"ते कसं?"
"मी कमवायला लागले तेव्हापासून सेविंग करतेय..आता बऱ्यापैकी पैसे जमले की डाऊन पेमेंट करून घर बुक करेन..बाकी लोन काढून हफ्ते भरेन..ए पण तू गैरसमज करून घेऊ नको हा..मी हे घर आपल्यासाठी नाही घेत आहे..ते फक्त माझ्या समाधानासाठी.. हवं तर भाड्याने देईन मी.."
रोहन तिचं ऐकत असतांना त्याचा चेहरा पडलेला..तिच्या ते लक्षात आलं..
"काय रे रोहन? काय झालं? तुला आवडलं नाही का हे?"
रोहन भानावर आला,
"अगं तसं नाही.."
"मग इतका वेळ मी सगळं बोलतेय, काहीतरी प्रतिक्रिया दे की.."
"खूप चांगलं झालं..चांगलंच होईल पुढेही.." हाताची घडी घट्ट करून तो स्वतःलाच समजवत होता..
"रोहन मला खरं सांग, काय झालंय?"
"ठीक आहे...सांगतो.. पण ऐकल्यावर तू मला सोडुन जाशील हे नक्की.."
"असं काय आहे नक्की?" राधा घाबरली..
"माझ्या आईला नोकरी करणारी सून नकोय..अशी एकच अट तिने टाकलीये.."
राधा शांतच झाली, तिने वर पाहिलं...तिला काही सुचेना, काय बोलावं? शेवटी रोहनच धीर करून म्हणतो,
"हे बघ, मला माहितीये तू लग्नाला नकार देशील हे ऐकून..पण एक लक्षात ठेव, जर मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर आयुष्यभर अविवाहित राहील.."
राधा डोक्याला हात लावते, जवळजवळ चिडतेच..
"रोहन हा काय वेडेपणा आहे..आणि ठीक आहे तुझ्या आईची असतील काही मतं.. पण तिला तू समजावू शकत नाहीस का? आपल्या प्रेमासाठी एवढंही करू शकत नाही का? आणि तुझ्या वडिलांचं काय म्हणणं आहे?"
"मी कमी प्रयत्न केला असेल का राधा..पण आईला अगदी जापनीज मुलगीही चालेल पण नोकरीवाली नको.."
"कठीण आहे.."
"आईच्या या मताला काहीतरी कारण आहे, तिच्या आतेबहिणीच्या बाबतीत एक खूप वाईट घटना घडलेली..ती नोमरी करत होती.. एके दिवशी तिला तिच्या मुलाला शाळेत घ्यायला जायला उशीर झाला, मुलगा गेटवरच रडत होता..आई योगायोगाने तिथूनच जात होती..तिने पाहिलं, त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याचं रडणं, त्याचं कासावीस होणं सगळं आईच्या मनात कोरलं गेलं..अतेबहिणीला तिने चांगलंच सुनावलं..आणि तिनेही ठरवलं, की आपल्या नातवांची अशी हेळसांड होऊ देणार नाही.."
*****
*****
राधा विचारात पडते,
"त्यांना तसं वाटणं साहजिकच आहे, पण..."
"मी काय म्हणतो, तू चांगला मुलगा बघ आणि लग्न कर.."
"तेच करायचं असतं तर कधीच केलं असतं.."
असं म्हणत राधा तिथून तावतावात निघून जाते. दोन दिवस दोघांमध्ये काहीही बोलणं होत नाही.
तिसऱ्या दिवशी तिचा मेसेज येतो,
"मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, काहीतरी मार्ग काढ.."
रोहनचीही तीच परिस्थिती होती..आता त्यालाच यातून मार्ग काढावा लागणार होता. तो आईजवळ जातो आणि आईला राधाबद्दल सगळं खरं सांगतो..
"अजिबात चालणार नाही.."
आईला समजवण्यात अर्थ नव्हता. काही वेळाने राधाचा फोन आला,
"काय बोलणं झालं तुमचं? काय म्हणाल्या तुमच्या आई?"
राधाचं ते उतावीळ होणं रोहनला पहावलं गेलं नाही, तो घाईघाईने बोलून गेला..
"आईने मान्य केलं.."
राधा आनंदाने नाचू लागली, इकडे रोहनला आपण काय बोलून बसलो याचं भान आलं,पण ते वाक्य सुधारायचं म्हणजे राधाच्या सगळ्या आशा आकांक्षांना सुरुंग लावण्यासारखं होणार होतं.
रोहन गप बसला. आता जे होईल ते होईल !
दोघांचं थाटामाटात लग्न झालं, रोहनने काळजी घेतली की लग्नाआधी दोघींचं या विषयावर बोलणं होणार नाही म्हणून. लग्न करून राधा घरी आली. सुट्ट्या संपल्या आणि आठ दिवसांनी ती सकाळी 7 ला नोकरीवर निघून गेली.
सासूबाईंनी आवाज दिला पण राधा त्यांना दिसेना, त्यांनी रोहनला विचारलं..
"अरे राधा कुठेय?"
"जॉब असतो तिचा सकाळी.."
आई चा bp वाढला..तिचा प्रचंड संताप झाला..ती आदळआपट करू लागली..रोहनने आईला शांत केलं आणि म्हणाला,
"आई, ऐक.. तू लहान लेकराची फरफट होऊ नये म्हणून नोकरी नको म्हणत होतीस ना? मग त्याला अजून अवकाश आहे, मूल झालं की ती स्वतः नोकरी सोडेल.."
*****
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा