A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e021adcb55309201976f3089c9576aa71f1b9e9f6d1): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

५ मिले सूर मेरा तुम्हारा
Oct 30, 2020
स्पर्धा

५ मिले सूर मेरा तुम्हारा

Read Later
५ मिले सूर मेरा तुम्हारा

“काऽय?”
आता जीभ चावायची वेळ वृंदाची होती. कारण निनाद ब-याच वेळा उशिरा घरी येत असे आणि वृंदा देखील कधी फोन करुन तो कधी येणार हे विचारत नसे.
“मी माझ्यासाठी चहा घेऊन येते.”,असं म्हणून  वृंदाने बोलणं टाळलं.
दोघांनी मग चहा आणि भजी वर मनसोक्त ताव मारला. निनादची नजर तिच्यावरुन हटतंच नव्हती. 
“काय झालेय सांगशील का?”,निनाद ने पुन्हा एकदा न राहवून तिला विचारले.  यावर वृंदा पुन्हा किचन मध्ये गेली. तिला असं जाताना बघून निनाद तिला पाठमोरा बघत राहीला. थोड्याच वेळात हातात एक केक आणि औक्षणाचं ताट घेऊन वृंदा बाहेर आली. तिने केक आणि ताट टिपॉय वर ठेवलं.
“पण  आज तर माझा वाढदिवस नाहीये.”
“हो पण माझा तर आहे ना.”, वृंदा असं म्हणाली आणि निनाद चं लक्ष केक वरच्या नावावर गेलं. त्यावर ‘Happy Birthday Vrunda’ असं white cream ने लिहिलं होतं. Black forest चा तो cake वृंदा ला खुप आवडायचा.
“ओह.. sorry .. I mean Happy Birthday Vrunda.”
“Thank you so much"
“ मला माहीत नव्हतं.. म्हणजे कधी लक्षंच नाही दिलं..sorry.”
“अरे तुच म्हणालास ना की मैत्रीत no sorry no thanks.”
“हो पण काय गं.. तुझा birthday आणि तुच cake आणलास?”
“का? असं कोणी म्हटलंय का की स्वत:च्या बर्थडे चा केक स्वत: आणू नये.”
“हो ते पण  आहेच..”
“बोलण्यातंच वेळ घालवायचा की केक पण  कापायचा?”वृंदा म्हणाली.
“हो पण आधी तुला ओवाळू.”, निनाद हसत हसत म्हणाला. वृंदा देखील मनसोक्त हसली. मग निनाद ने तिला ओवाळलं. वृंदाने केक कापला. 
“तुला द्यायला आता काही नाहीये माझ्याकडे.”
“मी मागितलंय का?”
“असं कसं? तुझं गिफ्ट pending राहीलं माझ्याकडे.”
“बरं ठिक आहे. आता जेवूया आपण.”
वृंदाने मग दोघांची पानं वाढली.
“अरे हे काय? वरण भात, भरले वांगं, भाकरी आणि श्रीखंड.. सगळं तर माझ्या आवडीचं आहे. तुला पण तेच आवडतं का जे मला आवडतं?”
“असं काही नाहीये. पण मला माहीत नव्हतं की मला जे आवडतं ते तुला आवडेल का?”
“हो का? आणि काय आवडतं तुला?”
“आताच सांगायला हवं का?”
“हो मग? It’s your birthday. मला कळायला हवं.”
“बरं. मला आईच्या हातची शेवयाची खीर खुप आवडते. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला खीर बनतेच.”
“अरे..”
“काय झालं अरे करायला?”
“आता तुझ्या आईचे हात कसे आणू मी शेवयाची खीर  करायला?”
“हाऽऽहाऽऽऽ.. त्याची काही गरज नाही. सकाळी येताना आईने माझ्यासाठी खीर केली होती. आणि मी खाऊन आलेय.”
“सुटलो बाबा म्हणजे मी. हाऽहाऽहाऽ.”
दोघेही खळखळून हसले. जेवणे उरकली. वृंदा आणि निनाद दोघांनी मिळून सगळं आवरलं. किचन पूर्ण स्वच्छ झालं. आता झोपायची तयारी म्हणून झोपायला जाणार एवढयात निनाद म्हणाला,”थोडया वेळ गप्पा मारायच्या का?”
“माझ्याही मनात तेच होतं.”,वृंदा म्हणाली.
“अजून काय काय होतं तुझ्या मनात?”,निनाद च्या या प्रश्नावर वृंदा लाजली. त्याची नजर कधीची आपल्यावर खिळलेय हे तिला माहीत होतं.
हिच ती वेळ आणि हाच तो क्षण. आता जास्त वेळ नको वाया घालवायला असं निनाद ला वाटून गेलं. तो हलकेच वृंदा च्या जवळ गेला. तिचा हात हातात घेतला. तिच्या हनुवटीवरून खाली झुकलेला तिचा चेहरा वर ओढला. वृंदाने वर डोळे उघडून बघितलं. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती.
“I LOVE YOU..”, निनादने म्हटलं आणि तिच्या कपाळावर किस केलं. दोघं एकटक एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. आणि वृंदाने त्याच्या कमरेत आपल्या हातांचा विळखा घालून त्याला मिठी मारली. निनादनेही तिला आपल्या बहुपाशात सामावून घेतले. 
बराच वेळ झाला तसे दोघं भानावर आले. आणि पटकन बाजूला झाले. मग एकदम मोठ्याने हसायला लागले. निनादने पुन्हा तिला मिठीत घेतले. मग दोघे hall मध्ये बसुन गप्पा मारू लागले.
“मग काय madam, आज वाढदिवस. सांगा काय सेवा करु आपली?”
“काही सेवा नको. फक्त इकडे माझ्याजवळ बस.”
“हो.”
“एक विचारू का निनाद?”
“हो बोल ना.”
“माझ्यावर इतका राग होता हे मी समजू शकते. पण खरंच माझीच चूक होती का? मी जे केलं ते मुद्दामून नव्हतं केलं रे.”
“खरं सांगू का? मी खुप विचार केलाय यावर. ते वयंच तसं होतं की काय बरोबर काय चूक याचा खोलवर विचार करणं सगळयांना जमतंच असं नाही. चूक होती आमची की आम्ही एका मुलाला त्रास दिला. मान्य. पण खरंच इतकी मोठी होती का की आम्हांला रेस्टीकेट व्हावं लागेल? तू ती गोष्ट थांबवू शकली असती. प्रिंसिपल कडे जाण्याअगोदर याचा तू विचार करायला हवा होता की पुढे आमचं संपुर्ण career आहे. त्यावर काय परिणाम होईल. असं अजिबात समजू नकोस की मी माझं वागणं justify करतोय. ते चुकंच होतं हे आज मी ठामपणे सांगू शकतो. पण तूच विचार करुन सांग, नशीब म्हण किंवा आणखी काही, आम्हांला exam द्यायची permission मिळाली. नाहीतर काय life राहीलं असतं आमचं.”
“तुझं बोलणं पटतंय मला. मी या गोष्टीचा विचार करायला हवा होता. चूक होती तरी त्याची शिक्षा वेगळ्या प्रकारे मिळू शकली असती. ज्यामुळे तुम्हाला समजलं ही असतं की जे तुम्ही करताय ते चूक आहे आणि ज्याप्रकारे तुमचं शेवटचं वर्ष गेलं तसं गेलं नसतं. तुझ्या मनात माझ्याविषयीचा राग इतकी वर्ष साचून राहीला नसता.”
“आता जे झालं ते झालं. हाच विचार करत माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांना मी मुकलो आहे. आता नाही. मला सगळे क्षण भरभरुन जगायचे आहेत. तूही त्याचा आता विचार नको करुस. Okay?”
“हो नाही करणार. मला सुद्धा हेच हवंय.”
“बरीच रात्र झालेय. झोपायचं का?”
“हो.”, असं म्हणून वृंदा बेडरूमच्या दिशेने चालायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की निनाद cot जवळंच उभा आहे. तिने त्याच्याकडे बघितलं.
“अगं माझी फ़ेवरिट उशी घेतोय..चालेल ना…”,असं म्हणून निनाद हसायला लागला. वृंदा लाजुन आत पळाली.
दोघांचा राजाराणी सारखा संसार सुरु झाला. Office मधून आल्यावर दोघं जमेल तितका वेळ सोबत घालवत. 
काही दिवसांनी निनाद वृंदासमोर दोन तिकीटे नाचवत आला. तिला जवळ ओढून म्हणाला, “हे बघ, as I promised, your birthday gift.”
वृंदा ने ते बघितलं. ती म्हैसूर आणि उटी ची दोन तिकिटे होती. एक आठवड्यानंतर जायचं होतं. मग काय दोघांनी जायची तयारी सुरु केली. Weekend ची 3 दिवसांची ती ट्रिप होती. राजे रजवाडे, आणि दुस -या ब-याच ठिकाणांना भेट देत त्यांची ट्रिप मस्त झाली. खरं तर बरीच ठिकाणं बघायची राहिली. कारण सुट्ट्या नव्हत्या. आणि तीन दिवसांत काय काय बघणार. तरी दोघांनी मनसोक्त enjoy  केलं. वृंदा तर खुपंच खुश होती. ट्रिप वरुन परत आले  तरी त्याच आठवणींमध्ये दोघं रमले होते. 
असंच चालू असताना एक दिवस निनादला घरी यायला बराच उशिर झाला. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर धो धो पाऊस सुरु होता. वृंदा जेवण बनवून पुस्तक वाचत बसली होती. तरीही तिचं लक्ष सगळं घड्याळाकडे होतं. निनादने फोन करुन उशिर होणार असल्याचं कळवलं होतं. त्यामुळे तिची बरीच चिंता कमी झाली होती. तरीही काळजी होतीच. इतक्यात तिचा फोन वाजला. Unknown नंबर होता.
“Hello  कोण बोलतंय?”,वृंदाने असं विचारल्यावर पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. तिने फोन ठेवून दिला.
असं ४-५ वेळेला झालं. पुन्हा रिंग वाजली. आता मात्र वृंदाने सरळ झापायला सुरवात केली.
“बोलायचं नसतं तर फोन का करता? कळत नाही का काही…”
“अगं थांब थांब. मी बोलतोय निनाद. काय झालं इतकं ओरडायला…”
वृंदाने मोबाइल वरचं नाव बघितलं. निनादचं नाव वाचून तिला बरं वाटलं.
“काही नाही रे. कोणी तरी कॉल करत होतं. पण बोलत नव्हतं. म्हणून… तू बोल..”
“निघतोय आता मी ऑफिस मधून.. तू जेवून घे…”
“नाही मी थांबते..”