सफर भाग-१

This story is about journey of Vivan in his college life .

प्रस्तावना/ टीप / सूचना -  ही कथामालिका सत्य घटनेवर आधारित आहे. यात काहीजणांचे नाव ओरिजनल आहेत ( त्यांच्या अनुमतीनेच त्यांचं नाव वापरलेला आहे.) आणि काही जणांचे नाव काल्पनिक आहेत . या कथेमधील खूप सारे प्रसंग सत्य आहेत आणि खूप थोडे प्रसंग काल्पनिक आहेत. वाचकाने फक्त या मधील कथेचा आनंद घ्यावा... धन्यवाद ????????????????
********************************

        दिवस पावसाचे होते किंवा म्हणू शकता की जून / जुलैचा महिना चालू होता. दिवस पावसाचे असले तरी विवान जिथे राहतो ( शहर सोलापूर ???? ) , त्या ठिकाणी कमीच पाऊस पडत असतो. बारावीचा वर्ष नुकताच संपला होता. निकाल लागून एक महिना झाला होता. विवान बारावी ज्या कॉलेजमध्ये काढला होता , तिथले विद्यार्थी एक तर इंजिनिअर करत असत किंवा मेडिकल मध्ये जात असतं. मनात असत तर विवानसुद्धा इंजिनिअर करू शकला असता कारण बारावीला त्याला बऱ्यापैकी छानच टक्के होते. पण ' सगळे इंजिनिअर करतात म्हणून मी पण करतो ' असा विचार करणारा तो नव्हता. 

       शेवटी विवान बी. एस सी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजूबाजूच्या कॉलेजमध्ये एडमिशन घेण्यासाठी फॉर्म्स भरला. काही दिवसांनी सगळ्या कॉलेजमध्ये लिस्ट लावण्यात आले. त्याला चांगले टक्के असल्या कारणाने त्याचा नंबर पहिल्याच लिस्टमध्ये आलेला होता. सगळं काही झालं होत. आता फक्त बाकी होती ते म्हणजे एडमिशन घेण्याची..... विवान ठरवला की एडमिशन घ्यायच तर संगमेश्वर कॉलेज मध्ये कारण त्या कॉलेजचे नाव मात्र मोठ होत आणि त्यातल्या त्यात बी. एस सी हा कोर्स तिथे चांगल्या प्रकारे घेण्यात येते असे बाहेरच्या लोकांकडून ऐकण्यात आलेलं होत.

       अडमिशन घेण्याचा दिवस उजाडला.विवान घरात सर्वात लहान असल्या कारणाने त्याला एडमिशन घेण्यासाठी एकटे पाठवण्यात आले नाही. त्याच्या सोबत त्याचा भाऊ एडमिशन घेण्यासाठी आलेला होता. फीच्या काउंटर वर भले मोठी लाईन होती आणि त्यात भर म्हणून काउंटरवरचा व्यक्ती अगदी हळुवारपणे काम करत होता . त्यामुळे तो लाइनच्या शेवटी वाट बघत उभा होता. नवीन कॉलेज , नवीन लोक आणि नवीन वातावरण होता. त्यामुळे तो शांतपणे वातावरण निहारत होता. तेंव्हा त्याला त्याच्या या कॉलेज लाइफमधील पहिला मित्र भेटला ... प्रदीप ..हाईट थोडी लहान होती ,  मोठी दाढी  , शर्ट आणि जीन्स घातलेला.. तो त्याच्याच पुढे लाईनमध्ये उभा होता. तो त्याच्या डोक्याला हात लावत म्हणाला.

प्रदीप -" अरे यांचं तर रोजच झालाय आता.... "

विवान त्याच्याकडे फक्त स्माइल देत होता. परत पुढे हात करून म्हणाला.

प्रदीप -" यार... आता तर सुधरा म्हणावं १२ वीला पण तसच होत.. आता पण तसच...????????.."

इतका वेळ शांत असलेला विवान म्हणाला. 

विवान -" तू या कॉलेजमध्ये होतास ??"

प्रदीप -" वाईट नशीब होत माझं जे इथ एडमिशन घेतल..."

विवान -" का??.. चांगलं शिकवत नाही का इथे??"

प्रदीप -" अरे शिकवतात चांगलं.... हे बघ असले लोक काम करत असल्यावर कसं चालेल.."

    प्रदीप काऊंटरच्या खिडकीकडे हात करत म्हणत होता. त्याच्या या फ्रस्ट्रेशन वरून कळू लागलं होत की ही व्यवस्था किती स्लो होती . 

प्रदीप -" तू पण बी. एस सी मध्ये एडमिशन घेत आहेस??"

विवान -" हो.... "

प्रदीप -" कोणता सब्जेक्ट घेतला ??"

विवान -" फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स ( PCME) ... तुझ?? "

प्रदीप -" PCM... तर आहेच फक्त statistics  आहे .."

विवान -" ओह..."

      असेच गप्पा मारत ते दोघेही काऊंटर जवळ आले  आणि अडमिशन करून झालं . प्रदीप आणि विवान दोघेही थोडावेळ कॉलेज बाबतीत गप्पा मारले ,  फोन नंबर एक्सचेंज  आणि कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटण्याचा प्लॅन ठरला. 

     उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप दिवस घरी राहिल्याने विवान ला कंटाळा आलेला होता. कधी एकदा कॉलेज सुरू होईल अस झाल होत. 

       अखेर कॉलेजचा पहिला दिवस उजाडला. विवान तयार होऊन कॉलेजला पोहचला. खूप सारे नवीन चेहरे दिसतील ... त्यातले काहीजण मित्र होतील .. हे विचार करून तो कॉलेज गेटच्या आता गेला तर काय??.. खूप कमी जण कॉलेजला आलेले होते आणि जे आलेले होते . ते पण इतर कोर्सचे होते. 

      थोडावेळ असच कॉलेजचा कॅम्पस फिरत राहिला. कॉलेज जुना असल्या कारणाने खूप सारे क्लास रूम्स जुने होते. जे काही जण स्टुडंट्स  होते ते पण बी. कॉमचे होते. कारण त्यांचं कॉलेज सकाळी सुरू होत आणि त्या नंतर दुपारी बी. एस सी चे क्लासेस होत . 

      इतका वेळ फिरल्यावर तो एका कट्यावर बसला . तेंव्हा त्याला प्रदिपची आठवण आली. तो खिशातून साधा मोबाईल ( samsung keypad) काढला.... प्रदीपचा नंबर डायल केला . प्रदीपशी बोलल्यावर त्याला कळाल की काही कारणास्तव तो आज कॉलेजला येणार होता . विवानच्या पुढे आता काय करावे हा प्रश्न उभा राहिला होता. 

     तेवढ्यात त्याला पुढे एक डिपार्टमेंट दिसलं , त्याच्या जवळ जाताच त्याला कळाल की हा तर गणिताचा डिपार्टमेंट आहे. बाहेरनूच त्याला एक प्रोफेसर आत काही कामकाज करत असलेले दिसले. 

विवान -" मे आय कम इन सर ?"

प्रोफेसर त्याला बघून म्हणाले. 

प्रोफेसर -" येस... "
  
        विवान त्यांना कॉलेज कधी सुरू होणार ?? हा प्रश्न विचारल्यावर त्याला कळाल की अजुन ३ दिवसानंतर क्लासेस सुरू होणार आहेत. 

       तो त्यांना अजून काही प्रश्न विचारतच होता की तेवढ्यात मागून एक आवाज आला . " मे आय कम इन सर??"

      विवान मागे वळला तर डिपार्टमेंटच्या दरवाजाजवळ एक मुलगी हात पुढे करून प्रोफेसरला आत येण्याची परवानगी मागत होती. एका खांद्यावर साईड बॅग लटकवलेली होती . तिच्या त्या केसांना बघून अस वाटत होत की आताच अंघोळ करून आलीय. कारण , तिचे केस अजुन थोडे ओले वाटत होते. तिचे डोळे काही घारे वैगरे नव्हते , ब्राऊनच डोळे होते . पण , डोळे ब्राऊन असले तरी ती खूप आकर्षक वाटत होती. 

     विवान तिच्याकडेच बघत उभा होता. लव एट फर्स्ट साईट आहे ,  का वयात येणार आकर्षण आहे ? हे माहिती नव्हतं . पण ती फिलिंग वेगळीच होती. तिच्याकडे बघत असतानाच त्याच्या मनात आल की ,'मुली एवढी फॉर्मलिटी का पाळतात?? परवानगी मागत असताना हात पुढे करणं गरजेचं आहे का ??... काहीही असो क्यूट मात्र ती आहे ????????.. '

     ती  डिपार्टमेंटमध्ये आली. ती जशी जवळ आली त्याचवेळेस एक मस्त वास हवेतून दरवळत होता , कदाचित ती ब्रँडेड परफ्यूम लावलेली होती . त्या वासाने त्याचा मान ट्रेनच्या स्पीडने धडकू लागला  . ती सेम तेच प्रश्न विचारली जे विवाननी विचारला होता आणि प्रोफेसरनेसुद्धा तेच उत्तर दिले जे विवानला दिलेलं होत. इकडे मात्र विवान वेगळाच विचार करत होता की , ' असले मुली इथे आहेत?? ,  मग तर मज्जाच मज्जा ????????...' तो मनातल्या मनात खुश होता. तो तिला बघत असताना एकदा तिच्या त्या सुंदर डोळ्यांनी ती त्याला बघितली. त्या क्षणालाच विवानचा मन अजुन जोरात धडकू लागला. सर्वकाही विचारपूस झाल्यावर ती त्याच वेगाने बाहेर गेली ज्या वेगाने ते आत आली होती. विवान मात्र तिच्याच विश्वात हरवून गेला होता आणि त्याची नजर त्याच वेगाने तिच्या मागून जाऊ लागली. न कळता त्याच पाऊल तिच्या मागे जाऊ लागली. 

        पाठलाग करत तो पार्किंगमध्ये पोहचला. ती तिच्या स्कूटी जवळ गेली आणि  स्क्राफ काढून बांधू लागली. तेंव्हाच विवानच्या मनात अजुन एक प्रश्न उत्पन्न झाला की , ' मुली स्कार्फ का घालतात ??.. एवढी तर सुंदर असतात .. ' तो विचार करत असतानाच ती स्कूटी चालवून त्याच्या पुढून गेली. 

      ती जाताच त्याच्या मनात एक वेगळीच एक्सायटमेंट निर्माण झाली. त्याच एक्सायटमेंटमध्ये तो घराकडे जाऊ लागला.....

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

जस मी सांगितल की ही कथामालिका सत्य घटनेवर आधारित आहे , तर वाचून नक्की कळवा की कसं वाटलं . कमेंट करा , शेअर करा ... धन्यवाद ????????????????

             

🎭 Series Post

View all