प्रवास एसटीचा

This article related in my traveling journey

बस गतिरोधकावरून पार होतांना , निसर्गाकडे तल्लीन होऊन पाहता येत.... वाऱ्याच्या मंद लहरीबरोबर डुलणाऱ्या झाडांना सरसर सोबत घेऊन धावत असणाऱ्या वाटेत हरवून जाता येतं . हे सारं काही एसटीतच घडतं.....

  एसटीचा प्रवास म्हणजे ना लोकल ट्रेन सारखाच भोवतालची गर्दी , त्या गजबजलेल्या घोळक्यात शिरत मिळते का कुठे निदान उभं रहायला जागा ?? म्हणून , कृपाकटाक्षाने जागा करत गर्दीत घुसायचं... पुढच्या स्टॉपवर कोणी उतरतो का म्हणून लक्ष कंडक्टरच्या बेल वाजवण्याकडे आणि सावरून बसणाऱ्या मंडळींकडे वेधलेलं .

मिळालीच जागा तर बसायचं नाहीतर उभ्या उभ्या सूक्ष्म अवलोकन करत निसर्गाच्या सानिध्यात विलीन व्हायचं .  बस समोर येणारा मेंढळांचा कळप , त्या कळपातून वाट काढण्यासाठी ड्रायव्हर दादाने वाजवलेला बसचा हॉर्न आणि त्याच्या जीवाचा आटापिटा बघून कधी तर म्हणावं वाटत दे मी चालवतो बस ! किती हॉर्न वाजवणार अजून.... ह्या साऱ्यात आपण कसं गढून जातो हे देखील कळत नाही . हे सारं अवलोकन करत असताना स्थिरचर विश्वात किती किती आनंद कोंदून भरलेला आहे हृदयात उद्रेकाचे निर्झर झरे वहात असतात . वाटेत लागणारी नदी ओलांडून मन मागेच त्या नदीच्या भेटीसाठी घुटमळत रहातं...

पर्वत हा , राजा सृष्टीचा
बसलाय रुतून जमिनीशी
डोंगरकपारी भूल ह्याची पडे ना कधी
वसुंधरेच्या वेळूवणी....

वाट निघते मध्यस्थी
ओलांडून पिवळी कुरणें
भ्रमर करत खिळते तिथे
पक्षांचे थवे....

चराचरात उभी
भरभर सरसर काटेरी बाभळी
खिडकीतून येती जवळजवळ फांदी
तातकळतच वेगाने मागे सरती...

मागे सरावी अगनिक दुःख जशी
धुंद करूनी नेत्रेंद्रिय ,
प्रवास तो सुखदायी
मिलना  सौख्य जे गावी....

मग मागे वळून पाहती
क्षण ते , लकजरीला त्याची सर नाही
विषण्णतेने भरून येते मन
प्रवास तोच ठायीठायी....