बाबा तुम्ही साथ द्याल ना !!

....


भाग 2


रामराव, यांना आज सगळे सोबत होते म्हणून तरी रिकामपण खाणार नव्हते,पण थोडा विचार मनात आला आणि क्षणात मनातील विचाराने त्यांना एकटेपणाची टोचणी टोचली आणि त्यांचे सत्कारात ही मन लागत नव्हते, कसे बसे सगळे आप आपल्या घरी गेले,काही जण त्यांना काळजी घ्या म्हणून सांगून गेले.


सत्कारातील फुले मिठाई शाल कपडे सगळे एका कोपऱ्यात पडले होते, आणि एका कोपऱ्यात एकटेपणा जाणवत होता, आतापर्यंत जर शीला असतो तर तिने ही सगळी आवरा आवर करून आलेले फुले मस्त फुल दाणीत सजवले असते, एखादे केसात माळले असते, एखादे देवाला वाहिले असते, तर एखादे मला दिले असते, शाल माझ्या अंगावर पांघरून म्हणाली असती,ही कधी कधी थंडीत बरी राहीन,पण हो मीच तुम्हाला ह्या शाली पेक्षा जास्त उभ देईल..मग मिठाई पेक्षा माझ्या हाताचा मूग दाळीचा शिरा करून खाऊ घालते ,त्याची चव आयुष्य भर जिभेवर रेंगाळत राहीन...

रामराव म्हणत,अग तुझी ही उभ कायमस्वरूपी अशीच राहूदे मी तर म्हणतो तू अशीच माझ्या भोवती भोवती ह्या मऊ शाली सारखी बिलगलेली राहूदे... ती गोड चव तुझ्या हाताच्या शिराची कशालाच नाही हे खरे आहे पण त्यापेक्षा तुझ्या गोड मधाळ बोलण्याला ही आहे, तू जे हिमतीचे बोल बोलतेस ते आयुष्य भर मला खंबीर पणे उभे राहायला खूप supportive आहेत, मी कुठे जरी खचलो ,मागे पडलो, हरलो असे वाटले तरी मी ह्या शब्दांचा आधार घेऊन पुढे माझी वाट सापडत राहीन, मी तर म्हणतो तुझ्या आधी मीच हे जग सोडून जाईल...पण देवाला म्हणेन तिला काही होऊ देऊ नकोस नाहीतर मी तिच्या सोबत येईल..
रामराव बाहेरून भक्कम प्रवृत्तीचे दिसत जरी असले तरी आतून खूप हळवे होते.


आई गेल्यानंतर जी आई आणि सखी संगिनी म्हणून आली ती फक्त शीला होती,तिने आईची कमी भरून काढली ,किती दिवस आई गेल्यानंतर असा प्रेमळ ध्यास,आणि भाव बाकी कोणी ही लावला नव्हता जितका शीला ने लावला, तिने सगळी कमी भरून काढली होती.. मग हळूहळू सगळे जीवन सुंदर वाटू लागले होते...तिच्या येण्याने घराला घरपण आले होते, ते एकटेपण दूर झाले होते ,लक्ष्मी जणू वास करू लागली होती,घरात हसण्याचे आवाज येत होते, जणू घराणे ही कात टाकली होती,शीला मुळे घर प्रसन्न वाटत होते, रोज नवीन पदार्थ करून खाऊ घालत होती,त्याची एक एक इच्छा पूर्ण करणारी शीला त्याला सर्वतोपरी आनंदी ठेवण्यात तिचा आंनद आणि तिचे सुख मानत होती, इतकी काळजी समर्पण आई गेल्यानंतर कोणी ही घेतले नव्हते ..त्या तिच्या नुसत्या आजूबाजूला असण्याने ही मन सुखावत होते, ती नसली की घर आणि रिकामे झालेले मन पुन्हा जुन्या त्रासदायक आठवणीत जात होते ,आणि परत उदास होत होते, म्हणूनच की काय शीला माहेरी गेली तर तिला रामराव दोन दिवसांच्या वर राहू देत नसत...

शिलाला ही तिथे फार करमत नसत पण मामा मामी यांनी आवर्जून बोलावले तर तिला जावे लागत यांचे मन तिला मोडू वाटत नसत,कारण मामा मामींना ही तिच्याशिवाय कोणी ही नसत.. त्यांची काळजी घेणारी फक्त शीला होती,तिला आई वडिलांच्या नंतर दत्तक घेतले होते मामाने आणि मामीला मुलीची माया मिळाली आणि अनाथ शिलाला आईची माया मिळाली. खूप शिकवले होते तिला पण रामराव यांच्यासारखा चांगला ,गुणी मुलगा मामींच्या नात्यातला असल्याने आणि जवळच रहात असल्याने त्यात तो ही अनाथ असल्याने एका अनाथला दुसऱ्या अनाथाची किंमत आणि दुःख कळेल हा विचार करून शीला चे लग्न त्यांच्याशी लावून दिले..

त्यांच्या संसार सुखाचा चालू होता,तिच्या मनात हा फक्त मामा मामींच्या आशीर्वादाने तिला हा नवरा मिळाला होता, म्हणून ती त्यांची ही किंमत ठेवत होती,त्यांनी हवं नको ते बघत होती.

अशी ही गुणी शीला जी सगळ्यांना आवडत होती ती देवाला ही अवडणारच,जे नको व्हायला ते घडणारच

क्रमशः ............