Login

संकेत भाग एकवीस

कथा मालिका

संकेत भाग एकवीस : 


आदित्य आणि निशा मिसेस पत्की आणि आईचा आशिर्वाद घेऊन आश्रमात निघाले. आश्रमात रखमाबाई आदित्यचीच वाट पहात होत्या. त्यांना बोलवायला आदित्य आणि निशा खोलीत आले, तर तिथे त्यांनी शालमलीचा एक फोटो लावला होता आणि थोड्या अंतरावर सदानंदचा फोटो लावला होता. त्यांची रूम छोटीच पण नीट नेटकी होती. जवळ काहीच सामान न घेता त्या निघायला तयार झाल्या. सामानाची गरजच काय होती म्हणा. निघताना त्यांनी स्वतः लावलेली झाडे बघताना मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आले. निशाला मात्र त्यांना पाहून राग आला होता पण आदित्यने डोळ्यांनीच शांत राहायला सांगितल्यमुळे ती शांत राहिली होती. आज आदित्य साठी खूप महत्त्वाचा दिवस होता. आज तो केसच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने पुढे पाऊल टाकणार होता, त्यासाठी त्याने सखा तुकाला तिथे आधीच बोलावले होते. निशा च्या घरापुढे गाडी थांबली तशी निशा बाबांच्या आठवणींत भावनिक झाली. आदित्यने तिचा हात घट्ट दाबून तिला आधार दिला. सगळेच आज शाल्मलीच्या म्हणजेच आताच्या निशाच्या खोलीत प्रवेश करणार होते. सगळे घरात आले तसे आदित्य म्हणाला, रखमाबाई आधी आम्ही म्हणजे सखा, तुका आणि मी खोलीत जाऊ. आम्हाला तिघांनाही आत्मा शांत करणारे काही तंत्र, मंत्र माहीत आहेत. आम्ही गरज पडल्यावर ते म्हणुच पण आधी आपल्या समोर शाल्मली येऊन तिला काय वाटतं ते बोलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आधी तिला येऊदे. मग ती काय म्हणते त्यावर आपण सगळं ठरवू पण निशा तू आणि रखमा बाई तुम्ही बाहेरच थांबणार आहात आणि निशा ही माझी ऑर्डर आहे असच समज. तुला आठवत ना तू मागे रूममध्ये जाण्याचा हट्ट केला होता तेंव्हा मी काय केले होते ?? आज मला केस वर फोकस करायचे आहे त्यामुळे प्लीज मला तिथे लक्ष देऊ दे. आदित्य विनंती पूर्वक पण आवाजात करारी पण ठेवून निशाला सांगत होता आणि त्याची नजरच इतकी जरब देणारी होती की आज चुकूनही चूक करणार नव्हती निशा. 


सगळे वर जात होते, एक एक पायरी चढत होते तसे निशा बिचारी देवाचा धावा करत होती तिच्याही नकळत. तिची नजर रखमाबाईवर गेली तर त्याही घाबरलेल्या अवस्थेत होत्या, साहजिकच होते शेवटी, त्याच तर गुन्हेगार होत्या आणि आज शाल्मलीकडून त्यांना शिक्षा मिळणार होती. आदित्य खूप कॉन्फिडन्स होता आणि हळू हळू पण सावध पणाने पाऊले टाकत होता. शेवटी सगळे रूमच्या दाराशी येऊन थांबले तसे आदित्यने निशा आणि रखमा बाईना खुणेनेच थांबायला सांगितले, आधी सखा तुका आत गेले आणि आदित्य खोलीत जाणार तेवढ्यात निशाने त्याचा हात घट्ट पकडला आणि साशृत् डोळ्यानी त्याच्याकडे पाहिले. आदित्यने हसून तिला डोळ्यांनीच काहीही होणार नाही असे सांगितले आणि तो आत गेला.


रूम बऱ्याच दिवसांनी उघडल्या मुळे दाराचा कर् कर आवाज झाला, तिघेही पुढे गेले. काही क्षण स्तब्ध शांतता पसरली होती खोलीत, पण काहीच क्षणात खोलीत खूप वारा सुटला आणि चित्र विचित्र आवाज येऊ लागले. कधी रडण्याचे तर कधी हसण्याचे तर कधी किंचाळण्याचे. आवाज इतके भयानक होते की रखमा बाईने घाबरून निशाचा हात घट्ट धरला तशी निशा दचकली आणि म्हणाली आता घाबरून काय फायदा रखमा बाई ?? तेंव्हाच घाबरला असता तर आज कोनावरच हि वेळ आली नसती. पुन्हा मोठा आवाज झाला तशा दोघी शांत झाल्या. रूम मध्ये एक अक्राळ विक्राळ सावली आदित्य आणि त्याच्या स्टाफला दिसली. शाल्मली भल्या मोठ्या अक्राळ विक्राळ रूपात होती अजूनही ती पूर्ण पने आदित्य समोर आली नव्हती. आदित्य तिच्या समोर येण्याची वाट बघत होता. शाल्मली खूप चिडली होती तिने सखा वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसा त्याने एक मंत्र म्हटला आणि तो सेफ राहिला. ते पाहून आदित्य म्हणाला, शाल्मली तू आमच्या समोर ये. पण तिचे नाव ऐकून ती जास्तच चवताळली आणि आता तिने आदित्य वर झडप घालण्याचा प्रयत्न केला तसे आदित्य ने पटकन राधा कृष्णाची मूर्ती तिच्या समोर धरली आणि तिथेच ठेऊन दिली. मग मात्र तिच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज यायला लागले. तेंव्हा आदित्य पुन्हा म्हणाला तू समोर ये शाल्मली, तू कोण आहेस आणि अशी आत्मा का झाली आहेस हे मला माहीत आहे. तुझ्या बद्दल मला सगळे काही समजले आहे, तुझी डायरी खाली स्टोर रूम मध्ये होती ती मी वाचली तेंव्हा तू समोर आलीस तर बरे होईल. 


आता खोलीत भयाण शांतता पसरली आणि थोड्याच वेळात वाऱ्याच्या झोकात शाल्मली समोर उभी राहिली. आता मात्र तिचे रुप म्हणावे तितके भयानक नव्हते. अंगावर पांढरी साडी, लांब काळे घनदाट केस, सडपातळ बांधा. अशाही परिस्थितीत ती आदित्यला खरंच खूप सुंदर भासली. तिचे सौंदर्य पाहून तो नकळत तिला बोलून गेला, शाल्मली तू खूप सुंदर दिसतेस. म्हणजे आता तू या जगात नाहीस हे मला माहीत आहे पण तरीही माझ्या विनंतीला मान देऊन तू समोर आलीस त्याबद्दल खरंच तुझा आभारी आहे. तुझे सौंदर्य डायरीत वाचले होते पण आज प्रत्यक्ष पाहून त्यातील शब्द तोडके वाटत आहेत. आता त्याचा काय उपयोग, मी तर जीवंतपणी आणि मेल्यावर ही त्रासच भोगला आहे. शाल्मली खेदाने हसून म्हणाली. ही मला माहीत आहे सगळे, तुझी डायरी वाचून समजले मला पण जे झालं ते तर मी बदलू शकत नाही पण तुला या त्रासातून सुटका देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तू कोण आहेस आणि या भानगडीत तू का पडलास ??


मी आदित्य. वास्तूशास्त्र अभ्यासक आणि ज्योतिषतज्ञ. या घरात जे लोक राहतात त्यांनी मला या वास्तूत दोष असल्याचे सांगितले होते आणि या घरात राहणारी निशा तिला ही तू एकदा दिसली होतीस सावली रुपात. त्यामुळे मी याचा अभ्यास करण्यासाठी इथे आलो तेंव्हा तुझी डायरी मिळाली आणि सगळ्याच प्रश्नाची उत्तरे पण. आदित्यच्या बोलण्यावर शाल्मलीच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले आणि ती पुन्हा चिडली. तिचे डोळे आता आग ओतत होते. अचानक तिचा आवाज घोगरा झाला आणि ती म्हणाली माझा छळ करणाऱ्या कोणालाच मला सोडायचे नव्हते पण सद्या आणि ती थेरडी सुटली. मला त्यांना छळून छळून मारायचे होते. ज्या सद्यावर मी प्रेम केले त्यानेच माझा विश्वास घात केला आणि मला मरण यातना दिल्या. 


शाल्मली तुझा आणि तुझ्या घरच्यांचा काहीच दोष नसताना तुम्हा सगळ्यांना खूप सहन करावे लागले पण जे झालं त्याचा सदानंद ला पश्चाताप झाला होता आणि त्यातच तो मेला. ही बघ त्याने लिहलेली डायरी, यात त्याने शेवटपर्यंत तुझी माफी मागितली आहे. त्याने ती डायरी शाल्मली समोर धरली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिने ती डायरी डोळ्यांनीच फेकून दिली. आदित्य वर चिडून ती म्हणाली आता त्याचा काय उपयोग आदित्य ?? मला झालेल्या यातना त्याने कमी होणार नाहीत. खरतर अजून तो तरफडेला पाहिजे होता पण मरणाची रोज भीक मागत होता तो माझ्याकडे. मी रोज त्याला मेल्यानंतरही छळत होते. त्याच्या स्वप्नात जात होते त्याच्या चुकांची जाणीव करून देत होते त्याचा गळा दांबत होते, सुरीने वार करत होते आणि शेवटच्या क्षणी सोडून देत होते. पण त्याला हे सहन झाले नाही आणि तो मेला. त्याला झालेला त्रास बघून थेर डी रोज रडत होती आणि मला आनंद होत होता. थेरडीच्या स्वप्नात जाऊन पण मी हेच केलं पण तीला मी मारलं नाही. मला प्रत्येक्षात तिला मारायचे होते आणि ती येणार याची खात्री होती मला. 


मी तिला घेऊनच आलो आहे शाल्मली, आदित्यच्या या बोलण्यावर शाल्मलीच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य आले आणि तिने डोळ्यांनीच पुन्हा दरवाजा उघडला आणि एका सेकंदात दारात जाऊन उभी राहिली. समोर निशा आणि रखमा बाई उभ्याच होत्या.  


तिने रखमा बाईना पाहिले आणि तिचे सौम्य रुप पळून कुठल्या कुठे गेले. तिचे केस विस्कटलले, चेहऱ्यावर क्रूर हास्य, डोळ्यात अंगार, हातांची नखे वाढलेली आणि जीभ बाहेर काढून काढलेले भयानक आवाज. निशा तिथल्या तिथे थंड पडली. रखमा बाई तिला पाहून मटकन खाली बसल्या तर आदित्य त्याच्या स्टाफ सोबत दारात उभा होता. दारातूनच शाल्मली ने हात पुढे केला आणि रखमा बाई ला ओढून घेतले पण रखमाबाईने निषाचा हात पकडून ठेवल्यामुळे ती पण आत ओढली गेली. रखमा बाई दार उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली तशी शाल्मली खूप जोरात हसली आणि पूर्ण रूम त्या आवाजाने सगळेच हादरून गेले अगदी आदित्य पण. 


रखमा बाई शाल्मली समोर बसून हात जोडून माफी मागत होती तशी शाल्मली क्रूर हसून जास्तच चिडत होती. आदित्यला पुढे काय होणार याची कल्पना आली होती. शाल्मली ने डोळ्यांनीच रखमा बाईना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फेकून दिले. ती बिचारी वयस्कर म्हातारी एकाच हेलकाव्यात खाली पडली आणि तिच्या हाडांचा खिळखिळा झाला. इतका की त्यांचा आवाज आदित्य निशाला ऐकू आला. रखमा बाई खूप तळमळीनं ओरडली तशी शाल्मली पुन्हा हसली आणि तिने हाताच्या इशाऱ्याने रखमा बाईना वर धरले. शाल्मलीची नजर रखमा बाईना सहन होईना इतका राग होता तिच्या डोळ्यात. का केलंस असं थेरडे, कसला सूड उगवला तू ?? आणि ते ही काहीच कारण नसताना. तुझ्या पापांची शिक्षा माझ्या सगळ्या कुटुंबाने भोगली. पण तुला मी इतक्या सहज मरण देणार नाही. तू भीक मागितली तरीही नाही. माज चुकल शाल्मली मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायला पाहिजे आणि ती मिळाली पण आहे. सद्याने मला आई म्हणून नाकारलं, तिरस्कार केला माझा. तुला तर सगळच माहीत आहे. पण तू आता माझा अंत बघू नको, मला लवकर मोकळीक कर शाल्मली, रखमा बाई च्या या बोलण्यावर शाल्मली कुत्सित हसली आणि तिने रखमा बाईना भिरकावून दिलं. तशा त्या भिंतीला आपटलस आणि जोरात खाली पडल्या. त्यांची कसलीच हालचाल होत नव्हती पण श्वास तेवढा चालू होता. शाल्मली पुन्हा तिच्या जवळ गेली आणि लाथा मारू लागली. तेंव्हा आदित्य मध्ये पडला आणि म्हणाला, बास कर शाल्मली तुझा सूड पूर्ण करून घे. जरा तरी माणुसकी दाखव. त्यांची अवस्था बघ. त्या चुकीच्या वागल्या आणि त्यांच्या कर्माची फळं त्यांनी भोगली. सदानंदने पण आणि रखमाबाईनेही. आता काहीही झालं तरी तुला झालेला त्रास त्याने कमी होणार नाही. त्यांना मोकळं कर आणि तू ही मोकळी हो. 


शाल्मली मात्र अजूनही रागात च रखमा बाईना बघत होती. शेवटी आदित्यने तिच्या समोर पुन्हा राधा कृष्णाची मूर्ती धरली आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती शांत झाली नाही, याने तर माझी कसलीही मदत केली नाही आदित्य. काय चुकल होत माज ज्याची इतकी मोठी शिक्षा याने मला दिली ?? मी वेळोवेळी याचा धावा केला आणि याने मात्र माझा त्रास वाढवला. आता मला कोणीही थांबवू शकत नाही आणि कोणी तसा प्रयत्न ही करू नये, तिच्या शेवटच्या वाक्यात खूप धार होती. त्याने आदित्यही एक पाऊल मागे आला. शाल्मलीने एक वेळ रखमा बाई कडे पाहिले आणि हातातून कसली तरी शक्ती तिच्यावर फेकली तशी रखमा बाई पुन्हा ओरडली आणि बऱ्याच वेळाने शांत झाली. रखमा बाई मेली तशी शाल्मली ने डोळे मिटून घेतले आणि ती खूप रडली. आता त्या खोलीत निशा, आदित्य आणि सखा तुका होते. 



क्रमशः

🎭 Series Post

View all