Login

संकेत भाग बावीस.

कथा मालिका

संकेत भाग बावीस : 


बऱ्याच वेळाने शाल्मली शांत होते. तेंव्हा तिची अवस्था पाहून आदित्य तिला म्हणतो, तुझ्यावर काय बेतलं याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही ते तू सहन केलेस शाल्मली. तुझ्या बाबतीत असे व्हायला नकोच होते. पण काही गोष्टी विधिलिखित असतात ज्या आपण बदलू शकत नाहीत. त्यामुळे तसेच काहीतरी तुला भोगावे लागले आहे असे समज पण आता शांत हो. तुझा बदला पूर्ण झाला आहे. सदानंद आणि रखमाबाई दोघेही मेले आहेत आणि तूही आता मोकळी होऊ शकते. इतक्या दिवसात तुला झालेला त्रास थोडा तरी कमी झाला असेल. मी सदिच्छा व्यक्त करेन की इथून पुढचा जन्म तुला हवा तसा मिळावा आणि तुझी राहिलेली सगळी स्वप्ने पूर्ण व्हावीत. 


माझी स्वप्न पूर्ण होतील की नाही, पुढचा जन्म कसा कोणता असेल माहीत नाही पण आता तू थेरडीला घेऊन आलास त्यासाठी तुझी आभारी राहीन मी, शाल्मली म्हणते. आता माज इथल काम झालं आहे आणि मला निघायला हवं. मी जातेय, तुम्हाला माझ्या मुळे काही त्रास झाला असेल तर माफ करा पण इथून पुढे माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही असे म्हणून शाल्मली तिथून निघून जाते. तशी त्या रूममधली काळी सावली क्षणात गायब होते आणि एकदम प्रसन्न वाटायला लागते. 


सगळेच खोलीतून खाली येतात आणि सखा तुका तिथून निघून जातात. आदित्य निशाकडे बघतो तर ती सोफ्यावर शांत बसलेली असते. तो तिच्यापुढे पाण्याचा ग्लास धरत म्हणतो, निशा हे पाणी पी आणि शांत हो. सगळे काही नीट झाले आहे आता कसलाही विचार करू नकोस. मी तुला म्हणालो होतो ना, दोन तीन दिवसात सगळे नीट होईल आणि तसे झाले. त्यामुळे आता कसलाही विचार करायचा नाही, तुझ्या बाबांचे स्वप्न असलेले हे घर पुन्हा नव्याने तुला मिळाले आहे त्याचा आनंद व्यक्त कर आता, आदित्य तिच्या हातावर हात ठेवत म्हणतो. 


निशा : हो आदित्य, तू म्हणालास तसे बाबांचे स्वप्न असलेले हे घर पुन्हा नव्याने मला मिळाले ते ही तुझ्या मुळे. पण शाल्मलीचा विचार डोक्यातून जात नाही माझ्या. केवढी दुःखी होती ती, किती रडत होती मला कसेतरीच वाटले तिच्याकडे पाहून. आणि खरंच खूप सुंदर होती शाल्मली, तिच्या या रूपातही किती छान दिसत होती ती हो ना ?? 


आदित्य : हो तर, खूपच सुंदर दिसत होती ती. तिच्याकडे पहिल्यांदा पाहून तर मी सगळच विसरून गेलो होतो. बापरे किती अफाट सौंदर्य होत तिच्यात. आदित्य मोकळे पणाने शाल्मलीची स्तुती करत असतो. 


निशा : त्याच्या अशा बोलण्यावर निशा चिडून त्याचा हात झिडकारते तसा तो म्हणतो, काय झालं निशा ?? तुला राग आला मी तिच्या सौंदर्याची स्तुती केल्याचा की तू जळतेस तिच्यावर ?? 


निशा : मी का जळेन. तसंही जळयला ती आहेच कुठे ?? 


आदित्य : मग तू चिडली का ?? 


निशा : मी कुठे चिडले ?? 


आदित्य : मग माझा हात का झिडकारला ?? 


निशा : तुम्ही सगळे पुरुष ना असेच असता. एखादी कोणी सुंदर मुलगी दिसली की लगेच लाळ घोटत बसता. त्यामुळे मी चिडले, निशा सोफ्यावरून उठून हातची घडी घालून म्हणते. 


आदित्य : तसे हसत आदित्य तिच्या दोन्ही हातांना पकडुन निशाच्या डोळ्यांत बघून म्हणतो, शाल्मली सुंदर होती यात वादच नाही निशा, जे आहे ते आहे आणि मी ते नाकारत नाही आणि अजून एक सौंदर्याची स्तुती करणं म्हणजे लाळ घोटे पना असतो असेही नाही. पण आता माझा समोर जी मुलगी नाक लाल करून उभी आहे तिचे सौंदर्य ही काही कमी नाही बाबा. 


निशा : खाली मान घालून मस्त लाजते, आणि बाजूला होत म्हणते चला घरी सगळे वाट बघत असतील. तसा आदित्य हसतो आणि निशाच्या मागे जातो.


घरी आल्यावर आदित्य आणि निशाने सगळी हकीकत मिसेस पत्की आणि आईला सांगितली. मिसेस पत्की उठून आदित्य जवळ आल्या आणि त्याचे हात हातात घेऊन म्हणाल्या, आदित्य या सगळ्या प्रकरणात तुला खूप त्रास झाला. माझ्यासाठी आणि निशा साठी तू खूप काही केलेस. तुझे आभार मानायला शब्द च नाहीत माझ्याकडे. आदित्यने त्यांचे हात घट्ट पकडले आणि म्हणाला, मिसेस पत्की मला कसलाही त्रास झाला नाही. तो माझ्या कामाचा भाग होता. आणि तुम्हा दोघींसाठी मी जे काही केलं ती माणुसकी म्हणून केलं. त्यात काही विशेष केलं अस मला वाटतं नाही. तुम्ही माझे आभार मानू नका. तुम्ही मला माझ्या आई सारख्या आहात आणि मुलाचे कोणती आई कधी आभार मानते का ?? आदित्यच्या या बोलण्यावर मिसेस पत्की खूप खुश झाल्या आणि त्याला प्रेमाने मिठीत घेतले. आदित्य ने ही त्यांना मिठीत घेऊन आपले प्रेम व्यक्त केले. त्याच्या पासून बाजूला होत मिसेस पत्की आदित्यच्या आईकडे आल्या आणि म्हणाल्या, तुमच्या सोबत राहून खरंच खूप छान वाटले. मला हक्काची चांगली मैत्रीण मिळाली. पण आता आम्हाला निघायला हवे. बरेच दिवस राहिलो आम्ही इथे पण आता अडचण दूर झाली आहे तर आम्हाला निघायला हवं ना ?? 


मिसेस पत्कीच्या या बोलण्यावर आदित्य आणि निशाने एकमेकांकडे पहिले. तेंव्हा आदित्यच्या आई म्हणाल्या, आता प्रॉब्लेम सुटल्या बरोबर लगेच जाण्याची गरज आहे का ?? हे ही तुमचेच घर आहे तेंव्हा अजून थोडे दिवस रहा ना. 


मिसेस पत्की : आता आग्रह करू नका. मला तो मोडता येणार नाही. पण आता आम्ही तिकडे गेल्यावर तुम्ही आणि आदित्य दोघांनीही घरी माझ्या घरी राहायला याय चे आहे आणि मी काहीही ऐकून घेणार नाही.


आदित्य : मिसेस पत्की तुम्हाला घरी जाण्याची ओढ लागली आहे मला कळतंय पण घराची वास्तू शांती केल्याशिवाय तुम्ही तिथे जाऊ नका असे सांगेन मी. म्हणजे आता त्या वास्तूत शाल्मली चा आत्मा वावरत नाही तरीही पुढे सगळ नीट होण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी वास्तू शांती गरजेची आहे असे मला वाटत. आता इतके दिवस इथे थांबलाच आहात तर अजून थोडे दिवस. एखादा चांगला मुहूर्त पाहून शांती करून घ्या आणि मगच जा. म्हणजे मलाही पुढे काळजी लागून राहणार नाही. 


मिसेस पत्की : आता तू म्हणतो आहेस तर वास्तू शांती करून घेऊया. पण इथे माझ्या ओळखीचे कोणी पंडित नाहीत. तूच तुझ्या ओळखीच्या पंडितांना फोन करून विचार आणि तसे सांग मला. आपण तसेच करुया. 


आदित्य : एका पंडितजीना फोन करतो आणि दोन दिवसांनी मुहूर्त असल्याचे सांगतो. त्यामुळे सगळ्यांच्या मताने दोन दिवसांनी मिसेस पत्की आणि निशा जाणार असे ठरते. त्यामुळे आदित्यचा चेहरा पडलेला असतो. त्याच्या आईच्या नजरेतून मात्र ते सुटत नाही. 


आदित्य : बरीच रात्र होऊनही आदित्यला झोप येत नसल्यामुळे तो गॅलरीत उभा असतो. निशा भेटल्या पासून आता पर्यंतचे क्षण त्याच्या समोरून जात होते. मॉल मध्ये झालेली पाहिली भेट, वास्तूत ला दोष मान्य न केल्यामुळे त्यांच्यात झालेले वाद, तिचा शाल्मली च्या खोलीत जाण्याचा हट्ट, तिला बांधून ठेवून भारावलेले घास, तिचे रागात लाल होणारे नाक, शाल्मलीला घाबरून रात्रभर कुशीत शिरून झोपलेली निशा, सकाळी उठून कॉफी आणून देणारी निशा. सगळे सगळे त्याला आठवून तो स्वतःशीच हसत होता. तेवढ्यात कोणीतरी त्याला म्हणते, एकटेच हसताय काय झालं आहे असे हसायला ?? या प्रश्नावर तो मागे वळून बघतो तर निशा तिच्या गॅलरीतून त्याला विचारत होती. तो हसून तिला म्हणतो, आहेत काही खास क्षण आयुष्यात जे आठवून चेहऱ्यावर येते हसू. 


निशा : हो का, म्हणून झोप लागत नाही का तुम्हाला ?? काय आहेत ते खास क्षण आणि कोणासोबत आहेत ?? विचारू शकते का मी पुन्हा नाक लाल करत निशा विचारते. 


आदित्य : हसू दाबत तो म्हणतो, का विचारायचे आहे तुम्हाला ?? आणि कोणत्या नात्याने विचारत आहेत तुम्ही मिस निशा ?? 


निशा : तुम्हाला सांगायचे नसेल तर जबरदस्ती नाही माझी खांदे उडवत निशा म्हणते आणि जायला वळते. 


आदित्य : पटकन तिला आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो, पण तू अजून जागीच कशी निशा ?? झोप लागली नाही का ?? की इथून जाणार म्हणून माझ्या आठवणीत झोप उडाली तुझी ?? तिच्याकडे रोखून बघत आदित्य विचारतो. 


निशा : नजर चोरत इकडे तिकडे बघत निशा मनात म्हणते याला कसे माझ्या मनातले समजले ?? खरच मन कवडा आहे की काय ?? समोर आदित्य हात हलवत तिला भानावर आणतो तशी ती म्हणते, सहजच आले होते गॅलरीत जरा गार वारा घ्यायला. बाकी काही नाही. आता मला झोप येत आहे मी जाते गुड नाईट. 


आदित्य : तिला जाताना पाहून हसत असतो.


दुसऱ्या दिवशी आदित्य आणि निशा गाडीत ऑफिसमध्ये निघालेले होते. दोघेही एकदम शांत होते कोणीच कोणाशी काही बोलत नाही. बघता बघता निशा च्या ऑफिस समोर गाडी येऊन उभी रहाते, तशी निशा त्याला विचारते गाडी का थांबवली. तेंव्हा आदित्य बाहेर हात करून म्हणतो, आल् तुमचं ऑफिस मॅडम बघा जरा बाहेर. निशा बाहेर बघते आणि जायला लागते तसा आदित्य तिला हाक मारून थांबवतो आणि म्हणतो, निशा परवा तू इथून तुझ्या घरी जाणार आहेस. नाही म्हणजे तुला तुझ्या राहायचे होते आणि तुझे स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला आनंदच आहे पण इतक्या दिवसात तुझ्या असण्याची सवय झाली आहे त्यामुळे तू गेल्यावर आईला आणि मला घर खायला उठेल. तर मी अस म्हणत होतो, म्हणजे बघ तुझी हरकत नसेल तर तुझा उद्याचा पूर्ण वेळ मला देशील ?? म्हणजे ऑफिसमध्ये न जाता माझ्या सोबत बाहेर येशील ?? 


निशा : त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते आणि म्हणते, नाही नको. त्यापेक्षा काल खास व्यक्ती सोबत घालवलेले क्षण आठवून हसू येत होते ना तिलाच घेऊन जा तुम्ही तुमच्या सोबत. असे म्हणून ती गाडीचे दार उघडते तेवढ्यात तिचा हात धरुन आदित्य पुन्हा तिला थांबवत म्हणतो, 


आदित्य : त्या खास व्यक्तीलाच तर विचारत आहे मी. एकदा ती हो म्हणाली की मग उद्याच प्लॅनिंग करता येईल ना ?? 


निशा : म्हणजे, ती खास व्यक्ती मी आहे का ?? 


आदित्य : अर्थात, पण काल मी खास व्यक्ती बद्दल सांगितले म्हणून तू माझ्यावर चिडून गाडीत काहीच बोलली नाहीस का ?? आणि म्हणूनच माझ्या सोबत यातला आढे वेढे घेत होतीस ?? 


निशा : हात सोडवून घेत,मला जायला उशीर होत आहे आपण संध्याकाळी बोलू. 


आदित्य : हातची पकड घट्ट करत, आधी हो की नाही सांग मगच सोडेन मी तुला. 


निशा : ठीक आहे जाऊया उद्या आपण खाली मान घालुन लाजत म्हणते आणि हात सोडून घेऊन निघून जाते. 


आदित्य : काय लाजते यार ही मुलगी. उद्याच्या दिवसाची वाट बघतोय मी. 


क्रमशः

🎭 Series Post

View all