घरकोन भाग 58

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी.

घरकोन-58
©राधिका कुलकर्णी.

सकाळी सातच्या आसपास सुश घरी परतला.
आई /काकुंनी चौकशी केली.त्यानेही सर्व वृत्तांत एेकवला,मला ऐकु जाईल अशा सुरात.म्हणजे मला वेगळे सांगायची गरज भासु नये.
पटापट आल्या आल्या बॅग अनपॅक करत एक पॅकेट कपाटात ठेवतानाच मी खोलीत प्रवेश केला.मला बघुन तो उगीचच इतका घाबरला की जणु काही मी त्याची कोणती तरी चोरी पकडलीय.
रेवाला त्याच्या सगळ्याच वागण्याचे प्रचंड आश्चर्य वाटत होते.एकतर गावाहुन आल्यावर अशी बॅग पटकन आवरायची असते हे तर त्याला बापजन्मी ठाऊक नाही.तो बॅग फेकुन लोळत पडणार.आणि ऑफीस असेल तर घाईने पळणार.मग ही सगळी कामे मीच करणार हे गृहीतक ठरलेले असायचे.कोणते कपडे धुवायचे हेही त्याला लक्षात नसायचे.मग तेही मीच ठरवायचे.पण आज मात्र आल्या आल्या ज्या घाईने बॅग व्यवस्थित अनपॅक केली गेली होती त्यावरून तर हे पक्के झाले होते की कोणीतरी त्याला ह्या गोष्टी शिकवुन करूवुन घेत होते किंवा मग त्याच्या बॅगला मी हात लावला तर मला काही क्लुज मिळतील जे त्याला नको असेल म्हणुन हे काम घाईने उरकले असावे.
पण दैवाचा कौल प्रमाण मानुन मीही त्याच्या वागण्याकडे पुर्ण दुर्लक्ष करत माझी कामे करत होते.
त्याला चहा देवुन मी काहीच कळले नाही असा अविर्भाव करत तिकडून बाहेर गेले.आतुन मन मात्र तटतट तुटत होते.आपल्याच प्रेमाची,संसाराची होणारी नासाडी मुकपणे बघण्या खेरीज पर्यायही नव्हता.
नेहमी प्रमाणे नैम्यित्यिक उरकत मी त्याचा डबाही पॅक करून टेबलवर ठेवला.ब्रेकफास्ट लावणार तोच सुश रेडी होऊनच बाहेर आला.,"आज एक ईम्पॉर्टंट मिट आहे.मी निघतोय."
"नाष्टा?"
"नको.तिकडे होईलच काहीतरी.
मी निघतो."
अतिशय त्रोटक शब्दात शक्य तितके कमी बोलतच आमचा संवाद घडत होता.
निघता निघता खिशातुन एक डबीसारख्या चोकेनी पसरट आकाराची वस्तु बाहेर काढुन तो कानाशी लावुन बोलत होता.
अरे वाह्!!म्हणजे मला कळु नये म्हणुन आता मोबाईल फोन पण खरेदी करे पर्यंत ह्याची मजल गेली तर...
रेवाच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती.परंतु पुन्हा पुन्हा ती स्वत:लाच सबुरीचा पाठ पढवुन गप्प करत होती.
उद्या लग्नाचा वाढदिवस आमच्या.आणि मला हा काय सरप्राईज देतोय बघा..
मनातल्या विचारांवर ठरवुनही ती अंकुश लावु शकत नव्हती.
फक्त उद्याचा दिवस..मग ती निर्णय घेणार होती.
न्युजपेपर्समधे जॉबसाठीच्या अॅड्स पण बघुन ठेवल्या होत्या.
सुशसाठी जॉब सोडुन घरी बसले नसते तर आज मी ह्याच्या अगोदर यु.एस. ला गेले असते.
मनातल्या मनात सगळी चरफड चाललेली.
लग्नाच्या वाढदिवसाचे कितीतरी केलेले प्लॅन्स आज मात्र लग्नच टिकणार की नाही इथपर्यंत विचार करायची वेळ आली होती.
उद्याचा दिवस कोणते सरप्राईज घेऊन येणार हे फक्त त्या विधात्यालाच माहित होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~(क्रमश:)
घरकोन-58
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही?
आजचा भाग जरा लहानच लिहीला गेलाय चुकुन. मलाही जाणवले पण प्लिज संभाळुन घ्या.लिहिण्याच्या ओघात समजत नाही आणि असे होऊन जाते.त्याबद्दल आधीच सगळ्यांची माफी मागते.
पण तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all