Login

संकेत भाग सोळा.

कथा मालिका

संकेत भाग सोळा. 


आता शाल्मली आणि सदानंद च्या संसाराचे गाडे सुरळीत सुरू झालेले असते. जे काही घडलं ते शाल्मली ने स्वीकारलेले असते आणि ती खुश असल्यामुळे सदानंद पण आनंदी असतो. दरम्यान एकदा शाल्मलीचे आई बाबा तिला येऊन भेटून जातात. सदानंद चे शेत पाहतात. सदानंद ने शेतात घेतलेली मेहनत बघून शाल्मली चे बाबा खुश होतात. सूर्यकांत राव सदानंद साठी एक नोकरीची ऑफर घेऊन येतात. गावापासून कंपनी जवळच असल्याने सदानंद पण आनंदाने नोकरी स्वीकारतो. खरतर या नोकरीसाठी सदानंद ने ही प्रयत्न केलेले असतात पण त्याला ती नोकरी मिळत नाही. त्यामुळे सूर्यकांत रावांना तो म्हणतो, बरं झालं तुम्ही माझ्या नोकरीसाठी शब्द टाकला नाहीतर मी आशाच सोडली होती. शाल्मलीचा छोटा च पण सुखी संसार पाहून सूर्यकांत राव मनापासून खुश झालेले असतात. 


आज आपली सासू घरात नव्हती ते बरं झालं नाहीतर आई बाबा समोर त्या काहीतरी बोलल्या असत्या आणि बाबा पुन्हा दुखावले गेले असते या विचाराने शाल्मली कृष्णाचे आभार मानत असते. तिच्या रूम मध्ये ही तिने एक सुंदर राधा कृष्णाची मूर्ती आणलेली असते आणि त्याच्याकडे पाहूनच ती बोलत असते. तेवढ्यात तिथे सदानंद येतो आणि म्हणतो शालू काय कोणाशी बोलत आहेस ?? माझ्या कृष्णाशी आणि कोणाशी ?? शाल्मली म्हणते. त्यावर सदानंद म्हणतो, अरे वा तू मूर्ती खूप सुंदर आणलीस शालू पण नेहमी याच्याशी तू असच बोलतेस का ?? आणि का आणलीस तू मूर्ती काही खास कारण ?? हो तर ही मूर्ती बेडरूम मध्ये असेल तर नवरा बायकोचे प्रेम वाढत जाते असे म्हणतात म्हणून आणली. सदानंद तिला मागून मिठीत घेतो आणि म्हणतो, म्हणजे आपल्या दोघातील प्रेम वाढावे म्हणून तू आणलीस ही मूर्ती हो ना. तशी शाल्मली लाजून खाली मान घालते आणि सदानंद तिला घट्ट मिठीत घेतो. तो म्हणतो, शालू पहिल्याच नजरेत तू मला खूपच आवडली होतीस. तेंव्हापासून तुला जवळ घेण्याची खूप प्रेम करण्याची सुप्त इच्छा मनात होती. आज ती थोडीफार पूर्ण होत आहे. तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहेस ना ?? यावर शाल्मली काहीच उत्तर देत नाही फक्त खाली मान घालून हसते, सदानंद तिला आपल्याकडे वळवतो, तिची हनुवटी पकडुन तिचा चेहरा वर करतो आणि डोळ्यांनीच पुन्हा विचारतो तशी शाल्मली लाजून स्वतःचे तोंड त्याच्या कुशीत लपवते आणि सदानंद हसून तिला मिठीत घेतो. 


हलकेच तिचा चेहरा वरती करतो आणि तिच्या नाजुक ओठांवर स्वतःचे ओठ टेकवतो. त्या रात्री दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून जातात. सदानंद ची इतक्या दिवसांची प्रतीक्षा संपलेली असते.


आता शाल्मली आणि सदानंद मधील सगळेच अंतर मिटलेले असते आणि त्यामुळे दोघेही खूप खुश असतात. आता दोघे फिरायला जात असतात, हसत खेळत वेळ एकत्र घालवत असतात. सदानंद रोज नोकरीसाठी तिथून आल्यावर थोडा वेळ शेतात आणि उरलेला सगळा वेळ शाल्मली साठी ठेवत असे. सदानंद कामाला गेल्यावर घरातली सगळी कामं शाल्मली आटपत असे. सगळे सुरळीत चालू होते पण अजूनही सदानंद च्या आईने शाल्मली ला सून म्हणून स्वीकारलेले नसल्याने ती जरा उदास असते.


एकदा शाल्मली पुस्तक वाचत बसलेली असते तेंव्हा तिची सासू तिच्या खोलीत येते आणि म्हणते झालं, सकाळची चार काम करायची आणि नवरा आला की दात काढत बसा यच इतकचं माहिती तुला. आपल्याला सासू आहे हे विसरलीस का ?? शाल्मली म्हणते नाही ओ आई, अस काहीच नाही तुम्ही च माझ्याशी काही बोलत नाही, स्वतःचे काम स्वतःच करता मग मी तरी काय करणार ?? बरं बरं फार बोलू नको, मला भूक लागली आहे काहीतरी खायला कर तिची सासू म्हणते. काय करू सांगा मी लगेच करून देते म्हणून शाल्मली किचन मध्ये येते. तिच्या मागे तिची सासू पण येते आणि म्हणते मला पोहे खायचे आहेत करून दे. शाल्मली लगेच पोहे करायला घेते, तिची सासू तिच्याकडेच एकटक बघत असते पण तिची नजर शाल्मली ला खूप खटकते. कारण तिची सासू तिच्या शरीराचा एक एक अवयव अगदी बारकाईने न्याहाळत असते. जणू काही एखादा टपोरी मुलगा जसा मुलींकडे बघतात तसेच त्याही बघत असतात. पण शाल्मली काहीच न बोलता पटकन पोहे करायला लागते कारण एकतर लग्नानंतर इतक्या दिवसांनी सासू बाईंनी काहीतरी खायला मागितले ले असते त्यात उगाच त्या चिडा यला नको त्यापेक्षा पटकन पोहे देऊन मोकळे होण्याचा विचार करते शाल्मली. पण अजूनही तिच्या सासूची नजर हट लेली नसते. त्या दोन पाऊले टाकून शाल्मली कडे येतात आणि स्वतःचे तोंड शाल्मली कडे झुकवत तिला विचारतात तू स्वतःला सद्याच्या हातात सोपवले ल दिसतंय, हो ना ?? त्या प्रश्नाने शाल्मली आवाक होऊन त्यांच्याकडे बघते तशा त्या म्हणतात आरशात बघितलस का स्वतःच थोबाड ?? किती चमकायलाय ते ?? आणि तुझे ही छाती किती वर आलीय अजुनच ?? असे म्हणत त्या हसायला लागतात खी खीं करत मोठ्याने. तशी शाल्मली रडायला लागते. त्या स्वतः एक स्त्री असून एखाद्या स्त्री बद्दल अशा प्रकारे कशा बोलू शकतात याचे तिला नवल वाटते. तिची सासू तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते अग मी तुझ्या वयाची असल्या पासून गावातल्या बायकांची बाळंत पण केली आहेत. त्यामुळे मला चांगलच कळतं बायकत झालेले बदल असे म्हणत ती पुन्हा हसायला लागते आणि शाल्मली चे दाट लांब केस जोरात ओढते. बिचारी शाल्मली कळवळत ओरडते तसे पोह्यातील उलथने काढून तिची सासू तिच्या हातावर ठेवते. बिचारी शाल्मली खूप ओरडते तशी तिची सासू पुन्हा मोठ्याने हसायला लागते. तिच्या सासूचे भयानक रूप बघून शाल्मली घाबरते आणि कृष्णाचा धावा सुरू करते. तिची सासू तिला ओढत तिच्या खोलीत नेते आणि बेडवर ढकलून देते. हे काय चालू आहे ते शाल्मली च्या काही लक्षात येत नाही. तुम्ही असे का करताय म्हणून ती तिच्या सासूला विचारते तेवढ्यात तिथे सदानंद येतो. सदानंद ला पाहून शाल्मली पटकन त्याला मिठी मारते आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगते. सदानंद त्याच्या आईकडे बघतो आणि आता दोघेही मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. ते पाहून शाल्मली बाजूला होते,हे काहीतरी भयंकर असल्याचे तिच्या लक्षात येते. ती जरा मागे सरकते तसे सदानंद आणि त्याची आई पुढे पुढे सरकायला लागतात आणि मागे बेड असल्यामुळे शाल्मली बेडवर पडते. सदानंद च्या अशा वागण्याचा शाल्मली ला खूप जास्त धक्का बसलेला असतो. एका क्षणी ज्याने जीवन सावरले आज त्यानेच त्यावर घाव कसा घातला याचाच ती विचार करत आसते. सदानंद तिला बेड वरून उठवतो आणि म्हणतो, काय शालू बरेच प्रश्न आहेत ना मनात ?? मी त्याची उत्तरे तुला देणारच आहे पण त्या आधी जरा मला तुझ्यावर प्रेम तर करुदे. सदानंद च्या या बोलण्यावर शाल्मली चे डोळे विस्फारले जातात. ती हात जोडून त्याला म्हणते हे बघ सदानंद तू असा का वागतोस ते मला माहित नाही, माज काही चुकलं असेल तर खरंच मी तुझी माफी मागते. मी तुला मारले होते त्याचा बदला तू घेत आहेस का ?? हवतार तू ही मला मार, तुझे शरीरावर चे घाव मी सहन करेन पण पुन्हा माझ्या मनाशी खेळू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघुन जायाला तयार आहे पण असं करू नकोस. मी तुझी बायको आहे आणि तो अधिकार मी स्वखुशीने तुला दिला आहे मग ही जबरदस्ती करू नकोस. 


तिच्या बोलण्यावर सदानंद आणि त्याची आई मोठमोठ्याने हसायला लागतात. तशी शाल्मली कृष्णाचा धावा करायला लागते. त्याच खोलीत तिच्यात आणि सदानंदमधील प्रेम वाढावे म्हणून लावलेला फोटो ती केविलवाण्या नजरेने पहात असते. तिची सासू पुन्हा दात ओठ खात तिचे केस ओढत म्हणते माझ्या मुलावर हात उगरण्याची हिम्मत करून तू तुझ्या मृत्युला आमंत्रण दिलंय पोरी. पण मरणाची भीक मागशील इतका त्रास देणार आहोत आम्ही तुला. तेवढ्यात सदानंद तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठावर स्वतःचे ओठ टेकत खूप आवेशाने तिचे दीर्घ चुंबन घेतो. त्याची आई तुसडेपणाने हसत हे बघत रहाते तर बिचाऱ्या शाल्मलीच्या बंद डोळ्यातून आसवे गळत असतात. सदानंद त्याच समाधान झाल्यावर तिला बेडवर ढकलतो आणि कपाटवर असलेली पेटी तिच्या समोर ठेवत म्हणतो उघड ही पेटी आणि बघ तुझ्या बापाने माझ्या बापा सोबत काय काय केलं आहे ?? 


शाल्मली ती पेटी उघडते तर त्यात एक फोटो असतो आणि काही पेपर पडलेले असतात. ती पेपर बघते त्यावर सदानंदच्या वडिलांची मृत्यूची बातमी असते. सूर्यकांत साबळे यांच्या भीतीने हनुमंत देशमुख यांची आत्महत्या. सदानंद सगळे पेपर आणि त्याच्या वडिलांचा फोटो शाल्मलीला दाखवत असतो. ही आत्महत्या नव्हती खूण होता खूण जो तुझ्या बापाने केला होता माझ्या बापाचा. मी तेंव्हा फक्त आठ वर्षांचा होतो. माझे बाबा तुझ्या बापाचे डावा हात होते. कोणतेही काम माझ्या बाबांना विश्वासात घेऊनच करत होता तुझा बाप. तुझ्या बापाने कारखान्याच्या कामात अफरातफर केल्यामुळे त्याला जेल मध्ये जावं लागणार होत पण तो आळ माझ्या बापाने स्वतःवर घेतला आणि दोन वर्षे खडी फोडायला गेला. कारण माझे बाबा तुझ्या बापाला देव मानत होते. खडी फोडून आल्यावर समाज त्यांना जगू देईना. सगळे त्यांच्याकडे अपराधी आल्यासारखे बघत. तेंव्हा तुझ्या बापाकडे मदत मागितली होती माझ्या बाबाने पण त्याने मदत करायला नकार दिला हाच धक्का माझा बाप पचवू शकला नाही आणि यामुळेच त्याने विहिरीत उडी मारून जीव दिला. या प्रकरणात माझी आई तुझ्या बापाकडे गेली आणि धाय मोकलून रडली पण त्याही वेळी तुझ्या बापाने तिला धक्के मारून हाकलून दिले. तेंव्हाच मी ठरवलं आता तुझ्या बापाचा सुड घ्यायचा आणि असा घ्यायचा ज्याची किंमत त्याला आयुष्यभर चुकवावी लागेल. म्हणूनच मी तुला भेटलो आणि तुझ्यावर प्रेम होत म्हणून तुझ्याकडे बघत नव्हतो तर आज ना उद्या तुला सुतला लावून तुला बर्बाद झालेलं स्वप्न बघत होतो. मी तुला बर्बाद केलं म्हणजे तुझ्या बापाला बर्बाद केलं आता मी मेलो तरी समाधानाने मरल शाले. बघ सगळं नीट. 


माझे बाबा असे वागलेत यावर माझा विश्वास बसत नाही आणि जरी ते असं वागले असले तर त्यांच्या चुकीची शिक्षा तू मला का दिलीस शाल्मली म्हणाली. कारण तुझ्या बापाचा गुरुर होतीस तू, तुझ्यात त्यांचा जीव अडकला आहे हे मला माहीत होतं. जेंव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास होताना माणूस बघतो ना तेंव्हाच तो जीवंत पणी मरण यातना भोगत असतो आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. माझा बाप माझा जीव की प्राण होता त्याला मेलेला बघून मी कसा जगलो माज मलाच माहीत. त्याच यातना तुझ्या बापाला मला द्यायच्या होत्या आणि तेच मी केलं. शाल्मली धाय मोकलून रडायला लागली, गुडघ्यावर डोकं टेकून ती सतत रडत होती आणि सदानंद आणि त्याची आई हसत होते. त्याची आई जाताना म्हणाली, सद्या घाल शेवटचा वार आणि हो मोकळा आणि तिने दार बंद केले. आता मात्र शाल्मली पुरती कोलमडून गेली. आता काय होणार या विचाराने तिचे शरीर थंड पडले. 


सदानंद तिच्या बेडवर बसून हसायला लागला तिने उठून पळण्याचा निरर्थक प्रयत्न केला पण सदानंदने तिला घट्ट आवळून घेतले. ती हात जोडून गयावया करू लागली पण आता सदानंद ला तिची दया येणे शक्यच नव्हते त्यामुळे कृष्णाचा धावा निरर्थक ठरला. सदानंदने तिला झोपवले आणि तिच्या अंगावर झोपून त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवले, शाल्मली नको नको म्हणत होती तरीही सदानंद ऐकत नव्हता, तो पूर्णपणे तिच्या अंगावर झोपल्याने तिला हलतही येत नव्हते. त्याने तीचा पदर बाजूला केला आणि स्वतःची भूक हवी तशी हव्या त्या प्रकारे भागवून घेतली. त्यात तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या आणि मनाच्या जखमांची गणतीच नव्हती.


क्रमशः

🎭 Series Post

View all