वर्गमित्र भाग 4

मैत्रीच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारी भावस्पर्शी कथा वर्गमित्र जरूर वाचा.

वर्गमित्र-4
©®राधिका कुलकर्णी.

"प्रसाद,एक विचारू का?"
गिफ्टच्या डबीवर "भारत ज्वेलर्स" लिहीलेय कुठुन खरेदी केलेस सांगशील का? आशु गंभीर झाली होती आता.
"अग्ऽऽकाय करायचेय हे जाणुन?
तुला गिफ्ट आवडले ना मग झाले तर.." 
विषय सहज करण्याचा प्रयत्न करत आशुच्या प्रश्नाला उत्तर देणे त्याने शिताफीने टाळतोय ही गोष्ट आशुच्या लक्षात न आली तरच नवल होते.
तिने पुन्हा विचारले,"प्रसाद मला सरळ उत्तर दे कुठुन घेतलेस?"
प्रसादचा नाईलाजच झाला .
प्रसाद : होऽ तु बरोबर ओळखलेस.ते दुकान वाटेवरच लागले मग तिथेच खरेदी केली.
आशु : प्रसादऽऽइतके महागडे गीफ्ट मी नाही घेऊ शकत.
माझ्या मनाला पटत नाहीये हे.
काय सांगु श्रीला मी?
तु इतके महाग कानातले मला का दिलेस? 
काय उत्तर आहे माझ्याजवळ?
तुला कळतेय नां मी काय बोलतेय?"
प्रसाद : अग् सखे तुही माझी अनमोल मैत्रिण आहेस ना, नकली वस्तु देऊ का इतक्या सच्च्या मैत्रीला?
आशु : तसे नसते रेऽऽ!आपल्या अवतीभोवतीच्या लोकांची मानसिकता विचारात घ्यावी लागते बाबा.आपण आता फार जवाबदार घटक आहोत रे आपल्या प्रत्येक नात्यांचे. इतका वरवरचा विचार करून कसे चालेल?त्यातल्या त्यात स्त्रीला खूप भान ठेवावे लागते..
कसे सांगु तुला?
मला कळतेय तुझ्या भावना खूप साफ आहेत पण हे प्रत्येकाला सांगणे खूप अवघड असते. "
प्रसाद: एऽ...क ए..क मिनिट..होल्ड अॉन डिअर, 
मला बोलण्यातुन मधेच काटत तो बोलला..
"तुला इतकाच प्रॉब्लेम होणार असेल तर एक काम कर.मी उद्याही इकडेच आहे.माझा माणुस बील पेपर सहीत येइल तुझ्याकडे.बील चेक कर आणि त्याच्या हाती परत पाठव.
नीट व्यवस्थित पॅक करून दे.
आता खूष???
सॉरी तुला त्रास झाला नकळत...
चलऽऽबोलु नंतर बाय!"

अरेऽऽ ..अरेऽ..म्हणेपर्यंत फोन बंदही झाला होता.
माझ्या मुळे तो दुखावला गेला होता.
मला काहीही बोलायची संधी न देता त्याने विषय मोडीतच काढला होता.
काय करावे काही समजत नव्हते.इतक्या वेळा पासुनचा आनंद क्षणात मावळला होता.मन उदास वाटत होते.
दारावरची बेल वाजली.मुले शाळेतुन आली असावीत..
मी विचारांना तात्पुरती मुठमाती दिली.
आणि त्यांच्या खाण्याचे करायला किचनकडे गेले..
डोळ्यातुन नकळत ओघळलेले आश्रु ..
समजत नव्हते कांदा कापताना येत होते की. . . . . . .!
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:4)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all