Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 18

Read Later
घरकोन भाग 18

घरकोन -18
©राधिका कुलकर्णी.

सकाळच्या साडेपाचच्या गझरने रेवाला जाग आली.
बेडवरच उठून सवयीप्रमाणे देवाला हात जोडून नमस्कार करून मगच ती कामाला लागायची त्याप्रमाणे सवयीने सगळे केले पण आज तिच्यात तो उत्साह नव्हता.खूप मलूल,उदास वाटत होते.अंगात थोडी कणकणही वाटत होती.तरी कॉलेजला आज युथ फेस्टीव्हल कमिटी मेंबर्सची मिटींग होती.सलग तीन वर्ष रेवा युथ प्रेसिडेंट म्हणुन काम पहात होती त्यामुळे आज काही झाले तरी कॉलेजला जाणे भागच होते तिला.
पण आज तिने मनाशीच एक निर्धार पक्का केला होता.कितीही कठीण असला तरी तिने एक गोष्ट करायची ठरवली होती.
तिला राहून राहून आज्जीचे एक वाक्य आठवत होते."जो जैसा है उसे उसी हाल पर छोडकर आगे बढने में ही समझदारी होती है।"
त्यामुळे सध्या जर परिस्थितीची मागणी हीच असेल की मी ह्या सगळ्या पासून स्वत:ला एका अंतरावर ठेवावे तर तसेच करणे हिताचे आहे.
जिथे आपली गरज नाही तिथे आपण उगीचच जाऊन आपलीच किंमत कमी करून घेऊ नये.
त्यामुळे आज तिने हॉस्पीटल वाटेवर होते वेळही होता तरी जायचे नाही असे ठरवूनच एक नजर जाताजाता फक्त हॉस्पीटलकडे वळवत,मनातल्या मनात सुशांतच्या तब्यतीची कामना करतच कॉलेजच्या रस्त्याला लागली.
ती थोडी पुढे गेली आणि वाटेतच समोरून सायली येताना दिसली.
सायलीने स्वत:हून रेवाला बघुन गाडी थांबवली.
"भेटून आलीस का सुशांतला?"इति सायली.
"नाही गं.आज माझी युथ कमिटीची मिटींग आहे  लवकर आणि तसेही तू आहेसच की काळजी घ्यायला मग मला आता काळजी करायची काय गरज सांग!!"
तू तिकडेच चाललीएस ना? "
रेवाने विचारले.
"हो.काकू रोज निघताना सकाळी लवकर ये गं असे म्हणतात.मग त्यांचा शब्द मोडवत नाही ग मला.सुशांत साठी नाहीतरी काकुंकरता तरी मला जाणे भागच आहे."
सायली उगीचच काकूंवर ढकलायचा प्रयत्न करत होती.पण मी तिला तरी का दोष देऊ जेव्हा आपलेच नाणे खोटे ठरताना साफ दिसतेय.
मी ही मला समजूनही न समजल्याचा आव आणत तिला हसून दुजोरा दिला.
"बर चल मी निघते मला मिटींगला उशीर होतोय,फक्त तू एक फेव्हर करशील का सायली?"
"यस,टेल मी.." 
काकूंना निरोप देशील की माझी मिटींग होती म्हणुन यायला जमले नाही असा, प्लिजऽऽ??
तिनेही हो म्हणतच एकमेकींना बाय करत आम्ही दोन विरूद्ध दिशांनी आमची गाडी वळवली.आमच्या दिशा खरचच बदलल्या होत्या.
ज्या वाटेवर मी असायला हवी होते आज सायली तिकडे होती.
पून्हा नजर धुसर झाली.पापण्या ओलावल्या.मायेने जोडलेले प्रेमाचे धागे स्वत:च्या हातानेच विस्कटायचे म्हणले की आतडे पिळवटणारच ना."इथे तर मी तन मन धनाने आकंठ त्याची झाले होते.
ही वाट चालायला खूप अवघड जाणार होती रेवाला ह्यात शंकाच नव्हती पण निर्णय घेतल्यावर तो मनापासून पाळायचा जिद्दीपणाही तिच्यात होताच त्यामुळे हे अवघड धनुष्य पेलायची मनाची तयारी तिने केलेलीच होती.
इकडे साडेसात/पावणेआठच्या आसपास रेवा येते ह्या सवयीने सुशांतची नजर रूमच्या दरवाजाकडेच खिळून होती.दारावर टकटक झाली तशी सुशांतला रेवाच आली वाटले पण तिकडे रेवा ऐवजी सायलीला पाहून त्याचे भाव सरकन बदलले पण स्वत:ला पुन्हा सावरत हसुन त्याने सायलीला विश केले.आज त्याच्यात बऱ्यापैकी सुधारणा होती.आज त्याचे कॅथेटर पण काढून टाकले होते त्यामुळे आजपासूून त्याला आता हलका आहारही द्यायची परवानगी डॉक्टरांनी दिली होती.
सायलीला बघून काकुूनीच विचारले,"अगं तुझी मैत्रिण आली नाही आज.रोज ह्याच वेळी येते."
"हो ती वाटेतच भेटली मला."
"तिची आज कॉलेजमधे यूथ कमिटीची मिटींग आहे वाटते म्हणुन ती येऊ शकत नाही असा तिने निरोप दिलाय माझ्याजवळ."
सुशांतला आतुन कळत होते की रेवाने येणे टाळलेय मिटींगचा बहाणा सांगुन.
"काल मी तिला खूप हर्ट केले."
"जरा जास्तच मस्करी केली का तिची?"
"काय करू?"
"ठिक आहे बघु."
"संध्याकाळी तरी येईलच की.."
आज त्याला पुर्ण कॉरीडॉरच्या दोन चकरा मारायला सांगितल्या होत्या डॉक्टरांनी.त्याप्रमाणे सर्व पार पडले.
सायलीही कॉलेजला निघाली.
तेव्हा काकुंनीच सांगीतले "रेवाला सांग होऽऽ मी आठवण केलीय म्हणुन."
सायलीने भेट होताच काकुंचा निरोप दिला.
सुशांतची इम्प्रुव्हमेंट पण सांगीतली.
चला निदान तब्येतीत सुधारणा तर आहे हे ही पुष्कळ आहे.
काय करावे?जाऊ का संध्याकाळी?काकुंचा काय दोष ह्या सगळ्यात?त्यांनी भेटायला बोलावलेय, त्यांचा मान म्हणुन तरी जायलाच हवे."
शेवटी काकूंना भेटायला म्हणुन ती हॉस्पीटलला गेली.काकू खालीच चहा घ्यायला आणि पाय मोकळे करायला म्हणुन खाली आल्या होत्या. बरे झाले काकू इकडेच भेटल्या मनाशीच म्हणत रेवा काकूंपाशी आली.सकाळी का येऊ शकले नाही तेही सांगीतले.सुशांतच्या तब्यतीची जुजबी चौकशी करून हालहवाल विचारला.काकूही खूप मनमोकळे बोलत होत्या.त्यांच्या गप्पा चालूच होत्या इतक्यात सायली पून्हा आली.
"चला ना वर जाऊ ईकडे का बसल्या आहात दोघी?"
"काकू चहा घेत होत्या म्हणुन इकडेच बोलत थांबलो होतो."
"तू जा नाऽऽ वरऽऽ,आम्ही येतोच काकुूचा चहा झाला की."
काही न बोलताच सायली वर गेली.
सुशांतला कळले होते की रेवा आलीय पण ती वरती येईल का ह्याची त्याला शंका होती.तिला कसेही करून वर यायला भाग पाडावे म्हणुन त्याने सायलीला आईला लवकर वर ये असा निरोप द्यायला सांगितले.
सायली बोलवायला गेली.
रेवाने ठरवल्या प्रमाणे काकुूना भेटून निघायचा विचार केला पण काकू तिला आग्रहाने सुशांतला भेटून मग जा असे म्हणल्यावर तिचा नाईलाज झाला.
ती जड पायानेच वर गेली.तिची मुळीच इच्छा नव्हती तरीही तिने औपचारिकता म्हणुन हलकेसे स्मित करून त्याला विश केले.फॉर्मली त्याच्या तब्येतीची चौकशी केली.तिला बघुन ह्याच्यातला अहं पुन्हा जागृत झाला.तिला चिडवण्या करता मुद्दाम त्याने सायलीला सफरचंद चिरून दे अशी रिक्वेस्ट केली.रेवाला सगळे दिसत असुनही ती मन घट्ट करून शांत बसुन राहीली.
सायलीने सफरचंदाचे बारीक काप करून त्याला एक एक हळुहळू भरवायला लागली.रेवाला ते सगळे असह्य होत होते.काहीतरी विचार करत ती झटकन उठली आणि काकूंना मी निघते असे सांगत जायला निघाली.
ती दाराशी पोहोचतेय तोच सुशांतनी तिला आवाज दिला.
पाठमोरी तशीच त्याचा आवाज एेकुन ती आनंदीत झाली.
संयमानेच तीने मागे वळुन काय असे विचारली.
पण सुशांत काही कमी नव्हता हे तिला कळायचे होते अजून.
"रेवा ती खाली पडलेली सफरचंदाची फोड जाता जाता डस्टबीन मधे टाकशील?"
"सायली मला खाऊ घालतीय ना म्हणुन तूला सांगतोय."
संयमाचे सर्व बांध तोडून मोठ्ठा टाहो फोडावा असे तिला त्याक्षणी वाटत होते.
तरीही मनातली सर्व वादळे राग,संतापांला आवर घालत तिने निमुटपणे ती फोड उचलून डस्टबीनमधे टाकली हात वॉशरूममधे साफ केले.
काकू मी निघते,मला उशीर होतोय असे,म्हणतच ती घाईने रूम बाहेर पडली.
हॉस्पीटलच्या बाहेरच एका बाकावर बसुन तिने मनसोक्त मन रिते होईपर्यंत रडून घेतले.
सुशांतचा असा कोणता गुन्हा मी केलाय की त्याने मला आज त्या सायली समोर अपमानीत केले.
ह्याच्या साठी काय काय नाही केले?
हा उपाशी राहिल म्हणुन ह्याला खाऊ घातले.प्रत्येक अ़डचणीच्या प्रसंगात त्याची साथ दिली.
जे कोणतीही     
सर्वसाधारण मुलगी करू शकणार नाही अशा सर्व गोष्टी फक्त ह्याची मदत म्हणुन केल्या.आणि आज हा त्याची कशी परतफेड करतोय तर त्या दिड दमडीच्या पोरी समोर मला कचरा उचलायला लावुन मला खाली दाखवतोय.
नाही,आता बास झाले.आता आपला अजून अपमान नाही करून घ्यायचा.
माझ्याकडून मी सर्वकाही केलेय आता जर रेवा परत हवी असेल तर तूला यायला लागेल माझ्यापाशी.
आता रेवा जैन किस खेत की मुली है ये तुम भी देखोगे।
मनातल्या आपला सर्व संताप व्यक्त करत ती सगळे विष ओकुन मन शांत करू पहात होती.
आज तिच्या संयमाचा अंत पाहीला होता सुशनी.
आज जे रडले ते शेवटचे.आता नाही.
मनाशी पुर्ण निश्चय करतच ती हॉस्पीटलच्या आवारातून बाहेर पडली.
गाडीला किक मारून एकवार बिल्डींगला वरून खालपर्यंत न्याहाळत तिने गाडी स्टार्ट करत घराकडे वळली.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-18)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथाआवडतेय की नाही? 
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.ा

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..