Login

पसंत आहे मुलगी भाग २३

ट्रिपचा दिवस उजाडला होता. रात्री दहा वाजताची ट्रेन होती, पण आशू सकाळपासूनच टेन्शनमध्ये होती. स??

भाग २३

ट्रिपचा दिवस उजाडला होता. रात्री दहा वाजताची ट्रेन होती, पण आशू सकाळपासूनच टेन्शनमध्ये होती. सिदची सगळी तयारी झाली होती. खाणं-पिणं, कपडे सगळं रेडी होतं, तो त्यादिवशी सकाळपासून मित्रांसोबतच बाहेर होता. पण घरी आशू मात्र अजून तळ्यात-मळ्यात होती. कपडे हा तिच्यासाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. गोव्यासारख्या हायफाय ठिकाणी फिरायला जायचं आणि हे असं फुल स्लीव्ज ड्रेस घालणं म्हणजे जरा जास्तंच गावंढळपणा. त्यात सोबत असलेल्या कोणत्या मुलींशी साधी तोंड-ओळखही नव्हती. तिला तिच्या सर्वात जवळच्या खास मैत्रीणीची, सीमाची खूप आठवण झाली. आयुष्यात कधीतरी खूप लांब फिरायला जायचे आणि तेही फक्त दोघीच., असं त्या दोघींचं स्वप्न होतं. पण आशूच्या बाबांमुळे ते २१ वर्षांत शक्यं झालं नाही. पण आत्ता होऊ शकतं. असा विचार करून तिने सीमाला फोन लावला.

पण सीमाचा फोन काय तो तिच्या लग्नाच्या दिवशीपासून बंद होता तो अजून बंदच होता... तिने दोन-तीनवेळा फोन केला पण फोन स्विचऑफच होता. तिला आता तर खूपच एकटे-एकटे वाटू लागले. या ट्रिपचे दडपणच आले.

तेवढ्यात सिदच्या आईने आशूला आवाज दिला आणि आशू या विचारांतून बाहेर आली.

अगं, कशात हरवलीयेस..., सिदच्या आईने तिला आपुलकीने विचारले.

काही नाही, असंच.. आशू हलकेसे हसत म्हणाली.

पहिल्यांदा जातीयेस ना पुण्याच्याबाहेर... आई तिच्या शेजारी बसत म्हणाल्या.

हो ना, आणि तेही गोव्याला. आयुष्यात कधी अशी समुद्रकिनारी वगैरे गेली नाही मी. आत्ता हे असं अचानक, जरा नर्वसच वाटतंय. आशू म्हणाली.

कशाला नर्वस होते., अगं आपला सिद आहे की. तो काही तुला एकटीला सोडायचा नाही कुठे. सिदचे सगळे मित्रं – मैत्रीणी एवढे गोड आहेत ना, त्याच्यापेक्षा तुझीच जास्तं काळजी घेतील ते.”

हे ऐकून आशूला जराचं हयसं वाटलं. तसंही ती संकेतला थोडीफार ओळखत होती. तसे त्याचे मित्र तिला चांगले वाटले.

तरी, आई. मी नाही गेले तर नाही चालणार का?” आशू चाचरत बोलली.

का बरं. नवरा चाललाय तुझा तर तू पण जा की. अगं हिच वेळ असते एन्जॉय करून घेण्याची. नंतर मुल-बाळं झाली नि संसारात पडली की मग माझ्याकडेच तक्रार करत येशील, सिध्दू कुठे फिरायलाही नेत नाही. त्याची आई हसत म्हणाली.

ह्या विषयामुळे आशू जरा अवघडली.

जा गं, मनसोक्त एन्जॉय कर. आणि हो, तुझ्या बाबांकडचे नियम विसर आता. हे सारखे असले फुल-स्लीव्ज ड्रेस घालायची काही गरज नाहीये..., त्या सिद्धूच्या मैत्रीणी पाहिल्या का कशा राहतात, तोंड नसाना का धड., पण कपडे मात्र हाय-फाय घालतात. तू तर किती सुंदर दिसतेस गं..., जरा जिन्स, थोडेसे शॉर्ट कपडे पण घालायचे.

आशूला हे ऐकून गहिवरून येत होतं. कारण तिचा प्रॉब्लेम तिलाच माहित होता..

ह्या गोष्टीमध्ये, आमचा सिध्दू तुला कधी अडवणार नाही हा. तुला जे हवं ते करू देणार तो. फक्त त्याचं एकच म्हणणं असतं, की त्याला न सांगता, फसवून कोणती गोष्टं करायची नाही. मग लय चिडतो तो..., पण क्षणापुरतंच. नंतर लगेच पूर्ववत होतो. तसा भारीय हा माझा मुलगा, तुमच्या वयात सहा-सात वर्षांचा गॅप असला तरी तो जाणवू द्यायचा नाय. स्त्री-पुरूष समानता नी स्त्रीवादी काय-काय त्याचे लेख असतात. स्त्रीयांसाठी तो मध्ये कोणत्यातरी संस्थेत काम पण करत होता. पण पगार काही पुरेसा मिळेना, म्हणून मग त्याने ते सोडलं. पण तरी अजूनही त्याचं काही ना काही चालूच असतं. त्यामुळे तू कोणत्याच दडपणाखाली राहू नको बरं.. सरळ आपल्याला हवं ते करायचं, हवं तसं राहायचं....,

सिदच्या आईचा एक न एक शब्द आशूच्या मनात सिदविषयीचे प्रेम बहरवत होता. पण त्याचा आता काही उपयोग नव्हता.

हे घे, सिदच्या आईने तिच्या ब्लाऊजमधून काही पैसे काढले आणि आशूच्या हातावर ठेवत म्हणाली, हेच तुला द्यायला आले होते..., घे....,

अहो आई, हे एवढे पैसे का....?”,

जास्तं नाही गं, पाच-एक हजार असतील.. राहू दे.. लांब चालली आहेस. काही आवडलं की घ्यावंसं वाटतं. सिध्दूकडे मागायला संकोच करशील, तुझ्याकडे राहूदे....,

आशूच्या डोळ्यात पाणी आलं...,

आत्ता, रडते कशाला गं...., मुलं सहलीला जाताना आई नाही का पोरांच्या हातावर पैसे ठेवत. तसंच काहीसं समज....

आशू डोळे पुसत हलकीशी हसली. सिदच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला....,

******

रात्री नऊ वाजताच सगळे मित्र सिदच्या घरी जमले होते. अभ्या, तेज्या, संकेत, रिया, समीर, टिना आणि डॉली. असे सातजण सिदच्या घरी जमले होते.

बसा रे पोरांनो, चहा पिऊन जा. अशी सिदची आई म्हणाली आणि सगळेजण चहा घेण्यासाठी सोफ्यावर बसले...,

सिध्द्या, आवर लवकर. कधीपासून तयारीच करतोय, एवढं काय भरतोय काय बॅगेत...?”, अभ्या बाहेरून सिदच्या खोलीच्या दिशेने ओरडला.

सिध्द्या, ब्लॅंकेट वगैरे घेऊ नको रे, नायतर घ्यायचा..., तेज्या हसत म्हणाला, आणि रियाने त्याला टाळी दिली...,

थांबता का जरा. येतोय आम्ही, एक पाच मिनिट. सिद त्याच्या रूममधूनच ओरडला.

रूममध्ये सिद आशूला समजावत होता.

अगं तुला खरंच बिल्कुल एकटं वाटणार नाही. तुला जो ड्रेस वाटतो तो तू घाल. कुणी तुझ्यावर हसणार नाहीये की तुला चिडवणार नाहीये.

पण नको ना. आई-बाबा घरी एकटेच असतील ना. त्यापेक्षा मी थांबते घरीच. तूम्ही सर्वजण या ना जाऊन. आशू अस्वस्थपणे म्हणाली.

ए असं नाही हा आशू. आता बाहेर सगळे मित्रं थांबले आहेत. त्यांना सांगितलंय आपण आधीच, की आपण दोघंही येणार आहोत. तिथे त्यांनी हॉटेल वगैरे बुक केले आहेत...., सिद डोक्याला हात लावत म्हणाला...,

कॅन्सल करता येईल ना, प्लीज..., आशू बारीक तोंड करत म्हणाली...

सिद तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, नक्की प्रॉब्लेम काय आहे, कपड्यांचा की.....?”,

आशू शांत होती...,

सिद रूममधली शांतता भंग पावत म्हणाला, तुला माझ्यासोबतच यायचा प्रॉब्लेम आहे का....?”,

आशू लगेच म्हणाली, नाही नाही. असं काही नाही. मी सांगितला ना माझा प्रॉब्लेम तुला...,

अगं तो काय प्रॉब्लेम झाला का गं, माझे कपडे तर बघ..., जास्त करून तर बरमोडा आणि बनियनच असतील..., तिथं कोण शर्ट आणि पॅन्ट घालत बसणारे..., सिद हसत बोलला.

सिद असं बोलला आणि आशूने टक्कं त्याच्याकडे पाहिलं....,

सिदने काहीक्षण आशूकडे पाहिलं, त्यालाही तिने दिलेल्या कारणांमध्ये तथ्य वाटू लागलं....,

तो काहीवेळ तसाच इकडे तिकडे पाहत बसला..., केसांवरून हात फिरवत टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरू लागला....,

म्हणून म्हणते, तुम्ही सर्वजण या जाऊन..., आशू हलकेसे स्मित देत म्हणाली, पण तिच्या मनातल्या वेदना तीच जाणून होती...

सिद काही बोलणार एवढ्यात दारावर संकेत अन् अभ्या जोराजोरात दार वाजवू लागले...

वहिनी, सिद्ध्या... चला लवकर..., जसे असाल तसे बाहेर या..., हनिमून इथे नाही गोव्याला आहे तुमचा...., अभ्या म्हणाला...

सिद-आशूने पुन्हा एकमेकांकडे पाहिले.....,

सिदने थोडा विचार केला आणि म्हणाला, चल तू..., तिथे गेल्यावर बघू काय ते..., गोव्यात फक्त शॉर्ट्सच घालायचे असा काही नियम नाही..., तू बिनधास्त चल..., मी आहे.....,

सिदचं हेच एक वाक्यं ऐकण्यासाठी तिचा नाहीचा पाढा सुरू होता...,

सिदने आशूकडे पाहून एक स्माईल दिली आणि सिदने दरवाजा उघडला...,

किती वेळ आवरायला..., चला वहिनी.. या लवकर बाहेर..., असं म्हणत संकेत आणि अभ्या सिदची आणि आशूची बॅग घेऊन हॉलमध्ये गेले...,

आशू त्या दोघांच्या मागे हॉलमध्ये आली...

सिद मात्र स्तब्ध तसाच उभा होता..., किती सहन करावं लागतंय हिला..., आयुष्यात हिने कधी शॉर्ट कपडे घातले नाहीत, कधी कुठे फिरायला गेली नाही, कधीच कसली तिची हौस केली नाही...,

थोडा वेळ सिद भावूक झाला होता...., त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांचे चक्र सुरू झाले.

****

फायनली सगळेजण रेल्वेस्टेशनवर पोहचले.., ट्रेन यायला अवघ्या पंधरा मिनिटांचा अवधी होता..., आशू अजूनही जरा ऑकवर्ड फिलिंगमध्ये होती हे सिदला तिच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं..., आणि त्यामुळेच सिदही जरा अस्वस्थच होता.., तिच्यापेक्षा जरा तो जास्तंच संवेदनशील होता ना....,

सगळेजण मस्ती करत, एकमेकांच्या खोड्या काढत ट्रेनची वाट पाहत होते..., सेल्फी काढणं नी गोव्याला पोहचताच नक्की कसे एन्जॉय करायचे वगैरेचे सगळे प्लॅनिंग सिदच्या मित्रांचे चालू होते..., पण सिद-आशू वेगळ्याच विश्वात हरवलेले होते....,

तेवढ्यात, सिदला मागून आवाज आला...

ए, सिध्द्या.....,

या आवाजावर सर्वांनी मागे वळून पाहिले....., सर्वांच्या चेहऱ्यावर जणू एक वेगळाच आनंद पसरला....,

सिध्द्या, अभ्या, रिया, संकेत, तेजस, डॉली, टिना....,ओह माय गॉड...., आय एम सो लकी..., माझे सगळे बडीज मला एकत्र भेटतायेत...

असं ओरडतच ती पुढे आली आणि सर्वप्रथम रिया तिच्या दिशेने धावली आणि जोरात तिला अलिंगन दिले....

माय डार्लो... कशी आहेस, कुठे होतीस गं स्कॉलर गर्ल...??”, रिया तिला अलिंगन देत म्हणाली...

तोपर्यंत सर्वजण तिच्याजवळ आले...

अगं स्कॉलर काय स्कॉलर..., एवढी हुशार नव्हते मी..., फक्त तुमच्या सर्वांमध्ये हुशार होते, बास....,

अगं, चैतू..., तुझ्यामुळे आम्ही दहावी बारावी पास झालोय, नाहीतर आमचं काही खरं होतं का....??”, अभ्या पुढे येत म्हणाला....,

सगळेजण हसले.., एक-एक करून सगळेजण तिला भेटले... तिला मनभरून मिठी मारली..., तिची विचारपूस केली...,

सिदच नाही तर सगळेचजण आनंदात होते, कारण त्यांची लंगोटी फ्रेंड म्हणजेच चैताली, त्यांना तब्बल सात-आठ वर्षांनी भेटली होती...,

अगं पण चैताली तू इथे कशी, आणि लग्न बिग्न केलंस की काय तू....?”, सिद हसत तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहत म्हणाला...

तसे सगळेजण तिला चिडवू लागले...

ती थोडीशी लाजत म्हणाली, हो अरे..., लास्ट मन्थमध्ये....,

काय सांगतेस..., आणि तुझ्या लग्नात आम्ही नाही, हा आमचा किती मोठा अपमान म्हणावा... तेज्या म्हणाला..

सगळेजण तिच्यावर रागवायला लागले...,

सो, सो सो सॉरी..., आणि तसेही तुमच्या सर्वांचे फोन नंबर कुठे होते माझ्याकडे? आणि मी काल आलीये पुण्यात...,

मग इतकी वर्षे कुठे होतीस...., डॉलीने विचारले...

अरे, मी बेंगलौरला होते.... चैतू असे बोलून पुढे बोलणारच एवढ्यात मागून तिचा नवरा आला...

डिअर, इथे काय करतीयेस तू, आय वॉज लूकिंग फॉर यू देअर...., आणि हे सर्वजण कोण आहेत....??” तो सिदच्या ग्रुपकडे पाहत म्हणाला...

चैतू हसत म्हणाली, सो फ्रेंड्स, हा माझा हबी....,

हे ऐकून रिया एकदमच हसू लागली...,

चैतूचा नवरा, कार्तिक रियाकडे विचित्रपणे पाहत म्हणाला, व्हाय आर यू लाफिंग....???”, असं म्हणत त्याने चैतूकडे पाहिले...

रिया हसू थांबवून म्हणाली, नाही, सो सॉरी... तू हबी म्हणालीस ना, म्हणून जरा हसू आलं..., ते मी आणि समीरपण आता लवकरच लग्न करतोय ना, सो मलाही आता असंच सर्वांना सांगावं लागेल ना की, ही इज माय हबी.... ती पुन्हा मोठमोठ्याने हसू लागली...

चैतूने डोक्याला हात लावला, सर्वजण हसू लागले...

सिद तिच्या डोक्यात मारत म्हणाला, मिस रिया, तुमचा हबी काही दिसत नाहीए जवळपास... कुठे गेलाय ते बघता का....? तोपर्यंत आम्ही चैतूच्या हबीकडे पाहतो...

अरे...!! कुठे गेला कुठे समीर...???” रिया इकडे तिकडे पाहत त्याला शोधू लागली....

इकडे या सर्वांच्या मनसोक्त गप्पा चालू होत्या.. ट्रेन यायला आता फक्त पाच मिनिटे शिल्लक होती... आशू मात्र जवळच्याच एका बाकावर बसून होती..., नाही म्हणता म्हणता, सिदला सध्या आशूचा विसर पडला होता.., आणि आशू आत्तापासूनच एकटी पडली होती...,

तेवढ्यात दुरूनच ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला...

चल, चैतू..., आम्ही चाललोय गोव्याला तू पण येणार का....??”, संकेत मश्करीत म्हणाला...,

तेवढ्यात चैतू ओरडत म्हणाली, वॉव. तुम्ही पण गोव्यालाच चालले आहात... हॉऊ नाईस यार...., मी., आय मिन आम्ही दोघेही गोव्यालाच चाललोय... ती तिच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली...

अरे व्वा..., हनिमून की काय...???”, अभ्या म्हणाला..

हो, तेच मिन्स फिरायला..., चैतू हसत म्हणाली...

तेच ते तेच असतं..., सिद भुँवया उंचावत म्हणाला आणि पुन्हा सगळेजण हसू लागले....

चैतू, चल ट्रेन आलीये.. आपण निघूया... तिचा नवरा वाकडे तिकडे तोंड करत, बॅगा उचलत म्हणाला...

अरे वेट ना..., माझे फ्रेंड्सही तिथेच चालले आहेत.., त्यांच्यासोबत जाऊयात ना..., हे माझे सगळे बेस्टफ्रेंड्स आहेत रे..., अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंतचे..., आय कान्ट लिव्ह देम नाऊ..., ती असं म्हणत त्यांच्याच ग्रुपमध्ये येऊन थांबली...

कार्तिक तोंड वाकडं तिकडं करत, ट्रेन थांबायची वाट पाहू लागला....,

तेवढ्यात सिदला अचानक आशूची आठवण झाली....,

त्याने मागे पाहिले तर ती एक पुस्तक वाचण्यात मग्न होती..., आजू-बाजूच्या या गोंगाटामध्ये तिचे चित्त त्या पुस्तकावर एकवटले होते...

सगळेजण ट्रेनमध्ये चढू लागले..., तेवढ्यात सिद तिच्यासमोर येऊन दोन चुटक्या वाजवत म्हणाला, मॅडम, चला... ट्रेन आलेली आहे....,

आशू भानावर आली..., अरे सो सॉरी, मी पुस्तक वाचण्यातच मग्न झाले होते...., ती उठत म्हणाली....

सिद तिच्याकडे पाहत हसत तिच्या बाजूला असलेल्या दोन बॅग उचलू लागला....

चैतू ट्रेनमध्ये चढली आणि तिथून बाहेर सिद बॅगा उचलतोय हे पाहून ती त्याची मश्किरी करत म्हणाली,

सिध्द्या...., तुझी हमालगिरी अजून चालूच आहे का...? मला वाटलेलं एखादी मुलगी केली असशील फायनल....., पण तू तर अजून मुलींच्या बॅगाच उचलतोयस....

हे ऐकून सिद हसला...., आशू आश्चर्याने चैतूकडे पाहू लागली....,

आतून अभ्या, संक्या ओरडत म्हणाली, अगं.... ती त्याची धर्मपत्नी आहे..., त्यांच्याच हनिमूनसाठी हा गोवा प्लॅन.....,

बापरे हे ऐकून मात्रं चैतू आशूकडे निरखून पाहू लागली......,

सिद दोन्ही बॅगा घेऊन येत होता आणि आशू त्याच्यासोबत अगदी बावरल्यासारखी चालत होती....,

आडवा भांग, कंबरेच्या खालपर्यंत सोडलेली मोठी वेणी, एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात थोड्याफार हिरव्या बांगड्या, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, पायात लेगिजमधून दिसणाऱ्या पट्ट्या, गळ्यात टाकलेला स्कार्फ आणि डाव्या हाताला अडकवलेली हँड बॅग....,

आणि तिच्यासोबत चालणारा सिद...., फुल हँडसम...., ब्ल्यू जिन्स, चेक्संचं शर्ट, केसांचा तुरा तर दुरूनच असा उडत होता की कोणतीही मुलगी जागीच घायाळ...., जास्तं गोरा नाही पण गहुवर्णीय असा सिद...., हातात कसल्या कसल्या माळा माळलेल्या...., दुसऱ्या हातात स्वस्तच पण त्याला अगदी उठून दिसेल असं घड्याळ..., पायात शूज आणि त्याची चालण्याची ती वेगळीच अदा.....,

सिदचं लग्नं झालं....?”, चैतूने विचारले...

तिच्या मागे उभी असलेली रिया बोलली, हो डिअर..., चार महिने झाले...., तू नाही बोलावलं पण सिदने सर्वांना लग्नाला बोलावलं... फुल एन्जॉय केला आम्ही त्याच्या लग्नात...., आणि आशू वहिनी....,

तेवढ्यात चैतू म्हणाली, काय नाव आहे तिचं...?”

अश्विनी... रिया म्हणाली...

पण सिदला शोभत नाही ना...., सिद म्हणजे सिदच...त्याच्यासारखा तोच...., त्याला अशी मुलगी आवडत असेल असं वाटलं नव्हतं ना...., चैतू एकटक त्या दोघांकडे पाहत म्हणाली.

रिया हसत म्हणाली, त्यात न वाटण्यासारखं काये....?” रियाचं नीटसं लक्षं नव्हतं ती मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यातच मग्न होती...

चैतू मात्र खूप वेळ त्यांच्याकडे पाहत होती...,

बॅगा आणता आणता मध्येच सिदने जाऊन बिस्लरी आणली..., हातात काही चॉकलेट्स आणले आणि ते आशूच्या हातात ठेवले...

हे कशासाठी... आशूने विचारले...

अगं, पहिल्यांदा ट्रेनने प्रवास करतीयेस ना..., राहूदे...

आशूने ते चॉकलेट्स घेतले आणि ते दोघंही ट्रेनमध्ये आले....

चैताली दारातच सिद-आशूकडे पाहत म्हणाली, सिध्द्या लग्नं केलंस तू... फायनली....!!!!”,

हो..., ओळख करून द्यायची राहून गेलं... ही आशू..., म्हणजेच अश्विनी...,

आशूने चैतूकडे पाहून हलकेसे स्माईल दिले...,

आणि ही चैतू..., आमची बालमैत्रिण..., हिचं पण नुकतंच लग्न झालंय...

हो का... अभिनंदन.., आशू तिच्याकडे पाहून म्हणाली...,

थॅंक यू..., चैतू स्माईल देत म्हणाली...

तोपर्यंत सिद पुढे जाऊन त्यांच्या बॅगा ठेवू लागला....

थोडावेळ आशू आणि चैतू फक्त एकमेकांकडे पाहून स्माईल देत होत्या....,

बाय द वे, तुमचं लव्ह मॅरेज की अँरेंज मेरेज...?” चैतूने नेमका प्रश्न विचारला आणि तेवढ्यात ट्रेन जागेवरून हलली..., सगळे प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठ चढाओड करू लागले...,

आशू या चढाओढीतच म्हणाली, अँरेंज मेरेज....,

आणि असं बोलून ती पुढे जाऊ लागली....,

चैतूच्या चेहऱ्यावरचा मात्रं रंगच उडाला होता.., ती तशीच त्या गर्दीतून पुढे येत होती..., तिच्या मनातही अशाच विचारांची गर्दी दाटली होती...., पुढून तिचा नवरा, कार्तिक तिला हाक देत होता..., पण ती मात्र त्या हाकेला ओ देत नव्हती...,

रेल्वे सुरू झाली आणि सगळेजण आपापल्या जागेवर येऊन बसली... योगायोगाने चैतू आणि कार्तिकचे सीटपण सिदच्या ग्रुपजवळच होते....,

आता तर सर्वजण जरा जास्तंच आनंदात होते, कधी एकदा गोव्याला पोहचतोय आणि फुल्ल एन्जॉय करतोय असं सर्वांना झालं होतं...,

सर्वजणांनी डब्ब्यात आणलेले वरवरचे खाणे संपवले.. आता पुन्हा सर्वजण गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात मग्न होते..., कार्तिक केव्हाच वरच्या सीटवर झोपी गेला होता..., आणि आशू पण कोपऱ्यात बसून या सर्वांचे बसूर आवाजातील गाणी ऐकून पूर्ण पकली होती. त्यामुळे खिडकीवर डोकं ठेवून ती डोळे बंद करून शांतपणे बाहेरील मंद हवा झेलंत होती....,

सिद जरा मोकळी हवा खाण्यासाठी ट्रेनच्या दारात येऊन थांबला आणि तेवढ्यात मागून चैतू आली.....,

चैतूकडे पाहून त्याने हलकेसे स्माईल दिले....

काय सिध्द्या...., लग्न केलंस तू..., ती हळूच म्हणाली...

सिद हसत म्हणाला, हो..., तुला शोधलं आम्ही खूप एफबीवर... तू काय सापडली नाहीस... नाहीतर तुला नक्की बोलावलं असतं....,

मी नसते आले पण..., ती बाहेर पाहत म्हणाली...

का गं..., आता शाळेत काढलेल्या खोड्यांचा राग तू आता काढणार आहेस का..., चैते...., तो तिला मस्तीमध्ये असं म्हणत तिच्या डोक्यात मारले...,

ती दाराला टेकून उभी राहिली आणि बाहेर दूरवर दिसणारी रोषणाई पाहत म्हणाली, मला वाटलं तु लव्ह मॅरेज करशील...,

हीहीहीह......सिद हसला....,

हसतोस काये..., सिरिअसली असंच वाटलं मला...,, पण तू तर....,

अरे यार..., लव्ह मॅरेज करायला कुणी सापडलीच नाही चांगली एखादी...,मग काय वय निघून जाण्यापेक्षा आई-बाबांनी पाहिलेल्या मुलीचा विचार केला...., आणि ती तर...,

अप्सराच निघाली...., चैतू हसत म्हणाली...,

काय...??” सिदने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाडत विचारले...

काही नाही...., शेवटी तुझ्यासारख्या डॅशिंग मुलाला एवढी कॉमन मुलगी पसंत पडेल, वाटलं नव्हतं..., चैतू त्याच्याकडे न पाहताच म्हणाली...,

सिद आताही हसत म्हणाला, कॉमन मुलगी म्हणजे....?”,

तूच तर म्हणायचास ना, माझ्या टाईपची मुलगी आख्ख्या कॉलजमध्ये शोधून सापडणार नाही.., म्हणून मी कोणत्या मुलीला प्रपोज करत नाही नि कुणाचे प्रपोज अप्रुव करत नाही...,

हो मग ते खरंच होतं...., सिद हसतच म्हणाला..

अरे, मग तुझ्या बायकोसारख्या तर किती मुली होत्या आपल्या कॉलेजमध्ये... मान खाली घालून, सरळमार्गाने चालणाऱ्या....,

सिद जरा कन्फ्युज झाला..., त्याला काय बोलावे कळत नव्हते...

आई-बाबांच्या ह्ट्टामुळे लग्नं केलेलं दिसतंय...., चैतू त्याची अस्वस्थता पाहून म्हणाली...

नाही नाही...,माझाच हट्टं..., सिद इकडे तिकडे पाहत म्हणाला...,

माझं मरूदे.. तू तुझं सांग..., सिद विषय फिरवत म्हणाला...

माझं काय... चैतू आता इकडे तिकडे पाहत म्हणाली...,

तुझं काय, लव्ह की अँरेंज...???” सिदने पण हसत विचारले..

माझं लव्ह मॅरेज..., ती शांतपणे म्हणाली...

अरे व्वा..., म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये लव्ह मॅरेज करणारी तू पहिली मुलगी...., तुझ्याकडून तर रियाने नि सर्वांनीच अनुभव लिहून घेतले पाहिजेत..., असं मोठ्याने बोलत सिद हसला....,

चैतू मात्र जरा अपसेट झाली...,

चल, चल... आपल्या गँगची बेसूर गाणी ऐकून तुझा हबी उठायचा... त्यांना थांबवलं पाहिजे...,

असं बोलून सिदने तिथून कल्टी मारली....,

इकडे सगळेजण मस्तीच करत होते.., पण सिदला पाहून सर्वांनी त्याला ओढले...

सिद..., आता आम्ही सगळ्यांनी भरपूर गाणी गायली आहेत..., आत्ता तू..., असं म्हणत रियाने जोरात त्याला आशूच्या शेजारी बसवले..

तेवढ्यात आशूने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले...,

सिद किंचितसा हसला...,

सिध्द्या.. चल आत्ता तू एक छानसं गाण गा, म्हणजे आम्हाला छान झोप लागेल..., संकेत म्हणाला..

अरे..., दोन वाजून गेलेत... झोपा सर्वांनी आता..., आणि तसंही सगळी मौजमस्ती इथेच करायचीय का.., गोव्यात पण जरा मस्ती करूया....,

तेवढ्यात चैतू वर कार्तिक जवळ जाऊन बसली आणि म्हणाली, सिध्द्या..., किती वर्षे झाली तुझे गाणेच ऐकले नाही.., आज गा की...,

सगळेजणच त्याला गाणं गाण्यासाठी फोर्स करू लागले...,

चल चल,, आजचं एक गाणं आशू वहिनींसाठी..., तेज्या म्हणाला..

हो, आणि तू गाणं गायल्याशिवाय आम्ही तुलाच काय कुणालाच झोपू देणार नाहीये...., रिया नि संकेत ओरडून म्हणाले...,

तेवढ्यात पुढे एका सीटवर बसलेले आजोबा म्हणाले, ये बाबा सिद का कोण... गा बाबा गाणं... ही पोरं काही झोपू द्यायची नाय आम्हाला....,

आजोबा... तुम्ही झोपा निवांत..., आमच्यासारखा बेसूर आवाज नाहीये सिदचा...., संकेत त्या आजोबांना पुढे घेऊन गेला....

इकडे आशू अवघडली..., ती अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागली...

अभ्या सिदला एवढा खेटून बसला होता की त्याला हलताच येत नव्हते... आणि त्याचे तोंड पूर्णपणे आशूकडे होते...,

आशू हलकीशी हसत त्याच्या जवळ जात म्हणाली, कोणतं तरी गाणं गाऊन टाक..., नाहीतर तुझे मित्रं सोडणार नाहीत तुला...,

सिद म्हणाला, हे असे हलकट मित्रं आहेत माझे..., आपण तोडायचं म्हणतोय आणि ते मुद्दाम जोडायचं बघतायत.....,

चैतू वर तिच्या नवऱ्याशेजारी जाऊन बसली होती...,

तिचा नवरा डोळे चोळत तिच्या जवळ झुकत बोलला, दिस इज कॉल्ड केमिस्ट्री...., किती लाजतायत ती दोघं..., अजून तरी गोव्याला पोहचायचं आहे पण त्यांनी इथंच लुका-छुपीला सुरूवात केली..., त्यांचा हनिमून तर सुरूही झालेला दिसतोय..., पण तू काही..., तो तिचा हात जोरात दाबत म्हणाला...,

कार्तिक..., प्लीज...., ती त्याला दूर करत चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली....,

तो मात्रं जमेल तितकं तिच्या जवळ येऊ पाहत होता आणि खाली मात्र सिद-आशू जमेल तितके दूर जाऊ पाहत होते....,

यार सिद गा ना गाणं...., डॉली पण झोपेतच म्हणाली... कारण तिलाही रियाने झोपू दिले नव्हते..

तेवढ्यात सगळेजण हसले...

तेच ना, तू गाणं गायल्याशिवाय हे चौघं आम्हाला झोपू देणार नाहीएत.... टिना म्हणाली...

यार सिद, गाऊन टाक आता गाणं..., समीरपण रियाकडे रागाने पाहत म्हणाला....

आणि सिदने कशीबशी रागात गिटार घेतली आणि म्हणाला, मी कोणतंही गाणं गाईल, ते गपगुमान ऐकायचं आणि गप झोपून जायचं....,

वरून चैतू ही ऐकत होती....,

बघ आता, किती रोमॅंटिक गाणे गाईल तो त्याच्या बायकोसाठी..., चैतू रागाने कार्तिककडे पाहत म्हणाली...,

सो..., मी पण गाऊ शकतो..., कार्तिक असं म्हणाला आणि लगेच चैतू त्याला थांबवत म्हणाली, तुझं गाणं ऐकण्यापेक्षा आपण सिदचं ऐकूया....,

तेवढ्यात सिदने गिटारीच्या तारा छेडल्या...

आणि आशूला डोळा मारत म्हणाला, दिस साँग इज डेडिकेट्स टू माय ऑल फ्रेंड.... कमिने फ्रेंड्स

हट्टे-कट्टे, उल्लू के पट्ठे

 एक ही थाली के चट्टे-बट्टे

हट्टे-कट्टे, उल्लू के पट्ठे

एक ही थाली के चट्टे-बट्टे

साले निखट्टू, बजरबट्टू

आई बल को टाल तू
 

आगे से बाती पीछे से कटी

पंगा लिया तो मार दे कल्टी

मुफ्त का चंदन घीस मेरे नंदन

माल बचा के भाग तू

ऊपर से बोलते हैं वाट्स उप बडी (What’s up buddy)

नीचे से खींचते हैं चड्डी चड्डी

साला इज्ज़त उतारने को ऑलवेज रेडी (always ready)

हर एक फ्रेंड कमीना होता है

बोले तो हर एक फ्रेंड कमीना होता है

हर एक फ्रेंड कमीना होता है

बोले तो हर एक फ्रेंड कमीना होता है



सिदने हे गाणे गायले आणि खरोखरंच तिथे सर्वजण सिदला जोरजोरात मारू लागले..., मागच्या सिटवरचे आजोबा पण उठून हसत होते...,  पण सिदच्या गाण्यामुळे आशूचा मूड जरा जास्तंच फ्रेश झाला होता....,