Login

संकेत भाग दहा.

कथा मालिका

संकेत भाग दहा.


आदित्य तयार होऊन खाली आला, निशा पण तयार होऊन दोघींशी गप्पा मारत बसली होती. 


आदित्य : आज मी तुमच्या घरी जाणार आहे मिसेस पत्की. तुमच्या घराची एक चावी माझ्याकडे तुम्ही दिली होती ती आहे माझ्याकडे त्यामुळे मी तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगत आहे. 


आई : आदी जरा जपून जा बरं बाळा. काल मला ताईंनी सांगितले किती भयानक आकृती तिथे आहे ते. थांब मी तुला अंगारा लावते म्हणत उठून त्या देवघरात गेल्या. 


मिसेस पत्की :. आदित्य खरतर आता तू तिथे जात आहेस याच विचाराने मी अस्वस्थ झाले आहे. त्या वास्तूत तुला खरचटले तरीही मला ते सहन होणार नाही बाळा. तू मला माझ्या मुलाप्रमाणे आहेस आणि तू सुद्धा मुलाप्रमाणेच माझी काळजी घेतोस, माझ्यावर प्रेम करतोस. तू तिथे जावस असे मला नाही वाटत पण माझ्या डोळ्यांसमोर निशाचे बाबा येतात आदित्य. पुन्हा त्यांचे डोळे पाणावले. 


आदित्य : मिसेस पत्की प्लीज तुम्ही अशा निराश होऊ नका. मगाशी किती फ्रेश दिसत होता तुम्ही. मला तुम्हाला तसेच पाहायला आवडेल. ते घर आता दोषयुक्त असले तरी ते लवकरच या वास्तू सारखे प्रसन्न वाटायला लागेल खात्री आहे मला. ते घर तुम्हा दोघीसाठी किती महत्त्वाचे आहे याची कल्पना आहे मला. आणि शिवाय हा माझ्या कामाचा भाग आहे मिसेस पत्की. असे भावनिक होऊन कसे चालेल. मला तुम्हा दोघीना त्या घरात आनंदात राहताना बघायचे आहे आणि ते मी करणारच. 


निशा :. निशा त्या दोघांकडे खूपच कौतुकाने पहात होती. आदित्यच्या रुपात आईला प्रेमळ मुलगाच मिळाला होता आणि त्यावर इतका विश्वास ती का ठेवत होती याचे उत्तर तिचे तिलाच मिळाले होते. त्यांचे इतके छान नाते पाहून तिचेही डोळे पाणावले होते. 


आई : दुरून आईपण हे सगळे पाहून भावनिक झाली होती. त्यांनी आदील अंगारा लावला, त्याने पटकन आईचे पाय पकडुन आशिर्वाद घेतला. त्यांचेही डोळे आज पाणावले होते आणि डोळ्यातील पाणी त्या लपवू शकत नव्हत्या. 


आदित्य : आईची अशी अवस्था पाहून आदित्यने पटकन आईला मिठी मारली. आई तूच तर माझी ताकद आहेस. आजवर तुझ्याच विश्वासाच्या जोरावर इतक्या केसेस हँडेल केल्या. आता तूच असे केले तर मी काम कसे करू. प्लीज रडू नको. तुझे प्रेम आणि आशीर्वाद असताना मला काहीही होणार नाही. आपले ओठ आईच्या कपाळावर टेकत तो म्हणाला. त्याची नजर निशाकडे गेली तर ती पण तिचे अश्रू पुसत होती. ही खरंच माझ्या काळजी पोटी रडत असेल का की ... त्याच्या मनात विचार सुरू होता पण त्याने तो दूर केला आणि म्हणाला चला सगळ्यांनी पटकन गोड स्माइल द्या. तुमचे असे रडके चेहरे बघून मी काम नाही करू शकणार. 


सगळ्यांनी डोळे पुसले. 


निशा : आदित्य मी पण येते तुझ्या सोबत घरी. तू असा एकटाच जातो आहेस ते मलाही पटत नाही. तू आमच्यासाठी खूप काही केलं आहे आत्तापर्यंत. तू एकटाच गेलास तर आम्ही सगळ्या इथे काळजी करत राहू. त्यापेक्षा मी येते. 


आदित्य : काहीच गरज नाही निशा. काल ती आकृती पाहून तुझी काय अवस्था झाली होती लक्षात आहे ना ? आता पुन्हा तिथे येण्याची काहीच गरज नाही. मी म्हणालो ना हे माझं काम आहे आणि मी ते व्यवस्थित करेन. तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवा. मला काहीही होणार नाही. तसंही आज मी फक्त वास्तू आणि तेथील काही वस्तू चेक करणार आहे. बहुतेक त्या रूममध्ये आज जाण्याची गरज नसेल. 


निशा : ते काहीही असलं तरी मी तुझ्या सोबत येत आहे. आणि हे मी तुला विचारत नाही सांगत आहे. मी किती हट्टी आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही. हातची घडी घालून त्याच्याकडे तिरकस नजरेने बघत, नाक लाल करत ती म्हणाली. 


आदित्य : त्याने त्याच्या दोन्ही भुवया उंचावल्या आणि म्हणाला तू हट्ट केलास तर तुला कसे गप्प करायचे ते मला चांगलेच ठाऊक आहे निशा. मी तुला कोंडून ठेवले होते तुझ्याच घरात तुझ्याच रूममध्ये आठवतंय की आठवण करून देऊ ?? 


निशा : आता ती रागाने अजुनच लाल झाली होती त्यामुळे जास्तच गोड दिसत होती. हे बघ आदित्य तू जर आज मला इथे कोंडून ठेवलेस तर मी .... मी .... 


आदित्य : काय, काय करणार आहेस ?? पाहिलत मिसेस पत्की, आई बघ हिच्याकडे कशी सतत वाद घालते आणि माझ्या कामाच्या मध्ये मध्ये करते. सांगा जरा हिला कोणीतरी समजावून. मिसेस पत्की तुमचं तरी ऐकते की नाही ती ??


निशा : मिसेस पत्की उठून काही बोलणार तेवढ्यात निशा म्हणाली, आई तू काहीच बोलू नकोस. तू नेहमी याचीच बाजू घेतेस. माझ्यापेक्षा तोच लाडका झालाय तुझा. तुम्हाला माहित आहे का काकू, याने मला माझ्याच घरात कोंडून ठेवले होते आणि आताही तेच करेल तो. तुम्ही त्याला काहीच कसं बोलत नाही. चांगलच रागवा त्याला. मुलींशी कोणी असे वागत का ?? 


आई : हो हो मी रागावणारच आहे त्याला. निशाकडे जात त्या म्हणाल्या. त्यांनी निशाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या तुला जायचं आहे तर जा. बघते आदी तुला कसा घेऊन जात नाही ते. 


आदित्य : तू पण काय आई तिचे लाड करत जायला सांगत आहेस ?? बघा मिसेस पत्की आता तुम्हीच सांगा तिला. 


मिसेस पत्की : आदित्य माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तुझे काम आणि निशाची काळजी दोन्ही छान पार पाडशील. त्यामुळे तू निशाल घेऊन जा. तुम्ही दोघे एकमेकांच्या सोबत असाल तर आम्हाला पण जरा रिलॅक्स वाटेल. नाहीतर तुझी काळजी वाटत राहील. 


आदित्य : ठीक आहे मिसेस पत्की. तुम्हा दोघींची हीच इच्छा असेल तर नक्कीच मी तिला घेऊन जाईन. चला मॅडम निघुया ?? निशाकडे बघून तो म्हणाला आणि बाहेर पडला. 


आदित्य आणि निशा गाडीतून जात होते. 


आदित्य : शेवटी तुला हवं तेच केलंस ना तू ?? तुझा हट्ट पूर्ण केलास. पण मला तुझी काळजी वाटते, काल रात्री किती घाबरली होतीस तू ?? आजारी होतीस म्हणून नको म्हणत होतो ना मी. पण तुला ऐकायचं नसतच माज कधी. हो ना ?? त्याने तिच्याकडे पाहून विचारले. 


निशा : का करतोस माझी एवढी काळजी ?? 


आदित्य : का म्हणजे ?? एखाद्या ठिकाणी घेऊन गेल्याने तुला अस्वस्थ वाटणार असेल, तू घाबरणार असशील तर तिथेच मी कसकाय घेऊन जाऊ तुला ?? माझ्या कामाची त्यात तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. त्या वास्तूत नेमका धोका तुलाच आहे हे माहीत असल्यावर तुला तिथे घेऊन जाणं म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखे नाही का ?? 


निशा : ज्या घरात आम्ही रहातो तिथे नक्की काय दोष आहे हे मलाही जाणून घ्यायचे आहे. आणि तसंही तू आहेस की माझी काळजी घ्यायला , मला सांभाळायला. मग मला कसलीही भीती नाही. 


आदित्य : एवढा विश्वास आहे का तुझा माझ्यावर ?? 


निशा : निशाने काहीच उत्तर न देता खिडकीची काच खाली केली आणि बाहेर बघत बसली. तिचे घर आले, तशी ती गाडीतून उतरली आणि घराकडे पहात राहिली. इथे राहायला येताना किती आनंदी आणि उत्साही होतो मी आणि आई. बाबांची आठवण आणि स्वप्न असलेल्या या घरात राहणेच काय तर तिथे पाऊल टाकने पण किती अवघड वाटायला लागले आहे आज. 


आदित्य : तू आणि मिसेस पत्की लवकरच या घरात नव्या उत्साहाने आणि आनंदाने रहायला जाल निशा. तिच्या खांद्यावर हात ठेवत आदित्य म्हणाला. 


निशा : याला कसे माझ्या मनात नेमके काय सुरू आहे ते समजले ?? हे पण गुण आहेत वाटतं याच्या जवळ. तिने आदित्य कडे पाहून हुंकार दिला. 


आदित्य :. तिचा हात हातात घेऊन आदित्य घरात आला.


निशा : घरात प्रवेश करताच तिच्या बाबांचा फोटो समोर बघून तिची पाऊले त्यांच्या फोटोकडे वळली. आपसूकच तिचे डोळे भरून आले. बाबा आज तुम्ही इथे हवे होता, आईला आणि मला सावरायला. खूप आठवण येते तुमची. हे घर म्हणजे तुमचे अर्धवट राहिलेले स्वप्न आहे. खरतर आपण तिघांनी इथे हसत खेळत राहण्याची स्वप्ने तुम्ही रंगवली होती. पण त्यासाठी तुम्हीच राहिला नाहीत त्यामुळे ती अर्धीच राहिली. पण मी आणि आई इथे राहून तुमचे स्वप्न पूर्ण करू बाबा. या घरात लवकरच राहायला येऊ.


आदित्य : नक्कीच निशा. तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी आहे माझी. चल. आदित्य आणि निशा ती रूम सोडून खालीच असलेल्या स्टोअर रूममध्ये गेले होते. 


निशा : आदित्य त्या दिवशी तू त्या आकृती समोर राधा कृष्णाचा फोटो दाखवला आणि ती गायब झाली. त्याच कारण तू अजून सांगितलं नाहीस. आणि आता इथे स्टोअर रूममध्ये काय शोधायचे आहे तुला ?? 


आदित्य : निशा ज्यादिवशी तू त्या रूममध्ये जाण्याचा हट्ट केला होतास त्याच दिवशी माझ्या काही विश्वासू लोकांनी मला एक माहिती दिली होती ती म्हणजे या घरात एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि ती मुलगी राधा कृष्णाची परम भक्त होती. ज्या रूममध्ये आपण ती आकृती पहिली ती त्याच मुलीची होती, कारण ती मुलगी त्याच रूममध्ये रहात होती. म्हणून मी त्या आकृती समोर राधा कृष्णाची मूर्ती धरली आणि ती गायब झाली. पण तिचे अस्तित्व अजूनही का आहे ?? तिने आत्महत्या का केली ?? आणि मग तिच्या घरचे बाकी लोक कुठे आहेत ?? हे घर तुझ्या बाबांना कोणी विकले ?? हे सगळं याच घरात सापडेल नक्कीच. कारण ती आत्महत्या केलेली मुलगी रोज डायरी लिहायची आणि ती डायरी याच स्टोअर रूममध्ये असेल कारण तुम्ही इथे येण्याआधी या घरातील सगळे सामान इथेच ठेवण्यात आले होते. असे माझ्या खबरीने सांगितले आहे. म्हणून आपण इथे आलो आहोत. 


निशा : पण आदित्य ती मुलगी म्हणजे जिने आत्महत्या केली तिची शक्ती फक्त त्या रूमपुरतीच कशी काय मर्यादित आहे ?? बाकी घरात कसे काय ती काहीच करू शकत नाही ?? 


आदित्य : सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आज इथे शोधायची आहेत निशा. त्यामुळेच तर इथे आलोय आपण. एकदा का सगळी सूत्रे हातात आली की मग केस मार्गी लागेल. नाही का ?? स्टोअर रूममधील काही वस्तू चाचपडत आदित्य म्हणाला. 


निशा : पण तुला राधा कृष्णा बद्दल कोणी सांगितले ?? 


आदित्य : माझ्या खबरीने सांगितले निशा. आता प्रश्न विचारून झाले असतील तर प्लीज जरा कामात मदत करतेस का ?? की अशीच हातची घडी घालून माझ्याकडे बघत बसणार आहेस ?? 


निशा : करतेच आहे जरा थांबशिल का ?? तोंड वाकडे करून त्याच्याकडे रागाने पहात ती ही डायरी शोधू लागली.


आदित्य आणि निशा दोघेही सामान चेक करून पहात होते पण डायरी काही मिळत नव्हती. काय करावे ते आदित्यला समजेना. ती डायरी मिळाल्याशिवाय केस पुढे जाणार नव्हती. त्याने निशाकडे पाहीले तर ती पण डायरी शोधून थकल्या सारखी दिसत होती. 


आदित्य : तू थकली आहेस का निशा ?? तिच्या जवळ जात आदित्य म्हणाला. तुला बराच घाम पण आला आहे. काल रात्री तू आजारी होतीस म्हणूनच म्हणत होतो नको येऊस माझ्या सोबत आता त्रास होतोय ना ?? 


निशा : काही झालं नाही रे मला. जरास थकले आहे बाकी काही नाही. आपण शोधुया डायरी. 


आदित्य : तू जरा बस इथे. मी पाणी देतो तुला आणि आराम कर मी शोधतो आता. तिला पाणी देऊन आदित्य पुन्हा कामाला लागला. जवळपास सगळे स्टोअररूम पालथे घातले होते पण डायरी काय एक कागद दृष्टीस पडला नव्हता. तेवढ्यात आदित्यची नजर निशाच्या जवळ असलेल्या एका कपाटावर गेली. त्यावर एक खूप जुनी पेटी ठेवली होती. तो निशाला म्हणाला निशा, आता फक्त ती पेटी चेक करायची बाकी आहे तू बघ जरा त्यात काय आहे. असे म्हणत तो तिच्याकडे जाऊ लागला. 


निशा : निशाने त्यावरची धूळ साफ केली आणि ती पेटी ओढून घेतली , त्या पेटी मागे असलेली पाल निशाच्या हातावरून गेली. मोठ्याने किंचाळत धावत जाऊन ती आदित्यला बिलगली. 


आदित्य : तो ही तिच्याकडेच येत होता. त्याने पाहिले होते पालीकडे. निशाला घट्ट मिठीत घेत तो म्हणाला, अग गेली ती तुझ्या हातावरून. आता नाही येणार ती. 


निशा : हो का, तुला सांगुन गेली आहे का , मान बाजूला न घेता जरा वरती घेऊन आदित्यकडे बघत तिने विचारले.


आदित्य : तिच्याकडे बघत पुन्हा तिला जास्तच घट्ट पकडत तो म्हणाला, हो सांगून गेली आहे. त्यानें तिच्या कपाळवरचे केस दूर केले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकत पुन्हा डीप किस केले. अशी कशी घाबरतेस तू निशा ?? पण बरं झालं ना तिथे पाल होती. काल ती आकृती आणि आज पाल माझ्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळेच तू अशी मिठीत आली आहेस ना.


निशा : काहीही काय तुझ. एकतर इथे डायरी मिळत नाहीये, त्यात पाल अशी हातावरून गेल्यामुळे मी घाबरले आणि तू रोमान्स कसला करतोस जरा बाजूला होण्याचा प्रयत्न करत निशा म्हणाली. 


आदित्य : तुझ्यासारखी सुंदर मुलगी आपणहून मिठीत येत असताना मीच काय कोणीही रोमँटिक होईलच ना? तिच्या कमरेभोवती असलेली हातांची गुंफण अधिकच घट्ट करत तो म्हणाला. 


निशा : निशाचे हात त्याच्या छातीवर अजुनच रुतून बसले होते त्यामुळे. तू आता सोड नाहीतर अजून नखे टोचावेन मी तुला. 


आदित्य : काय करायचे ते कर पण मी तुला सोडणार नाही. आपले तोंड तिच्या जास्तच जवळ घेऊन जात तो म्हणाला. आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बुडून गेले होते. आदित्य तिच्या जास्तच जवळ गेला होता अगदी जवळ. थोडी मान वाकडी करुन तो तिच्या ओठांवर ओठ टेकवनार इतक्यात निशाने त्याला ढकलून दिले. 


निशा : आगाऊपना बंद करा आणि जे काम करायला आलोय ते करा मिस्टर आदित्य. 


आदित्य : माझा मूड spoil करून काय हसतेस ?? तिच्याकडे जरा लटक्या रागाने बघत आदित्य म्हणाला आणि पेटी उघडली तर त्यात काही कपडे, काही फोटो आणि सगळ्यात शेवटी एक डायरी होती. आदित्यने पटकन ती डायरी उघडून पाहिली आणि त्याचे डोळे चमकले. हीच ती डायरी निशा जी आपल्याला हवी होती. 


क्रमशः

🎭 Series Post

View all