आदरणीय डॉक्टर्सना समर्पित

Respect to dr. Harish panhal ????????

   बाहेर कोरोना मुळे सुन्न वातावरण. मी ही सुन्न खिडकीशी उभी राहून निर्जीव रस्त्याला बोलके करण्याचा प्रयत्न करत होते.
    इतक्यात डॉक्टरचा सिंबाॅल असलेली गाडी समोरून गेली. परत परत मी वळून पाहिले.गाडीतील व्यक्ती ओळखीची वाटली.

      बापरे हे तर आपलेच डॉक्टर!नक्की डाॅक्टर कोठे?कशासाठी? मनात प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. 

    या प्रश्नांच्या भुंग्याला शांत करण्यासाठी मी लगेचच त्यांच्या क्लिनिकला फोन केला. नेहमीप्रमाणे कंपाऊंडरने फोन घेतला. मला सागितले हो डॉक्टर येणार आहेत, तुम्ही  शकता. पण येताना कोरोना साठी असलेल्या नियमांचे पालन नक्की करा हे सांगायला ती विसरली नाही.

    यदाकदाचित मी पेशंट आहे हे तिने गृहीत धरले असावे. मी थोड्या उशीराच क्लिनिकला पोंहचले कारण मला डॉक्टरला जाणून घ्यायचे होते.

      अगदी सगळे नियम, सोशल डिस्टंसिंग पाळून पेशंटला माफक औषधे देऊन, धीराचा डोस डॉक्टर देत  होते.चेहरा हसतमुख सहचरणी पण तशीच पतीच्या कार्यात स्वतःहाला पण झोकून देऊन हातभार लावणारी.
 
     क्षणभर मी स्तब्ध झाले आणि मनोमन देवाला हात जोडले.खरच देव सगळीकडे पोंहचू शकत नाही, म्हणून कि काय असे देवदूत तुमच्या आमच्या साठी तो पृथ्वीवर पाठवतो.

     कोरोना सारखी भंयकर परिस्थिती असताना देखील आपल्या   कार्याला वाहून घेतलेले हे दांपत्य आपल्या पेशाची शपथ विसरले नाहीत. पेशंट हेच आपचे दैवत मानून माफक दरात औषध उपचार करतात.तेही आपल्या जिवाची पर्वा न करता!

   डॉक्टर सलाम तुमच्या कार्याला! म्हणून आपोआपच माझ्या मुखातून गौरवोद्गार बाहेर पडले.

  यावरही डॉक्टर ने छानशी प्रतिक्रीया दिली व ते म्हणाले,आमच्या प्रयत्नांची शर्त, सर्वांच्या भल्यासाठीच झटणारी पोलीस संघटना, या सर्वांना जनतेच्या सहकार्याची साध मिळाली ना तर नक्कीच 'हम होंगे कामियाब!.

     खरच सर्वांच्यात कष्टाला समान दर्जा देणाऱ्या दिव्य मुर्तीला मानाचा मुजरा!

  वरील लेख आमचे फॅमिली डॉ. हरीश पांचाल  व डॉ. सौ. जयश्री पांचाल!. 

   याच्या दैदीप्यमान कार्याला समर्पित!

   आजही कोरोना सारख्या कठीण परिस्थितीत ही आपल्या प्राणाची बाजी लावून अहोरात्र पेशंटची सेवा करत आहेत विर्कोळीत  कोरोना येण्यास मज्जाव करत आहेत.

   कधीही फोन केला कि, नम्रपणे फोनवर बोलतात पेशंट हेच दैवत मानून माफक दरात उपचार करतात.

  रात्री अपरात्री पण फोन केला कि, धावत येतात. व्हीजीट फी पण माफकच बरका!
  गोरगरिबांना मोफत उपचार. गरजूंना काम, कमी दरात गरीबांना मोठ्या आॉपरेशन ची सोय करून देतात.
   मग सांगा यांना देवच म्हणावे ना, आम्ही विर्कोळी कर फार नशीबवान आहोत अश्या देवदूताची आमच्या वर कृपा आहे.
    देव जरी मज कधी भेटला माग हावे ते काय म्हणाला, म्हणेल प्रभू रे, असे दैदीप्यमान व्यक्तीसाठी मला ही काही करता आले तर मी माझे भाग्य समजेल!!..
   डॉक्टर या डॉक्टरदिनी आपल्या घरातील सर्व डॉक्टर्सना मनपूर्वक शुभेच्छा!...

©️ ®️ सौ. ऊज्वला रवींद्र राहणे