थोरली आई आहे तुझी Part 3

......

आभा चा निर्णय आभा घेऊन आणि आई बाबाला ऐकवून मोकळी झाली होती... मस्त वाटत होते तिला....

पण इकडे बाबा तडफडत होते..... हिला अक्कल कधी येईल.. हिने वाटेल ते निर्णय घ्यायचे आणि आम्हाला नुसते सांगून मोकळे व्हायचे.... मला आता तिचा हा निर्णय अजिबात पटला नाही..

त्या वसंत्या ने सांगितले हे असे स्थळ आहे.... आता असे स्थळच मिळतील.... कारण माझी...पोरीच्या आईची... परत पोरीची choice जगवेळी आहे.... आणि उरली सुरली.... आजकालच्या उरलेल्या मुलांची choice त्याहून ही वेगळी आहे..... मग सांग बाब्या तुम्हाला कोणता choice होईल.... कसा चॉइस होईल... कोण चॉइस करेल... आता तिच्या वयाचे मूल मिलने खूपच कठीण झाले आहे बाबा... .हा एक मुलगा आहे, तो बघ वाईट काही नाही.... फक्त आधीची बायको काही कारणास्तव मरण पावली आहे.... तिचा का मृत्य झाला ते कळल्यावर मी तुला कळवेन.. .पण स्थळ चांगले आहे ....मुलगा चांगला, निर्व्यसनी... शिकलेला... कमवता... स्वतंत्र विचारांचा आहे अगदी तुझी मुलगी मला म्हणाली होती तसा आहे.... बघ आता तुम्ही तुमचे ठरवून सांगा... नाहीतर मी आहेच तुमच्या  सोबत स्थळ वारी करायला मोकळा.... हम्मम्म... पण एक लक्षात ठेव आता आगे limt संपली आहे...मूल मिळत नाहीत.... आणि ते ही कधींकधी जास्त वय झालेल्या मुलींना पसंत करत नाहीत.... सतरा कारणे विचारतात.... के कसे कुठे, कधी हे त्यांना ही जाणून घ्यायचे असते.... ह्या मुलाने आधीच्या लग्नात ही असे कधी विचारले नव्हते आणि आता ही नाही विचारले...... आपली आभा त्याला साजेशी आहे.... थोड वेगळं आहे... म्हणजे सवत ...पण बघ..

आभा काकांचे आणि बाबांचे बोलणे ऐकत उभी होती... पडद्या आडून ऐकत होती... तिने जरी हेडफोन्स लावले होते असे बाबांना वाटत होते तरी तिने volume mute केला होता.... तिला आधी हे स्थळ आले हेच पटले नव्हते... पण त्याचे एकंदर सगळे plus point तिच्या अपेक्षांशी खूप जुळत होते... फोटो अजून मिळाला नव्हता पण बाबा नाही म्हणत असताना मी कसे काकांना म्हणून की फोटो दाखवा म्हणून... हा आगाऊ पणा होईल.... नको आधी मी विचार करून ठरवते की मला काय वाटते...मला जमेल का... मी निभाऊ शकेल का.... त्याला परत एक संधी देणारी मीच असेल का....

आधी तर त्याची बायको कशी होती.... ती कश्याने गेली... त्यांच्यातले नाते कसे होते.... त्याच्या घरचे कसे आहेत... त्याला आधी मूल आहे का.... तो खरच प्रत्यक्षात ह्या मापदंडात बसतो का हे बघावे लागेल... तसे ही किती तरी मुली स्वतःहून लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडतात की.... मी तर रीतसर लग्न करणार आहे... ही चोरी किंवा extra marital affair कुठे आहे... मला आवडला तरच मी ही हो म्हणणार आहे ,मी ही सजक आहे.... मला सगळे पटल्यावर,सूट झाल्यावर मी मागे हटणार नाही.... वयाचा काटा पुढे पुढे सरकत आहे... अजून ही जास्त नाही तरी मुले मिळत नाहीत... मग अजून थोडा पुढे सरकल्यावर काय होईल.... कोणी ही करण्यापेक्षा मी बिन लग्नाची राहील..... मी बिन लग्नाची राहिले तर आई बाबा यांना तर खूप घोर लागेल.... तसे ही राधिका आत्या ही बिन लग्नाची होती... तेव्हा त्या भाऊ काकाने तर तिला पैसा कमावण्याची एक सोय म्हणून तिचे लग्नच  जमू दिले नाही.... किती तरी adjustment चे स्थळ सांगून येत पण ह्याने आपले पैसे वळते होतील म्हणून आलेले स्थळ मुद्दाम काही ना काही कारण सांगून परतून लावले होते....

शेवटी आत्याने स्वतः stand घेतला आणि आपल्या हव्या तश्या स्थळा तिने होकर दिला आणि ती आज खूप सुखी आहे... शेवटी आधार हवा असतोच ना.... सुरक्षा नाही तर मनाचे धागे कुठे तरी कोणासाठी जुळले पाहिजेच.... ती आता खूप सुखी आहे ....भले ही काही निर्णय चुकले होते तिच्या बाबतीत... पण मला राधिका आत्याने केलेली चूक करायची नाही ...

थोडी adjustment मी करायला तयार आहे.... आणि मी बाबाला आणि आईला ही ही थोडी adjustment करण्यासाठी तयार करेन......

मी विचारांती सगळे पुढचे निर्णय घेईल.... त्यात जे काही पुढे माझ्या नशिबाने होईल त्याला ही मीच धीराने सामोरे जायची हिम्मत करेन.... आयुष्य म्हणजे तडजोड हे आता मी समजले आहे.. पण बाबाला माझ्यासाठी राजकुमार शोधायची जिद्द आहे..

तसेही बाबांचे काही एक चुकत नाही ते माझ्या वर असलेल्या प्रेमापोटी हे सगळे माझ्या भल्यासाठी करत आहेत.... मी ही त्यांचीच मुलगी आहे.... थोडा वेळ घेतील ते पण मला समजून घेतली ते... आईला तर माझ्यावर विश्वास आहेच... पण ह्या निर्णयात ती ही बरीच विचलित झालेली दिसत आहे..... आईच शेवटी ती... कोणाला वाटेल असे आपल्या लेकीच्या नशिबी असावे.... कोणाचं तरी मोडलेला संसार तिने करावा ते...

त्यांचा भावनिक विरोध समजू शकते..... पण जरा मी practical विचार करते...

क्रमशः...........

🎭 Series Post

View all