Login

संकेत भाग चौदा

कथा मालिका


संकेत भाग चौदा.


मंगत आता त्वेषाने शाल्मलीकडे पहात होता, त्याने तिच्या ओठांवरचा हात काढला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवण्यासाठी तिच्या अजुनच जवळ आला, शाल्मलीने डोळे घट्ट मिटून घेतले आणि हातांच्या मुठी आवळल्या. मंगत पुढे येणार तोच त्याच्या पाठीवर कोणीतरी घाव घातला होता आणि तो वेदनेने विव्हळल होता. शाल्मलीने डोळे उघडून पाहिले तर तो सदानंद होता. सदानंद खूपच रागाने लाल झाला होता. एकामागून एक असे वार तो मंगतवर करतच राहिला. मंगत आता बेशुध्द पडला होता. सदानंदने त्याच्या हातातील काठी तिथेच फेकली आणि शाल्मलीकडे पाहिले. तिची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी तरळले पण अगदी क्षणभर. त्याने स्वतःला सावरले आणि पटकन तिचे हात पाय मोकळे केले. ती सदानंदकडे बघतच होती, मनातल्या मनात कृष्णाचे आणि सदानंदचे आभार मानत होती. सदानंदने तिच्या तोंडातील कापडाचे बोळे काढले आणि तिच्याकडे पाहिले, तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता आणि त्याला सांगत होता आज तू आला नसतास तर माझे काय झाले असते कोणास ठाऊक ?? तू आज जी मदत केलीस त्याचे उपकार कसे फेडू ?? तिने साशृत नयनांनी सदानंदल खूप घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला तितक्याच आवेगाने मिठीत घेतले होते. आज त्याचे अश्रू तो थांबवू शकत नव्हता. त्याने स्वतःचे डोळे पुसत तिला उठवले तिचा पदर नीट केला तेवढ्यात तिथे शेखर आणि सूर्यकांतराव पण आले. खाली पडलेल्या मंगतकडे आणि सदानंदकडे पाहून सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सदानंदने मंगतल इतके मारले होते की आयुष्यात तो पुन्हा उठू शकेल की नाही सांगता येत नव्हते. शाल्मली पटकन सूर्यकांत रावांच्या कुशीत शिरून रडत होती.


आता सगळे त्या वाड्यातून बाहेर येऊन शेखरच्या मित्राकडे थांबले होते. शाल्मली अजूनही सावरली नव्हती. घडलेला प्रकार इतका अनपेक्षित आणि भयंकर होता की त्याचा धसका फक्त शाल्मलीलाच नव्हे तर सूर्यकांतरवांनही बसला होता. शेखर दोघानाही सावरत होता. सदानंद सूर्यकांतरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला तुमच्या मुलीसोबत काहीही चुकीचे घडलेले नाही मंगतने शाल्मलील स्पर्श करण्याआधी मी तिथे त्याला मारले होते. त्यामुळे प्लीज सावरा स्वतःला. सूर्यकांतराव खूप भावनिक झाले होते. साहजिकच होते आज एक बाप आपल्या मुलीचे कन्यादान करून त्याच्या जबाबदारीतून, कर्तव्यातून मोकळा होणार होता पण हे घडलेली घटना बघून त्यांचे काळीज आज चिंध्या चिंध्या झाले होते. ते उठले आणि म्हणाले आज तू माझ्या पोरीची अब्रूच वाचवली नाहीस तर तिचे आयुष्य तिला परत केले आहे. तुझे उपकार मी कसे फेडू पोरा असे म्हणत त्यांनी सदानंद समोर हात जोडले आणि रडायला लागले तेव्हा, हे काय करताय तुम्ही काका, शाल्मली माझी मैत्रीण आहे, त्या नात्याने मी मैत्रीचे कर्तव्य पूर्ण केले आहे. तुम्ही हात जोडून मला लाजवताय प्लीज अस नका करू अस म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून शाल्मली पुन्हा रडायला लागली. तिने सदानंदला मारलेली घटना तिच्या डोळ्यापुढून जात होती. सूर्यकांतरावांनी सदानंदल घट्ट मिठीत घेतले होते.


शरद म्हणाला, पण मला एक सांग तू तिथे कसकाय पोहचलास म्हणजे तुला कसे समजले की मंगत शालूल घेऊन तिथे गेला आहे कारण आम्ही इकडे त्याची गाडी कुठे आणि कोणत्या दिशेने गेली हेच शोधत होतो. शेवटी चाकाचे निशाण दिसले आणि आम्हाला समजले.


खरतर परीक्षा संपली होती आणि मी गावाकड जाणार होतो पण तिथे तरी जाऊन काय करावे हा प्रश्न पडला होता मला. मग मित्रांनी सुचवले की इथेच राहून काही काम मिळते का बघ म्हणून मग इथेच राहिलो. इथे रानात माझ्या एका मित्राची खोली होती त्याच्याकडेच रहात होतो मी. तिकडेच निघालो होतो तेवढ्यात ही जीप माझ्या समोरून गेली, त्यात मला शाल्मली दिसली, म्हणून मग मी त्या जिपचा पाठलाग करायला लागलो. आडवळणाचा रस्ता होता पण मी डोंगरावरून सरळ घसरत खाली आलो आणि मला वाड्या समोर जीप दिसली. मग तिथे गेलो आणि मांगतला थांबवले. सदानंद म्हणाला. तसे शाल्मली खूप रडायला लागली. सूर्यकांत रावांनी तिला शांत केले आणि सगळेच घरी आले. सोबत सदानंद पण होताच. घरी आल्यावर सूर्यकांतरावणा समजले केतन पेंढारकर ने लग्नास नकार दिला आहे. त्याच्या घरातील कोणीही मंडळी लग्नासाठी तयार नाही. हे ऐकून शाल्मली मटकन खाली बसली. तिच्या इतकाच धक्का सूर्यकांतरवाना ही बसला होता, पण ते केतनच्या घरच्यांना बोलायला रूममध्ये गेले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार केतनच्या घरच्यांना सांगितला पण कोणीही काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, सगळे लोक निघून गेले.


घडला प्रकार खरंच खूप वाईट होता. सगळेच उदास झाले होते. लग्न मंडपातून लग्न न होताच परत मुलगी घरी आणणे म्हणजे अपशकून मानले जात असे शिवाय अशा मुलीशी लग्न करायला कोणीच तयार होत नसे. त्यामुळे सगळे डोक्याला हात लावून बसले होते. शाल्मली एकसारखी रडत होती. तेवढ्यात सदानंद शाल्मली जवळ आला आणि त्याने शाल्मलीचा हात धरून तिला मंडपात नेले. शाल्मली त्याच्याकडे बघत होती. हा काय करत आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. तो गुरुजी समोर गेला आणि तिथे असलेले कुंकू त्याने सरळ शाल्मलीच्या भांगेत भरले, तिथेच असलेले मंगळसूत्र घेतले आणि शाल्मलीच्या गळ्यात घातले. काही मनी ध्यानी नसताना शाल्मली सोबत लग्न केले होते. सगळ्यांनाच धक्का बसला होता पण सदानंद म्हणाला, शाल्मली माझी मैत्रीण आहे, तिला आणि तुम्हाला असे दुःखात मी बघू शकत नाही. त्यामुळे मला जे सुचलं ते मी केले. तुम्हाला आवडल नसेल तर मी आता इथून निघून जायला तयार आहे पण जेंव्हा मला समजले की आता शाल्मली सोबत कोणीही लग्न करायला तयार होणार नाही आणि मुलीने लग्न मंडपातून लग्नाशिवाय तसेच जाणे अपशकून मानले जाते तेंव्हाच मी ठरवले की असे होऊ द्यायचे नाही. तुमच्यासाठी जितके करणे शक्य होईल तितके मी केले. शाल्मलीवर सहानुभूती दाखवून नाही तर मनापासून केले. शाल्मली खूप चांगली मुलगी आहे जे काही झाले त्यात तिची किंवा तुमची चूक नव्हतीच. मग त्याची शिक्षा तुम्हाला का म्हणून मी हे पाऊल उचलले त्याने हात जोडत सूर्यकांत रावांना सांगितले. सूर्यकांतराव त्याच्या जवळ आले आणि त्याला मिठीत घेतले. तू केलेले उपकार कसे विसरू मी आणि तू का हात जोडत आहेस आभार तर मी मानायला हवेत ना ?? म्हणून सूर्यकांतरावनी त्याच्या समोर हात जोडले. तर सदाशिव त्यांचे हात पकडुन मानेनेच असे करू नका म्हनाला आणि दोघांनीही जोडीने नमस्कार केला त्यांना. लग्नाचे विधी आटोपले आणि सगळे घरी आले.


सदाशिव सूर्यकांतरावांना* म्हणला, आता मला शाल्मलीला घेऊन घरी जावं लागेल. सूर्यकांतरावनी सदानंदला विचारले, तुझ्या घरी कोण कोण असते आणि तुझ्या घरातले लोक शाल्मलीचा सून म्हणून स्वीकार करतील ना ?? सदानंद म्हणला तुम्ही काळजी करू नका. माझ्या घरी माझी आई असते फक्त. बाबा वारले आहेत. माझी आई खूपच साधी भोळी आहे त्यामुळे तिचा कसलाही विरोध होणार नाही. तिला उलट आनंदच होईल. सदानंदचे हे बोलणे ऐकून सूर्यकांतराव जरा निश्चिंत झाले आणि शाल्मलीच्या आई, बाबानी आणि शरदने मिळून शाल्मलीला निरोप दिला. सदाशिव शाल्मलीला घेऊन घरी येण्यासाठी निघाला.


क्रमशः


🎭 Series Post

View all