Jun 15, 2021
प्रेम

कथा तुझी अन माझी ....प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग 24)

Read Later
कथा तुझी अन माझी ....प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग 24)

शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी.... प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग 24)

शामलच्या बाबांनी घातलेली अट ऐकून प्रशांत चे आईबाबा ही नाराज झाले...आपण इतका प्रयत्न केला तरी शामलचे बाबा त्याच अटीवर अडून बसले आहेत...मग होऊ दे त्यांना पाहिजे तसं...पण आम्ही नाही त्यांची ही अट मान्य करणार...प्रशांतचे बाबा म्हणाले...

संध्याकाळी सगळं कुटुंब एकत्र जमलं होतं...शामलच्या बाबांनी जी अट घातली होती त्यावर चर्चा करायला...पण प्रशांत च्या बाबांनी चर्चा सुरु होण्याआधीच आपला निर्णय सुनावला ...त्यामुळे पुढे कोणालाच काही बोलता येईना...

यापुढे आता याविषयावर कोणीच काही बोलणार नाही...असं म्हणत ते आपल्या रुम मधे निघून गेले...

प्रशांतचे तर आता अवसानच गळून गेले...काय करायचे आता??... एकिकडे शामल जीला मी सगळं ठिक करेन असा शब्द दिला आहे.... तर दुसरी कडे  आईबाबा...त्यांचही बरोबरच आहे...प्रशांत चांगलाच कोंडीत सापडला होता...

कोणाचा विचार करू शामल चा की आईबाबांचा...???

मी असं काय करू ज्याने सगळं ठिक होईल  ?... प्रशांत ने आपला हात जोरात टिपॉय वर आपटला...तसा तो काचेचा टिपॉय ताडकन फुटला...सगळ्या काचा खाली पडल्या ...प्रशांत च्या हातालाही काच लागली...हातातून रक्त येऊ लागला...

तशी प्रशांतची आई पटकन धावत आली...त्याचा हात हातात घेऊन म्हणाली....वेडा झालास का?? काय केलसं हे...असं चिडून काही होणार आहे का??? त्याने फक्त तुला त्रासच होईल...आणि तुला त्रासात पाहून आम्हांला ही त्रास होईल...

अजून काही वेळ गेली नाही...आपण करू काही तरी...

प्रशांत ला घेऊन त्या वॉशबेसिन जवळ गेल्या...तिथे त्याच्या हातावर आधी पाणी ओतलं...हात पुसून जिथे लागलं होतं तिथे औषध लावलं....पट्टी केली...

त्याला थोडं पाणी प्यायला दिलं...आणि त्याच्या रुममध्ये नेऊन त्याला थोडा वेळ शांत पडायला सांगितले...

प्रशांत रुम मध्ये एकटाच होता...डोळे बंद केले की शामल चा चेहरा त्याला नजरेसमोर दिसायचा...आणि काही क्षणात पुन्हा तो गायब व्हायचा....हा खेळ किती वेळ चालू होता कोणास ठाऊक...कारण त्याचा फोन वाजला तसा प्रशांत भानावर आला...आणि त्याच्या लक्षात आलं आपण कितितरी वेळ असेच बसलेलो आहोत...शामलचा विचार करीत...

फोन पाहिला तर त्याचा मित्र विकी चे नाव डीस्प्लेला दिसले...विकीने का बरं अचानक फोन केला असा विचार करून त्याने फोन कानाला लावला...

प्रशांत: बोल...

विकी: क्या बोल...भाई कितने दिन हुए तुझसे कोई मुलाकात ही नही हुई...हैं कहांँ तू...इतना बिझी हैं क्या?? जो दोस्तोंको भी भूल गया...

प्रशांत: क्युँ घूमा फिराकर बात कर रहा हैं...चल सिधे पॉईंट पे आ...क्या हुआ जो अचानक कॉल किया??

विकी: कुछ नही यार बडा सुना सुना लग रहा था तो सोचा..तेरे साथ थोडा वक्त बिताऊ...गप्पे शप्पे करेंगे तो थोडा मूड भी ठिक हो जायेगा...

प्रशांत: नहीं यार अभी नही...बाद में किसी दिन मिलते हैं ना ...आज मेरा जरा भी मूड नहीं हैं...

विकी: पता हैं उसी मूड को तो ठिक करना हैं...

प्रशांत: क्या???...

विकी: कुछ नहीं यार यूँही...चल बता तू आ रहा हैं या मैं ही आ जाऊ..

प्रशांत ला माहित होतं ...हा विकी काही सहजा सहजी पिच्छा सोडणार नाही...तसही घरात एकटा बसून राहीलो...तर शामलची आठवण जास्तच त्रास देईल...घरातले पण मला असं पाहून काळजी करत असतील...त्या पेक्षा विकी सोबत वेळ घालवलेला काय वाईट...

प्रशांत: ठिक है चल मैं ही आ जाता हूँ तेरे घर पे...बस दस मिनिट में पहूंच रहा हूँ...

विकी: ओके चल बाय मिलते हैं...(मनातल्या मनात खुश होतो... प्रशांतला कॉल करण्यापूर्वी ....प्रशांतच्या आईचा कॉल विकी ला आला होता...प्रशांत अप्सेट असला की विकी सोबत वेळ घालवतो...हे त्यांना चांगलच ठाऊक होतं...त्यामुळे विकी ला हाताशी घेऊन प्रशांतचा मूड ठिक करावा या विचाराने त्यांनी विकिला सांगितले ...प्रशांत ला कॉल करून त्याला भेटायला बोलाव...तुझ्या सोबत गप्पा मारल्या ...थोडा बाहेर गेला तर त्याला ही बरे वाटेल...आणि म्हणूनच...विकी कॉल करून प्रशांतला भेटण्यासाठी फोर्स करत होता...)

दारावरची बेल वाजली...विकी ने दरवाजा उघडला...समोर प्रशांत उभा होता...चेहरा पूर्ण उतरलेला...एका दिवसातच त्याची हालत खराब झाली होती...अगदी देवदास दिसत होता...विकी ने हसतच त्याचे स्वागत केले...

विकी: क्या यार कितने दिन हुए हमने एक साथ वक्त नही बिताया..तेरा कॉलेज क्या स्टार्ट हुआ तू तो पुराने दोस्तों को भूल ही गया...

प्रशांत: जादा नौटंकी मत कर तुझे पता हैं ऐसा कुछ नही हैं...

दोघेही रात्री बराच वेळ गप्पा मारत बसतात...मधेच प्रशांत शामलचा विषय काढतो...शामलच्या घरी घडलेला सगळा प्रसंग आणि शामलच्या बाबांची ती विचित्र अट विकी ला सांगतो...

प्रशांत: कुछ समझ नहीं रहा करु तो क्या करू??... शामल जो मुझपे उम्मिद लगाये बैठी हैं की मैं सबकुछ ठिक करा दूँगा...दुसरी तरफ मेरे पापा हैं जो शामल के पापा ने शर्त रखी हैं उससे नाराज हुए हैं और अब ईस रिश्ते को भी मना कर रहे हैं...

विकी : अरे यार तू टेंशन क्यों ले रहा हैं ...मैं हूँ ना तेरे साथ....अगर दोनो तरफ से प्रॉब्लेम हो रहें हैं तो हम शामल को भगा के ले आयेंगे...फिर शादी कर लेना...एक बार शादी होगी तो कोई कुछ नहीं कर सकेगा...

प्रशांत: चुप रे...मै नहीं लाने वाला शामल को भगा के...और ना वो मेरे साथ भाग के आयेगी...हमारा प्यार भगोडा नहीं हैं...जिस प्यार को पाने के लिये भागना पडे वो प्यार  ही क्या???... मुझे शामल को सारे रीतिरिवाज के साथ लाना हैं...और जब हमारी शादी हो तब सभी खुश होके आशिर्वाद दे...किसी एक को भी दुखी करके...हम दोनों खुश नहीं रह पायेन्गे...

विकी: भाई हार गया तेरे सामने...( हात जोडतो)... तू और तेरा प्यार...पर भगवान से प्रार्थना करून्गा की तुझे शामल तेरा प्यार जरूर मिले....

चल अब सो जा बातों बातों  में सुबह के पाँच बज गये...थोडा आराम करेगा...तो बेहतर मेहसूस करेगा...

दोघेही झोपतात...

असाच 1महिना सरतो...प्रशांतच कशातच लक्ष नव्हतं...रेगुलर कॉलेज अटेंड करणारा...अभ्यासात पूर्ण लक्ष देणारा प्रशांत...आता पुन्हा कॉलेजला वरचेवर दांड्या मारू लागला....रुम मध्ये एकटाच बसून असायचा...कोणाशी बोलणे नाही की खाण्यापिण्यावर लक्ष नाही...

शामलचीही तिच अवस्था होती...शामल च्या बाबांना शामल च्या आईने...रेश्मानेही खूप समजावन्याचा प्रयत्न केला...पण ते कोणाचेच ऐकून घ्यायला तयार नव्हते...आपल्या अटीवर ठाम होते...शेवटी वैतागून सगळ्यांनीच त्यांच्या पुढे हात टेकले...

शामलचा जॉब ला असल्याने तिला काही करून बाहेर पडणं भाग होतं...प्रशांत शी फोन वर बोलणं व्हायचं...दोघेही एकमेकांना दिलासा द्यायचे...त्याशिवाय दुसरा काही मार्ग ही त्यांच्या कडे नव्हता...या एक महिन्यात ते एकदा ही भेटले नाही..कारण भेटल्यावर एकमेकांना फेस कसं करायचं..हा प्रश्न होता त्यांच्यापुढे...

प्रशांत ची अवस्था पाहून त्याच्या आई ने त्याच्या बाबांशी पुन्हा बोलायचं ठरवलं...

आई: मी काय म्हणते...पुन्हा एकदा विचार करा ना ...दोन्ही बाजूने ताणून धरलं तर हे नातं तुटणारच...त्या पोरांनी कोणाकडे पहायच मग...

आपणच नको त्यांना सांभाळून घ्यायला...जर ते म्हणता आहेत सहा महिन्यात लग्न लावून द्या..तर ठिक आहे ना ...लावून देऊयात लग्न...पुढच पुढे बघूयात...

प्रशांतचे बाबा यावर काहिच बोलत नाहित...प्रशांतचा मोठा भाऊ तिथेच होता..त्यानेही आपल्या बाबांना समजाविन्याचा प्रयत्न केला....

प्रशांत चा मोठा भाऊ: हे बघा तुम्ही माझ्या लग्नासाठी प्रशांत च लग्न नको म्हणत असाल...तर मला प्रशांतच लग्न आधी झाल्याने काहिच प्रॉब्लेम नाही आहे...तसही मी स्वत: दोन वर्ष लग्न करणार नाही आहे...

आणि लोकांचा विचार करत असाल...तर इथे कोणाला पडलं आहे कोणाच्या घरात काय सुरु आहे याचा विचार करायला...आपली फ्यामिली आहे...मग आपल्या फ्यामिली साठी एखादा निर्णय घेताना कशाला लोकांचा विचार करत बसायचा...प्रशांतचा आनंद आपल्या साठी महत्वाचा आहे...त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा...असं मला तरी वाटतं....बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा...मी माझ्या परिने तुम्हाला समजविण्याचा प्रयत्न केला...गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच सावरलेल्या बर्या....

प्रशांतची आई: आणि तसही आपल्याला काय कमी आहे...प्रशांतच शिक्षण होऊन त्याला नोकरी लागेपर्यंत त्यांच्या संसाराची जबाबदारी आपण घेऊ...पुढे जाऊन पाहतीलच ते त्यांचा संसार...शामलही जॉब करते...दोघांचा एकमेकांवर जीव आहे...देतील साथ एकमेकांना...तोपर्यंत आपण त्यांना सावरुयात ना...
मूलं चुकली तर मोठ्यांनीच नको का त्यांच्या चुका पदरात घ्यायला...त्यांनी काही चुकिच पाऊल उचलण्याआधी आपणच योग्य निर्णय घेऊयात..मुलांच्या सुखासाठी...

प्रशांतची अवस्था पाहवत नाही हो...पोराच कशातच लक्ष नाही...किमान त्याच्यासाठी तरी...

प्रशांतच्या आईचे डोळे भरून येतात...प्रशांतचे बाबा आता काय उत्तर देतील याचीच प्रतिक्षा करत असते...

प्रशांतचे बाबा : पाहू काय करायचे ते...असं म्हणत ते जागेवरून उठतात...आणि बाहेर जातात...प्रशांतची आई विचार करत बसते की ते काय निर्णय घेतील...

तुम्हालाही विचार पडला असेल ना प्रशांतच्या बाबांच काय उत्तर असेल ....तर मग हे जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात..शामल आणि प्रशांत सोबत..तोपर्यंत सायोनारा...

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद...