स्वतःच स्वतःला खुश ठेवलात तर दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी होतील... अपेक्षा कमी झाल्या की रुसवे फुगवे कमी होतील आणि नातं नवाने फुलायला लागेल.....
बघा पटतंय का??❤❤❤❤???


❤❤