Jan 26, 2022
नारीवादी

स्वाभिमान-स्त्रिचा खरा दागिना...!

Read Later
स्वाभिमान-स्त्रिचा खरा दागिना...!

   ह्या लेखातुन मी एक स्त्री म्हणुन महिलांना स्वाभिमान म्हणजे काय? हे सांगत आहे.यात मी कोणा सासू वा सासरवाडीला दोष देत नाही आहे तसेच प्रत्येक पुरूषाला उद्देशून हे लेख लिहित नाही आहे.आपल्या आजुबाजुला असलेल्या त्या पुरूषासाठी हे लेख आहे जे बोलतात की दररोज मार खाऊनही स्त्रीने ते अत्याचार सहन करत आपल्या नवर्याची आयुष्यभर गुलामी करत राहावे.

      स्वाभिमान म्हणजे आपण करत असलेल्या कार्यात आपले असलेले महत्तव ओळखणे होय.माझा स्वाभिमान म्हणजे माझे लेखन होय.तसेच प्रत्येक स्त्रिचे स्वाभिमान वेगवेगळ्या कामाविषयी असु शकते. जसे की, शिक्षिका,परिचारिका, डाँक्टर इत्यादी होय.

     काही स्त्रियांना आपल्या नवर्याविषयी स्वाभिमान असतो.परंतु तो नवरा आपल्या बायकोला पायातली चप्पल अशी उपमा देतो.हव तश्या बदलायला.तर बायको त्याला आपल्या गळ्यातील अमुल्य असे दागिना म्हणजे मंगळसुत्र समझते.

    पुरुषाला वाटते पहिली चप्पल खुप जुनी झाली. ती आपल्या पायांना शोभत नाही.आपण आता नविन चमचमीत चप्पल घ्यावी. पुरूषाला हे समझत नाही कि हिच ति चप्पल आहे जिने आपली पावलोपावली साथ दिली आहे.तिनेच आपल्या पायांचे दगड माती पाण्यापासून संरक्षण केले आहे.त्याच्या पायी तुडवुन झिजुन ति स्वतःला धन्य समझत असते.दुसरी चप्पल आणल्यावर ति त्याच्या पायाला जखम करते.ते सगळ सहन करूनदेखील तो ति चप्पल वापरत असतो.परंतु काही दिवशातच त्याला आपल्या जुन्या चप्पलची आठवण होते.तो दुसरी चप्पल सोडुन जुनीच चप्पल वापरतो.

    स्त्रिया आपल्या मंगळसुत्राची खुप काळजी घेतात.त्याला कुठेही अडकु देत नाहीत.तसेच त्याचा दोरा तूटु देत नाहीत.जरी दोरा तुटलाच तर त्याला नविन दोर्यात पुरवुन घेतात.

   काही पुरूष आपल्या बायकोला डोक्याचे मुकुट समझतात.परंतु गंमत अशी कि मुकुटाला नेहमी डोक्याची गरज असते.मात्र पुरूष ते मुकुट चोविस तास डोक्यावर ठेवू शकत नाही. त्या मुकुटाला तेव्हाच महत्तव येते जेव्हा त्याला डोक्यावर ठेवले जाते.

   समाजात नवर्याला सोडुन आलेली किंवा नवर्याने सोडलेली मुलगी म्हणजे अयोग्य बायको,सुन होय. त्यांना कधीच तिचे दुख कळत नाही.ती जेव्हा माहेरी येते तेव्हा ती स्वतःला कमनशिबी समजु लागते.ह्या घटनेने तिचा स्वाभिमान दुखावला गेलेला असतो.

   एखाद्या फुलाच्या झाडाला नविन कळ्या येतात त्या फुलतात मग कोमेजुन खाली गळुन पडतात परंतु ते त्या फुलाचे अंत नसते.ती कळी परत एकदा नव्याने फुलते बहरते.हेच गुणधर्म स्त्रियानी आपल्या अंगी आणावे.स्वतःला कमी समझु नये.परत एकदा स्वतःच्या जिवनाच्या रथाला स्वाभिमान नावाचे चाके लावावीत.स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन पुढिल वाढचाल केली पाहिजे.

काही चुकीच लिहिल्यास माफी मागते.लेखात चुका झाल्यास क्षमस्व....!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reena Pawar

Simple is beatiful