घरकोन भाग 23

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा.

घरकोन -23
®©राधिका कुलकर्णी.

सुशांत चातका सारखी उन्मेशची वाट पहात होता.
तो रेवाशी बोलला असेल का?
त्यांचे काय बोलणे झाले असेल.नेमके रेवाने काय काय सांगीतले असेल? एक ना अनेक प्रश्नांनी सुशांतच्या डोक्यात गर्दी केली होती.उन्मेश आल्या शिवाय ह्या सगळ्याचा खुलासा होणार नव्हता.
म्हणुन सुशांत जास्तच अधीरतेने उन्मेशच्या येण्याची वाट बघत रूमच्या बाहेर फेऱ्या मारत होता.
उन्मेशला येताना बघुन सुशांत घाईघाईने त्याच्यापर्यंत पोहोचला.
"काय रे कुठे होतास इतक्यावेळ?"
"इकडे मी तास झाला तुझी वाट बघतोय,आत्ता येशील मग येशील पण तुझा पत्ताच नाहीऽऽ."
जरासे वैतागातच किंवा मग अति उत्सुकतेपोटी तो बोलत होता.
आता उन्मेशलाही त्याची मस्करी करायचा मुड आला.
"क्यो बेऽऽ इतना क्यु तरस रहा है मेरी याद में?"
"इससे आधा प्यार अगर किसी माशुका पर लुटाते तो वो आज तुम्हारे पास होती।"
"यार नको ना तरसवूस.."
"बोल नाऽऽ काय बोलणे झाले तुमचे?"
"Am really very eager to know."
"सांगतो सांगतो.थोडा दम तर खाऊ दे."
"इतक्या लांबवरून  सायकल मारत तिला घरी सोडून परत आलो,माझे पाय खूप दुखताएत."
"माझी तर साधी चौकशी पण नाही."
"दोस्त दोस्त नाऽऽ रहा...."
उन्मेश पुन्हा फिरकी घेत होता.
सुशांतला हे त्याचे नाटक काही नविन नव्हते पण आज तो मस्करीच्या मुड मधे मुळीच नव्हता.
अगतिक होऊन तो पुन्हा म्हणाला," हवे तर तुझे पाय चेपून देतो पण तु पटकन सांग ना रेवा तुझ्याशी काय बोलली?"
"का माझा अंत पहातोएस तू?"
उन्मेशला मनातल्या मनात हसु आवरत नव्हते.
सुशांतची अगतिकताच त्याचा रेवाबद्दलच्या प्रेमाची साक्ष देत होती.
उन्मेशला नेमके हेच जाणुन घेण्यासाठी तो सुशांतला मुद्दाम सांगण्यात विलंब करत होता.आता त्याची खात्री पटली होती की ह्या दगडामधे प्रेमाचा पाझर फुटलाय.
अरे होऽऽ,घाई काय आहे बोलू ना रात्री.
जेवुन आल्यावर निवांत सांगतो प्रॉमिस.
सुशांतलाही ऐकण्या वाचून दुसरा पर्यायच नसल्यामुळे तो शांतपणे रात्र होण्याची वाट पहात बसला.
तब्येत अजुनही पुर्ण बरी नव्हती.काही गोळ्यांचे डोसेज अजुनही चालू होते त्यामुळे इच्छा नसतानाही त्याला जेवणे गरजेचे होते.
नेहमी प्रमाणे जेवण उरकुन दोघेही रूमवर आले.सगळी मुले आपापल्या कामात, अभ्यास किंवा इतर कामात गुंतलेले होते.
जराशी सामसुम झाल्यावर उन्मेशनेच विषय सुरू केला.
"सुशांत तूला एक विचारू?"
"खरे उत्तर देशील?"
"हो विचार ना."
"मला एक सांग, तुला सायली बद्दल काय वाटते नेमके?"
"कायऽऽऽ?"
सुशांतसाठी हा प्रश्न अनस्पेक्टेड होता.
"हो सायली."
"काय वाटते सायली बद्दल तुला?"
उन्मेशनी पुन्हा प्रश्न रिपीट केला.
"अरे तिच्या बद्दल काय वाटणार मला."
"शी इज जस्ट अ फ्रेंड बस,बाकी काही नाही."
"पण तुला अशी शंका का आली?"
"तिच्या बद्दल काहीच फिलींग्ज नव्हत्या तर मग हॉस्पीटलमधे तु जे काही नाटक केलेस ते का केलेस,तेही रेवासमोर असताना मुद्दामहून?"
"कारण तुझ्या ह्याच वागण्यामुळे रेवा खूप हर्ट झालीय."
"तिला असेच वाटतेय की तू सायलीला पसंत करतोएस म्हणुन रेवासमोर तू मुद्दाम तसे वागलास."
"केवढी रडत होती माहितीय ती."
"तू असा का वागलास यार तिच्याशी?"
"त्यापेक्षा स्पष्टपणे तिला भेटायला येऊ नकोस सांगीतले असतेस तर बरे नसते का झाले."
"तिला असे हर्ट करून, तिचा अपमान करून, तूला नेमके काय सिद्ध करायचे होते मित्रा?"

उन्मेश प्रश्नांची सरबत्ती करत होता.
काही करून सुशांतला बोलते करणे जास्त गरजेचे होते म्हणुनच तो त्याला खरे मनातले बोलायला भाग पाडण्यासाठीच एकावर एक प्रश्न विचारत सुटला होता.
सुशांत शांत झाला होता.
काय सांगावे आणि कुठुन सुरवात करावी ह्याचा तो मनातल्या मनात विचार करत होता.
उन्मेशला माहित नसलेल्या त्या रात्रीचा किस्सा त्याला ऐकवणे आता सुशांतला क्रमप्राप्त होते.
सांगु की नको ह्याचाच विचार करत तो शांत बसला होता.
"काहीतरी तर बोल."
उन्मेशच्या बोलण्याने तो भानावर आला.पण आपल्या दोघांमधली इतकी पर्सनल गोष्ट उन्मेशला शेअर करावी की नाही ह्यावर त्याचे अजुन एकमत होत नव्हते.

सुशांतच्या द्विधा अवस्थेचा उन्मेशला थोडा थोडा अंदाज येत होता.
हा कदाचित हेजीटेट होतोय मला सांगायला.
पण जर त्याची मदत करायची असेल तर कारण जाणणे त्याला गरजेचे होते त्याखेरीज तो दोघांचीही कोणतीच मदत करू शकणार नव्हता.

त्यामुळे उन्मेशने पुन्हा एकदा जोर देवून त्याला विचारले,"अरे सांगतोएस ना की,मी झोपू.?"
मग काहीतरी मनाशी ठरवून सुशांतने उन्मेशला सर्वकाही सांगायचे ठरवले.
"हे बघ,मी तूला सगळे सांगतो पण प्लिज ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील असे वचन दे."
"म्हणजे रेवालाही तू पुढील भविष्यात हे तुला माहितीय असे दाखवायचे नाही असे वचन दे तर सांगतो."
"बापरे बाप!!"
"इतक्या शपथा अँड ऑल!"
"असे नमके घडलेय तरी काय तुमच्यात?"
"साले मै तो तुम्हे बहोत सीधा समझता था मगर तुम तो बडे छुपे रूस्तम निकले मियाँ।"
हसुन उन्मेश सुशांतची पुन्हा खेचत मु़ड हलका करण्याचा प्रयत्न करत होता.
"एऽऽ!!उगीच आपले कल्पनेचे पतंग उडवणे थांबव.तू समजतोस तसले काही नाही घडलेय."
"साले तुम्हा सरड्यांची धाव कुंपणा पर्यंतच,त्याच्यापुढे कधी विचार पोहचतच नाहीत का रे??"
"विचारजंतू साले!!"
उन्मेश हसत होता सुशांतला चिडलेले पाहून पण मग लगेच गंभीर होत म्हणाला,
"अरे यारऽऽ मस्करी केली, किती,चिडतोसऽऽ!!"
"बरऽऽबाबा!!!"
"दिले वचन."
"नाही ओळख दाखवणार."
"आता सांगतोस की अजुन स्टँम्प पेपरवर लिहून देऊ?"
सुशांतने मग त्या रात्री रेवाच्या रूमवर राहील्यावर जे जे घडले ते सर्व कथन केले.
"साले मुझे तो बताया की तेरे किसी रिश्तेदार के पास गया और गया था रेवा के पास।"
"व्हेरी गुड!!"
"अच्छा हुआ जो भी हुआ तेरे साथ।"
"साले दोस्त से झुट बोलेगा तो यही फल मिलेगा।"
"भोग आता आपल्या कर्माची फळे."
उन्मेश मुद्दाम चिडवत होता कारण अशी सुशांतला खेचायची संधी त्याला क्वचितच मिळत होती.
"अरे प्लिज यार सेंटी मारना बंद कर ना तू."
"प्लिज मेरी बात तो पुरी सुन ले फिर जो कोसना है कोस दे। "
"वैसे भी रेवा अब मुझसे बात नही करेगी तो तुम्हारी बददुवा वैसेही लगने वाली है तो फिर क्या फर्क पडता है?"
कोस जीतना कोसना है कोस।
"अरे मै मजाक कर रहा था यार,मै हु ना.तू बोल चल फटाफट."
उन्मेशने पुन्हा एकदा   त्याला आधार दिला .

मग दुसऱ्या दिवशी रेवाशी झालेले सगळे संवाद त्याने उन्मेशला सांगीतले.
मग बोलला की तिला मी खरे तर त्या दिवशी सांगायचे ठरवले होते की मी जे बोललो ते खरेच बोललो होतो की माझे तिच्यावर....... .....पण तीने अशी अॅक्टींग केली की मी काय बोललो हे ती साफ विसरलीय.
मग मला हे जाणुन घ्यायचे होते की तिच्या माझ्या बद्दलच्या नेमक्या काय फिलींग्ज आहेत म्हणुन मी मुद्दाम हॉस्पीटल मधे तसे नाटक केले.तिच्या चेहऱ्यावरची चीड संताप बघुन मला हे तर समजले होते की ती इनसेक्युअर आहे माझ्याबाबतीत पण त्यावर ती माझ्याशी येऊन भांडेल,मला जाब विचारेल असे मी एक्सपेक्ट करत होतो पण टु माय सरप्राईज तिने ह्यातले काहीच न करता मला डिस्चार्ज मिळणार, मी जातोय,माझी तिची पुढे पंधरा दिवस भेट होणार नाही हे माहीत असुनही ती मला त्या दिवशी भेटायलाही नाही आली.
आणि मी कॉलेजला आल्या दिवसापासुन रोज तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे तर ती मला भेटणे,बोलणे टाळतीय यार.
मी तिला कसे समजावू की हे सगळे एक नाटक होते.
सुशांत सुद्धा आता सांगताना थोडा भावूक झाला होता.
हातांनी डोळे पुसतच तो शांत झाला.
इतक्यावेळ शांतपणे ऐकुन घेतल्यावर मग उन्मेशला राहवले नाही.मग तोही बोलला,"तुझी चुक कुठे झाली सांगु?"
"हंऽऽ." सुशांतने फक्त हुंकार दिला.
"जी मुलगी जीवावर उदार होऊन परीणामांची पर्वा न करता रात्री तुला कंपनी म्हणुन बाहेर पडते.तूला तिच्या रूमवर रहायला ठेऊन घेते,तू तिच्याच मनातले आळखू शकला नाहीस की तिच्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत?"
"आणि दुसऱ्या दिवशी स्वत:हुन व्यक्त करायचे सोडून ती मी एेकले नाही म्हणाली म्हणुन तुही काही न बोलता विषय बंद केलास?"
"सुशांत तिला तुझ्या तोंडून एेकायचे असेल की तु तिच्यावर प्रेम करतोस म्हणुन ती तसे बोलली असेल तर तू तिच्याच प्रेमाला परीक्षेला बसवलेस?"
" वर तिचा असा पदोपदी सायली समोर पाणउतारा केलास?"
"काय वाटले असेल तिच्या मनाला तिच्या जागी बसुन बघ म्हणजे तूला कळेल की तू किती मोठा गुन्हा केलाएस असे वागुन."
"सिंपली रिडीक्युलस यार!"

उन्मेशने मनातली सर्व भडास ओकुन त्याला त्याच्या हीन कृत्याची पूर्ण जाणीव करून दिली.
"मला माहितीय उन्मेश मी खूप चुकलोय.पण मी ठरवले होते की लास्ट डे तिला हे सर्व सांगुन की मी नाटक केले वगैरे आणि माझ्या प्रेमाची कबुलीही द्यायचे ठरवले होते पण ती पुर्ण दिवस जाऊन निघायची वेळ झाली तरी आलीच नाही."
"मी ही खूप तरसत होतो रे तिला भेटण्यासाठी पण कदाचित मी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्य मला भोगायचे असेल म्हणुन असे सगळे घडलेय."
"जाऊदे उन्मेश,तू मनाला लावून घेऊ नकोस."
"जे होईल ते होईल.तिला वाटले तर बोलेल नाहीतर नाही.आता हा विषय बंद.
त्यातल्यात तुझ्याशी बोलून तरी मन हलके झाले हेही काही कमी नाही."

सुशांतचे असे निर्वाणीचे बोलणे एेकुन उन्मेशलाही खूप त्रास होत होता.
फक्त गैरसमज आणि आपापसात योग्य संवाद न घडल्याने दोन मने एकमेकांपासुन दुरावली होती ह्याचेच उन्मेशला जास्त वाईट वाटत होते.
निदान त्याला दोन्ही बाजुंचे घटनाक्रम तरी आता कळले होते त्यामुळे आता गरज फक्त त्यांना एकदा एकत्र आणुन त्यांच्यात याेग्य संवाद घडवण्याची होती.
आणि हा भागीरथी प्रयत्नच कसा जमवायचा ह्याचाच विचार उन्मेश
मनाला सतावत होता.

काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल.
मनातल्या मनात विचार करत दोघेही निद्रेच्या आधीन झाले.
आता उद्याचा दिवस नक्की काय घेऊन उगवतोय  हेच पहाणे बाकी होते..
वाट तर पहावीच लागणार होती.
~~~~~~~~~~~~~~~~
घरकोन -23
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all