Jan 28, 2022
थरारक

लघुकथा साक्षीदार आहे तोच सामसूम रस्ता

Read Later
लघुकथा साक्षीदार आहे तोच सामसूम रस्ता

लग्न मंडप सुंदर  सजवला होता .करवल्या मिरवत होत्या.नवरी मनात स्वप्न सजवत होती.नवरदेवसुद्धा खुश होता..त्याने मंगळसूत्र घातले.सप्तपदी चालले ..वचनबद्ध झाले दोघे.लग्नबंधनात अडकले..खूपच सोनेरी दिवस होता त्या जोडप्यांसाठी.अचानक पोलिसांनी हॉलच्या अवतीभवती गराडा घातला.. आरडा ओरड सुरू झाला ,हॉल खाली करण्यासाठी पोलिस मागे लागले .. सगळे भांबावले काय झाले.सर्व सुरळीत असताना हे काय झाले??पोलीस का आले??सर्वांच्या कपाळावर आट्या पडल्या..कारण मंडपाच्या पाठीमागेच एका तरुण मुलीचा मृतदेह  सापडला होता,सडलेल्या अवस्थेत..कोणातरी नराधमाने त्या  सामसूम रस्त्यावर ,एका रात्रीच्या काळोखात  तिचा जीव घेऊन  जमिनीत पुरलं होतं तिला.तो सामसूम रस्ताच एकमेव  साक्षीदार होता.तिच्या किंचाळ्या ऐकल्या होत्या त्या रस्त्याने.अमानुषपणे कत्तल केली होती तिची कोणीतरी????..ग्वाही देईल का तो सामसूम रस्ता???

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..