Jan 29, 2022
नारीवादी

स्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...

Read Later
 स्वराज्य आणि स्त्रीसन्मान ...

 

Lock down मुळं सगळ्याच चॅनेल्स वर लोकप्रिय मालिका सलग ३-४ तास दाखवल्या जात आहेत.  त्यातली माझी  स्वतःची आवडती.. 'स्वराज्यरक्षक संभाजी'.....ही मालिका पाहताना छत्रपतींच्या स्वराज्यात स्त्रियांना किती मान सन्मान होता हे  पदोपदी जाणवतं... 

त्यातल्या कालच्या एपिसोड मध्ये एक सीन होता..राणूअक्का यांनी युवराजांसोबत मुघल छावणीत जाऊन कशी खुप मोठी चूक केली आहे हे काही दरबारीं लोक पटवून द्यायचा प्रयत्न करत असतात... गडावर आलेल्या त्यांच्या यजमानांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न करतात... त्यावर राणू अक्कांच्या यजमानांनी दिलेलं सडेतोड उत्तर ऐकून सगळ्यांचीच तोंडं बंद होतात... ते म्हणतात.. "एका बहिणीनं जे करायला हवं तेच त्यांनी केलं... तशीच वेळ आली तर अंगठीत जहर आहे तिच्या... जहर खाऊन जीव देइल पण त्या आधी ५-६ जणांना फाडून खाईल.... वाघीण आहे ती वाघीण.... "
किती तो विश्वास....किती तो सन्मान.... बायको परक्याच्या छावणीत आहे हे  माहित  असताना तिच्याकडून कुठल्याही 'अग्निपरीक्षेची' अपेक्षा न ठेवता तिच्या मागे ठामपणे उभं राहणं.... बायकोला दुसरं काय हवं असतं हो.... अक्खी दुनिया विरोधात झाली तरी चालेल.. पण आपला नवरा आपल्या बाजूनं आहे यासारखं बळ देणारं दुसरं काहीच नसतं या जगात....

दुसरीकडे संभाजीराजे आपल्या पत्नीला येसूबाईंना  'श्री सखी राज्ञी जयंती' संबोधतात...पत्नीचा याहून मोठा सन्मान कुणी केलाय का?....

शत्रूच्या पराभवानंतर त्याच्या सुनेला 'नजराणा' म्हणून महाराजांसमोर पेश केल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली होती ती आज इतक्या वर्षांनंतरही जगात उल्लेखनीय आहे... 

'अशीच आमची आई असती सुंदर रूपवती... आम्हीही सुंदर झालो असतो... वदले छत्रपती.....'

काय बोलावं.... शब्द सुद्धा निशब्द....... 

येसूबाईंना ..... आपल्या सूनबाईला  महाराजांनी  'कुलमुखत्यार' हे मानाचं पद बहाल केलं...मानाची शिक्के कट्यार त्यांच्या स्वाधीन केली....

आपल्या सुनेला  'चुल आणि मुल' यामध्ये अडकवणाऱ्यांनी काहीतरी शिकावं हो यातून... त्या काळात शिवाजी महाराजांनी जे केलं ते या २१ व्या शतकातल्या शिकून सवरून स्वतःला महान समजणाऱ्याला कधीच जमणार नाही का?....  
 

जिजाऊंच्या हाती स्वराज्याची धुरा देऊन स्त्री शक्तीचा सन्मान करणारे शहाजी महाराज....स्त्री शक्तीच्या सन्मानाचे अजून एक ज्वलंत उदाहरण.... 

त्या काळी शिवाजी महाराज,  जिजाऊ यांनी आपल्या लेकी बाळींना,  सुनांना मुलांसारखेच समजुन त्यांना फक्त 'चूल आणि मुल' मध्ये न अडकवता सगळ्याच गोष्टींचं प्रशिक्षण दिलं.... तलवारबाजी.. घोडसवारी...स्वतः जिजाऊ तलवार घेऊन स्वराज्य रक्षणास कायम तत्पर राहायच्या.... आणि आपल्या सुनांकडून सुद्धा हे अपेक्षा ठेवायच्या...

खरंच किती समर्पक आहेत या ओळी... 
आम्ही जिजाऊंच्या मुली 
जशा तलवारीच्या धारा.... 

स्वराज्यात जो मान.... जो सन्मान स्त्री ला मिळायचा,  स्त्री शक्ती चा जो आदर व्हायचा... तो आताही मिळाला तर पुन्हा स्वराज्य निर्माण होईल.... 

तळटीप :-'नथीचा नखरा' यावरून जे वादंग माजलं आहे त्यावरून मला हे लिहावं.. सांगावं वाटलं.... ज्या काही विचित्र -अपमानास्पद कंमेंट्स येत आहेत....त्या कंमेंट्स करणाऱ्या सगळ्यांसाठी एकच सांगेल...स्त्री चा सन्मान करायला शिका...आम्हा बायकांना नकारात्मक गोष्टीत सुद्धा सकारात्मक शोधण्याची... सकारात्मक करण्याची.... एक अलौकिक शक्ती असते... आम्ही रडत बसून परिस्थिती बदलणार नाहीये... पण अशाही परिस्तिथी मध्ये सकारत्मक राहून आम्ही आमचं घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय.. त्यात मदत करता येत नसेल तर कमीतकमी आमच्या प्रयत्नांचा सन्मान तरी करत... शेवटी एकच सांगेल... 

आम्ही जिजाऊंच्या मुली 
जशा तलवारीच्या धारा.. 
ठसक्यात साजरा करू 
आमच्या 'नथीचा नखरा'...

दणक्यात देऊ 
स्त्री शक्ती चा नारा..... 
आवरा जरा तुमचा 
कंमेंट चा पसारा.... 

©®रत्ना

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now