Login

संकेत भाग तेरा

कथा मालिका


संकेत भाग तेरा.


त्या जीपमधील सगळीच मुले खूपच माजोरडी दिसत होती. सगळेच उतरून शाल्मली समोर उभे होते. जीप चालवणारा मुलगा शाल्मलीचे सौंदर्य बघून घायाळ झाला होता. शाल्मली होतीच सुंदर त्यात वादच नव्हता. त्या मुलाची नजर इतकी वाईट होती की शाल्मलीला तिचे सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरते की काय असे वाटले ते ही अगदी क्षणभर. क्षणात सूर्यकांत साबळेची मुलगी असल्याचे भान तिला आले. तो मुलगा तिच्या जरा जवळ येऊन म्हणाला, ये पाखरा येतेस का माझ्या सोबत ?? राणी सारखं ठेवेन तुला जन्म भर. काही कमी पडू देणार नाही. तू दिलेली शिवी सुधा फुलासारखी वाटली बघ. येतेस का ?? 


शाल्मलीने सणसणीत त्याच्या मुस्काटात मारली, तुझ्यासारख्या नराधमाची राणी होण्यापेक्षा मरण पत्करेन मी कुत्र्या असे म्हणून शाल्मली तिथून निघाली. तो मुलगा तिच्या हाताला धरून तिला पकडणार इतक्यात त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे जरा सबुरीने घे. हे पाखरू तुला हवंय ना ते मिळणारच. पण जरा योग्य वेळ येण्याची वाट बघ.


शाल्मली घरी आली, तिच्या डोक्यात अजूनही प्रचंड राग होता. घरात आल्या आल्या तिने दादा, बाबा अशा मोठ मोठ्याने हाका मरायला सुरुवात केली, तसे सगळेच बाहेर आले. तिने घडलेला सगळा प्रसंग घरच्यांना सांगितला.


तसे सूर्यकांत साबळेचे डोळे रागाने लाल झाले तर शरदच्या मुठी आवळल्या गेल्या.शरद घराबाहेर पडणार इतक्यात सूर्यकांतराव म्हणाले शरद थांबा.मला आलेली शंका बरोबर ठरली आहे. गावात इनामदारांची काही कुत्री भुंकत आहेत सकाळ पासून. इनामदार आपला जुना वैरी. त्याची नजर माझ्या पोरीवर पडलेली मला चालणार नाही. याचा बंदोबस्त कायमचा करायलाच हवा पण जरा दमान. मी त्या पोरांचं काय करायचं ते बघतो. शाले वरती जा आणि काही दिवस कॉलेज बंद.


९. शाल्मली खूपच वैतागली होती. काहीही चूक नसताना तिचे कॉलेज बंद झाले होते ते तिला अजिबातच आवडले नव्हते. आज तिच्या कॉलेजमध्ये खूपच महत्त्वाची लेक्चर्स होती. ती खाली आली आणि सूर्यकांत साबळेना म्हणाली, बाबा जे घडायचं होत ते घडून गेलं आहे आणि त्यात माझी काहीच चूक नसताना तुम्ही माझे कॉलेज बंद केले आहे ते मला अजिबातच पटले नाही. तुम्ही मला कॉलेजमध्ये जाऊद्या, हवतर दोन बॉडी गार्ड द्या पण मला कॉलेजला जायचे आहे. काल हा प्रकार जेंव्हा सूर्यकांत रावांच्या कानी पडला होता त्याच वेळी त्यांच्या काही खास लोकांसोबत जाऊन त्यांनी त्या पोरांना बेदम मारून परत त्यांच्या गावी पाठवले होते आणि योग्य शब्दात इनामदारणा समज मिळाली होती. खरतर इनामदार हे त्या गावचे नव्हते. पण जमिनीच्या प्रकरण वरून इनामदार आणि साबळे यांच्यात वाद झाले होते. चुकीच्या जमिनीवर इनामदार हक्क सांगत होता त्यासाठी कोर्ट कचेरी झाली होती आणि साबळेकडे असलेले पुरावे बघून कोर्टाने साबळेच्या बाजूने निकाल दिला होता. तरीही इनामदार उगाचच वैर धरून होते. हे सगळे सूर्यकांत रावांच्या डोळ्यासमोरून क्षणात गेले. बाबा काय म्हणते मी ?? जाऊ न कॉलेजमध्ये. शाल्मलीच्या प्रश्नाने ते भानावर आले आणि म्हणाले मी तुझ कॉलेज बंद केले ते तुझ्या काळजी पोटी. पण तुला अस घरात ठेवून घेणे ही चुकीचेच ठरेल. त्यामुळे तू जा पण माझ्या खास दोन लोकांना घेऊन जा असे शाल्मलीला सांगितले.


१०. शाल्मली आता कॉलेजमध्ये जाऊ लागली होती. त्या जीप मधील मुलांचा किंवा सदानंदचा कसलाही त्रास नव्हता आता शाल्मलीला. सदानंद कॉलेजमध्ये येत होता,जात होता पण शाल्मलीकडे चुकूनही बघत नव्हता तो. एकदा दोनदा शाल्मलीने त्याच्याकडे पाहिले होते पण तो शाल्मलीकडे नजर चुकिनेही बघत नव्हता. 


बरेच दिवस होऊन गेले. वातावरण शांत झाले होते. शाल्मलीची परीक्षा जवळ आली होती. आता तिचे पूर्ण लक्ष अभ्यासात होते. हे तिचे शेवटचे वर्ष होते आणि यानंतर तिचे लग्न लावून देण्याचे सूर्यकांतराव यांनी ठरवले होते. शाल्मली दिसायला अतीच सुंदर होती आणि गावातील हे वातावरण बघून तिचे लग्न लावून देणेच योग्य ठरणार होते. बघता बघता परीक्षा संपली आणि सूर्यकांतराव यांनी तिच्यासाठी मुलगा शोधला सुद्धा. त्यांच्याच मित्राचा मुलगा होता. केतन पेंढारकर नाव होते त्याचे. केतन अतिशय हुशार आणि देखण होता. त्याचे सौंदर्य शाल्मलीला शोभेल असेच होते. 


लग्नाची गडबड सुरू झाली होती. शाल्मली अतिशय सुंदर नटून थटून तयार झाली होती. लाल रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. प्रत्येकजण तिच्या सौंदर्या बद्दल बोलत होता. केतनने नशीब काढले असे सगळेच म्हणत होते. लग्नाच्या विधिंना नुकतीच सुरुवात झाली होती, तोच मंडपात एक जीप भरधाव वेगाने घुसली आणि काही समजण्याआधीच शाल्मलीला घेऊन जीप गावाबाहेर गेली. ती जीप इनामदारांची होती. लग्नात असे काही होईल हे कोणाच्या मनी ध्यानी नव्हते. सूर्यकांत रावांनी खूप काळजी घेतली होती अनेक लोक राखण होते पण हे सगळं इतक्या अचानक घडले की कोणाला काहीच सुचले नाही. शरद गाडी घेऊन त्या जीप मागे धावला होता. सूर्यकांतराव जागच्या जागी बसून राहिले होते, सुन्न झाले होते. थोड्याच वेळात स्वतःला सावरून ते कसेबसे शरदच्या गाडीमागे गेले होते. 


इकडे शाल्मलीने ज्या मुलाच्या मुस्काटात मारली होती त्याने खूप जोरात तिचा दंड पकडला होता आणि तिच्याकडे बघुन क्रूरपणे हसत होता तो. तो भयानक चेहरा पाहून शाल्मली खूपच घाबरली होती, मनात कृष्णाचा धावा करत होती. आता आपल्या सोबत काय घडणार याचा अंदाज तिला आला होता. दादा, दादा म्हणून ती शरदल आवाज देत होती. शरद बऱ्याच अंतरावर होता पण जीपचा पाठलाग करत होता. त्याच्या नजरेच्या टप्प्यात होती जीप. अचानक जीप चालवणाऱ्या व्यक्तीने जीप दुसऱ्याच रस्त्याला नेली, तो रस्ता खूप अडवळणाचा होता, काटेरी होता. आता शरदल ती जीप दिसत नव्हती. नक्की जीप कुठे गेली ते त्याला समजेना. पाऊलवाट पण समजेना. जीपच्या टायारचे निशाण सुद्धा कुठे दिसत नव्हते. आता त्याने डोक्याला हात माराला होता. 


इकडे शाल्मली आवाज देतच होती पण त्या नालायक माणसाने आता तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता, हात पाय घट्ट बांधले होते. जीपच्या सीटल तिला आवळून ठेवले होते. थोड्याच वेळात एक पडका वाडा आला आणि त्याने शाल्मलील उचलून वाड्यात नेले. वाडा खूप जुना होता, कित्येक दिवसात त्या वाड्यात कोणीच रहात नव्हते. सगळीकडे जळमटे लागली होती. त्या जीपवाल्याने शाल्मलीला एका रूममध्ये नेले आणि बेडवर पाडले. शाल्मली बांधलेले हात जोडून रडत होती, मागे मागे सरकत होती. त्या व्यक्तीने तिच्या तोंडातल कापडाचा बोळा काढला आणि ती काही बोलायच्या आत तिच्या तोंडावर स्वतःचा हात दाबत तो म्हणाला, त्या दिवशीच मी तुला बर्बाद करणार होतो पण माझ्या मित्राने मला अडवल. पण मला मारूनच तू थांबली नाहीस, तुझ्या बापाला सगळा प्रकार सांगून स्वतःचे मरण ओढवून घेतले स तू. तुझ्या बापाने मला बेदम मारला. पण त्याला काय वाटलं आता मी तुझ्या वाट्याला जाणार नाही ??? असे म्हणत तो हसायला लागला. मंगत इनामदार नाव हाय आपलं. कोण मंगत इनामदार. एकदा एक गोष्ट मनात भरली की भरली, मग ती आपली झालीच पाहिजे काय ??? तू लय मनात भरलीस अन् आता तुला मिळवल्या बिगर आपल्याला चैन पडणार नाय. असे म्हणून मंगतने शकमलीच्या मनेखली हात घालून केस जोरात ओढले, बिचारीला वेदनेने ओरडता ही येत नव्हते कारण मंगतने दुसरा हात तिच्या तोंडावरच ठेवला होता. ती मनातल्या मनात कृष्णाचा धावा करतच होती. काय माहित तिच्या हाकेला कृष्ण धावून येणार होता की नव्हता.


क्रमशः


🎭 Series Post

View all