Login

थोरली आई आहे तुझी भाग 24

...

रणजितने खूप मोठे मन करून तो एक त्याग केला होता,रागिणी गेली आणि सगळेच आयुष्य विस्कळीत झाले होते त्याचे,ती तर पहिल्याच बाळंतपणात किती खुश होती,बाळ येणार आपल्या आयुष्यात ह्या आनंदाने तर वेडी झाली होती जणू ती किती,पाय जमिनीवर ठेव कितीदा रणजित सांगत होता... हळूहळू पाय उचल नाहीतर पडशील...तो ही किती काळजी घेत होता तिची... छोट्या जाऊबाई ही तिला सांगत आहो वहिनी तुम्ही पोटुशी आहात जरा जपून हो..मला तर बाई तुमची तर खूपच काळजी वाटते...नका ही इतकी धावपळ करू नाही सहन होणार..उगी नसते उद्योग नको ..मला सांगत जा तुम्हाला काय हवे ते मी तिथे लगेच हातातले काम सोडून धावत येईल पण हे असे काही उपक्रम नका करत जाऊ,मला असे हेकाही करताना तुम्हाला पाहिले की काळजात धडधड होते... एक तर रणजित भाऊ तुम्हाला सांगून सांगून दमले... आईसाहेब ही कंटाळल्या... आता जरा निवांत बसा मी तुमच्या दिमतीला आहे असे समजा,आणि हवे ते काम करून घ्या... त्या frame मी लावून देते पण तुम्ही स्टूल वर ,सोफ्यावर काय चढू नका... आणि आपले नौकर चाकर आहेत ना ,आपण संतोष भाऊ ला सांगू ,तुम्हाला फक्त काय कुठे कसे लावायचे ते सांगा ,ते ही अगदी व्यवस्थित लावतील...पण तुम्ही नकोच नको ह्या भानगडीत पडायला, आता खूप काळजी घेण्याचे दिवस आहेत... आणि रिस्क ही आत्ताच जास्त असते... डाक्टर म्हणत होते ना की काळजी घेणे ही आवश्यक आहे...

रागिणी.... अग माणिनी तू ग किती काळजी घेतेस माझी पण कसे आहे ना हे आई झाल्यावर कळते की आई होण्याचा आंनद काय असतो ते, तुला नाही कळणार ते...तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल की स्वतःच्या हाताने बाळाच्या आगमनाची तयारी करण्यात आईला किती आंनद मिळतो ते.... मला करू दे थोडं...आणि हवे तर तू ही काकू म्हणून कर...आपण दोघी ही करू... तो तर काकुला ही thnku म्हणेन...तुझा ही तर काही लागणार ना तो....

माणिनीला रागिणीच्या त्या शब्दांचे खूप वाईट वाटले होते, आई झाल्यावर कळते की आई होण्याचा आंनद काय असतो ते, तुला नाही कळणार... कारण तिला आई होण्याची शक्यताच नव्हती... डॉक्टर ने पहिल्या बाळंतपणात सांगितले होते की एक तर आई जगेल किंवा बाळ,मग तेव्हा आईसाहेब यांनी आईला निवडले होते, बाळ काय रणजित चे ही होईल,ते तिला आई म्हणेन...पण आई जगली पाहिजे.. एककीकडे तिला वाटत होते की मी नाही जगले तरी बाळ जगले पाहिजे... तिने नवऱ्याला ही तिची इच्छा बोलून दाखवली होती... इतक्या वर्षांनी बाळा होणार होते म्हणून बाळा आणि वंशाचा दिवा वाचला पाहिजे... खूप हट्टाला पेटली होती ,पण आईसाहेब आणि रणजित यांनी तिला समजून सांगितले तेव्हा ती तयार झाली होती.. बाळ गेल्याच्या दुःखात ती बरेच दिवस होती,पण आता रागिणीला बाळ होणार ह्या आनंदाने ती पुन्हा सुखावली होती... बाळ कोणाचे ही यादो ते वंशाची वेल चालवणार आहे हेच खूप आहे माझ्यासाठी...तिच्या डोळ्यात पाणी आले होते आणि ते दिसू नये आणि वहिनीच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून ती ,डोळे पुसत आपल्या रूम मध्ये जात होती, तितक्यात रणजित ने तिला रडत जाताना पाहिले, आणि तो आत गेला, रागणीने रूम मस्त सजवली होती ,हे पाहून त्याला ही जरा आनंद झाला,त्याने परत तिला बजावले,परत ही अशी कामे तू करायची नाहीस... जरा ही कामे माणिनी ला ही करू दे... तिला ही ह्यातून आई सुखाचा थोडा आनंद घेऊ दे,उपभोगू दे...ती ही आई होता होता आणि हा आंनद घेता घेता राहिली आहे, तिचे दुःख खूप खोल आहे आणि ताजे आहे,त्या इतक्या दिवस कोणाशी ही बोलत नव्हत्या पण तुझ्यामुळे त्या परत बोलू चालू लागल्या आहेत... त्यांना परत दुःख होईल असे वागायचे नाही... त्यांना कुठे जाणवू द्यायचे नाही की त्यांना मुल होणार नाही किंवा त्यांना काय माहीत आई होण्यात काय सुख आहे ते...

रणजीतच्या ह्या शेवटच्या वाक्य ऐकून जरा रागिणी चपापली आणि तिने डोक्यावर स्वतःच्या हातेने स्वतःला छोटी चापट मारली...रणजित बघत होता ही हे असे काय करते...आणि तिला तिच्या बोलण्याचा पचतावा झाला होता... तिने लगेच सगळे समान आवरले आणि लगेच ती माणिनीच्या रूम मध्ये पळत गेली....

माणिनी,ने तिला तिच्या खोलीत पळत येतांना पाहिले आणि लगेच ती उठली आणि तिला पकडले, धाप लागली होती पायऱ्या चढून रागिणीला... आणि माणिनीने तिला सावरले
..आणि म्हणाली

आहो वहिनी तुम्हाला कितीदा सांगायचे म्हणते मी की जरा हळूहळू, मला बोलवा पण pls हे असे काही पराक्रम करू नका... हात जोडते मी आता तुमच्या समोर हो... ळनं असून मला तुम्हाला हे सांगावे का लागते... आपला वंश आहे त्याला असे धक्के लागले तर तो दचकेल ना, घाबरून जातात बाळ पोटात...का इतके पळत आलात तुम्ही बर असे... मला आवाज द्या, फोन करा, मी हजर होईल ...

रागिणीला माणिनीच्या ह्या तगमगी मागे प्रेम जिव्हाळा,आपुलकी, काळजी सगळे भाव दिसत होते आणि त्यामागे एका न झालेल्या आईचे काळीज ही दिसत होते.. तिचा काहीच एक स्वार्थ नव्हता...आई होण्याचा फक्त तिला आता कधी आंनद मिलनाच्या chance नव्हता... ती किती काळजी घेते आणि मी तिला अनावधानाने किती सहज बोलून गेले होते ,देवा तूच मूल देणार आणि तूच आईपण देणारा आहेस... मग गर्व कसला करावा ह्या आईपणाचा मानाचा

माणिनी आग मी चुकले ग,मला तुला हे मुद्दाम नाही बोलायचे होते ग,ते अगदी सहज निघून गेले मुखातून...मी पण कशी समजले नाही की आईपणावर जरी माझा हक्क आहे पण इथे तर बाळाची धाकटी आई ही त्याची किती आतुरतेने वाट बघत आहे, तिने ही किती तयारी केली आहे... ती ही बाळाची आणि बाळाच्या आईची किती काळजी घेत आहे.. माझ्यापेक्षा जास्त तर तूच त्याची आई आहेस.... माणिनी
आता मी बिनधास आहे की मी नाहीतर तू असशील त्याची काळजी घ्यायला नेहमीच..

मागून रणजित त्यांच्या दोघींचे ही बोलणे ऐकत उभा होता,पायाची कात्री करून तो रागिणीचे मोठेपण बघत होता, तो ही मनानीनीला म्हणाला,तू काळजी करू नकोस, तो तुला ही आई म्हणणार बघ... एक थोरली आई आणि एक धाकटी आई.... नशीब वाण असेल तो त्याला दोन दोन आयां चे प्रेम मिळेल....


क्रमशः..............





























 

🎭 Series Post

View all