संकेत भाग नऊ.
निशा : निशाने डोळे मिटले, आदित्य तिच्या जवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिलाही थोड्याच वेळात छान झोप लागली.
आदित्य : तिचे झोपलेले गोड रूप पुन्हा आदित्य न्याहाळू लागला. थोड्या वेळाने उठून तो त्याच्या रूममध्ये जाणार इतक्यात निशा दचकून उठली. तिचा चेहरा घामाने चिंब झाला होता.
आदित्य : आदित्य तिच्याजवळ गेला आणि तिला पाणी दिले. ती पुन्हा ती भयानक आकृती स्वप्नात पाहून घाबरली हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. त्याने पटकन तिला घट्ट मिठीत घेतले.
निशा : आदित्य ती पुन्हा मला स्वप्नात दिसली, म्हणत रडायला लागली. तिने आदित्यचा शर्ट दोन्ही हातांनी खूप घट्ट पकडला होता. जवळपास ती त्याला ओढत होती. तिने तिचे तोंड आदित्यच्या शर्टमध्ये घातले होते आणि पोटात पाय घेऊन एखादे पिल्लू तिच्या आईला चिटकते तसे चिटकली होती ती आदित्यला.
आदित्य : निशाचे असे लहान मुलांप्रमाणे वागणे बघून त्याला तिच्यात वेगळीच निशा दिसत होती. सुरुवातीला वास्तूदोषवर विश्वास न ठेवता भांडणारी ती आणि आता घाबरून त्याचा आधार घेत त्याला घट्ट बिलगनारी ती, किती फरक होता दोघीत. आदित्यने एक हात तिच्या खांद्याभोवती तर दुसरा तिच्या कमरेभोवती गुंफला होता. खांदा थोपटत तो तिला शांत करत होता, तशी ती त्याला जास्तच बीलगत होती. माझ्याकडे बघ निशा, इकडे बघ. तिने वर पहिले तसे तो म्हणाला तू इथे माझ्या घरात आहेस आणि अगदीच सुरक्षित आहेस. तू अजिबात घाबरु नकोस. इथे तुला कसलीही भीती नाही. मी आहे ना ?? तू झोप मी आहे इथेच. हम.
निशा : नाही मी झोपणार नाही. मी डोळे बंद केले की तीच समोर दिसते. नको.
आदित्य : निशा मी म्हणालो ना मी इथेच आहे. आणि इथे तू सेफ आहेस. झोप बर तू नाहीतर आजारी पडशील. तिचे पाय सरळ करत त्याने तिला पांघरून नीट घातले आणि तोंडावर आलेले केस बाजूला करत असताना निशाचे अंग त्याला पोळले. निशा तुला तर खूप ताप आहे, थांब मी तुझ्यासाठी औषध घेऊन येतो.
निशा : नाही, तू कुठेही जायचं नाहीस. ती पाय पुन्हा पोटात घेत त्याला घट्ट पकडत म्हणाली. आता तिचे ओठ थरथरत होते. तू इथेच थांब, मला एकटीला सोडून जाऊ नकोस.
आदित्य : निशा तुला थंडी पण वाजत आहे आणि तापाने फणफणत आहेस. इथेच माझ्या रूममधून मी औषध घेऊन येतो. तू एकच मिनिट थांब प्लीज. असे म्हणत तो गेला आणि पटकन गोळ्या घेऊन आला आणि तिला दिल्या. पुन्हा निशा त्याला बिलगुन गेली.
आदित्य : तू झोप आता मी इथेच थांबेन. निशा त्याला इतकी घट्ट बिलगली होती. की हवा जायला पण जगा उरली नव्हती आता दोघामध्ये. आदित्य ही तिला खूप घट्ट बिलगल होता.
निशा : तू मला सोडून तर जाणार नाहीस ना आदित्य ?? तिच्या थरथरत्या ओठांनी ती त्याला विचारत होती. तिचे ओठ आदित्यच्या गळ्याला स्पर्श करत होते आणि बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल त्याचे अंग मोहरुन टाकत होती.
आदित्य : अजिबात नाही निशा. मी इथेच आहे तू झोप. त्याने तिच्याकडे पाहिले, तिनेही मान जरा वरती केली. आदित्यने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकले आणि डीप किस केले. तशी ती पुन्हा त्याला बिलगली आणि झोपी गेली.
आदित्य : सकाळी आदित्य लवकर उठून गॅलरीत व्यायाम करत होता. रात्रभर निशाच्या मिठीत त्याची छान झोप झाली होती. निशाचे त्याला घट्ट बिलगुन झोपणे आणि मला सोडून जाणार नाहीस ना ?? असे विचारणे त्याला सतत आठवत होते. गलारीतून आई आणि मिसेस पत्की बाहेर जाताना त्याने पाहिले. त्यांच्या हातातील सामान पाहून त्या आता मंदिरात गेल्या हे त्याच्या लक्षात आले. आता काही आई लवकर येत नाही. पण माझी स्ट्राँग कॉफी पिण्याची वेळ झाली आहे. पण आता आई बाहेर गेल्यामुळे स्वतःच करून घ्यावी लागणार असे स्वतःशी बोलत तो खाली गेला. आदित्य व्यायाम करत असल्याने त्याने स्लिवलेस शर्ट घातला होता. घामाने ओला चिंब झाल्याने टॉवेलने अंग पुसत किचनमध्ये आला आणि समोरच उभा असलेल्या निशाला धडकला. निशा सकाळी सकाळी मस्त अंघोळ करून, ओल्या चिंब केसांना टॉवेल गुंडाळून किचनमध्ये आली होती. त्यात तिची वाऱ्याच्या झोक्यासोबत डूलानारी छोटी बट तिच्या चेहऱ्यावर येत होती. तिचं सौंदर्य कमालीचे खुलून दिसत होते. आदित्य तिच्याकडे बघतच राहिला होता.
निशा : घामाने ओले झालेले केस टॉवेलने पुसल्याने आदित्यचे केस कपाळावर आले होते. त्यामुळे निशाला तो अधिकच हॅण्डसम दिसत होता. काय हवंय तुला चहा की कॉफी ??
आदित्य : अग राहूदे. तू या घरची पाहुणी आहेस. खरतर मीच तुला काय हवंय ते विचारायला हवे. तू राहूदे मी करतो दोघांसाठी कॉफी. तू बस. पण तुझी झोप नीट झाली ना ?
निशा : हं. मान वरती न घेताच तिने उत्तर दिले. तू राहूदे करते मी तिने त्याच्या हातातून कॉफीचा डबा घेत म्हटले.
आदित्य : रागावलीस का माझ्यावर ??
निशा : का रागवेन मी ?? तुला का असं वाटलं ?
आदित्य : पहाटे तुला एकटीला सोडून माझ्या रूममध्ये गेलो ना मी. म्हणून मला वाटलं तू चिडलीस की काय ?? आता मी आईला आणि मिसेस पत्कीना बाहेर जाताना पाहिले. म्हणून मीच कॉफी करुन घेण्यासाठी खाली आलो. मला वाटलं तू अजूनही झोपेत असशील. तुझ्या रूमचे दार बंद होते ना. पण तू अंघोळ करून खाली किचनमध्ये काम करतेस ते पाहून आश्चर्य वाटलं मला.
निशा : का मी काम नाही का करू शकत ?? खूप छान येतं मला सगळं. आई आणि काकू दोघी मंदिरात गेल्या आहेत म्हणून मीच आले. ही कॉफी घे म्हणजे तुला अंदाज येईल मी किचन काम करू शकते की नाही याचा कॉफीचा मग पुढे करत ती त्याला म्हणाली.
आदित्य : हंम... खरंच मस्त झालीय कॉफी. पण या कॉफी पेक्षा अजूनही काहीतरी मस्त आहे इथे.
निशा : काय ??
आदित्य : तुझ सौंदर्य.
निशा : मी पटकन तयार होऊन येते म्हणून जायला वळली. खूपच लाजून लाल झाली होती ती.
आदित्य : आदित्यने पटकन तीचा हात पकडुन तिला जवळ ओढले आणि तिच्या कमरेभोवती हातांनी घट्ट पकडून तिला मिठीत घेतले. तुझे नाक लाल झाल्यावर तुझ्या सौंदर्यात भरच पडते निशा तिच्या नाकावर स्वतःचे नाक घासत तो म्हणाला. रागवल्यावर पण नाक लाल करतेस आणि लाजल्यावर पण.
निशा : सोड मला जाऊदे काय करतोस तु म्हणत तिने चुळबुळ सुरू केली. तेंव्हा आई ग असे ओरडला आदित्य. काय झाले आदित्य ?? काही दुखतयं का ??
आदित्य : हो तर खूप दुखतय. त्याने त्याचा शर्ट जरा खाली घेऊन तिला दाखवले. त्याच्या गळ्याखाली नखांचे खूप व्रण होते. काही ठिकाणाहून रक्त पण आले होते.
निशा : हे काय झालं तुला आणि कसं झालं ??
आदित्य : काल रात्री एक मुलगी खूप घाबरली होती आणि तिने मला इतके घट्ट पकडून ठेवले होते की तिची नखे मला लागतायत हे काल आणि आताही तिच्या लक्षात आलेले नाही. आदित्य तिच्याकडे तिरकस नजरेने पाहत बोलला.
निशा : सॉरी जरा खजील होऊन खाली मान घालून निशा म्हणाली. थांब मी पटकन तिथे हळद लावते म्हणजे तुला बरे वाटेल.
आदित्य : अग त्याची काहीच गरज नाही. आणि तसंही मला या जखमा शक्य तितक्या जपून ठेवायच्या आहेत. तू पहिल्यांदा, मग ती घाबरून का असेना पण माझ्या मिठीत आलीस, रात्रभर मिठीतच होतीस त्याची आठवण आहेत या खुणा.
निशा : त्याच्याकडे पहातच राहिली निशा. काहीही काय बोलत असतोस तू. त्रास होईल ना तुला त्याने.
आदित्य : होऊदे. पण या खुणा अशाच राहतील. निशाला पुन्हा स्वतःकडे ओढत तो म्हणाला आणि मान जोरात हलवत त्याच्या केसातील पाणी तिच्या अंगावर उडवले.
बाहेर मिसेस पत्की आणि आईच्या बोलण्याचा आवाज आदित्यच्या कानावर पडला तसे दोघे पटकन दूर झाले.
आदित्य : कशी आहे तुमची तब्येत आता मिसेस पत्की ?? आज तुम्ही एकदम फ्रेश दिसत आहात.
मिसेस पत्की : हो खूप मस्त वाटतंय मला. आताच मंदिरात जाऊन आलो आम्ही.
आई : तुला कॉफी करून देते आदी, तू ये फ्रेश होऊन.
आदित्य : अग आई मी घेतली कॉफी आताच. निशाने बनवून दिली.
आई : तू अंघोळ न करताच कॉफी घेतलीस आदी ?
आदित्य : सॉरी आई पण आज खूप थकलो होतो व्यायाम करून. कॉफी घेतली की फ्रेश वाटेल म्हणून मी घेतली आज आधीच कॉफी. आता पटकन अंघोळ करून घेतो.
आई : तुझी झोप नीट झाली ना काल रात्री ? नाही, सहसा तू असं कधी करत नाहीस आणि तुझा चेहरा पण नेहमीसारखा दिसत नाही म्हणून विचारते मी ??
आदित्य : अग काल खूप छान झोप लागली मला. अगदी गाढ. निशाकडे पहात तो म्हणाला. जरा थकवा जाणवला म्हणून कॉफी घेतली इतकेच.
आई : मग काही हरकत नाही. आज निशाच्या हातची कॉफी घेऊन दिवसाची छान सुरुवात झाली ना ?? मग दिवस मस्तच जाईल. त्याच्याकडे पहात हसत आई म्हणाली.
आदित्य : मी आलोच फ्रेश होऊन असे म्हणत आदी तिकडून पटकन पळाला.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा