Feb 28, 2024
रहस्य

काय असेल सत्य!

Read Later
 काय असेल सत्य!

काय असेल सत्य!
भाग 1
लेले काकू,एक उत्साही आणि प्रसन्न व्यक्तीमत्त्व..लेले काकांचा कपड्याचा जंगी व्यवसाय...अशा या आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा कुटूंबात जाई ची भर पडली अन लेले कुटुंबाच सुखी संसाराच झाड हे बहरू लागल. हळुहळू जाई पाठी जुई आणि सई ह्या फुलांनी लेले कुटूंबाच झाड अजूनच बहरल. हळुहळू पोरी मोठ्या होत होत्या.पण लेले काकूंना मात्र आपल्याला मुलगा नाही ह्याची खंत मात्र नेहमीच वाटायची.लेले काकूंना भाऊ नव्हता आणि आपल्या मुलींना पण भावाच प्रेम मिळणारं नाही याचं दुःख त्यांना बऱ्याचदा खुपायच.लेले काकूंना एकच बहीण तिच्या पदरात मात्र देवानं दोन  पोरांचं वाण दिलेलं.मोठा नील आणि जुळे रिद्धी आणि सिद्धेश..आपल्या बहिणीची आस भरून काढण्यासाठी लेले बाईंच्या बहिणीनं धाकट्या सिद्धेश ला बहिणीकडे शिकायला ठेवलं..लेले बाई खुपचं खुश होत्या.. असेच दिवस भुर्रकन उडून चालले होते.
पिल्ल मोठी होत होती.आणि लेले कुटुंबाची देखील भरभराट होत होती.
       पण म्हणतात ना हाताची पाचही बोटं हीं सारखी नसतात..लेले काकांना दारूच व्यसन लागल आणि लेले काकूंना मानसिक विचाराचं..पुढे जाई च लग्न झालं.बाकी पोर सुद्धा मोठी झाली.. चांगली शिकली..सिद्धेश अजूनही लेले बाईकडेच राहत होता तो लेले बाईना खूप जीव लावायचा..आपल्या पोरी लग्न करून गेल्यावर सिद्धेश तरी आपल्यासोबत राहावं असं त्यांना फार वाटायचं..असेच दिवस भुर्रकन उडून चालले होते.आता सिद्धेश काकांच्या व्यवसायात कॉलेज सांभाळून बरीच मदत करत होता.आणि जुई च सुद्धा लग्न लेले कुटुंबाने एक चांगला आणि सधन मुलगा पाहून करून दिलं.सगळ कस नीट चाललं होत.
         मोठी जाई आई होणार होती ह्या बातमीने लेले कुटुंब अजूनच खुश झाल.आणि सातव्या महिन्यांत ती डिलिव्हरी साठी माहेरी आली.लेले काका काकू पोरीच्या लाडात हरवून गेले.असेच दिवस सरत होते.असेच एके दिवशी नेहमीप्रमाणे सिद्धेश आणि लेले काकू सकाळी फिरायला गेले.पण आज दहा वाजले तरी दोघांचा घरी पत्ता नव्हता.जाई आणि सई काळजीत पडल्या काय झाल नेमक की आई आणि सिद्धेश अजून घरी आले नाही..त्यांनी लेले काकांना फोन करून सगळ सांगितलं.लेले बाई आणि सिद्धेश फोन घरीच ठेऊन गेल्याने काहीच कळायला मार्ग नव्हता.
         बारा वाजले तरी काहीच हालचाल नाही अशातच लेले काकांचा फोन वाजला आणि पलीकडून पोलिसांचं बोलण ऐकून ते हादरले.' लेले काकू आणि सिद्धेश चा रक्ताने बरबटलेले देह रेल्वे रुळावर सापडले होते.,'
         काय झालं होत नेमक की अस घडल.कोणाला काहीच समजत नव्हतं..काय घडल असावं?लेले काकू अन् सिद्धेश यांची हत्या झाली की आत्महत्या? पाहू अंतिम भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//