एकतर्फी प्रेम

One side love

प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येत 
तेव्हा नकळत कोणीतरी आपलंस वाटत
प्रेम करण्यासाठी सुंदरतेची गरज नसते
ते तर फक्त दोन दिलांचे मिलन असते

काहीवेळा  प्रेमाची व्याख्या हळूच बदलून जाते 
कारण, कधी कधी ते एकतर्फी असते
एकतर्फी प्रेमाची व्याख्या कशी करावी 
आपल्या मनातली गोष्ट जिवलगला कशी सांगावी

आपल्याला कोणीतरी आवडल म्हणून त्यांनाही
आपण आवडणार अस कधी नसतं 
कारण प्रत्येकाच मन वेगळी छबी गिरवत असतं 
प्रत्येकान काहीतरी स्वप्न रंगवलेली असतात 
ति कधितरी दोघांची नशीबाने जुळतात.

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कुणीतरी मिळतं
ज्यावर आपलं प्रेम आहे अस मणाला वाटत
भावना व्यक्त करायला एकतर कधी वेळ मिळत नाही
पण कधी वेळ मिळालाच तर ते 
व्यक्त करायचं धाडस होत नाही

मुलिंच्या बाबतीत हे जरा अधिकच घडत
त्यामुळे त्यांच प्रेम नेहमी अधूरच राहत 
आई-बाबांचे संस्कार आणि दुनियेच्या पार
जाण्यासाठी मुलींकडे हिंमत काही नसते
म्हणून ज्यावर आपल प्रेम आहे त्यानेच
व्यक्त करावा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते