आईची सोय करतोच मी भाग 21

Marathi story

ईलाला आता कुठे तरी राम बद्दल असेच भाव जणू निर्माण होत होते..तिला उद्याची सकाळ कधी होईल आणि जे तिला तिच्या मनात उमलणारे भाव आहेत ते त्याच्याबद्दल वाटणारे प्रेमच आहे हे ती त्याला कधी एकदाचे सांगून मोकळी होईल असे तिला झाले होते.. म्हणजे तो फक्त मित्र नाही राहिला तर तो त्यापेक्षा खूप खास होता हे तिला आज पटले होते जेव्हा तिने रीमा आणि वेधला त्यांचे प्रेम व्यक्त करतांना पाहिले होते..म्हणजे जे मैत्री पलीकडे असते ते फक्त प्रेम असते... भले ही ते उशिरा समजले तरी ते मनात वादळ निर्माण करत असते.. ते वादळ हळूहळू हृदयापर्यंत पोहचून हृदय काबीज करत असते.. त्यात सगळ्या भावनांचा एक सोबत कल्लोळ होत असतो... त्याचा उद्वेग होऊन ते बाहेर पडण्याची दिशा शोधत असते.. मग हळूहळू ते ओठावर येत असते.. आणि मग ते व्यक्त होत जाते ,पण आधी ते आपल्या बुद्दीला साक्ष देत आणि मग ज्याच्यावर प्रेम झाले आहे ते त्याला ह्या भावना रुपी वादळात गुरफटून घेत जाते... तसेच तर मला झाले आहे.. त्या वादळाची छोटी सुरवात जणू त्याने त्यादिवशीच केली होती जेव्हा रामने मला डावलून आरतीला hii केले होते.. मग मला त्याने त्या प्रेम नावाच्या वादळाने जे राम पासून सुरू होऊन माझ्या मनात समावले होते ते ही एका रागाच्या स्वरूपात, तसा राग मला येण्याचे खरे तर काहीच कारण नव्हतेच, पण का कोण जाणे मला खूप राग आला होता,अचानक कधी ही न रडणारी मी माझ्या डोळ्यात अश्रू होते.. हेच वादळ हे प्रेमभाव माझ्या मध्ये भाव निर्माण करून घेत होते त्या वादळाने मला जणू त्याच्या कवेत घेतले होते...आता तो हळूहळू माझ्या मनात भिनत जात होते... आणि जसे जसे राम च्या जवळ मी जात होते ते तसे तसे अजूनच मला त्याच्याविषयी काही तरी special feel करवत होते... त्याने तर त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती पण मी मात्र अजून ही त्याला हे सांगू इच्छित नव्हते की तुला माझ्या बद्दल जे भाव दाटून येत आहे ते प्रेमच आहे...may be ते प्रेम नसेल ही...काही काळ जाऊ द्यावा.. मग बघावे हे प्रेम किती दिवसाचे आहे.. खरंच हे प्रेमच आहे की फक्त एक attraction... नाही पण ते तसे काही नसून शुद्ध अंतकरणातून येणारे निखळ खळखळणारे प्रेम होते... रामने तर वेळोवेळी त्याची प्रचिती दिली होती...पण मीच वेडी त्याला अजून ही college teens चे attraction समजून टाळू पहात होती... कधी कधी तर मी ही गेलेच तर होते ह्या प्रेमाच्या आहारी...त्याची त्या दिवशी मीच सगळ्यात आधी येऊन वाट बघत होते... मला ही माहीत होते मी त्याच्यासाठी थांबले होते... त्याला ही समजले होते मी त्याच्यासाठी खास तयार होऊन आले होते आणि त्याचीच वाट बघत होते... तेव्हा ही ना मी कबुली दिली ना त्याला कळवू दिले की मी त्याचीच वाट बघत होते... सराईत पणे सांगून गेले की मी ह्या माणसाची वाटत बघत होते... का मी नाही सत्य सांगू शकले.. इतका वेळ लागतो का प्रेम कबूल करायला की मी त्याच्या प्रेमाची परीक्षा मुद्दाम बघत होते...मला ही तेच बघायचे होते आणि जितका तो व्याकुळ होत तितके माझ्या मनाला मोरपीस फिरल्या सारखे वाटत...आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फक्त माझ्याशीच प्रामाणिक आहे का हे ही मला बघायचे होते... हो तर त्याने त्याचा प्रामाणिकपणा ही सिद्ध केला होता... त्याने आरतीला आणि तिच्या प्रेमाच्या मोहाला हात ही लावला नव्हता.. त्याने फक्त मला निवडले होते त्या दिवशी... माझी किती वाट बघेन..किती त्यांच्यामध्ये माझ्या साठी माझ्या भेटीसाठी patience आहेत हे ही त्याने आज सेंडोफ संपल्यानंतर बराच वेळ माझी वाट बघत सिद्ध केले होते... आता त्याने खूप परीक्षा दिली आहे माझ्या प्रेमासाठी आता मी उशीर नको लावायला ,आता मी कबूल करेन ते ही सगळ्यांसमोर...तेव्हा आरती ही असेल,रीमा ही असेल ,डॉन ही ,गणेश ही आणि कधी काळी माझ्यावर प्रेम करणारा तो वेध ही असेल... त्यांना ही कळेन मी फक्त आणि फक्त रामची आहे.. आणि तो माझा.. त्याला उद्या चा दिवस हा आयुषभर लक्ष्यात राहणार असेल अशी मी त्याला propse करेल.. सगळ्या त्रास दिलेल्या गोष्टी ची मी माफी ही मागेल.. त्याला तो कसा माझ्यासाठी special आहे हे जाणवून देईल.. मी उद्या माझ्या ही प्रेमाची कबुली देईल...

ईला घरात आल्या आल्या दादाने जाहीर केले की ईला पुढील पोस्ट graduation साठी out of इंडिया जाणार आहे ,हे फिक्स झाले आहे...

ईलाला दादाच हा निर्णय ऐकून धक्का बसतो, आयुष्यात कुठे तरी मी स्थिरावण्याचा निर्णय घेतला होता तिथे दादाने त्याला पलटणी दिली होती... तिला आता कोणताच मार्ग दिसत नव्हता.. दादा जो म्हणणे घरात तेच होत होते.. आई बाबा ही त्याचेच ऐकत होते...म्हणून तिला ही काही स्वतःचे निर्णय घेता येत नव्हते


क्रमशः......