हा पतंग सांगे...
रंगीबेरंगी सुंदर रंग
नाजूक अन हलके अंग
लहानथोर होती दंग
उडविताना उंच पतंग
वाऱ्याला घेऊन सोबतीला
गवसणी घाली आकाशाला
सरसर उंच जाता हा पतंग
उधाण येई आनंदाला
न विसरता भूमीचा संग
किती याची भरारी उत्तुंग
देतसे हीच शिकवण
करी त्याचे अवलंबन
बंधनास करूनि सैल
आवश्यक तो द्यावा ढील
न होता मत्त उगा उन्मत्त
लगाम खेचुनी जपावे शील
योग्य ढील ताण नात्यांना
सुखदुःखात साथ आप्तांना
ओढ एकमेकांची एकमेकांना
करी समृद्ध प्रेमाने नात्यांना
मिळवुनी यश कीर्ती उंच उडा
पण जमिनीशी नाते जोडा
सगेसोयरे मित्र आप्त परिवार
आनंदाचा नित्य भरती घडा
राग द्वेष सारे विसरुनी
मनाला मनाशी जुळवूया
एकाग्र होऊनि कर्तव्याशी
जीवन सुकर आनंदी करूया
© Swati Amol Mudholkar
माझी
"ती चांदणभेट... "
ही कविता सुद्धा वाचा आणि कशी वाटली ते कळवा ...
https://www.irablogging.com/blog/ti-chandanbhet-..._4891
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा