संकेत भाग वीस :
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आदित्य तयार होतो आणि सखा तुकाला फोनवर बोलत खाली येत असतो. निशा नाश्ता करत असते, खाली नाश्त्यासाठी बसत तो म्हणतो, मला माझ्या माणसांनी दोन आश्रमाचे पत्ते दिले आहेत. मी आज तिकडे जाऊन रखमा बाईची चौकशी करून येतो. पण निशा आज तू इथेच थांब ऑफिसला जा संध्याकाळी मी तुला घ्यायला येतो आणि काय झालं ते सांगतो. आज निशा हट्ट न करता त्याच सगळं ऐकते आणि जाताना ऑफिसमध्ये सोडायला सांगते. तसे आश्चर्याने आदित्य मान हलवतो आणि दोघेही बाहेर पडतात.
आदित्य : आज तू काहीच वाद न घालता माझे कसे ऐकलेस निशा ?? निशाकडे बघत विचारतो.
निशा : काल घरी आल्यावर ऑफिसचा मेल आला होता त्यात आज मीटिंग असल्यामुळे सगळ्यांनी हजर रहाणे गरजेचे आहे असे लिहला होते त्यामुळे तसंही आज मला मीटिंगसाठी जाणे गरजेचे होते. उरला प्रश्न आज काय होईल याचा तर तू आल्यावर मला सगळं संगाशिलच ना ??
आदित्य : ओह त्यामुळे तू आज शांत राहिलीस. नाहीतर मला शंका आलीच होती आज सूर्य पश्चिमेला उगवल्याची. आदित्य हळूच पुटपुटतो.
निशा : तू काही म्हणालास का ?? निशा नाक लाल करत विचारते तसा आदित्य नाही कुठे काय म्हणत तोंड फिरवतो आणि तिला ऑफिसमध्ये सोडुन आश्रमाच्या दिशेने गाडी वलवतो.
आदित्य : आधार आश्रमाच्या बाहेर गाडी येऊन थांबते आणि आदित्य चौकशीसाठी ऑफिसमध्ये जातो. तिथे चौकशी केल्यावर आश्रमाच्या बाहेरील बाजूस एका खोलीत रखमाबाई असल्याचे त्याला कळते. तो त्या खोलीत वाकून बघतो पण तिथे कोणीच त्याला दिसत नाही. तो इकडे तिकडे नजर फिरवतो तसे एका झाडाखाली कोणीतरी बसल्याचे त्याला दिसते. तो तिथे जाऊन बघतो, तर सत्तर पंचाहत्तर वर्षाची वयस्कर बाई तिथे काही झाडे लावताना त्याला दिसते. तो आजी म्हणून हाक मारतो, तसे त्या बाई वर बघतात तर त्या रखमा बाई असतात.
आदित्य तिथेच त्यांच्या शेजारी बसून स्वतःची ओळख करून देतो आणि का आला हे पण सविस्तर सांगतो.
रखमा बाई : बरं झालं पोरा तू आलास. मी हित आल्यापासून वाटच बघत होते कधी कोण शाल्मलीसाठी मला न्याय द्यायला येतंय ह्याची. तुला तर सगळच माहीत आहे आता मला काय करायचं आहे ते सांग मी करीन ते. पण मला आता मोकळं कर बाबा.
आदित्य : रखमाबाई तुम्ही आता खूप थकला आहात आणि मरणाची वाट बघत आहात हे कळतंय मला. पण तुमचं वय झालं म्हणून तुम्ही चूक कबूल करत आहात की खरंच मान्य आहे तुमची चूक तुम्हाला ?? आणि तुम्ही इथे आश्रमात येण्याचे कसे ठरवले ???
रखमा बाई : चूक झाली हे वयान नाही तर पोराच्या वागण्यानं दाखवून दिलं मला पोरा. मी लहापणापासून लय गरिबी भोगली. आई बापाच्या घरात दोन वेळा जेवायला मिळत नव्हत कधी. त्यात आम्ही सहा बहीनी. जड झाल्यागत बापानं चौकशी न करता येतील त्या ठिकाणी दिल्या. माझा नवरा हनुमंत काम करून पैसा मिळवत होता. चार घास खाऊन सुखी होतो आम्ही. पण त्याला पैशाची हाव सुटली. मी त्याला वाईट मार्गानं पैसा कमवू नको म्हणून लय समजून सांगितल पण त्यानं माज एकल नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. त्याची हाव त्याच्या अंगाशी आली आणि तो त्यात अडकून जेलमध्ये गेला. त्याला सोडवण्यासाठी मी शाल्मलीच्या बापाचे पाय धरले आणि त्याला सोडवले पण तेंव्हा पेपरात बऱ्याच बातम्या छापून आल्या आणि खर काय खोटं काय मला बी समजना. मी माझ्या नवऱ्याला विचारलं आन त्यानं मला तो चुकीचा असताना बरोबर हाय अस सांगून माझा केसान गळा कापला. म्हणूनच मी शाल्मलीच्या दारात जाऊन त्याला, त्याच्या सगळ्या घरादाराला शिव्या शाप घातले. पण पूना माझ्याच नवऱ्याला त्याच्या पापाची लाज वाटली आणि त्यानं आत्महत्या केली. लहान वयात मी विधवा झाले आणि पदरात पोराची जबाबदारी पडली. सगळ्या गावाने माज जगणं अवघड करून टाकलं. मला काय करावं सुचतच नव्हत. शेवटी एके दिवशी माझ्या सद्या न पेटी बघितलेच आणि तो चवताळून उठला. त्याच वेळेला शाल्मलीच्या बापाला मारायला निघाला होता पण म्याच त्याला समजावंल आन शांत राहायला सांगितलं. पण त्याच वेळेला मी समद त्याला सांगायला पाहिजे होत पण म्या तास नाही केलं. नवरा मेलेला असताना अन एक पोरं पदरात असताना एकट्या बाईच जगणं माझ्या नशिबी आल. ह्यात चूक कोणाची नव्हती पण माझ्या नवऱ्याची होती आणि त्याची पाप आम्ही फेडत होतो. शेवटी माझ्यातली सैतान जागा झाला आणि मी साद्याच्या मनात राग निर्माण केला. पण जेंव्हा माज्या पोरान मलाच झिडकारल तेंव्हा केलेल्या चुका ध्यानात आल्या. पण वेळ निघून गेली होती पोरा. समद संपल होत. माज पोर माज राहील नाही आणि माझ्या डोळ्यादेखत त्याला मरताना बघून म्या काय बी करू शकले नाही.
सद्या मेला अन् मी ते घर सोडलं. सद्याच्या आजारपणात ह्या आश्रमाबद्दल ऐकलं होत म्हणून मग हितच राहायचं ठरवलं. आता मला मरण पाहिजे आणि ती फक्त शाल्मलीच देईल बघ मला. म्हणून तू घेऊन चल मला तिकड.
आदित्य : हम मी त्यासाठीच आलो होतो पण तुम्ही इतक्या सहज सगळ मान्य कराल अस वाटलं नव्हत.
रखमा बाई : सद्याचा राग सहन केला, त्याच मरण बघितल अन् त्याची अवस्था बघून माज काय होणार त्याची जाणीव झाली. आता त्यासाठीच सहन करण्याची ताकद मागत आहे. आदित्य त्यांचा निरोप घेऊन निघतो.
आदित्य : मी तुझ्या ऑफिस बाहेर उभा आहे लवकर ये मी घरी चाललो आहे एकत्रच जाऊ आदित्य निशाला फोन करून सांगतो.
निशा : पाचच मिनिटात खाली येऊन आदित्यच्या गाडीत बसते पण त्याचा चेहरा त्याचा मुड चांगला नाही हे लगेच सांगतो आणि काहीच न बोलता ती गुपचूप गाडीत बसते. आदित्य रस्त्यात तिला काहीच बोलत नाही. घरी येऊन सरळ तो त्याच्या खोलीत जातो. रात्र झालेली असते पण आदित्य बाल्कनीत उभा राहून विचारात मग्न असतो. निशा त्याच्या मागे जाऊन उभी राहते पण ते ही त्याला समजत नाही. निशा त्याला आवाज देते तसा तो मागे वळून बघतो आणि म्हणतो अरे निशा, तू आता इथे ? झोपली नाहीस अजून ??
निशा : नाही झोपले. तुला आश्रमातून आल्या पासून बघते तर तू खूप अपसेट आहेस. गाडीत माझ्याशी एकही शब्द बोलला नाहीस, नीट जेवला नाहीस आणि आताही न झोपता कसल्यातरी विचारात मग्न होतास. मी कधीची तुझ्या मागे येऊन उभी होते पण तुला ते समजले पण नाही. काय झालं आहे सांगणारेस का ??
आदित्य : अग काही विशेष नाही. आज मी गेलो होतो ना आश्रमात तिथे मला भेटल्या रखमा बाई मला लगेच आणि विशेष म्हणजे त्या यायला तयार झाल्या लगेच माझ्या सोबत तुझ्या घरी.
निशा : पण मग तू इतका उदास का आहेस ?? तुला तर आनंद व्हायला हवा ना ??
आदित्य : हो झालाच आहे मला आनंद.
निशा : पण तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगत आहे आदित्य.
आदित्य : अग प्रवासाने थकलो आहे ना त्यामुळे तुला तसे वाटत असेल बाकी काहीच नाही तो बेडवर बसत म्हणतो.
निशा : त्याच्याजवळ बसते आणि म्हणते माझ्याकडे बघ आदित्य. पण आदित्य तिची नजर चोरतो हे तिच्या लक्षात येते आणि स्वतःच्या ओंजळीत त्याचा चेहरा पकडुन ती त्याला पुन्हा म्हणते, माझ्याकडे बघ आदित्य आणि मग बोल.
आदित्य : आता आदित्य निशाला खोट बोलू शकत नाही,तो म्हणतो का कोणास ठाऊक निशा पण मला खूपच उदास वाटत आहे. खरतर हे प्रत्येक केसच्या वेळीच होत माज पण आज जरा जास्तच उदास झालो मी. तिचे हात हातात घेत म्हणतो, आज रखमाबाईना भेटून त्यांच्याशी सगळे बोललो त्यांना झालेला पश्चात्ताप ऐकून घेतला मी. मला वाटल नव्हत त्या इतक्या लवकर चूक कबूल करून आपल्या सोबत येतील. म्हणजे त्या तिथे आल्यावर शाल्मली त्यांना मारून आपला बदला पूर्ण करणार यात शंका नाही. त्याशिवाय तिचा आत्मा शांत होणार नाही पण याची कल्पना असूनही त्या लगेच यायला तयार झाल्या. त्यांची अवस्था मला बघवत नव्हती. डोळे रडून रडून कोरडे पडले होते, कसलेही अश्रू डोळ्यात नव्हते, कसलीही जगण्याची इच्छा नव्हती. शाल्मली साठी कोणीतरी कधी शोधत येतो आणि आपल्याला घेऊन जातो याचीच वाट पहात होत्या त्या. किती अवघड असते ना निशा हे असं मरणाची वाट बघत जगणं ?? म्हणजे सदानंद काय किंवा आता त्याची आई रखमा बाई काय ?? त्यांच्या हातून झालेल्या चुका त्यांना किती महागात पडला ना ??
निशा : त्या चुका नव्हत्या गुन्हा होत्या आदित्य. त्यात एकटी शाल्मली नाही तर तिचे सगळे कुटूंब मरण पावले आणि शेवटी गुन्हेगार जीवंत राहिला. जरा तिचाही विचार कर ना. आज मरूनही तिचा आत्मा भटकत आहे त्याच खोलीत गेली कित्येक वर्षे. तिला मुक्ती तर मिळवून द्यायलाच हवी आणि त्यासाठी रखमा बाई मरायलाच हवी ना. तरच तिचा सूड पूर्ण होईल ना ?? मला कळतंय तुला आज रखमाबाईकडे बघून खूप वाईट वाटले आणि सद्यला बघून पण तुझी अशीच अवस्था झाली होती पण त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागली आणि लागणार. त्याला आपण काहीच करू शकत नाही.
आदित्य : हम खरंय तू म्हणतेस ते पण मला उदास वाटलं खूप रखमा बाई ना भेटून. असो तू जा आणि झोप आता खूप उशीर झाला आहे.
निशा : झोप येईल ना तुला ?? की थोपटत झोपवू ?? आदित्यचा मुड चांगला करण्यासाठी निशा म्हणते.
आदित्य : तुझी काहीच हरकत नसेल तर मला धावेल तू थोपटले तर आदित्य तिच्या डोळ्यांत बघून म्हणतो तशी ती त्याला पाठीत मारते आणि झोपायला जाते.
तिला जाताना पाहून आदित्य ही हसत झोपी जातो.
सकाळी आदित्य वर्क आऊट करत असतो तेंव्हा त्याची आई तिथे येते.
त्याच्या समोर त्याचा वर्कआऊट बघत बसते. आदित्यचे आईकडे लक्ष जाते आणि तो तिथून सरळ आईच्या मांडीवर डोकं टेकून झोपतो.
आई : काय रे आदी काल खूप अस्वस्थ होतास तू. जेवला नाहीस आणि झोपला पण नव्हतास. काल आले होते मी तुझ्या खोलीत पण निशा समजावत होती तुला म्हणून आत आले नाही. मला समजल होत काल तू त्या रखमा बाईना भेटून उदास झाला होतास ते आणि आजवर सगळ्या केस सोडवताना हेच होत तुझ पण काल निशा होती तुला समजून घ्यायला. म्हणून मग मी फार लक्ष घातले नाही पण आज बघावं म्हटल बरा आहेस की नाही. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई बोलत होत्या.
आदित्य : हो ग आई, पण काल तू यायचं होतस ना. काल निशाने समजून घेतलं आणि सांगितल मला पण जरा अस्वस्थ झाल्यामुळे झोप येत नव्हती. पुन्हा तिच्याशी बोलून मोकळा झालो आणि छान झोप लागली. म्हणूनच उठून व्यायाम करत होतो.
निशा : गुड मॉर्निंग. झाली का झोप नीट आदित्य ?? रूममध्ये येत निशाने विचारले. तिथे आई आहेत हे तिला माहीतच नव्हतं. त्यांना पाहून ती जरा अवघडली तसे आई म्हणाल्या,अग तू कशाला कॉफी करत बसलीस ?? मला सांगायचं मी केली असती बाळा.
अहो त्यात काय काकू, मी केली तर कुठं बिघडल. तेवढाच तुम्हाला आराम. मी सगळ्यांसाठीच केली होती, पण तुम्ही खोलीत नव्हता म्हणून मग आदित्य साठी घेऊन आले. थांबा मी तुमची कॉफी इथेच घेऊन येते.
आई : अग निशा थांब, मी खाली जातच होते तेवढ्यात तू आलीस. तू बस इथे कॉफी पित गप्पा मार मी खाली तुझ्या आई सोबत कॉफी घेते, चल उठ रे आदी, त्याला मांडीवरून उठवत त्या म्हणाल्या आणि खाली निघून गेल्या.
आदित्य : काय मॅडम आज सकाळी सकाळी लवकर उठून चक्क माझ्यासाठी कॉफी करून आणलीत तुम्ही ?? काय विचार काय आहे ??
निशा : विचार काहीच नाही काल तू उदास होतास म्हणून तुझा मुड चांगला करण्यासाठी मी घेऊन आले कॉफी. पिऊन बघ कशी झाली आहे आणि सांग मला.
आदित्य : कॉफीचा एक घोट घेत, खूपच छान झाली आहे कॉफी. आणि खरंच आता खूप चांगलं वाटत आहे मला.thank you मॅडम.
निशा : अरे काल तू रखमा बाईना घेऊन आलास की तिथेच आहेत त्या आश्रमात ?? मी काल विचारायच विसरून गेले.
आदित्य : त्या तिथेच आहेत आश्रमात. त्यांना घेऊन येणार होतो कालच पण मग त्यांना आणून ठेवायचे कुठे हा प्रश्न होता म्हणून त्यांना संगितले उद्या घेऊन जाईन म्हणून.
निशा : पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू आदित्य ??
आदित्य : पुढे काय ?? आता तुझ्या खोलीत मी रखमा बाई घेऊन जाणार, तिथे शाल्मली त्यांना पाहून येईल आणि सूड पूर्ण करेल. त्यानंतर मात्र तिला मुक्ती मिळायला हवी. तशी तिला विनंती करेन म्हणजे बघू काय होत ते.
निशा : आणि तिने ऐकलं नाही तर ??
आदित्य : असे होणार नाही निशा. तिचे काम झाल्यावर ती निघुनच जाणार आणि तसे झाले नाही तर मात्र काहीतरी शक्ती वापरून, मंत्राची ताकद वापरून तिला तिथून जायला भाग पाडावे लागेल. पण तू तिथे येऊ नकोस.
निशा : का नको येऊ मी तिथे. मला आता भीती वाटत नाही तिची. मला बघायच आहे पुढे काय होत आणि प्लीज तू असशील ना तिथे मग काय भीती ??
आदित्य : मला छान वाटलं तुझा माझ्यावरचा विश्वास बघून पण तरीही निशा तुला तिथे येण्याची गरज नाही ऐक माज.
निशा : आदित्य प्लीज उगाच शेवटच्या क्षणी असा हट्ट करू नको. मला काहीही होणार नाही.
आदित्य : ठीक आहे जशी तुझी इच्छा. मी सोबत सखा तुका ला घेणार आहेच बघुया काय होत ते. नीघुया आपण थोड्या वेळात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा