Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 7

Read Later
घरकोन भाग 7

घरकोन - 7
®©राधिका कुलकर्णी.

रेवा किचनमधे जरा गडबडीतच काम उरकत होती कारण रोजच्या पेक्षा नेमका आज कामाला उशीर झाला होता आणि त्यात एेन वेळी सुशांतने वॉशरूम मधे जाता जाताच आज लवकर निघायचेय असे सांगितले होते.त्यामुळे सगळीच धावपळ होत होती.
तरीही तिने घाईघाईनेच त्याचा ब्रेकफास्ट आणि चहा डायनिंग टेबलवर लावला.
चहा नाष्टा उरके पर्यंत पोळ्या आणि मग लंचबॉक्स तयार अशी मनातल्या मनात कामाची आखणी,जुळवणी करतच ती काम संपवत होती.
सुशांत टेबलवर आला पण लक्ष खाण्यात नव्हतेच त्याचे.कुठेतरी नजर लावून विचार करत टोस्ट सँडविच चिवडणे चालले होते.रेवाने किचन मधुनच हे बघितले आणि म्हणाली
"लक्ष कुठेय सुश?
नाष्टा करत नाहीएस नीट."
कसला एवढा विचार चाललाय?"
काही नाही गं असेच. ऑफिसमधे आज एक खूप इम्पॉरटंट मिटींग आहे.
त्याचाच विचार चाललाय.
"रेवा वेळ असेल तर इथे ये ना,मला तूला काहीतरी सांगायचेय."
"काल रात्रीच सांगणार होतो खर तर पण काल तर तू ....
असोऽऽऽऽ.
 हरकत नाही आता एेक."
"कायऽ बोल,मी ऐकतीय."
नाही इकडे बैस माझ्या जवळ. 
"I wanna share with you something very important."
"हंऽऽ आले,सांग."
काल संध्यकाळी मी चिडलो तुझ्यावर आठवतेय ना." 
"कशी विसरेन?"
"विसरण्या इतकी साधी गोष्ट होती का ती?"
पण त्याचे काय?
तो विषय तर कालच संपला ना!!"
"त्या चिडण्याचे खरे कारण आज सांगतो ऐक."

"तूला लवकर जायचेय म्हणलास ना,मग वेळ आहे का आत्ता?
" नाहीतर आल्यावर बोल."

"हाेउ दे गं.मला त्यात तूझा सल्ला ही हवाय त्यामुळे आत्ताच बोलणे गरजेचे आहे."
"बर मग सांग काय बोलायचेय एवढे?"

"काही नाही गं,तूला तर माहितीय ना की गेले सहा महिने मी एका कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करतोय.
माझी अख्खी टीम ह्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे.
आता आज त्याचा आमच्या कंपनी हेड्स समोर डेमो होणार होता आणि उद्या आमच्या फॉरेन डेलिगेट्सच्या टीमला प्रेझेंटेशन द्यायचे.
ही मीट सहा महिन्या पूर्वीच फिक्स झाली होती.
मला प्रोजेक्ट लीडर केले होते बॉस ने आणि हे प्रेझेंटेशन जर आमच्या फॉरेन डेलिगेट्सनी अप्रुव्ह केले तर मला प्रमोशनवर यु.एस.ला जायचा चान्स मिळणार होता."
"होता म्हणजे??" रेवाने त्याला मधेच काटत विचारले.
"हो ना,तेच सांगतोय एेक तरी पुढे."
आधीचे जॉन सर माझ्या कामावर खूष म्हणून हे प्रोजेक्ट त्यांनी मला हँडल करायला दिले आणि वन वीक बॅक त्यांना माइल्ड हार्ट अॅटॅक अाला त्यामुळे ते सध्या मेडीकल लीव्ह वर घरी आहेत.
त्यांच्या जागी तो आमचा के.के.राव आलाय बॉस म्हणून.त्याला माझा कसला एवढा राग आहे की माझ्या हुशारीवर जळतो,काय माहित,रोज एक नवीन क्विरी काढून उगीचच आमच्या कामात अडथळे आणायचा प्रयत्न करतो पण तरीही आम्ही सर्व काम ऑलमोस्ट डन पोझीशनवर आणलेले असताना अचानक त्याने मला काल केबिन मधे बोलवून सांगीतले की उद्याचे प्रेझेंटेशन गावंडे देईल.
ह्या आधीचे ही प्रोजेक्ट तुम्हीच केले होते तेव्हा आता ह्यावेळी आपण दुसऱ्या कोणाला तरी चान्स देवू.
काय वाटते तुम्हाला मि.सुशांत? तो असे बोलल्यावर मी काय बोलणार.मी फक्त "आेके सर अॅझ यू विश" एवढेच बोललो.
मग म्हणतो कसा मि.गावंडेना तुमचे प्रोजेक्ट डिटेल्स द्या आणि तूम्ही दुसरे क्लाएंट मिटींगसाठीचे पेपर्स रेडी करा.
म्हणजे सहा महिने खपून,राबून काम केले आम्ही आणि त्या अक्कल नसलेल्या निर्बुद्ध माणसाला प्रोजेक्ट लिडर केले,का?तर तो त्याच्या फेव्हर मधला आणि ते दोघे एकाच गावाचे म्हणून.
बर ठिक आहे द्या तुम्ही,पण योग्य पातळीच्या व्यक्तीची तरी निवड करायची ना,पण ह्याला साध्या क्लाएंट मिटींग मधेही धड दोन वाक्य सलग पणे इंग्रजीत बोलता येत नाही त्याला आता फॉरेन डेलिगेट्स समोर प्रेझेंटेशन द्यायची जवाबदारी दिलीय.
" How disgusting and irritating you know."
पण काय करू काहीच समजत नाहीये ग.
तो आमचे हातचे प्रोजेक्ट आणि यु.एस.कंपनी सोबतचे आमचे डिल घालवणार बघ.मला तीच चींता सतावतेय.
मी काय करू ह्या सगळ्यात?
जॉन सरांना झाला प्रकार कळवू का?
काय करू काहीच समजत नाहीये.
तू मला काही सजेस्ट करू शकशील का प्लिज?"
"अॅम टोटली ब्लँक अॅट धीस मोमेंट."
सुश मला काय वाटते तू ना तूझे प्रेझेंटेशन रेडी ठेव.तुझ्या टिमला ही तसेच सांग.
जर ऐनवेळी असे वाटले की तो गावंडे का कोण आहे तो नीट प्रेझेंटेशन देवू शकत नाहीये तर तू स्वत:च आपणहून मधे जावून सरळ सांग की मी हेल्प करतो प्रेझेंटेशनला आणि सगळे  प्रेझेंटेशन तू दे.
"हे बघ भले ही प्रमोशन न मिळो तूला पण कंपनीचे रेप्युटेशन बाहेरच्या लोकांसमोर खराब नाही व्हायला पाहिजे.

"यस तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे."
"मला यु.एस.चा चान्स काय केव्हाही मिळेल पूढे पण कंपनीची इमेज खराब नाही होणार ही काळजी घ्यायला पाहिजे."
"थँक्स रेेवडी माझी."
असे म्हणतच त्याने रेवाचा प्रेमाने गालगुच्चा घेतला."

"आणखीन एक सुश,तू जॉन सरांना ह्यातले काहीच सांगू नकोस."
"एक तर त्यांची तब्येत ठिक नाहीये अशा वेळी त्यांना रेस्ट ची गरज असताना हे सांगून त्यांचा त्रास तू वाढवू नकोस.                         
आणि दुसरे असे की शेवटी कितीही झाले तरी ते दोघे एकाच पोस्टचे आहेत त्यामुळे एका बॉसची अशी चहाडी दुसऱ्या बॉसला करणे एथिकली राँग आहे असे मला वाटते."
"आणि अशा गोष्टी काही लपून रहात नाहीत कोणी ना कोणी ही बातमी त्यांच्या पर्यंत पोहोचवेलच किंबहूना पोहोचली ही असेल एव्हना पण हे सगळे तू सांगितलेस असे के.के.ला वाटले नाही पाहिजे नाहीतर तो खार खाईल तुझ्यावर आणि उगीच जास्तच त्रास देईल मुद्दाम."

"तू शांत रहा.तू जी मेहनत घेतली आहेस त्याचे फळ तूलाच मिळणार नक्की,डोंट वरी."
चल आवर आता.
आधीच खूप वेळ झालाय,निघ लवकर.
आणि आज तरी डबा जेव.
काल सारखा उपाशी नको हं राहूस काय?"
"हो ग.जेवतो, बट थँक्स रेवू! "बघ किती छान सल्ला दिलास."
"म्हणून मला तू हवी असतेस सतत सोबत,कळले ना!"
"बर चल निघतो मी.खूप महत्वाचा दिवस आहे आज."
मला विश नाही करणार का?
यस ऑल द बेस्ट डिअर.
डू युवर बेस्ट.
थँक्स डिअर!
आय डेस्पली नीड युवर
विशेश,.
बाय डार्लिंग सी या.बाय.
यस सावकाश जा.बाय.
म्हणत रेवाने हात हवेत हलवला.
एक हलकासा पुसटसा किस देत सुशांत जवळपास पळालाच.
"लंच अवर्स मधे मला फोन करून कळव रे काय झाले ते."
हो करतो जमल्यास, बायऽऽ."
म्हणतच सुशांतने कार ऑफीसच्या दिशेने सुसाट वेगाने वळवली.
आज पून्हा एका दिव्यातून जायला सुशांत सिद्ध झाला.
रेवाने मनोमन पून्हा देवाचे स्मरण केले सुशातच्या यशासाठी.
दूर दूर दिसेनासा होई पर्यंत ती त्यालाच बघत राहीली.त्याला धीर देवून स्वत: मात्र काळजीच्या डोहात जावून बुडली.......
~~~~~~~~~~~~~~~~~ 
(क्रमश:7)
®©राधिका कुलकर्णी.

-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही?? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..