लग्नगाठ स्वर्गातूनपृथ्वीवर..
१९९०-९१ चा काळ असेल....माझ्या बाबांचं लग्न तेव्हा झालं होत,पण बाबांच्या जिवलग मित्र रामदास च मात्र लग्नाचं बघण चालू होत.बऱ्याच मुली पाहिल्या पण रामदास काकाला मात्र त्यांची अप्सरा काय सापडत नव्हती,हो हो अप्सराच..' देखणी बायको हवी होती त्यांना.
रामदास काकाच्या घरचे देखील वैतागून ' रामदासा तुला नक्की लग्न करायचं ना भाऊ?' अस विचारायला लागले.असच काही दिवसांनी त्यांना सुमन च स्थळ आल.सगळ काही छान होत घरदार,सुसंस्कृत मुलगी.पण सुमन मात्र दिसायला "अप्सरा" काही नव्हती.पण चांगली होती.
मग काय रामदास आणि कुटुंब गेलं सुमनला बघायला.सुमन च्या घरचे माणसं खूप चांगले..रामदास आणि कुटुंबाची ठेप एकदम राजेशाही केली होती त्यांनी.आणि जेवणं वावावा.....पुरणपोळी चा घाट घातला होता चक्क..वरून साजूक तूप... रामदासांच्या घरचे खुपचं खुश..इतकी ठेप...रामदास सगळ लई च झक्कास भाऊ..आता उरकुन च टाकू ह्या नजरेने रामदास कडे बघत होते.पण इथे खरी गंमत.."रामदासला सुमन काही आवडली नव्हती."
पोरगी पाहून रामदास लगेच कामावर परतला.तो जिल्ह्यात नोकरी ला होता.तिथेच एकटा राहायचा मित्रांसोबत,आणि कुटुंब गेलं गावी .त्या काळी आजच्यासारखे फोन काही नव्हते.पत्रव्यवहार चालायचा काही खास असल तर.आता कुटुंबाला वाटल रामदास इतकं सगळ भारी पाहून होकरच देईल.त्यात रामदास लगेच कामावर गेल्याने आणि लांब राहत असल्याने बोलण काही झालंच नाही. ईकड मात्र रामदास ल समजत नव्हत की नकार कसा द्यावा पोरगी सोडून बाकीचे आवडल म्हणजे अर्थ नाही नाई का!
खूप विचार करून आणि माझ्या बाबांसोबत बोलून शेवटी त्याने मुलिकडच्याना एक पत्र लिहिलंकी,आमचा पाहुणचार तुम्ही खुपचं छान केला त्यासाठी धन्यवाद,पण आम्हाला मात्र हे लग्न मान्य नाही.त्याबद्दल माफी असावी.पत्र लिहिलं तर खर त्याने पण पोस्टात टाकायची हिम्मत काही होत नव्हती त्याची.रोज खिशात घेऊन फिरायचा तो ते पत्र.असेच आठ एक दिवस गेले त्यानं पत्र काय पोस्टात टाकल नाही.
अशातच संक्रांती चा सण आला म्हणून तो गावी गेला.आणि घरच्यांनी त्याच्यावर बॉम्बचं फोडला.."अरे रामदास पुढच्या महिन्यात दोन तारखा निघतात लग्नाच्या कधीचा मुहूर्त धरायचा..सुमन च्या घरी दोघी तारखा मान्य आहेत बाबा आता तुझ्या सुट्टीच सांग तेवढं."आता मात्र रामदासला घाम फुटला.आता काय ..रामदास चा होकार समजून घरच्यांनी लग्न ठरवून टाकल होत.काय वाटतं तुम्हाला काय झालं असावं पुढे...रामदास नाही म्हंटला का लग्नाला?की केलं?
काय राव....ओळखल की तुम्ही...शेवटी आई बाबांचं सगळ ऐकायचा काळ तो... आता रामदास आणि सुमन गेल्या ३०-३१ वर्षांपासून हॅपिली? नांदत आहेत..पण सुमनच्या घरच्यांना लिहलेले पत्र रामदास काका अजूनही खिशातच घेऊन फिरतात...आणि माझे बाबा अजूनही काकांना गमतीने विचारतात..."रामदास पत्र टाकल का पोस्टात" ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा