Jun 15, 2021
ललित

मी आणि कोरोना

Read Later
मी आणि कोरोना

मी आणि कोरोना

     गेलं वर्ष यातच गेलं. ही काळजी घे आणि ती काळजी घे. हे एक बरं आलंय आपल्याकडे . काळजी घे TC  वगैरे . आपण आधी काळजी घेत नव्हतो का ?  नाहीच बहुतेक. म्हणूनच आजकाल आपण ज्याला त्याला म्हणत असतो ,मेसेज टाकत असतो. असो
    फेब्रुवारीमध्ये काहीतरी  पंडेमिक म्हणून 
 आलं करता करता लॉक डाऊन सुरूच झालं. हात पाय धुवायची सगळ्यांची गडबड सुरू झाली. नवीन मास्क प्रकरण आलं. सगळंच हळू हळू सक्तीचं झालं. घराबाहेर न पडणं  हेच काळजी घेणं ठरलं.
      मग पुढे काढे , भारतीयांची इम्यूनिटी वगैरे मेसेज आणि बातम्या. अशांचा तर पाऊस पडला व्हॉट्स ऍप वर. पण काही अंशी खरंच आहे ते. पण मुळात कारोना काय आहे ते कुठे कळलं होतं ? हे सगळेच अंदाज .बरं ते वैज्ञानिक नुसतेच काय काय सांगत होते . डॉक्टर आपल्या परीने  आर अँड डी करीत होते. कुठलं औषध काम करतेय , हे पण कळत नव्हतं.  नंतर औषधे आली ,काही इंजेक्शने आली   आणि पेशंट बरे होऊ  लागले  .

 पण आपले सण वार सुरूच होते , प्रार्थना सुरूच होत्या. लोकांनी टीव्ही बंद केला..आणि खरंच बरं वाटलं. त्या बातम्यांचा रवंथ बघवत नाही आताशा. उगाच दिवसभर नको ते  लोकांच्या डोक्यावर मारायचं. अजुन नव म्हणून  काही दाखवून लोकांना घाबरवून सोडायचं. व्हॉट्स ऍप ने सुद्धा खूप खत पाणी घातलं. पण कधी कधी कसं कामी आलं ते पुढे सांगते आणि काही माहिती देखील पुरवली.
   या सगळ्यातून तरुण मुलांना बाहेर काढणं मला जास्त अवघड वाटलं. त्यांना असा हवाल दिल झाल्यासारखं वाटतंय . समोर भविष्य क्लिअर नाहीये. सगळ्याच बाबतीत सगळंच अस्पष्ट . परीक्षा ,अभ्यास , परीक्षा , डिग्री परीक्षा , सगळंच धूसर . मी या मुलांना खचलेलं पाहिलं आणि मला यातला मार्गच सापडला नाही  , अजूनही..खूप वेळ देऊन त्यांची मानसिक तयारी हा खूप मोठा विषय आणि तितकीच चिकाटीने तयारी. अशा सगळ्या आयांना सलाम .त्यांनाच ठाऊक अशा मुलांना कसं सांभाळायचं. त्यांच  खाणं , अभ्यास , आँनलाईन क्लास च्या  वेळा सगळं  सांभाळावं लागलं ....डोक्यावर बर्फ ठेवून. 
 या गदारोळात गणपती , नवरात्र , दिवाळी आले आणि गेले. ज्यांना जमलं त्यांनी सगळंच रीतसर केलं. आता घाबरून कसं चालेल म्हणून ,घरातील परंपरा म्हणून आणि अजुन काय. कोणी येऊ शकलं , कोणी नाही तरी पण उत्साह होता. आणि तो हवाच होता. नाहीतर घरातल्या मुलांना आणि वयस्कर लोकांना कसं सांभाळलं असतं ? ज्यांना नेहमी बाहेर जायची सवय आहे त्यांना तर कुठलेच बंधन नको होते. लॉक डाऊन  संपताच ते बाहेर पडलेले होते. 
     मी पण दिवाळी सगळ्यांसोबत साजरी केली. सगळे म्हणजे घरातील वयस्कर , भाऊ  , वहिनी आणि घरातील मुलं. पण दिवाळी संपताच माझी तब्येत बिघडली . सर्दी, पडसे ,अंग दुखी ...आपल वातावरण बदल वगैरे  म्हणता येईल असं. 
      दोन दिवसांनी सर्दी वाढली अन थोडा ताप आला. पण वास अन् चव गेली . झालं डॉक्टर ने हात वर केले.  कोरोना फायनली आलेला होता.
   सगळी दूनियाभरची काळजी घेऊन सुद्धा. रिपोर्ट  पॉसिटिव्ह आला आणि माझा जग बदललं.  दोन दिवस सगळं वेगळं करून पाहिलं पण अशाने घरातले देखील बाधित झाले असते.  सारखं  सगळं सॅनिटाइज़ करणं शक्य   नव्हतं. शेवटी हॉस्पिटल मध्ये  अॅडमिट झाले . तिथे सगळी व्यवस्था छानच होती . डॉक्टर अटेंशन , औषधे , वेळेवर  जेवण , ऑक्सीमीटर ने ऑक्सिजन चेक अप , बीपी  मॉनिटर , सगळंच चेक अप अन् काय काय  . माझी तब्येत मात्र  व्यवस्थित    होती . यालाच माइल्ड  सिम्पप्टम्स् असे  म्हणता त .

   या एकाच  आजारा मध्ये आपलं कुटुंब , मित्र - मैत्रिणी काहीही मदत करू शकत नाही . म्हाणून कदाचित एकटेपणा येतो  . नेहमी  सारखं मिसळू शकत नाही . त्यांची मदत आपल्याला चालू शकत नाही . उलट आपल्या कडून त्यांना धोका आहे याचं जास्त गिल्ट येतं. यामुळे झोप लागत नाही . आणि म्हणूनच काही जण डिप्रेशन मध्ये जातात . ही व्यथा माइल्ड सिम्प्टमस् असलेल्या पेशंट ना . पण ज्यांना इतर आजार पण असतात जसे बीपी  , डायबिटिस , अस्थमा  अशांसाठी फार अवघड  . त्यांची तब्येत अजून बिघडू शकते आणि म्हणून हा रोग म्हणा , आजार म्हणा फार भीतीदायक वाटतो . पण तसं नाहिये . हे प्रत्येकाच्या तब्येतीवर आणि इम्यूनिटीवर अवलंबून आहे. 
      या सगळ्या मध्ये फोन  व्हॉट्स अॅप हा माझा एक अविभाज्य भाग झाला . व्हिडिओ  कॉल तर अपरिहार्य झाला . औषध सुरु होती . सोबतचे पेशंट पण चांगले भेटले . आम्ही आपले मन रमवत होतो . मला ना वास ना चव . मला सगळे हसत होते. हिला जेवणाची चव विचारा बरं का ! कसल छान जेवण आहे ! मी आपली गोळ्या खायच्या म्हणून जेवायचे . कुठे काही कळत होतं ! वरून टेंशन वेगळं . वास येत  नाही ही एक विचित्र स्थिती होती . सगळं आयुष्य स्वैपाघरात सगळं हुंगुन चाललेलं असत . इतर प्रत्येक ठिकाणी हेच . डॉक्टर म्हणाले  होईल बर . पण तो पर्यंत  वाईट अवस्था असल्या सारखे वाटत होते .  
       एकदाचे हॉस्पीटल चे सात दिवस संपले  . आता घरी सात दिवस आयसोलेशन . तो  वेळ अजून जायचा होता . घरातल्या एका रुम मध्ये मी . कशालाच हात न लावता आठ दिवस काढले . जेवण वाढायला माझा नवरा . मला सगळं हातात आणून द्यायचा . कारण  इतरत्र माझे हात लागले तर त्यांना धोका होता . प्रत्येक वेळेला सगळ सॅनिटाईज करणे . वगैरे . पण या काळात  वाचन मात्र खूप केलं . फोन वर , पुस्तके , फोन वरील पुस्तके , रोजचा पेपर तर इतका पटकन वाचून होत होता ' की इतकी वर्ष मला एवढाही वेळ मिळत नव्हता '   हे कळलं . कधी कधी म्हणायचे चला या अर्थाने बरंच आहे हे . एवढा  ' मी टाईम' मला पूर्वी कधीच मिळाला नव्हता.  तो मी आत्ता अनुभवला आणि मला वाटलं की असा वेळ आपल्याला अधून  मधून मिळायला हवा . अर्थात असा नाही , पण आपल्या रोजच्या जीवना मध्ये शोधावा लागतो , आता शोधावा  . प्रत्येकाने . 
     आणि खरंच सगळ्यांनी  ' काळजी घ्या' बरं का !
      आता मी बरी आहे ना ! मग हे म्हणणं भाग आहे !

Circle Image

Gauri Vinayak

Teacher n homemaker

Never penned anything ...but I can express myself I guess after looking to my surrounding students , their parents and related issues and women in general .