Login

सौभाग्यवती भवं

सौभाग्य वती भवं

सौभाग्यवती भव
आपल्या इथं सुवसिनी ने थोरा मोठ्या ना वाकुन नमस्कार केल्यास तिला आशीर्वाद दिला जातो "सौभाग्यवती भव". अर्थात सर्व जण अगदि हाच आशिर्वाद देतात असे नाही,पण बहुतेक वेळा हाच आशिर्वाद दिला जातो .हा आशिर्वाद देणे खरया  अर्थाने परिपूर्ण आहे का?? सुवासिन स्त्रियांना फक्त त्यांचा पतिंना दीर्घायुष्य मिळो किवा त्यांन सुहागण मरण येवो ही एकच इच्छा असते का?? बहुतांश स्त्रियांची असेलही. परंतु जरा वेगळ्या पद्धतीने विचार करुन त्या स्त्री ला जर,' नेहमी खुप खुश रहा, सदैव हसतमुख रहा, सुखाचा संसार कर. ' असे बरेच शुभाशिर्वाद दिल्याने त्या स्त्री ला स्वत:साठी ही दुवा मिळेल. व या सर्व दुवा मध्ये तिच्या सौभाग्या साठी ही दुवा मिळतेच की कारण एखादी स्त्री तिचा पती सोबत असेल म्हणुन ती खुश असते. परंतु आपल्या समाजात आजही बर्याच स्त्रियां पतींच्या  व्यसनमुळे किवा अजून काही करणास्त खुपच दुःखी असतात.संसार करताना रोजच अश्रु ढाळतात. काही पती तर बाहेर अनैतिक संबंध ठेवतात. अशा परिस्थितीत "सौभाग्यवती भव"असा आशिर्वाद दिल्यावर तिला खरच आनंद मिळेल का? किवा हाच आशिर्वाद देणे खरंच जरुरी आहे का? या ऐवजी आपण या आशिर्वादच्या सोबत  दुसरे अनेक शुभाशिर्वाद दिले तर काय  कमी पडेल का????
     असा विचार केल्यास त्या  स्त्री ला तिच्या सौभाग्यसोबतच तिचा स्त्रित्वा साठी ही काही आशिर्वाद मिळेल आणि कळत नकळत तिच्या मनातील काही सुप्त ईच्छाचीही पुर्तता होईल.

लेखिका:  सौ. राजेश्री मराठे .