थँक्यू नवरोबा ( नेगेटिव्हिटी कडून प्रॉडक्टिव्हिटी कडे )

...

थँक्यू नवरोबा....(पहिलं पाऊल नेगेटिव्हिटी कडून प्रॉडक्टिव्हिटी कडे )


नवरा बायको म्हंटल की भांडण आलंच.


धनश्री आणि दीपक बाहेरून पाहायला गेलें तर सुखी जोडपं पण आतून चित्र काही वेगळंच होतं.


दीपक डॉक्टर असल्यामुळे सतत बीजी असायचा. त्यात ह्या कोरोना प्रकरणामुळे तर जरा जास्तच बीजी झाला होता.

हॉस्पिटलहुन घरी आल्यानंतर कुठे ही टच न करता सरळ त्याची रूम गाठायचा. त्याची आणि तिची अशी सेपरेट रूम होती. कोरोनामुळे तो वेगळ्या रूममध्ये राहत होता आणि ती दुसऱ्या रूम मध्ये.

घरी आल्यास सॅनिटाईज होऊन, अंघोळ सगळं उरकून बाहेर यायला दोन तास लागायचे त्याला. त्याचा हेतू इतकाच की आपल्यामुळे घरामधल्या लोकांना बाधा नको.

बाहेर आल्यास पळतपळत दोन घास नास्ता झाला की लागलीच दवाखानाला निघून जायचा.

धनश्री मात्र तो आज बोलेल उद्या बोलेल याचं आशेवर दिवस ढकलत होती. समजदार धनश्री स्वतःच्या मनाची समजूत स्वतःच घालत असे की, डे नाईट ड्युटीमुळे थकत असतील, बोलायला त्राणच उरत नसेल, बोलतील कधीतरी.

कामापुरत बोलणं होतं होते दोघांचं पण नवरा बायकोचा असा काही संवाद नव्हताच.

बघता बघता कोरोना संपला. पण त्यासोबत दीपकला एकटं राहण्याची सवय देऊन. बावीस तास बाहेर राहणारा दीपकला धनश्रीची इन्व्हॉल्व्हमेंट नकोशी वाटु लागली. तिचं सतत बोलत नाहीस माझ्याशी या अश्या कंप्लेंट चा तिटकारा येऊ लागला आणि दोघात अंतर निर्माण होऊ लागलं.

अबोलपणे नातं निभावणं धनश्री साठी अवघड होऊ लागलं.

तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण तो टाळाटाळ करू लागला.


तिला समजतं नव्हते, दीपकच्या मनात नेमकं चालू काय आहे?

बायकांचा मनातलं कळत नाही असं उगीच बोलतात लोक. खरं तर पुरुषांचा मनातलं काहीच कळत नाही. ते काय विचार करतात त्यानं काय हवं.. काही समजतं नाही.. त्यात अबोल पुरुष समजायला महाकठीण असतो.


तिने ठरवलं आज दीपकला भांडायचं. घरी आल्यानंतर त्याला शांतपणे जेवणं करू दिल्यास ती त्याच्याकडे गेली.

"मला बोलायचं आहे तुझ्याशी?" धनश्री


"आता नको, नंतर कधीतरी " दीपक मोबाईल पाहत म्हणाला.


"दीपक, मी शांतपणे बोलत आहे, प्लीज बोलूया. इट्स हाय टाइम. आपल्याला आपल्याविषयी बोलावं लागेल" धनश्री.


"इतकं काय घडलं की आताच आणि आजच बोलायचं आहे तुला?" त्यांनी रागारागात मोबाईल बाजूला फेकला


"तू बोलत नाहीस माझ्यासोबत आणि विचारत आहेस काय झालं?" तीही आता रागात आली होती.


"ये यार, काय असतं गं तुझं बोलत नाहीस बोलत नाहीस. हजार कामं असतात मला, हजार गोष्टी डोक्यात चालू असतात माझ्या. त्यात तू घरात रिकामी बसून तुला सुचतं काहीही. मी बोलत कसा नाही? वेळ कसा देत नाही?" तो ही चिडला होता.


"कंटाळा आलंय यार, तुझ्या या प्रश्नचा. तुझ्या सतत अवती भोवती असण्याचा. कधी थोडा वेळ भेटला स्वतःसोबत घालवावे म्हंटल की, तुझं चालू होतं तुणतुणं, मला तू बोलत नाहीस, मला तू बोलत नाहीस "


ती शांतपणे त्याचं सगळं बोलणं ऐकत होती. तिला त्याच्या मनात काय चालू आहे जाणून घ्यायचं होतं आणि आज ते तो बोलत होता.

रागात माणूस सगळं मनातलं बोलून जातो म्हणतात ते अगदी खरं.


"हे बघ धनु, मला थोडा स्पेस दे. आणि काहीतरी प्रॉडक्टिव्ह ककर यार. सतत माझ्या अवती भोवती नको राहूस यार. घरातले चार कामं करून तुला जर असं वाटतं असेल की तू खूप करत आहेस तर माझ्या मते तू काहीच करत नाहीस " तो बोलत होता आणि ती ऐकत होती.


त्याचं बोलून झालं तसं ती उठली आणि जाऊ लागली. जाता जाता त्याला म्हणाली, "थँक्स डिअर ".


तिने तिथून तिची आवडती जागा गाठली \"टेरेस\".मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि स्वतःसाठी काही नियम ठरवले. त्याआधी ती रोज करतंय काय हे पहिलं.


नवरा जे काही बोलत होता ते अगदी योग्यच तर होतं. दिवसभर घरात असते, घरातलं कामे करते आणि तो घरी असला की त्यांनी आपल्याला थोडं अटेंशन द्यावं म्हणून त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेते मग ती बाथरूम ची चप्पल असो या त्याचा संपलेला पावडर चा डबा त्याच्याही नकळत नवीन ठेवणं असो.

कॉन्टीनुए त्याच्या मागे तर असते मी. त्याला काय हवं, काय नको हे तो न मागता त्याच्या समोर ठेवण्यासाठी मी सतत सज्ज असते.

म्हणजे थोडक्यात माझं स्वतःच असं काही आयुष्यच जगत नाही मी. जे काही आयुष्य जगतंय ते फक्त त्याच्यासाठी. त्याचं हसणं म्हणजे माझं हसणं. त्याचं इग्नोर करणं म्हणजे जगातील भयंकर दुःख.


लग्नाआधी तर काय काय स्वप्न होते आपले. स्वतःच कोचिंग सेंटर काढणार.टॉप कोचिंग सेंटरपैकी एक कोचिंग आपलंच असणार.

विद्यार्थ्यांना सगळं बेस्ट मिळवून देणार असं काहीसं स्वप्न होतं आणि आज आपण फक्त नवऱ्याच्या अवतीभोवती फिरतोय. नवऱ्याला शंभर टक्के समर्पित आहोत तरीही त्याला प्राब्लम आहे.

प्रॉडक्टिव्ह काही करत नाही म्हणे. काय असतं प्रॉडक्टिव्ह?

तिने फोन उचलला आणि मोठ्या बहिणीला कॉल केला.

मोठी बहीण कपड्यांचा ऑनलाईन बिजनेस करायची. महिन्याला लाखो रुपये कमवायची.


"हॅलो, ताई बीझी आहेस का गं?" धनश्री


"नाही गं. तुझ्यासाठी मी नेहमी फ्री असते. बोल, कशी आहेस?" ताई.


ताईचे आपलूकीचे शब्द ऐकून इतका वेळ थांबवून ठेवलेले अश्रू गालावर ओघळेच.

"मी ठीक आहे ताई " तिने कसाबसा आवाज नॉर्मल करत उत्तर दिलं.


"आवाजावरून तर वाटतं नाही,तू ठीक आहेस ते. सांग पटकन काय झालंय?" ताई.


झालेला सगळा प्रकार तिने ताईच्या कानावर घातला.


"हम्म. इतके दिवस मी कुठल्या भाषेत तुला सांगत होते? किती वेळा सांगून झालं, बाई काहीतरी कर. स्वतःची अशी ओळख निर्माण कर. त्या नवऱ्याच्या मागे मागे करणं बंद कर. असं करण्याने खूप प्रेम आहे हे न दिसता, आपण किती रिकाम्मे टेकडे आहोत हेच समोरचा माणूस गृहीत धरतो. घुसतय का काही डोक्यात " ताईने जीव तोडून तिला समजावत होती.


"हम्म. समजलं मला, पण समजतं नाही नेमकं करू तरी काय?"धनश्री.


"तुझं स्वप्न पुर्ण कर "ताई.


"बांयॉलॉजि कोचिंग च स्वप्न?" धनश्री


"ऑफकोर्स डिअर. तू बांयॉलॉजि मध्ये किती बेस्ट होती. स्टडी स्टार्ट कर आणि चालू कर. सुरुवातीला एक स्टुडन्ट येईल पण हळूहळू येतील ना भरपूर. स्वतःवर विश्वास ठेव आणि चालू कर " ताई.


ताईच्या बोलण्यानंतर तिने बांयॉलॉजिची स्टडी स्टार्ट केली आणि एक महिन्यानंतर समोरच्याच घरातील प्रिया तिची पहिली स्टुडन्ट बनली.


तिची टेक्निक, तिचं एक्सप्लेनेशन देण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये शिकवण्याची पद्धत यामुळे प्रियाने तिच्या सोबत तिच्या चार मैत्रिणीही घेऊन येऊ लागली.


दीपक घरात नसलेल्या वेळीच ती मुलींना घरी बोलवून शिकवत होती.

आज मंथ कंप्लिट झाला होता आणि मुलींनी फीस दिली.


स्वतःच्या हक्काचे, स्वतःच्या कमाईचे दोन रुपये पण अप्रूप वाटतात. धनश्रीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यात डबल ख़ुशी अशी होती की प्रियाच्या क्लास मधील आणखीन दहा स्टुडन्ट जॉईन झाले.

घरातच अड्जस्ट करून ती क्लास घेत होती. आजही घर स्टुडन्टने भरलं होते आणि त्याचं वेळी दीपक घरी आला.

घरातलं वातावरण बघून त्याला काय बोलावं सुचत नव्हते.

10-15 स्टुडन्ट त्यात काही स्टुडन्ट त्याच्या सिनियरचे मुलं ही होती.

धनश्रीने त्याला काही एक्सप्लेन केलं नाही आणि त्यांनी एक्सप्लिनेशन मागितलं ही नाही.

दुसऱ्याचं दिवशी त्यांनी घराजवळच एक हॉल तिच्यासाठी रेंट वरती घेतला. तिच्यासाठी हा सुखद धक्का होता.

"थँक्यू "ती त्याला इतकंच बोलू शकली.

"आय प्राऊड ऑफ यू " तो तिला मिठीत घेत म्हणाला.

त्याचे सिनियर त्याच्या वाईफची तारीफ करत होते. त्यालाही छान वाटत होतं.

धनश्रीला नवऱ्याच्या नेगेटिव्ह बोलण्यामधून स्वतःचा मार्ग भेटला होता. स्वतःला सिद्ध करण्याची संधी भेटली होती. स्वतःच असं वेगळं विश्व निर्माण करणाचा रस्ता नवऱ्याने नकळत पणे दाखवून दिला होता.

धनश्रीला एक गोष्ट समजली होती, "आपल्याकडे काही प्रॉडक्टिव्ह नसल्यास कोणीच आपल्याकडे लक्ष देत नाही.आपल्याकडे नॉलेज, पैसा किंवा मग आणखीन काही असेल तरच लोक आपली किंमत करतात. ते म्हणतात ना बोलणाऱ्याचे वाळू पण विकली जाते आणि न बोलणाऱ्याच गहू पण विकले जात नाहीत".


आजच्या जगाची हीच सत्यता आहे. तुम्ही चार पैसे कमवता, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही सुंदर दिसता वैगरा वैगरा. असं असेल तरच लोक तुमच्याकडे आट्रॅक्ट होतात नाहीतर कोणी पाहत नाही आणि किंमतही करत नाहीत.

हाऊसवाईफ पण आजकल किती ऑनलाईन बिजनेस करत आहेत.

सासू सासरे, मुलं आणि नवरा यांच्या पलीकडेही एक विश्व आहे जे फक्त आपलं आहे.

प्रत्येक स्त्रीमध्ये काही स्पेसिऍलिटी असते. कोणी सुंदर रांगोळी काढत तर कोणी चित्र तर कोणी विणकाम तर कोणी भरतकाम तर कोणी चविष्ट प्रदार्थ बनवतं.

फॅमिलीशी समर्पित असायला हवं पण त्यासोबत स्वतःची आवड जपत,चार पैसे कमवून आत्मविश्वासाने मान उंचावून जगायला काय हरकत आहे.

लग्नाअगोदर अतिशय पोटेनशिअल असणारी मुलगी लग्नानंतर मात्र घर आणि मुलं यातच अडकून पडते. ती वाट पाहत राहते की कोणीतरी आपली मदत करेल आणि आपण आपली स्वप्न पुर्ण करू पण मैत्रिणींनो आता कोणी कोणाची मदत करत नाहीत. स्वतःची मदत स्वतःच करायला हवी.